✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

भ
भडकमकर मास्तर यांनी
Tue, 12/09/2008 - 17:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14597 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

व
विसुनाना Tue, 12/09/2008 - 18:14 नवीन

होतीलही कदाचित हजारावर प्रयोग!

त्यावर लोक अगदी खुर्चीतून उसळ्या मारून हसत होते
गेली काही (काही का? बरीच!) वर्षे अनेक विनोदी नाटके विनोदी नसून हास्यास्पद होती - तरीही ती चालली. 'यदा कदाचित'चे किती भ्रष्ट नमुने येऊन गेले आणि लोकांनी पाहिले ते आठवा. मराठीत मेलोड्रामाचा तर मेलो,मेलो! ड्रामा झाला. ऐतिहासिक नाटकातही 'जगदंब! जगदंब!' असा पुल्लिंगी जप करणारे शिवाजी महाराज पाहून प्रत्यक्ष जगदंबेलाही आपण 'अंबा'च आहोत का? असा प्रश्न पडला असेल. तरीही ती नाटके मराठी नाट्यसृष्टीत मैलाचे दगड ठरली. मास्तर, नाटकाची संहिता सुमार आहे सर्व लोकांना कळतेच असे तुम्हा-आम्हाला वाटते हो! दर्जेदार संहिता,दर्जेदार नाट्यलेखन म्हणजे काय? ते दाखवण्याची आता तुमच्याकडूनच काही अपेक्षा. :)
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Tue, 12/09/2008 - 22:24 नवीन

यदाकदाचित???

"यदाकदाचित" हेच मुळी एक अतिशय दर्जाहीन आणि तद्दन भिकार नाटक(?) होते आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्या संतोष पवारने चेकाळून त्यापेक्षाही भिकार नाटके लिहिली. (चुकून यदाकदाचित पाहून पस्तावलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
छ
छोटा डॉन Wed, 12/10/2008 - 08:51 नवीन

सहमत ....

"यदाकदाचित" हेच मुळी एक अतिशय दर्जाहीन आणि तद्दन भिकार नाटक(?) होते आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्या संतोष पवारने चेकाळून त्यापेक्षाही भिकार नाटके लिहिली.
अगदी चोक्कस प्रतिसाद .... लै भिकार नाटक होते राव, त्यानंतर आलेली तर फक्त "जत्रेत" तमाशा आला नाही तर ऐनवेळी उभा करायच्या लायकेची ... काही पण म्हणा, मराठी रंगभुमीवर "संतोष पवार" व मराठी चित्रपटात "भरत जाधव" ह्यांना आवरायला हवे ... उगाच डोक्यात जाईल असा अभिनय किंवा जे असेल ते काम करतात ... मी तर म्हणेन ही लोकं सध्या चक्क वाट्टोळे करत आहेत दोन्ही क्षेत्रांचे .... बाकी मास्तरांचे परिक्षण नेहमीप्रमाणे भारी ....! आपला सध्या "प्रशांत दामले" यांच्यावरही विश्वास राहिला नाही ... "अंगविक्षेप, पाचकळपणा,अचाट / अश्लिल शाब्दिक कोट्या, ओढुन ताणुन केलेला विनोद, उगाच चेहर्‍याचे भजे करणे" ह्याला कमीत कमी मी तरी "अभिनय" म्हणु शकत नाही. क्षमस्व ...! छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
आ
आपला अभिजित Wed, 12/10/2008 - 09:27 नवीन

यदा कदाचित

माझ्या मते अतिशय उत्क्रुष्ट दर्जाचे विडंबनात्मक लोकनाट्य होते. संतोष पवारच्या उत्तम कामगिरीपैकी एक. त्यातले विनोद आणि कोट्या म्हणजे तर अशक्य पातळीवरच्या होत्या. मी सात वेळा पाहिले. अर्थात, काहींना त्याचा फॉर्मच आवडला नाही. पण संतोष पवार, केदार शिंदे मंडळींनी `कारकुनी' विनोदाच्या छापातून मराठी नाटकांना बाहेर काढले, हे मान्य करावे लागेल. यदा-कदाचित भाग २, यदा यदा हि अधर्मस्य, आम्ही पाचपुते, ही मात्र अतिशय टुकार नाटके. संतोष पवार काही उत्तम विनोदी लेखक नाही. पण तो खूप प्रयोगशील, हुशार, वेगवान दिग्दर्शक आहे. तुम्ही `स्वभावाला औषध नाही', `ए भाऊ, डोकं नको खाऊ' पाहिल्येत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आपला अभिजित Wed, 12/10/2008 - 09:31 नवीन

***

`दिवसा तू रात्री मी'देखील असेच एक भिकार नाटक. पण अशी नाटके पाहतानाही प्रेक्षक खुर्चीतून उसळतात. सध्याच्या प्रेक्षकांची अभिरुची हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. अनेकदा येऊन गेलेल्या कथेवरचा `गोलमाल रिटर्न' पाहतानाही लोक पोट दुखेपर्यंत हसताना आणि नवेच काहितरी पाहिल्यासारखे भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. असो. भडकमकर मास्तरांचे यावर मत ऐकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
ट
टायगर Wed, 12/10/2008 - 09:54 नवीन

अरेरे

भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. आणखी कोणत्या डोळ्यांनी पाहता येते. आपणाला चार किंवा आठ डोळे आहेत वाटते. शब्दप्रयोग खटकला. आपल्या सारख्या शब्दप्रभुंनी (?) अशी चूक करावी. अरेरे दुसऱ्यांच्या चुका काढता काढता, माणूस स्वत:कडे (चुकांकडे) पाहण्यास कसा विसरतो, याचे उत्तम उदाहरण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
व
विसोबा खेचर गुरुवार, 12/11/2008 - 11:10 नवीन

आणखी

आणखी कोणत्या डोळ्यांनी पाहता येते. असे म्हणायची पद्धत आहे. याची देहि याची डोळा... यावरूनच ते रूढ झालेले आहे.. आपणाला चार किंवा आठ डोळे आहेत वाटते. शब्दप्रयोग खटकला. कृपया आपले भाषिक ज्ञान वाढवा म्हणजे विविध शब्दप्रयोग, म्हणी यांचा परिचय होऊन आपल्याला मराठी भाषेतले साधे, सोपे व रूढ शब्दप्रयोग खटकणार नाहीत..! आपल्या सारख्या शब्दप्रभुंनी (?) अशी चूक करावी. अरेरे दुसऱ्यांच्या चुका काढता काढता, माणूस स्वत:कडे (चुकांकडे) पाहण्यास कसा विसरतो, याचे उत्तम उदाहरण वरील वाक्यात विनाकारण वैयक्तिक शेरेबाजी दिसते आहे. कृपया तसे करू नये अशी आपल्याला समज देण्यात येत आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टायगर
ट
टायगर गुरुवार, 12/11/2008 - 15:37 नवीन

ही तर दादागिरी

http://www.misalpav.com/node/5032 यावर उत्तर वैयक्तिक शेरेबाजीचा प्रश्‍नच नाही तात्या. कारण माझी आणि लेखकाची ओळखच नाही. त्यांचे पुष्कळ लिखाण वाचले आहे. त्यामुळेच त्यांना शब्दप्रभू म्हटले आहे. अगदी निर्मळ मनाने काही शेरेबाजी केली, तर त्यात राग येण्याचे कारण नाही. खेळकरपणे ती स्वीकारायलाच हवी, असे मला वाटते. तसेच मला आपण भाषिक ज्ञान वाढविण्याविषयी सांगावे, अशी काही परिस्थिती नाही. आणि "समज देणे' वगैरे शब्द माझ्या देहयष्टीला पेलणारे नाहीत. ही तर दादागिरी, असे मला वाटते. काहीच मत नोंदवायचे नसेल, तर आपण आपले सदस्यत्व रद्द करा, असा संदेश पाठवून द्या ना....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
छ
छोटा डॉन Wed, 12/10/2008 - 09:56 नवीन

:)

>>अनेकदा येऊन गेलेल्या कथेवरचा `गोलमाल रिटर्न' पाहतानाही लोक पोट दुखेपर्यंत हसताना आणि नवेच काहितरी पाहिल्यासारखे भारावून गेलेलेही मी याच डोळ्यांनी पाहिलेत. =)) =)) अगदी खरे, मुळात "गोलमाल" हाच भंगार होता , रिटर्नने त्यापुढची खालची पातळी गाठली ... प्रेक्षकांची "अभिरुची व आवड" हा आता खरच चर्चेचा व अभ्यासाचा विषय झालेला आहे... :( छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
छ
छोटा डॉन Wed, 12/10/2008 - 09:57 नवीन

.

.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
भ
भडकमकर मास्तर Wed, 12/10/2008 - 10:23 नवीन

यदा-कदाचित..

यदा कदाचित पहिल्यांदा आले तेव्हा त्याचे साप्ताहिक सकाळमध्ये माधव वझे यांनी केलेले परीक्षण वाचले होते ... त्यांनी त्याबद्दल बरेच बरे उद्गार काढले होते त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली होती... ...... या नाटकाच्या फॉर्ममबद्दल पूर्वीपासूनच कल्पना होती आणि अपेक्षा अति नव्हत्या त्यामुळे पहिला प्रयोग मी अत्यंत मोजक्या शंभर दीडशे लोकांबरोबर पाहिला , आणि तो खूप आवडला... त्यातले कित्येक विचित्र वाटणारे शब्द, गंमतीदार कॉमेंट्स मित्रांच्यात बराच काळ वापरत होतो हे आठवते.... महाभारतात गांधीजी आणि कृष्णाचं शेवटचं आर्ग्युमेंटसुद्धा उत्तम वाटले होते... ( याच आर्ग्युमेंटला एका लेखन कार्यशाळेत परेश मोकाशीने खच्चून शिव्या घातल्या होत्या... "कृष्णाला युद्धखोर दाखवणार्‍या या लेखकाला कृष्णाने शांततेचे सर्व प्रयत्न संपल्यावरच युद्धाचा मार्ग सांगितला होता , हे लेखकाला समजू नये? " असा परेशचा मुद्दा होता... असो, तेव्हा बघताना असं काही जाणवलं नाही हे खरं...) शिवाय सत्याचा शेवटीच विजय का होतो? असा प्रश्न आणि कालचक्राचे या विंगेतून त्या विंगेत जाणे हे प्रकार लै इन्ट्रेष्टिंग होते... नंतर हेच नाटक पुन्हा एका गणेशोत्सवात आयोजित केलेले मोफत पाहिले.... बरे वाटले होते..... नंतर सहा महिन्यांनी आमच्या नाटक मित्र मंडळाला घेऊन मी पुन्हा गेलो , तिकिट काढून.... एव्हाना नाटक चालायला लागलेले होते.....कलाकार मंडळी ष्टार व्हायला लागली होती.... तिकिटाचे दर खच्चून वाढले होते....लवकर हाउसफुल्ल होऊन तिकिटे मिळेनाशी व्हायला लागली होती... या वेळी नाटकात भलताच फरक वाटला.... मुख्य लोक सोडले तर कलाकार पुष्कळ बदललेले होते... नाटक चालू होते पण कलाकारांचे मन नाटकात नव्हते...ज्यांचे संवाद त्या क्षणी चालू नाहीत असे साईडचे कलाकार नाटक चालू असताना आपापसात खाणाखुणा करणे, नेत्रपल्लवी करणे, उगीच हसणे, संगीत संयोजन करणार्‍या आणि समोर बसलेल्या ढोलकीवाल्याकडे वगैरे बघून बोलणे असले पुष्कळ प्रकार चालू होते..हसू आवरत नाही म्हणून पाठ करून काही कलाकार हसत होते.. ते पाहून शिसारी आली.... माझ्या बरोबर आलेल्या मित्रमंडळाने नाटकाला तर शिव्या घातल्याच पण मलाही घातल्या... आजूबाजूला असेच लोक प्रचंड हसत होते , हजार बाराशे प्रेक्षक एन्जॉय करत होते आणि मी मोजक्याच लोकांबरोबर पाहिलेला सिन्सियर प्रयोग आठवून अजून व्यथित होत होतो... कमी वयात कमी काळात जास्त प्रसिद्धी मिळाली की ती डोक्यात जाते आणि कलाकार असे वर्तन करतात असे मला वाटते... दिवसाला तीन तीन प्रयोगांच्या पाट्या टाकणारे कलाकार होते ते... .... कलाकार प्रेक्षकांना गृहित धरायला लागले की संपले ..... तुमची कला कशी का असेना , कितीही महान असेल माझ्या दृष्टीने ती सिन्सियरली सादर करणे आवश्यक आहे....( तेव्हा ठरवले की किमान तिकिट काढून तरी आता पवारांचे नाटक काही पहायचे नाही ... त्यानंतर एकदा गणेशोत्सवात आयोजित एक पवारांचे दुसरे मोफत नाटक पाहिले ...नाव आठवत नाही, त्यात सगळे तसेच्..भारत पाक संबंध,आग्रा समिट २००२ वर भाष्य...मुशर्रफचे केरिकेचर होते .. तो कलाकार उड्या मारत होता बगैरे....जोकला जोक जोडून केलेले नाटक... सुमार लेखन.. आवडले नाही) पण तरीही अभिजितचे म्हणणे मला पटते... संतोष पवार हा लेखक म्हणून भारी नसेल पण दिग्दर्शक म्हणून मला आवडतो... ( ती तिचा दादला आणि मधला या नाटकाच्या एका टीव्ही कार्यक्रमातला एक सीन मला लै भारी वाटला होता... ते नाटक बघायला जावे असे वाटले होते पण अजून पाहिले नाही...) काँट्ररी टु पॉप्युलर बिलीफ मी पवारांचे आणि यदाकदाचितचे कौतुक करतोय याची मला कल्पना आहे, पण ही माझी सिन्सियर मते आहेत...त्याने नाटकाला एक वेगळेपणा आणला पण लेखक म्हणून तो मात्र त्याच्त्याच प्रकारात अडकलेला आहे , असे वातते... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
आ
आपला अभिजित गुरुवार, 12/11/2008 - 10:08 नवीन

मास्तर,

तुमचे म्हणणे पटले. तुम्हाला बरीच आवड दिसते नाटकांची. `ती तिचा दादला आणि मधला' मी मूळ संचात पाहिले. नंतर विजय कदमने ते नाटक सोडले. पण विजय चव्हाण आणि संतोष पवार धमाल करायचे. संतोष उत्तम विनोदी अभिनेताही आहे. त्याचा टायमिंग सेन्स जबरदस्त आहे. त्या नाटकात तो म्हणायचा, `च्यायला, लोक महिना-महिना आंघोळ न करता कसे राहतात, कुणास ठाऊक! मला तर १५ दिवसांतच खाज सुटायला लागते.' `लगे रहो राजाभाई'ही बरे होते. पण त्याच फॉर्ममधले आणि तेच तेच. त्यातही सूत्रधार म्हणून संतोष पवार धमाल करायचा. त्याच्या बाणकोटी भाषेच्या स्टाईलमध्ये एक दासी म्हणायची...`नंगा महाराज. नंगा!' (नको महाराज, नको!) त्यावर संतोष त्या राजाकडे विचित्र नजरेने बघून म्हणायचा, `नंगा' महाराज??? असो. `माझा बाप डोक्याला ताप' बघायला मिळाले नाही. तसेच, `पती माझे छत्रीपती'देखील. बघू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
छ
छोटा डॉन Wed, 12/10/2008 - 09:50 नवीन

माझ्या मनातले बर्‍यापैकी ...

अभिजीतदा, बर्‍यापैकी माझ्या मनात असलेली वाक्ये जशीच्या तशी उतरली आहेत तुझ्या प्रतिसादातुन. माझ्याकडे "सहमत" म्हणण्याखेरीज दुसरा पर्याय नाही... >> काहींना त्याचा फॉर्मच आवडला नाही. एक्झॅक्टली ... माझे मत ह्यामुलेच खराब आहे, का ते माहित नाही पण मला त्याचा फॉर्म / पॅटर्न आवडला नाही ...
पण संतोष पवार, केदार शिंदे मंडळींनी `कारकुनी' विनोदाच्या छापातून मराठी नाटकांना बाहेर काढले, हे मान्य करावे लागेल.
+१, ह्याबाबतीत मी बर्‍यापैकी सहमत ... संतोष आणि केदार ह्यांचे इतर काही प्रकार सोडले तर "साच्याबाहेरचे प्रयोग" ह्यातले यश मान्य करतोच मी ... त्यांचे काही समारंभातले "प्रयोग" सुद्धा मस्तच होते, उदा : पुरस्कार सोगळे वगैरे ... इनफॅक्ट केदारच्या "घडलयं बिघडलयं" ह्याचा तर मी डॅम फॅन आहे .... त्यातल्या टीका / कोट्यांची लेव्हल अक्षरशः अत्युच्चच म्हणावी लागेल ...
यदा-कदाचित भाग २, यदा यदा हि अधर्मस्य, आम्ही पाचपुते, ही मात्र अतिशय टुकार नाटके.
यु सेड इट ...! "यदा यदा" तर मी अक्षरशः भंगार-पत्रा-लोखंड ह्या कॅटॅगिरीचे मानतो ... "स्वभावाल औषध नाही" बद्दल ऐकले आहे, अजुन पाहिले नाही. आता नक्की पाहिन जिकडे मिलेल तिकडे ... छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
आ
आपला अभिजित गुरुवार, 12/11/2008 - 10:09 नवीन

डॉन,

`श्रीयुत गंगाधर टिपरे' ही निखळ, खुसखुशीत, धमाल मालिका विसरलास काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आपला अभिजित Tue, 12/09/2008 - 18:26 नवीन

वाईट!

अजून बघण्याचा योग आलेला नाही. (म्हणजे, पाहावेसे वाटलेले नाही.) पण वाईट असल्याचे आधीच समजले होते. प्रशांत दामले यांनी फार काही दर्जेदार नाटके हल्लीच्या काळात केलेली नाहीत. मी पाहिलेले त्यांचे शेवटचे बरे नाटक म्हणजे, गेला माधव कुणीकडे. हो....एका लग्नाची गोष्ट' चांगले होते. निदान करमणूक या पातळीवर तरी. `जादू तेरी नजर'ही वाईट होते, असे कळले. पाहायला मिळाले नाही अजून. सीडीवर बघेन आता.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 21:25 नवीन

याच्या

याच्या तुलनेत जादू तेरी नजर म्हणजे मास्टरपीस म्हटले पाहिजे :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
आ
आपला अभिजित Tue, 12/09/2008 - 18:37 नवीन

...तरीही

स्वत:च्या पैशाने बघेनच. वाईट असे कुणी सांगितले, की आम्ही आधी धावतो! पण अर्थातच, १५० रुपयांचे तिकीट काढणार नाही. ८० रुपयांचे मिळाले, तर बघू! (अवांतर : `सही रे सही' मी पहिल्या प्रयोगाला ३० रुपयांत खालच्या शेवटच्या रांगेतून पाहिले होते. गेले ते दिवस!)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 12/09/2008 - 22:42 नवीन

मास्तर, चांगली 'ओळख' करुन दिलीत!

कमितकमी ३०० रु. वाचवल्याबद्दल आभारी आहे! :D चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 12/09/2008 - 22:46 नवीन

छान

छान परिक्षण.. नेटावर नाटक आले तरच पाहीन.. तसेही नेटावर आले तरच पाहायला मिळेल. प्रेक्षक खुर्चीतून उसळ्या मारुन हसत होते ना ! मग झाले तर.. अभिरुचीच्या अनेक वर्गातल्या कुठल्यातली वर्गाला हे नाटक आनंद देत आहे ना.. मग ते चालेल की.. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 22:54 नवीन

नेटवरही

नेटवरही नेटाने बघावे लागेल .... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
न
नंदन Wed, 12/10/2008 - 01:06 नवीन

परीक्षण

आवडले. खाकी लोकरीचा गुंडा आणि दिलेली उदाहरणे मस्तच. >>> एकाच वेळी भलतीच ऍरोगंट आणि विनोदी वाटली -- कमीत कमी इथे तरी डबल जानराचे ओझे पेलता आले म्हणायचे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 12/10/2008 - 08:36 नवीन

प्रेक्षक

प्रेक्षक मूर्ख नसतात .... हे खरे असले तरी, पण हे सगळे पाकीटाला भोक पडल्या नंतर समजते. असाच रिव्ह्यु आपच्या नजरेत आला आहे. ह घे णे
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 12/11/2008 - 10:34 नवीन

असेच म्हणते...

खरेच, ती लोकरीच्या गुंड्याची उपमा फार आवडली. प्रशांत दामलेंचा उत्स्फूर्तपणा आणि लोभसवाणेपणा - दोन्ही अक्षरशः डोळ्यांसमोर आले. सुरेख परीक्षण. प्रशांत दामलेंना कुठेसे कुणीतरी विचारले होते, की याच प्रकारच्या भूमिका करून तुम्ही एका साच्यात अडकणार नाही का? त्यावर त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले होते - मी एकसाची भूमिका करत नाही. मी विनोदी भूमिकांमधे स्पेशलायझेशन करतो... तेव्हा ते उत्तर वेगळे वाटले होते आणि प्रशांत दामलेंबद्दल अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण त्यांनी विनोदी भूमिंकामधे फार काही वेगळे - ज्याला 'स्पेशलायझेशन' म्हणावे असे सुरेख - केलेले दिसत नाही. मास्तर, तुमचे काय मत?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 12/11/2008 - 15:08 नवीन

स्पेशलायझेशन

दामले स्टेजवर धमाल करतात... त्यांची बरीचशी नाटकं पाहिली आहेत... मोरूची मावशी,ब्रह्मचारी,गेला माधव कुणीकडे, चार दिवस प्रेमाचे,एका लग्नाची गोष्ट,पाहुणा,प्रियतमा, श्श्शू...कुठे बोलायचे नाही,जादू तेरी नजर.... म्हणजे राहिली फक्त लग्नाची बेडी, टूरटूर आणि मिसळ्पाव नावाचे काहीतरी हिन्दी इन्ग्रजी प्रकरण आहे ते... यातली बरीचशी नाटके आवडलीच आहेत.... ... एक गोष्ट सांगावी लागेल की हा माणूस स्टेजवर / टीव्हीवरही आला की छान वाटतं... काहींचं व्यक्तिमत्त्वच लोभसवाणं असतं, त्यातला तो आहे...... त्या खवैय्या कार्यक्रमात तो त्या पदार्थाची चव घतो शेवटी आणि काही निरर्थक बडबड करतो ती ऐकायलाही फार मजा येते... पण त्यांनी विनोदी भूमिंकामधे फार काही वेगळे - ज्याला 'स्पेशलायझेशन' म्हणावे असे सुरेख - केलेले दिसत नाही. हे मेघनाचे म्हणणे पटते... विनोदी भूमिकांमध्ये त्याने काही अधिकाधिक वेगळे केले आहे का? जवळजवळ सगळ्याच तशाच भूमिका... 'पाहुणा'मधली भूमिका थोडी वेगळी होती...अर्थात पाहुणा विनोदी नव्हतेच... आणि चार दिवस प्रेमाचे मधला शेवटचा प्रसंग उत्तम.... बाकी सर्व भूमिका या नाटकातून काढून त्या नाटकात घुसवल्या तरी फारसा फरक पडणार नाही.... या अर्थाने मग स्पेशलायझेशन उरते ते काय? ... याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांनीच एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे " ओळख ना पाळख करण्याचे कारण म्हणजे मी इन्स्पेक्टर कधी केला नव्हता"... म्हणजे एक वेगळी भूमिका म्हणून इन्स्पेक्टर केला ... पण हा इन्स्पेक्टर स्वभावानं तोच इतर नाटकांसारखाच आहे... मग नुसतं पात्र आणि पोषाख बदलून काय होणार? म्हणजे खाकी कपडे घातलेला प्रशांत दामलेच ना तो ? अर्थात हे सारे त्याला समजत असणारच पण आता व्यवसाय म्हणून वेगळ्या भूमिका करायची रिस्क कितपत घ्यायची ते ठरवणे हा ज्याचा त्याचा प्रश्न.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 12/11/2008 - 17:29 नवीन

>> आणि चार

>> आणि चार दिवस प्रेमाचे मधला शेवटचा प्रसंग उत्तम.... << चार दिवस प्रेमाचे नाटक मला फार आवडले होते.. सर्व प्रवेश मस्त मजेदार होते. शेवटचा प्रसंगात म्हातारा-म्हातारी 'सुखाने' राहात आहेत असे काही होते ते आठवते. तो प्रसंग गंभीर होता. आणि नाटकातल्या विनोदाचा मूड तो प्रसंग बघितल्यावर निवळला. विनोदी नाटकाला अशी गंभीर-कारुण्याची किनार कशासाठी? ('हसता हसता डोळ्याच्या कडा ओल्या' हे कशासाठी ते समजत नाही.) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा