सावज-शशक(शत शब्द पेक्षा थोडेच जास्त)

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
6 Feb 2023 - 6:11 pm

ती- तू माझे व्हाट्सअप संदेश बघितले आणी तेंव्हापासून डोके फिरल्या सारखे वागतोयस.

दररोज कटकट,भांडणे, वैताग आलाय....

ती- मी कितीवेळा सांगीतले तू समजतोस तसे काहीच नाही.

तो-त्याला बागेत बोलव,प्रथम लांबून बघेन आणी मग काय करायचे ते ठरवेन ......

तो दुर कोपर्‍यात आडोशाला बसून सावजाची वाट बघत बसला होता.

अचानक,पंजाबी पोशाख,चंदेरी केसांची फॅशनेबल बाॅयकट,ओठावर हल्की गुलाबी लिपस्टिक,रंग पोतलेला चेहरा अशी एक सौंदर्यवती त्याच्याच दिशेने येत होती. अचानक तिने त्याला आवाज दिला,

"ए तू पेठेतला रोहनच ना!
ऐकोणसत्तर बॅच...नुमवी....
मी "भवानी", तुझ्याच वर्गातली..."

अय्या..!!!! किती दिवसांनी भेटतोय आपण!!!!!.

पटकन त्याच्या गळ्यात पडली.

मीठी मारावी की नाही या द्वीधा मनस्थीतीत तो बावळटा सारखा बायको कडे पाहू लागला.

कथामुक्तकसमाजजीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

6 Feb 2023 - 8:16 pm | चित्रगुप्त

म्या अल्पमतीस काही समजले नाही.

प्रसाद गोडबोले's picture

6 Feb 2023 - 8:26 pm | प्रसाद गोडबोले

कथेचा नीट अर्थ लागत नाहीये ,

बायको नवर्‍याच्या शाळेतील कोणत्यातरी "भवानी" नामक मुलीशी व्हॉट्सॅप्प वर गुलु गुलु करत होती , ते पाहुन नवर्‍याला वाटले की आपल्या बायकोचे बहेर काही लफडे चालु आहे की काय म्हणुन त्यांने बायको वर डाऊट खाल्ला , अन त्याला भेटायला बोलावले , पण प्रत्यक्षात भेटायला आल्यावर तो तो नसुन ती आहे अर्थात बायकोनेच शाळेतील कोणत्यातरी पोरीला "सेटिंग" करुन बोलावले आहे हे पाहुन नवरा द्विधा स्थितीत गेला .
असा काहीस्सा अर्थ लागला.

बाकी असं काही होत नसंतय ...

हमे मालुम है जन्नत की हकीकत लेकीन , दिल को खुष रखनेके लिये गालिब ये खयाल अच्छा आहे ;)

कर्नलतपस्वी's picture

6 Feb 2023 - 9:00 pm | कर्नलतपस्वी

कंजूस भौ कथा अशी आहे, नवरा डाऊट खातो. बायको समजावते वर्गमित्र आहे पन्नास वर्षानंतर भेटलाय. नवर्‍याला विश्वास नाही.

नवरा बागेत घात लावून बसलाय. त्याच वेळेस नवर्‍याच्याच वर्गातली मुलगी भवानी त्याला भेटते व डायरेक्ट गळ्यात पडते तेंव्हा नवराच सावज बनतो. इश्टोरी समजतो. Then they (husbandandWife)lived happily thereafter.

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

टर्मीनेटर's picture

7 Feb 2023 - 8:55 am | टर्मीनेटर

फुसका फटाका नाही वाटला, बरी आहे!
शिकारी खुद्द यहा शिकार हो गया... 😀

प्रसाद गोडबोले's picture

7 Feb 2023 - 2:05 pm | प्रसाद गोडबोले

Then they (husband and Wife) lived happily thereafter.

हे कंसात (husband and Wife) टाकल्याने रसभंग झाला ;) तिघेही सुखाने एकत्र नांदले असते तर कथा जास्त 'रोचक' झाली असती ;)

=))))

प्राची अश्विनी's picture

7 Feb 2023 - 10:58 am | प्राची अश्विनी

कळली आणि आवडली.

श्वेता व्यास's picture

7 Feb 2023 - 12:26 pm | श्वेता व्यास

आवडली शशक.

अनंतफंदी's picture

7 Feb 2023 - 2:07 pm | अनंतफंदी

प्रतिक्रिया वाचुन अर्थ लागला

विंजिनेर's picture

8 Feb 2023 - 1:25 am | विंजिनेर

आयला! मला वाटले काही LGBTQ टाईप आहे का म्हणून दोनदा वाचली!

स्वगतः बीबीशीवरच्या बातम्या अंमळ कमी वाचल्या पाहिजेत - साध्या शशक सुद्धा वेगळ्या चश्म्यातून दिसायला लागल्यात :(