काथ्याकूट: आपण केलेल्या 'चुकांचे' फळ आपल्याला 'याच जन्मी' भोगावे लागते का ?
मित्रहो, जगभरातले धर्मग्रंथ, पुराणे इत्यादी प्राचीन साहित्यात, मानव करत असलेल्या विविध 'पुण्यकर्मांचे' तसेच 'पापांचे' ' फळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 'स्वर्गसुख' अथवा 'नरकयातना' या स्वरूपात मिळत असते, असे सांगितलेले दिसते.
तसेच त्या त्या देशातील कायद्याप्रमाणे काही 'चांगले' कृत्य केल्याबद्दल बक्षीस, पुरस्कार, सन्मान इत्यादि, आणि 'गुन्हा' किंवा 'दुष्कृत्य' केल्याबद्दल कमीजास्त कठोर शिक्षा दिली जात असते.
याखेरीज आपल्या रोजच्या जीवनात 'आळस' (- जे करायला हवे ते न करणे) किंवा 'प्रमाद' (- जे करायला नको, ते करणे) यातूनही विविध मनो- शारीरिक व्याधी, ताणतणाव, परस्पर संबंध बिघडणे असे परिणाम घडून येत असलेले दिसतात, आणि त्यांच्या कार्य-कारण भावाविषयीही तर्क करता येतो.
परंतु हा काथ्याकूट वरील तिन्ही गोष्टींविषयी नाही. मग कशाविषयी आहे ? तर :
आपल्या माहितीततल्या लोकांवर जेंव्हा काही गंभीर स्वरूपाचे संकट अकस्मातपणे कोसळते, आणि बघता बघता त्या व्यक्तीचे आयुष्य बरबाद होते - तेंव्हा आपण अवाक होतो, आणि हे कशामुळे घडले असावे, यामागील कार्यकारण भाव काय असावा, असा प्रश्न आपल्याला पडतो.
हे संकट आरोग्यविषयक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे असू शकते.
यावर उपाय म्हणून वैद्यकीय उपचार, गंडेदोरे-ताईत, देवाचा धावा, बाबा-स्वामींची काकळूत, मनो-चिकित्सकांचे उपचार, ज्योतिष, राजकीय नेत्यांची लोकांची ओळख-वशिला, वगैरे प्रयत्न करूनही जेंव्हा कशाचाच काही उपयोग होत नाही, तेंव्हा माणूस हतबुद्ध होतो आणि 'नशिबा' ला दोष देत ते सोसण्याचा प्रयत्न करतो.
तर इतर लोक "त्याच्या अमूक तमूक कर्माचे फळ त्याला मिळते आहे" असा निष्कर्ष काढताना दिसतात.
– मोठ्यांचे ऐकले नाही, वडीलधाऱ्यांचा अपमान केला, आई - वडिलांना घराबाहेर काढले, सुनेचा छळ केला, मित्राची फसवणूक केली, लहान मुलांना मारझोड केली, पूज्य विभूतींविषयी अनुद्गार काढले, नादिष्टपणा- छंदिफंदीपणा - बाहेरख्यालीपणा केला, देशद्रोहीपणा केला …. असे विविध प्रकारचे प्रमाद त्या व्यक्तीवर कोसळलेल्या संकटाला कारणीभूत आहेत, असे मानले जाते.
हा काथ्याकूट त्याबद्दलचा आहे.
लहानपणापासून आपल्यावर जे जे 'संस्कार' आपले पालक, शिक्षक, गुरु वगैरे करत असतात, पुस्तके, प्रवचने, चर्चा, वगैरेतून योग्य-अयोग्य वर्तनाबद्दल आपल्याला जो काही बोध होत असतो, त्याचे पालन कळत-नकळत आपल्याकडून जर घडून आले नाही, तर अशा विविध 'चुकांचे' फळ आपल्याला याचि जन्मी - याचि देही सोसावे लागणार आहे का ?
मंडळी, तुम्हाला काय वाटते ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
संत तुलसीदास....
पहले रचा प्रारब्ध.....
नाडीग्रंथाच्या अनुभवातून
तुमचे अनुभव नक्की लिहा
धन्यवाद चित्रगुप्त, स्वधर्म जी
आपल्याकडून कमीत कमी चुका
सहमत आहे ...
श्वेत व्यासः असं मानणे सोयीस्कर आहे ... हे एकदम सोयिस्कर आहे.
आपण केलेल्या 'चुकांचे' फळ
@ गवि : एकदम चपखल प्रतिसाद.
कधीकधी फक्त कळ्यांवर सुटका
@ कंजूसः फक्त कळ्यांवर सुटका होणे ...
बहुतांश घडणाऱ्या घटना आपल्या
@ कॉमी : मनुष्याच्या आकलन-क्षमतेच्या मर्यादा ....
100 % सहमतआहे.
मागच्या एप्रिलमध्ये नानासाहेब
हं.
हे तर काहीचनाही, त्या
कोणत्याहि धाग्यात आपले
लोक कसे फसतात हे दाखवले होते.
>>>अप्पा धर्माधीकारी
>>>का? कशासाठी ?
प्रबोधन...
महाराष्ट्राला प्रबोधनाची फार
आणि भुजबळांच्या कुठे नादाला
अच्छा म्हणजे तुमच्या आवडत्या
आमचं ते घाण आणि तुमचं ते छान?
सहमत आहे.
>>>सुदीन यावा इतकेच अपेक्षित.
ती मेंढरं नव्हती.
नाही. माझी आईपण गेली होती
तुम्ही पुरोगामी विचारांचे
मी पुरोगामी असा डंका आहे???
बर आजपासून तुम्ही सनातनी.
>>>त्या सभेत आणलेली माणसं
मी आधी असाच विचार करायचे
पाप पुण्य देखील समजावर
दिलेले उदाहरण चूकलं आहे...आता
ऊदाहरण चुकलंय? :(
चुकांचे फळ
लग्न झालेल्या व्यक्तीला
संत रामदास...
हाहाहा.
मराठीचे प्राध्यापक असून संत
जी अर्भकं
जी अर्भकं/ मुलं, एक वर्षांची
'मृत्यु' ही शिक्षा नसून वरदान आहे.
कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण
दुसऱ्या टोकाला समाजात जाती
दुसऱ्या टोकाला समाजात जाती जातीत तेढ निर्माण करून समाजाची वाताहत करणारे हरामखोर राजकारणी सहस्त्र चंद्र दर्शन ( ८० वर्षे पूर्ण) सारखा सोहळा साजरा करतात त्यांनी या जन्मात असे कोणते पुण्य केले आहे कि त्यांना दीर्घायुष्य मिळावे?ऊलटही असू शकतं ना?? अनेक जाती जातीत सामंजस्य तयार करून, कुठलीही जात श्रेष्ठ नाही असं समाजात बिंबवलं. त्यामुळे लोकांच्या प्रेमाने पुण्य कमावून ते सहस्त्र चंद्रदर्शन (८० वर्षे पुर्ण) करू शकले?? जातीवादी जळफळाटाशिवाय काय करू शकले??भुजबळ बुवा