Skip to main content

कळले तुजला?

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 28/12/2021 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
कारण काढून भेटायाचे किती दुरूनी आलेला तू! लपवलेस तू मनातले तरी किती बाभरा झालेला तू! कळले मजला... विचारसी तू देऊन हाती चित्रे काही सापडते का यांच्यामधले लपले अक्षर? इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर कळले तुजला? मधुभासांचे रिंगण पडले सभोवताली गोंधळले मी तुझा गंध का होते अत्तर? केसांवरती तव श्वासांची मोहक फुंकर क्षणाक्षणाला वितळत होते मधले अंतर कळले तुजला?? श्वास रोधुनी उत्सुक मी रे काही घडण्या.. मिसळून गेली शब्दांमध्ये चित्रे झरझर.. काय बोलले किंवा हसले काही स्मरेना आठवते ती अनोळखीशी नाजूक थरथर.. कळले तुजला??? किती मनाला आवरले तू... आणि मलाही सावरले तू.. कळले मजला.. पण कळले मजला, हे कळले तुजला????
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5654
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

क्या बात है...! एकदम सुरेख.
किती मनाला आवरले तू... आणि मलाही सावरले तू.. कळले मजला.. पण कळले मजला, हे कळले तुजला????
हे तर जबरीच.

गोंडस कविता आवडली, फारच आवडली
पण कळले मजला, हे कळले तुजला????
हाच तर खरा प्रॉब्लेम असतो पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

;)

सुंदर!

अतिप्रचंड आडली! विचारसी तू देऊन हाती चित्रे काही सापडते का यांच्यामधले लपले अक्षर? इतके बोलून सहज उभा तू माझ्यामागे आणि इथे मी चूर लाजुनी शोधीत उत्तर कळले तुजला? हे खास आवडलं!

कवीतेचा वास्तवाशी संर्दभ लावताना का कुणास ठावूक दुर्गम क्षेत्रात तैनात आसलेल्या सैनिकाला मिळणाऱ्या पत्रा बरोबर उचंबळणार्या भावना आणी कवीता यात कुठेतरी साम्य असल्याचे दिसले. बाकी कवीता सुंदर आणि सहज, आवडली.

आवरले... सावरले यातचं सारे आले. :) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

मध्यमवर्गीय पापभिरू मानसिकता वगैरे वगैरे.

खूप छान चित्र उभं केलं आहे शब्दांतून! वळूनी मागे पाहता, मी डोळ्यात तुझ्या गवसली का रे, तुझीच अक्षरे तुजला