Skip to main content

वजिर सुळका ट्रेक.

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 27/08/2021 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे जिल्ह्यातील 'माहुली' हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक आवडता ट्रेक आहे. त्यातही तो मुंबईकरांना जवळ. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला हा गड त्याच्या सुळक्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक सुळका म्हणजे 'वजीर' सुळका. माहुली गडाचा पसारा हा दक्षिण उत्तर असा पसरला असून त्याच्या दक्षिणेला अनेक सुळके आहेत. यातील सगळ्यात शेवटचा सुळका म्हणजे वजीर. माहुली किल्ल्याचाच भाग असला तरी वजीर सुळक्याचा ट्रेक हा माहुली किल्लयाच्या ट्रेकपासून पूर्ण वेगळा आहे. तसेच, वजीर ट्रेक हा तुलनेने खूप सोपा ट्रेक आहे. मुंबईपासून पन्नास किमीवर असलेला हा ट्रेक पटकन करण्यासारखा तसेच नव्या ट्रेकर्ससाठी एक चांगली सुरुवात आहे. तसेच छोटा असला तरी तो सुंदर मात्र नक्की आहे. ट्रेकची सुरुवात नंदिलकेश्वर या मंदिरापासून होते. तिथे पिण्याचे पाणी तसेच निवार्याची सोय होऊ शकते. अलीकडेच मी दोनदा या ट्रेकला जाऊन आलो. पहिल्या फेरीला खूप पाऊस होता आणि दुसऱ्या फेरीला उन्हाने भाजून काढले. या दोन्ही ट्रेकचा व्हिडीओ क्लिप्स मिळून एक व्हिडीओ तयार केला आहे. मी पहिल्यांदाच ट्रेकिंग व्हिडीओ बनवला असून व्हॉईसओव्हर एडिटिंग करताना स्टुडिओत दिला आहे.

वाचने 8702
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

माझा एक मित्र खुप ट्रेकींग करतो, तो सारखा म्हणतो : "ट्रेकींग करायला फक्त पाऊसातच जावं, बिल्कुल पाय घसरत नाही, आणि घसरलाच तर काय होतंय?"

आवाडला. वजीर सुळक्याच्या पायथ्याला सायकल ठेवायची सोय होऊ शकते का?

In reply to by mayu4u

नंदिकेश्वर मंदिरात भरपूर जागा आहे.

धुमतारा येऊ द्या.

'वजिर' पर्यंत चढाई करावी ती त्याला गवसणी (कातळ चढाई) घालण्याकरता, हे ट्रेक वगैरे सर्व फालतू गोष्टी आहेत. ज्याला ट्रेक करायचाच आहे त्याने श्रावणात छिडीघाट मार्गे भिमाशंकराला जावे. (आपआपल्या जबाबदारीवर)

In reply to by प्रसाद_१९८२

हे ट्रेक वगैरे सर्व फालतू गोष्टी आहेत.
- आणि ते "फ्री क्लाईंब" की काय बोलतात ते करणारे लोक तर काही सुरक्षा म्हणजे दोरी वगैरे न वापरता खडकी पर्वत चढत जातात. काय फा......ना? नायतर काय!

In reply to by प्रसाद_१९८२

तुमच्या म्हणण्यानुसार गृहीत धरले तर वजीर सुळक्याची कातळ चढाई हि इतर ठिकाणांच्या मानाने 'फालतू' ठरेल.

माहुलीचा उल्लेख वाचून तीन वर्षांपूर्वीची भटकंती आठवली. टिटवाळ्याचा महागणपती, आटगांव/आसनगाव जवळचे "मानस" जैन मंदिर पाहून आम्ही माहुली सुळक्यांच्या पायथ्याशी असलेल्या निसर्ग केंद्रात पोहचलो होतो.  सुळक्यांना नवरा, नवरी, भटोबा, करवली अशी मजेशीर नावे स्थानिकांनी दिली आहेत. या फोटोत वजीर सुळका आहे का कुठे?  येथील एक आठवण. येथे महिला बचत गटातर्फे जेवणाची सुविधा पुरवली जाते. आम्ही गेलो तो दिवस रक्षाबंधनाचा असल्याने बचत गटाच्या बहुतेक सर्व महिलांनी सुटी घेतली होती. हजर असलेल्या एकट्या महिलेने जेवण बनवून देण्यास होकार दिला पण वेळ लागणार होता. म्हणून मदतीसाठी मी चुलीचा ताबा घेतला. तासाभरात ग्रुपच्या पंधरा जणांचा स्वयंपाक आटोपला होता.

In reply to by गोरगावलेकर

माहुलीचे मिपावरचे लेख. भालदार फेस (माहुली ) https://www.misalpav.com/node/20402 _________________________ किल्ले माहुली (कल्याण दरवाजाच्या खडतर वाटेने) https://www.misalpav.com/node/21990 या लेखात आहे वजीर सुळका. _______________________ माहुली गड | https://www.misalpav.com/node/23981 आणि ब्लॉग फोटोसाठी. http://mahuligad.blogspot.com/?m=1 _______________________ पुनःश्च किल्ले माहुली (Fort Mahuli Trek) https://www.misalpav.com/node/24082 _______________________ रंगभूत सुळका (माहुली किल्ला) आणि ५२ वर्षांचा तरुण https://www.misalpav.com/node/30433 _______________________ वजिर सुळका ट्रेक. https://www.misalpav.com/node/49185