मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
संसदेत नाही । फिरकले पायी । महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।। जुने मढे सारे । काढिले बाहेरी । नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।। एपस्टिन यादी । येईल बाहेरी । हीच भीती उरी । दाटलेली ।।३।। शिक्षण, बेकारी । तशी महागाई । बोलणेच नाही । विषयांवर ।।४।। आत्महत्या करी । राजा शेतकरी । जंगले व्यापारी । लुटविती ।।५।। निवडणुकीवेळी । गोड गोड बोली । वचनांची झोळी । रिकामीच ।।६।। सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव । जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।। संसदेचा वेळ । वायाचि गेला हा । 'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।

वाचने 1716 वाचनखूण प्रतिक्रिया 26

In reply to by गणपा

मिसळपाव Mon, 02/16/2026 - 00:25
चक्क बल्लवाचार्य गणपा??? मित्रा, अरे अधनं मधनं तरी पाकृ टाकत जा. मान्य आहे की मी एकही ट्राय नाही केली. पण तुझ्या नीटनेटक्या पाकॄ वाचायचा / बघायचा काय मझा असतो यार. तब्येतपाणी, घरची मंडळी खुशाल?

In reply to by मिसळपाव

मिसळपाव Mon, 02/16/2026 - 00:26
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

अभ्या.. Sun, 02/15/2026 - 15:12
अहाहा, . बुडताचि वह्या । येई ते विमान । 'अभ्या' विनवी सरा । दीनवाणे ।।७८६।।

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप Mon, 02/16/2026 - 13:40
दादानु,
बुडताचि वह्या
ऐवजी "काढताचि वह्या" असे असायला हवे असे वाटते. वह्या एकदा बुडवल्यावर विमानाची लगेच गरज पडत नसावी, हे माझे वैयक्तिक मत. सं - दी - प

Bhakti Sun, 02/15/2026 - 16:23
भक्त म्हणे विसरा नाव ते एपिस्टना पाहा आता आणला हा टिपू सुलताना!! :) :) प्लीज भक्त ऐवजी भक्ती चुकूनही वाचू नका,_/\_

In reply to by Bhakti

लै फॉर्मूले आणतात हे लोक. तर अभंगातील चरण असे. भक्त म्हणे नाव । सोडा एपिस्टन । आणला टिपू हा । सुलतान ।।९!! -दिलीप बिरुटे ( अभंगात रमलेला )

In reply to by गवि

असेच म्हणतो! @दिलीपराव मन की बात | असो मना आत | सांगाया सुरुवात | करो नये || काही मेंबर | जणू इको चेंबर | जाने ते डिसेंबर | भुंकिताती ||

आपले आभार । काय मी मानावे । डोळे हे भरून । आले आता ।। ​अभंग रचावे । ऐसे निरंतर । 'दिलीप' म्हणे हा । भाव मनी ।। -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (जालावरील 'वार'करी

मदनबाण Fri, 02/20/2026 - 13:30
स्वतःचीच आरती | करावी जाऊन सेल्फी काढावी | इव्हेंट पाहुन कोण दलित | कोण ब्राह्मण आपणच महान | सागंतसे अजैविक फेकावे जोरात | बोलावे मिठास जीएसटी लावोनी | लुटावे जनास कोणाता स्ट्रोक | कोण मारतो भिकेस लागतो | सामान्य माणुस हिंदूत्वाचे घेऊन सोंग | फसावावे जनास चढवतो चादर | ख्वाजा चरणी नौटंकी करावी | रोज नवनवी फुकावे कोट्यावधी | फीत कापोनी बाण म्हणे आज | ओळखावे सोंगास काळ योग्य पाहोन | हकलावे मुर्खास

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya... - (8K)

बाजीगर Sun, 02/22/2026 - 23:41
बंधूंच्या युती | आता ते फूटी| ढोंगाला सुटी | मराठी भाग्य || जनतेने नाकारले |संख्या ना साकारले | कडू कारले|विरोधी नेता || क्लिनचीट चे पेव |जज ऐकमेव| चालू द्या देवघेव | 'देव' आशिर्वाद || विमान अपघात | नाही घातपात | नको अन्य बात |वदले साहेब || करमचंद जासूस | तर्क मागमूस | रोज नवे ऊस | चर्चा गुऱ्हाळासी ||