अग्निपथ
समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
प्रतिक्रिया
कुठल्या नोकरी....
कर्नल तपस्वी
कर्नल तपस्वी
प्रतिसाद द्यायचा म्हणून
सुनील साहेब,
पूर्णपणे सहमत.
+१
सैनिकांचे पेन्शन परवडत नाही
शेतकर्यांनी फार्मर्स लॉ ला
कर्नलतपस्वीन जी
Mr डांबिस
योजनेलाच विरोध कशासाठी?
सरकारला योजना आणयचीच होती तर
सरकारला योजना आणयचीच होती तर
पहिली बाजू :
माहितीची पीडीएफ पाहिली.
टूलकीट
अगदी बरोबर. मिपावरही नेहमीचेच
बऱ्याच माजी लष्करी अधिकारी,
वेड घेवून पेड गावाला भक्त जात आहेत.
इस्रो आणि अटोमिक एनर्जी, वीज प्रकल्प
वाटेल ते बोलू नका
आहे हो
वयाच्या १८ ब्या वर्षी
छाती पाच इंच फुगणे ??
फाका मारायला काय जाते ..
टुकडे टुकडे
दोन प्रश्न ..
त्यामुळे अग्नीवीर ही योजना
त्यामुळे अग्नीवीर ही योजना वाईटच कशी आहे .. त्यात चांगले काहीच नाही हे कुणी जर तर ची भाषा न वापरता सांगेल का?ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे. अजून या योजनेची पुरेशी माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यासाठी थोडा काळ ही योजना चालवून त्यातून मिळालेल्या फायद्यतोट्यांचा, त्रुटींचा अभ्यास करून नंतरच प्राथमिक निष्कर्ष काढता येईल. अर्थात कणभरही प्राथमिक माहिती नसताना, योजना राबवायला अजून प्रारंभ सुद्धा झालेला नसताना, त्यातील फायदेतोटे त्रुटी समजलेल्याच नसताना विरोधी पक्ष व मिपावरील नेहमीचेच यशस्वी मोदीद्वेष्टे यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. काहींनी तर प्रचंड स्पेक्युलेशन करून या योजनेमुळे देशात अराजक माजेल, तरूण गुन्हेगारी मार्गाला लागतील, चीन पाकिस्तान भारतावर हल्ला करून युद्ध जिंकतील वगैरे निष्कर्ष काढून अकलेचे तारे तोडले आहेत. बिहार, उत्तर प्रदेश वगैरे राज्यात तरूणांना भडकवून जाळपोळ केली जात आहे. जर दंगली, जाळपोळ वगैरे खूप वाढले तर नाईलाजाने मोदींना ही योजना गुंडाळावी लागेल व त्यातून त्यांचे काहीही नुकसान न होता तरूणांचेच नुकसान होईल.बरोबर आहे ...
ही योजना चांगली की वाईट हे आता लगेच समजणे किंवा तसा निष्कर्ष काढणे अशक्य आहे.अगदी हेच माझ्या मानात होते. कुठलीही नवीन योजना मग ती कुठल्याही क्षेत्रात असो, तिचे फायदे तोटे काही काळानेच दिसतात. फायदा झाला की योजना पुढे जाते. तोटा झाला की बारगळते. साधा हिशेब आहे. पण आता ज्या पध्द्तीने या किंवा कुठल्याही योजनेला विरोध होतो तो पाहता एक समाजविघातक शक्ती जोर लाउन कार्य करते आहे असेच दिसते. गंम्मत म्हणजे ही आंदोलनकारी लोक सार्वजनीक किंवा दुसर्याच्या मालमत्ते चे नुकसान करतात. एकाने तरी मी या योजनेचा विरोध करतो आहे म्हणुन मी माझी कार जाळतो आहे किंवा माझा या योजनेला विरोध म्हणुन मी माझे घर जाळणार आहे असा विरोध केला नाही. सार्वजनीक मालमत्ता च (जी पर्यायाने आपल्याच पैशातुन आलेली असते) यात बळी पडते . . बेरोजगार लोक सार्या जगात आहेत. पण सरकारी नोकरी साठी हापापलेली जनता माझ्या भारतातच जास्त आहे ..भक्त लोकांना मूर्ख समजत आहेत का
??
भक्त
साहेब . .
सुक्या भाऊ
महायुध्द झाले नसते तर आज पण
हिंसाचार का होत आहे
ORPO हा बराच खर्चिक निर्णय
बचत व वेतन धरून ४ वर्षात
लाखाचे आकडे
पीडीएफची लिंक दिली आहे.
काही स्पष्टीकरणे
जुनी कायमस्वरूपी भरती बंद
फक्त २५ टक्के दर वर्षी भरती करा
सर्व सिव्हिल सर्व्हिस मधील लोक
केंद्र सरकारने या पुढे
प्रसाद १९८२
चालू दे.
प्रसाद १९८२
सहमत आहे
Pagination