संसदेत नाही । फिरकले पायी ।
महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।।
जुने मढे सारे । काढिले बाहेरी ।
नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।।
एपस्टिन यादी । येईल बाहेरी ।
हीच भीती उरी । दाटलेली ।।३।।
शिक्षण, बेकारी । तशी महागाई ।
बोलणेच नाही । विषयांवर ।।४।।
आत्महत्या करी । राजा शेतकरी ।
जंगले व्यापारी । लुटविती ।।५।।
निवडणुकीवेळी । गोड गोड बोली ।
वचनांची झोळी । रिकामीच ।।६।।
सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव ।
जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।।
संसदेचा वेळ । वायाचि गेला हा ।
'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1778
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक काव्य / रचना म्हणुन मस्त
अरे वाह !
In reply to एक काव्य / रचना म्हणुन मस्त by गणपा
आं?? गणपा???
In reply to एक काव्य / रचना म्हणुन मस्त by गणपा
टिप राहीली!
In reply to आं?? गणपा??? by मिसळपाव
अहाहा
।।७८६।।
In reply to अहाहा by अभ्या..
=))
In reply to अहाहा by अभ्या..
हाहा! एक नंबर!
In reply to अहाहा by अभ्या..
दादानु
In reply to अहाहा by अभ्या..
राईट्ट
In reply to दादानु by चांदणे संदीप
'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे?
भक्त म्हणे विसरा नाव ते
अरे हो... =))
In reply to भक्त म्हणे विसरा नाव ते by Bhakti
वा वा...
:) आवडला!:)
व्वा, भारीच की बिरुटे सर.
लै हसलो, चपखल आहेत :)
आवडले. भारी.
+१
In reply to आवडले. भारी. by गवि
वह्या लिहु.उद्या दुपारी.
मस्त..
सर्वांचे आभार.
झक्कास!
In reply to सर्वांचे आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभंग वृत्त असे...
In reply to झक्कास! by सोत्रि
स्वतःचीच आरती | करावी जाऊन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya... - (8K)मस्त जमलेय डॉक्टर साहेब...आवडली रचना