साजणी आता इथे तू एकदा येऊन जा
सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा.
बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती
फुललेली ही फुले केसात तू माळून जा.
माळता केसात सुमने गगन हे गंधाळले
गंध केसातील सारा या इथे उधळून जा.
एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये
एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1724
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
चारी कडवी आवडली.
चारी कडवी आवडली. तुमच्या कवितांमधे काहीतरी एक वेगळेपण जाणवते. लिहीत रहा.
छान कवीता
माळता केसात सुमने गगन हे गंधाळलेगंध केसातील सारा या इथे उधळून जा.
आवडली
मनःपूर्वक धन्यवाद.
चित्रगुप्त सर,श्वेता मॅडम मनःपूर्वक धन्यवाद.