असेहि एक विलगीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
अलिबाग या मुख्य शहरापासून आमचे गाव साधारण 20 किलोमीटर आहे. तसेच मांडवा जेट्टी पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर एका कोपर्यात सासवणे गाव वसलेले आहे. आमच्या गावाला आणि आजूबाजूच्या गावांना सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अशा समुद्रकिनारी पूर्वी स्थानिकांच्या वाडी, बाग घर होती याठिकाणी आता श्रीमंत लोकांनी जागा विकत घेऊन स्वतःचे बंगले बांधले आहेत व सुट्टीच्या दिवशी त्यांचे तिकडे येणे-जाणे होते तसेच अधूनमधून पार्ट्या होत असतात. या श्रीमंत लोकांमध्ये क्रिकेटर, फिल्मी दुनियेशी संबंधित लोक, तसेच मोठे उद्योगपती सामील आहेत. तर अशाच एका मोठ्या (खूप मोठया) उद्योगपतीच्या वाडी मध्ये माझे गावचे चुलत भाऊ, मित्र बागकामासाठी, स्विमिंग पूल मेंटेनन्स च्या कामासाठी, साफसफाई साठी, पाळीव जनावरे सांभाळण्याच्या कामासाठी तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी नोकरीला आहेत.
या उद्योगपतीला आपण साहेब म्हणू या कारण गावातले सर्व लोक तसेच म्हणतात. तर साहेब त्याच्या त्या वाडीमध्ये मुंबईहून यायसाठी हेलिकॉप्टर चा उपयोग करतो. त्यासाठी वाडी पासून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर वेगळी जागा घेऊन त्याने हेलिपॅड बांधलेला आहे. हेलिकॉप्टरच्या पायलट साठी अशी व्यवस्था केलेली आहे जे कि फाईव्ह स्टार हॉटेल ला सुद्धा मागे टाकेल असे ऐकिवात आहे (अतिशयोक्ती असू शकेल) मला काहीच कल्पना नाही.
या साहेबाच्या बाकी करामती पण खूप आहेत जसे की रेसिंग गाड्या (मोठ्या टायरच्या, बाईक सारखे हँडल असते त्याला) चालवण्यासाठी यांनी बंगल्यापासून चार किलोमीटर वर काही एकर जागा घेतली आहे आणि त्यामध्ये रेसिंग ट्रॅक बनवून तिथे आपली हौस पुरवायला वर्षातून एक-दोन वेळा हे तिकडे येतात.
कोरोना महामारी च्या काळात माझे गावी जास्त जाणे येणे होत नव्हते. साधारण महिन्याभरापूर्वी गावी जाऊन आलो तेव्हा मला एक वेगळीच गोष्ट कळाली
असेहि एक विलगीकरण
तर हा साहेब जेव्हा कधी येणार असेल तर त्याप्रमाणे 20 ते 25 दिवस आधी बंगल्यावरील मॅनेजमेंट ला कळवले जाते त्यानंतर तेथील बहुतांश लोकांना जे की साहेबाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षय संपर्कात येणारे असतील त्यांना कमीत कमी पंधरा दिवस quarantine ठेवले जाते. म्हणजे हा शेठ जर हेलिपॅड वरून बंगल्यात जाणारा असेल तरी सुद्धा हेलिपॅड वरील बहुतांश कामगारांना quarantine राहायला सांगितले जाते. ज्याला मंजुर नसेल त्याने आपला रस्ता धरावा असा अप्रत्यक्ष आदेश असतो. त्यांच्या जेवण, नाश्ता व इतर राहण्याची सोय केली जाते. हेलिपॅड वरील आवारामध्ये साहेबाच्या मुलीच्या मनोरंजनासाठी काही पाळीव प्राणी पाळलेले आहेत जसे की बकऱ्या, गाई, ससे तसेच विविध प्रकारच्या फुलवनस्पती चे बागकाम केलेले आहे यांचा सांभाळ करणारा जरी प्रत्यक्ष साहेबाच्या संपर्कात येणार नसेल तरीसुद्धा त्याला क्यारन्टीन केले जाते. असे सर्व कामगारांना पंधरा पंधरा वीस दिवस quarantine केले जाते. काही वेळेस साहेबा चा दोन-तीन दिवस आधी प्लान चेंज होतो पुढे ढकलला जातो किंवा रद्द होतो त्या केस मध्ये सुद्धा यांचा कालावधी वाढवला जातो. ऑन ड्युटी २४ तास. सुरवातीला यासर्वांची मजा वाटली पण आता सर्वजण त्रासून गेले आहेत. दर दीड-दोन महिन्यांनी साहेबाचे येणे-जाणे होते (कदाचित विदेश दौरे बंद असावेत, नाहीतर हे वरचेवर परदेशात असतात) त्यामुळे या सर्वांना घरी जवळ जवळ जायला मिळतच नाही. जरी घर वाडीच्या जवळ असले तरी पण प्रत्यक्ष घरी जाणे होत नाही घरच्यांना बंगल्याच्या आवारातच लांबून बघावे लागते जवळ जाऊन भेटणे होत नाही. घरच्या पेक्षा जास्त वेळ आता यांचा वाडी आणि हेलिपॅड वरच जातो म्हणजे जसे की पंधरा दिवस जर quarantine राहिले साहेब आला किंवा येऊन गेला तर तीन-चार दिवसांसाठी घरी येतात पुन्हा दुसरे कोण गेस्ट येणार असतील किंवा साहेबाची पत्नी इतर कोणी येणार असेल तर यांना पुन्हा quarantine केले जाते. बाकीच्या वाडी किंवा बंगल्यांमध्ये अशाच प्रकारे होत असते परंतु ते थोड्या फार प्रमाणात आता सौम्य झाले आहे परंतु हा साहेब काही केल्या हे कमी करायला तयार नाही.
आता काही हुशार लोक बोलू लागले आहेत की जर 24 तास कामावर राहत असेल तर आम्हाला पगारा शिवाय वेगळे काहीतरीएक्स्ट्रा पैसे मिळाले पाहिजेत अशी कुजबुज चालू आहे पण हे बोलणार कोण कारण कामगार खुप आहेत पण त्यांच्यात एकी नाही. तसेच हे कामगार वेगवेगळ्या एजन्सी तर्फे नेमले गेले आहेत जसे की हाउसकीपिंग ची वेगळी एजन्सी, गार्डनिंग ची वेगळी एजन्सी, सिक्युरिटी ची वेगळी एजन्सी. तसेच सध्याच्या काळात जर का नोकरी गेली तर काय करायचे हा सुद्धा प्रश्न असावा त्यामुळे कोणी काही बोलत नसावे. तसेच या सर्व कामगारांचे लसीकरण का करून घेतले जात नाही हा सुद्धा एक प्रश्न आहेच त्या साहेबाला यांचे लसीकरण करण्यात काहीच अडचण नसावी.
माझा एक मित्र त्या बंगल्यामध्ये स्विमिंग पूल मेंटेनन्स चे काम करायचा सकाळी एखाद दोन तास आणि संध्याकाळी एखादं तास काम असायचे बाकीच्या फावल्या वेळेत तो दुसरा वाड्यांमध्ये काम करतो. एक दुसरी वाडी पूर्णपणे तो सांभाळतो. नाईट ड्युटी सुद्धा करतो. तर त्याला सुद्धा quarantine राहायला सांगितले होते परंतु जर का या तीन चार तासाच्या कामासाठी १५-२० दिवस quarantine राहिले तर बाकी दुसरी कामे त्याला सोडावी लागली असती त्यामुळे त्याने ह्या स्विमिंग पूल मेंटेनन्स चे काम सोडायचे ठरवले जेणेकरून बाकीचे दोन तीन कामे त्याला करता येतील.
(शुद्धलेखन तसेच व्याकरणातील चुकांसाठी क्षमस्व)
प्रतिक्रिया
बंगला व वाडीhttps://www
यावर मार्ग मी सुचवू शकलो असतो
-:)
ह्याला पिळवणूक म्हणतात
माझ्या एका परिचिताने सांगितले
नाही म्हणायला सॅलरी स्लिप
अलिबाग
इतकी फाटली ...
कदाचित हा सर्व प्रकार
अरेरे. थोडं आधी कळलं असतं
साहेबाच्या बंगल्याच्या आणि
पुनश्च हरि ओम
परंतु आता डिजिटल युगात खर्च वाढल्याने ते हि पैसे पुरेनासे होतात
प्रश्न तो नाही
अगदी बरोबर साहेबांवर खटलाच
:)
तर याचा अर्थ असा आहे की एक
तर याचा अर्थ असा आहे की एक