सांज फुले
सांज फुलांनी भरू दे
काळोखा रंग सावल्यांत उतरू दे
धूसर झाली मावळतीची वाट
मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट
पंखात घेऊन भोवतीची वारे
परतू लागली चुकार पाखरे
सूर्य मिटून राने अंधारली
प्रकाशज्योत अलगद विजून गेली
अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर
रात्र पावलाने पुढे येई हळुवार
सुंदर काव्य!
धन्यवाद
सरळ आणि तरल कविता...
धन्यवाद
रात्र पावलाने पुढे येई हळुवार
छान! आवडली कविता.
एकदम चित्रमय काव्य!!
सर्वांचे मनापासून आभार