कळले तुजला?
कारण काढून भेटायाचे
किती दुरूनी आलेला तू!
लपवलेस तू मनातले तरी
किती बाभरा झालेला तू!
कळले मजला...
विचारसी तू देऊन हाती चित्रे काही
सापडते का यांच्यामधले लपले अक्षर?
इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे
आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर
कळले तुजला?
मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली
गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर?
केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर
क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर
कळले तुजला??
श्वास रोधुनी उत्सुक मी रे काही घडण्या..
मिसळून गेली शब्दांमध्ये चित्रे झरझर..
काय बोलले किंवा हसले काही स्मरेना
आठवते ती अनोळखीशी नाजूक थरथर..
कळले तुजला???
किती मनाला आवरले तू...
आणि मलाही सावरले तू..
कळले मजला..
पण कळले मजला, हे कळले तुजला????
क्या बात है...!
धन्यवाद!:)
सुरेख
;)
सहज,
धन्यवाद.
किती सुंदर अवखळ कविता!
विचारसी तू देऊन हाती चित्रे काही सापडते का यांच्यामधले लपले अक्षर? इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर कळले तुजला?हे खास आवडलं!श्वेता, thank you.
कारण काढून भेटायाचे किती दुरूनी आलेला तू!
धन्यवाद.
सुंदर!
धन्यवाद .:)
छान
:):)
सहज आणि सुंदर, नेहमीप्रमाणेच!
:) धन्यवाद राघवा!
खूप छान चित्र उभं केलं आहे
आवडली