असेहि एक विलगीकरण

shashu's picture
shashu in जनातलं, मनातलं
13 Jul 2021 - 5:28 pm

अलिबाग या मुख्य शहरापासून आमचे गाव साधारण 20 किलोमीटर आहे. तसेच मांडवा जेट्टी पासून तीन-चार किलोमीटर अंतरावर एका कोपर्‍यात सासवणे गाव वसलेले आहे. आमच्या गावाला आणि आजूबाजूच्या गावांना सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या अशा समुद्रकिनारी पूर्वी स्थानिकांच्या वाडी, बाग घर होती याठिकाणी आता श्रीमंत लोकांनी जागा विकत घेऊन स्वतःचे बंगले बांधले आहेत व सुट्टीच्या दिवशी त्यांचे तिकडे येणे-जाणे होते तसेच अधूनमधून पार्ट्या होत असतात. या श्रीमंत लोकांमध्ये क्रिकेटर, फिल्मी दुनियेशी संबंधित लोक, तसेच मोठे उद्योगपती सामील आहेत. तर अशाच एका मोठ्या (खूप मोठया) उद्योगपतीच्या वाडी मध्ये माझे गावचे चुलत भाऊ, मित्र बागकामासाठी, स्विमिंग पूल मेंटेनन्स च्या कामासाठी, साफसफाई साठी, पाळीव जनावरे सांभाळण्याच्या कामासाठी तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी नोकरीला आहेत.

या उद्योगपतीला आपण साहेब म्हणू या कारण गावातले सर्व लोक तसेच म्हणतात. तर साहेब त्याच्या त्या वाडीमध्ये मुंबईहून यायसाठी हेलिकॉप्टर चा उपयोग करतो. त्यासाठी वाडी पासून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर वेगळी जागा घेऊन त्याने हेलिपॅड बांधलेला आहे. हेलिकॉप्टरच्या पायलट साठी अशी व्यवस्था केलेली आहे जे कि फाईव्ह स्टार हॉटेल ला सुद्धा मागे टाकेल असे ऐकिवात आहे (अतिशयोक्ती असू शकेल) मला काहीच कल्पना नाही.
या साहेबाच्या बाकी करामती पण खूप आहेत जसे की रेसिंग गाड्या (मोठ्या टायरच्या, बाईक सारखे हँडल असते त्याला) चालवण्यासाठी यांनी बंगल्यापासून चार किलोमीटर वर काही एकर जागा घेतली आहे आणि त्यामध्ये रेसिंग ट्रॅक बनवून तिथे आपली हौस पुरवायला वर्षातून एक-दोन वेळा हे तिकडे येतात.
कोरोना महामारी च्या काळात माझे गावी जास्त जाणे येणे होत नव्हते. साधारण महिन्याभरापूर्वी गावी जाऊन आलो तेव्हा मला एक वेगळीच गोष्ट कळाली

असेहि एक विलगीकरण
तर हा साहेब जेव्हा कधी येणार असेल तर त्याप्रमाणे 20 ते 25 दिवस आधी बंगल्यावरील मॅनेजमेंट ला कळवले जाते त्यानंतर तेथील बहुतांश लोकांना जे की साहेबाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षय संपर्कात येणारे असतील त्यांना कमीत कमी पंधरा दिवस quarantine ठेवले जाते. म्हणजे हा शेठ जर हेलिपॅड वरून बंगल्यात जाणारा असेल तरी सुद्धा हेलिपॅड वरील बहुतांश कामगारांना quarantine राहायला सांगितले जाते. ज्याला मंजुर नसेल त्याने आपला रस्ता धरावा असा अप्रत्यक्ष आदेश असतो. त्यांच्या जेवण, नाश्ता व इतर राहण्याची सोय केली जाते. हेलिपॅड वरील आवारामध्ये साहेबाच्या मुलीच्या मनोरंजनासाठी काही पाळीव प्राणी पाळलेले आहेत जसे की बकऱ्या, गाई, ससे तसेच विविध प्रकारच्या फुलवनस्पती चे बागकाम केलेले आहे यांचा सांभाळ करणारा जरी प्रत्यक्ष साहेबाच्या संपर्कात येणार नसेल तरीसुद्धा त्याला क्यारन्टीन केले जाते. असे सर्व कामगारांना पंधरा पंधरा वीस दिवस quarantine केले जाते. काही वेळेस साहेबा चा दोन-तीन दिवस आधी प्लान चेंज होतो पुढे ढकलला जातो किंवा रद्द होतो त्या केस मध्ये सुद्धा यांचा कालावधी वाढवला जातो. ऑन ड्युटी २४ तास. सुरवातीला यासर्वांची मजा वाटली पण आता सर्वजण त्रासून गेले आहेत. दर दीड-दोन महिन्यांनी साहेबाचे येणे-जाणे होते (कदाचित विदेश दौरे बंद असावेत, नाहीतर हे वरचेवर परदेशात असतात) त्यामुळे या सर्वांना घरी जवळ जवळ जायला मिळतच नाही. जरी घर वाडीच्या जवळ असले तरी पण प्रत्यक्ष घरी जाणे होत नाही घरच्यांना बंगल्याच्या आवारातच लांबून बघावे लागते जवळ जाऊन भेटणे होत नाही. घरच्या पेक्षा जास्त वेळ आता यांचा वाडी आणि हेलिपॅड वरच जातो म्हणजे जसे की पंधरा दिवस जर quarantine राहिले साहेब आला किंवा येऊन गेला तर तीन-चार दिवसांसाठी घरी येतात पुन्हा दुसरे कोण गेस्ट येणार असतील किंवा साहेबाची पत्नी इतर कोणी येणार असेल तर यांना पुन्हा quarantine केले जाते. बाकीच्या वाडी किंवा बंगल्यांमध्ये अशाच प्रकारे होत असते परंतु ते थोड्या फार प्रमाणात आता सौम्य झाले आहे परंतु हा साहेब काही केल्या हे कमी करायला तयार नाही.

आता काही हुशार लोक बोलू लागले आहेत की जर 24 तास कामावर राहत असेल तर आम्हाला पगारा शिवाय वेगळे काहीतरीएक्स्ट्रा पैसे मिळाले पाहिजेत अशी कुजबुज चालू आहे पण हे बोलणार कोण कारण कामगार खुप आहेत पण त्यांच्यात एकी नाही. तसेच हे कामगार वेगवेगळ्या एजन्सी तर्फे नेमले गेले आहेत जसे की हाउसकीपिंग ची वेगळी एजन्सी, गार्डनिंग ची वेगळी एजन्सी, सिक्युरिटी ची वेगळी एजन्सी. तसेच सध्याच्या काळात जर का नोकरी गेली तर काय करायचे हा सुद्धा प्रश्न असावा त्यामुळे कोणी काही बोलत नसावे. तसेच या सर्व कामगारांचे लसीकरण का करून घेतले जात नाही हा सुद्धा एक प्रश्न आहेच त्या साहेबाला यांचे लसीकरण करण्यात काहीच अडचण नसावी.

माझा एक मित्र त्या बंगल्यामध्ये स्विमिंग पूल मेंटेनन्स चे काम करायचा सकाळी एखाद दोन तास आणि संध्याकाळी एखादं तास काम असायचे बाकीच्या फावल्या वेळेत तो दुसरा वाड्यांमध्ये काम करतो. एक दुसरी वाडी पूर्णपणे तो सांभाळतो. नाईट ड्युटी सुद्धा करतो. तर त्याला सुद्धा quarantine राहायला सांगितले होते परंतु जर का या तीन चार तासाच्या कामासाठी १५-२० दिवस quarantine राहिले तर बाकी दुसरी कामे त्याला सोडावी लागली असती त्यामुळे त्याने ह्या स्विमिंग पूल मेंटेनन्स चे काम सोडायचे ठरवले जेणेकरून बाकीचे दोन तीन कामे त्याला करता येतील.

(शुद्धलेखन तसेच व्याकरणातील चुकांसाठी क्षमस्व)

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

shashu's picture

13 Jul 2021 - 5:48 pm | shashu

बंगला व वाडी
https://www.google.com/maps/@18.7918251,72.8648393,209m/data=!3m1!1e3

ह्यालीप्याड
https://www.google.com/maps/@18.7874978,72.873374,176m/data=!3m1!1e3

पण माझे डाटा सायंटिस्ट मित्र सध्या क्वारन्टइन असल्याने त्यांचे कडून माहीती जमवून आपणास सांगता येणे तूर्त शक्य नाही :(

shashu's picture

13 Jul 2021 - 10:50 pm | shashu

-:)

रोजगार कमी आणि बेरोजगार अती प्रचंड हे एक कारण आहे.
खुली अर्थ व्यवस्थेचे मूळ उत्पादन जास्त असेल की किंमत कमी.
पण मानवी मूल्य जपणे,प्रतेक व्यक्ती ला योग्य अधिकार मोबदला मिळावा ही समाजवादी विचार सरणी.
पण नवं श्रीमंत लोकांस समाजवादी विचार सरणी आवडत नाही.
पिळवणूक करणारी भांडवल शाही वृत्ती आवडते.
तुमच्या लेखातील उद्योग पती किमान वेतनाचा नियम पण नक्कीच पाळत नसणार आणि कामाचे तास विषयी असलेले नियम पण पाळत नसणार.
किरकोळ आठ ,दहा हजारांत लोकांना २४ तास १२ महिने राबवून घेत असेल.
नवीन वेठ बिगारी चा जा अवतार आहे.

माझ्या एका परिचिताने सांगितले लॉकडाऊन चालू असताना स्वीगीमध्ये त्याला ट्रिपमागे अक्षरश: दहा अन वीस रुपये सुटत होते ऑर्डरमागे किमान 25 मिनिटे तरी जात असत... पुन्हा काम करणारे भरपूर, घरात नुसतं बसून कंटाळा येतो म्हणून फिरत रहायचे सुख म्हणून दिवस ढकलले... मग पोलिसही हुशार झाले नुसता गणवेश नाही तर app उघडून खरेच डिलिव्हरी करतोय की असाच उंडारतोय ते चेक करत... बरे ऑर्डर करणारे सगळेच गरजवन्त त्यामुळे घसघशीत टीप वगैरे विषयच नाही :(

नाही म्हणायला सॅलरी स्लिप मिळते पी एफ कट होतो.
पण जेमतेम आठवी ते बारावी शिक्षण झालेली हि सर्व कामगार त्यांना त्यामध्येच समाधान असते. विशेष असे कोणते कौशल्य नसते. काहीजण तर अशिक्षित आहेत. तसेच दुसरा काही पर्याय नसल्याने जे मिळेल ते काम करायची तयारी. त्यामुळे कमी पगारात सुद्धा पहिले भागून जायचे. परंतु आता डिजिटल युगात खर्च वाढल्याने ते हि पैसे पुरेनासे होतात

Rajesh188's picture

13 Jul 2021 - 9:53 pm | Rajesh188

मुंबई पासून सर्वात जवळचा प्रदेश .समुद्र मार्गे काही मिनिटाच्या अंतरावर.लांब दूर बोरिवली,अंधेरी , ठाण्या पेक्षा जवळ.
उद्योगपती नी तिथे जमिनी खरेदी करायला सुरुवात करायचे काळ पंधरा वीस वर्ष.
आणि प्रतेक पाच ते दहा एकर जमिनी त्यांनी खरेदी केलेल्या आहेत.
मौज मजा हा उध्येश असेल असे नाही.
Bjp सरकार अलिबाग ला रस्ता मार्गे जोडण्याची भाषा बोलायला लागले आहेत.
Sea link सारखा रस्ता ते नक्की बांधणार पण जो पर्यंत अलिबाग पूर्ण पने उद्योगपती खरेदी करत नाहीत तो पर्यंत नाही.
आणि तिथे सिडको ,हुडको काही येणार नाही विकास करण्यासाठी.
मग सरकार कोणत्या ही पक्षाचे असू ध्या.
आणि मस्त सर्व सोयींनी युक्त,मुंबई पासून जवळ शांत,जागेवर स्थानिक लोकांची मालकी नसेल.
बघा पुढे असेच घडणार .

गामा पैलवान's picture

13 Jul 2021 - 9:54 pm | गामा पैलवान

shashu,

साहेबांची जाम फाटलेली दिसतेय. यावरून साहेब कोण याचा अंदाज बांधता येतो. हा साहेब जगायला खरंच लायक आहे का, याची मला शंका येऊ लागलीये.

आ.न.,
-गा.पै.

कदाचित हा सर्व प्रकार साहेबाला माहिती सुद्धा नसावा पण त्याचे असिस्टंट म्हणा सेक्रेटरी म्हणा किंवा मॅनेजर म्हणा हे असे करत असावेत कारण जर का चुकून सुद्धा साहेब किंवा त्यांच्या कुटुंबातील किंवा गेस्ट पैकी कोणाला ह्या कामगारांकडून लागण झाली तर पहिला हातोडा ह्या मॅनेजर, असिस्टंट, सेक्रेटरी वरच पडेल त्यामुळे ते जास्त काळजी घेत असावेत असा माझा अंदाज आहे. आणि यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. शेवटी सर सलामत तो पगडी पचास.

तसं बघायला गेलं तर तो साहेब खूप चैनी हौस-मौज करणारे जीवन जगतो. म्हणायला गेलं तर त्याच्या वडिलांनी तयार करून ठेवलेला बिझनेस आता तो चालवत आहे आणि त्यातून तो बक्कळ पैसा कमावतो.

गोरगावलेकर's picture

13 Jul 2021 - 10:20 pm | गोरगावलेकर

अरेरे. थोडं आधी कळलं असतं तर हेही ठिकाण नजरेखालून घालता आले असते. असो. या फेब्रूवारीतच भेट दिली आपल्या गावाला. बंगले जरी झाले असले तरी खूप सुंदर आहे आपले सासवणे गाव आणि आजूबाजूचा परिसर.
करमरकर यांचे शिल्पालय पाहण्यासाठी आपल्या गावाला आवर्जून भेट दिली.
अगदी शांत आणि सुंदर असा आवस बीच तर खूपच आवडला. वरसोली बीचही छानच आहे.

मांडवा जेट्टी

करमरकर संग्रहालयातील एक शिल्प : हीरा कोळीण

आवस बीच

साहेबाच्या बंगल्याच्या आणि वाडीची कंपाउंड वॉल बघून मला परत यावे लागले असते :) :) :) :)
सासवणे बीच सुद्धा चांगला आहे परंतु तो त्या प्रमाणात देखरेखीखाली नाही आहे. आवास बीच बऱ्यापैकी सुशोभिकरणाचे काम केलेले आहेत तसे सासवणे बीच वर दिसत नाहीत.
परंतु हे बीच नेहमी कमी रहदारी असतात शांतता अनुभवायची असेल तर या बाजूस फिरायला जाणे उत्तम.

shashu's picture

14 Jul 2021 - 5:40 pm | shashu

झी टॉकीज वर १२ जुलै ला दाखवण्यात आलेला 'पुनश्च हरि ओम' हा संपूर्ण चित्रपट सासवणे, आवास आणि किहीम येथे चित्रित झालेले आहे.

परंतु आता डिजिटल युगात खर्च वाढल्याने ते हि पैसे पुरेनासे होतात

म्हणजे ? डिजिटल एज मध्ये खर्च वाढला ह्या जेनेरीक वाक्याचा अर्थ काय हे मला आजवर कळलं नाही, डिजिटल एज मध्ये माणूस एक ऐवजी चार भाकरी खाऊ लागलं आहे ? का कापड वर्षाला १० वार फाडू लागलं आहे, ह्याचा अर्थ काय समजावा नेमका ?

Rajesh188's picture

14 Jul 2021 - 9:02 am | Rajesh188

मोठ मोठे उद्योगपती पण किमान वेतन ,किमान कामाच्या तासाचे नियम पाळत नाहीत हा आहे.
साहेब येण्या अगोदर विलागिकरण कामगार न चे केले जाते.काही अडचण नाही त्यांच्या सुरक्षेसाठी ते योग्य आहे.
पण २४ तास कामगार ना बंदिस्त करून ठेवले तर त्यांच्या जेवणाचा(उत्तम) राहण्याची,झोपण्याची व्यवस्था केली जाते का हा प्रश्न आहे.
त्यांना २४ तास तिथे राहण्याचा मोबदला दिला जातो का हा आहे.
नक्कीच असे होत नसणार.
आणि ह्या वृत्तीचा. निषेध करणे गरजेचे आहे.
ही वृत्ती बळावत चालली आहे.
अनेक कंपन्यांनी पण security, hk स्टाफ ला असेच बांधून ठेवले होते.
जेवणाच्या नावावर डाळ भात रोज .आणि झोपायला योग्य जागा नाही.बाथरूम ची नीट व्यवस्था नाही.
आणि तिथेच राहिले म्हणून वेगळा आर्थिक लाभ नाही.
वेठबिगारी अशीच असायची पूर्वी च्या काळात.

सुबोध खरे's picture

14 Jul 2021 - 6:32 pm | सुबोध खरे

अगदी बरोबर साहेबांवर खटलाच भरायला पाहिजे आणि त्यांचा बंगला, हेलिपॅड, स्विमिंग पूल सर्व बंदच करून टाकायला पाहिजे.

लोकांना वेठ बिगारीला लावतात म्हणजे काय?

जाता जाता -- आमच्या घराच्या जवळ असेच एक साहेब राहतात त्यांच्या कुत्र्याला( हा कुत्रा एखादा वासराएवढा मोठा आहे) फिरवायला एक वेगळा माणूस ठेवलेला आहे. माणसाला कुत्रा फिरवायला ठेवतात म्हणजे काय? हे ताबडतोब बंद झाले पाहिजे आणि कुत्रा सुद्धा वनखात्यात वर्ग केला पाहिजे. आणि त्या माणसाला वनखात्यात सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे.

श्रमशक्ती चा विजय असो.

गॉडजिला's picture

14 Jul 2021 - 7:17 pm | गॉडजिला

खिक्क...

तर याचा अर्थ असा आहे की एक ऐवजी चार भाकरी खाऊ लागला असे नाही तर एक मोबाईल ऐवजी चार मोबाईल वापरला जाऊ लागला आहे त्यामध्ये सुद्धा 2-2 सिम असतात तसेच गरजेपेक्षा जास्त टीव्ही बघितला जाऊ लागला त्यामुळे चैनल चा रिचार्ज वाढले आणि आपण जितका विचार करतो की आपण मोबाईल मध्ये २५० चा रिचार्ज करूया के ३०० तितका विचार ही लोक करत नाहीत हा माझा अनुभव आहे.
माझा परिचितांच्या एक उदाहरण देतो एक 22 वर्षाची मुलगी पूर्वी कामाला जायची काय 4-5 हजार पगार मिळायचा. तिचे वडील पोल्ट्रीमध्ये काम करतात पगार तितका नाही आहे. तर लोक डॉन मध्ये या मुलीचे काम गेले. घरांमध्ये एक 80 वर्षाची म्हातारी आजी असते आणि एक भाऊ बारावी झालेला आहे तर ह्या तिघांकडे सुद्धा मोबाईल आहेत आता घरात कमावणारे फक्त एक ते वडील आहेत मुलगा बारावी झाल्यानंतर मोबाईल साठी हट्ट धरून बसला आणि त्याला मोबाईल घेऊन दिला गेला आता एकच घरात गरज नसताना सुद्धा पाच ते सहा सिम आहेत
नाही म्हटलं तरी हजार एक रुपये महिन्याचा रिचार्ज वर घालवले जातात.
हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून तुम्हाला माझा अनुभव सांगितला आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत तिच्या ची गरज नसताना सुद्धा वापरल्या जातात वापरल्या जातात याला हरकत नाही पण आपल्या मिळकतनुसार आणि या गरजेच्या वस्तू नसतील तर त्या वापरायला हवेत का, इतक्या मोठ्या प्रमाणात यावर खर्च केला गेला पाहिजे का हा प्रश्न आहे.
मोबाईलचा रिचार्ज करताना आपन चार वेळा विचार करतो 250 रिचार्ज करू कि ३०० कोणता फायद्यात पडेल पण हे लोक असा विचार करत नाहीत सरसकट खर्च करून मोकळे होतात. टीव्ही चा रिचार्ज सुद्धा तसेच आहे गरज नसताना सुद्धा एचडी चॅनल्स रिचार्ज केले जातात.

त्यामुळेच मी म्हटले कि डिजिटल युगात खर्च थोडा वाढलेला आहे. कोणाला पटेल का पटणार नाही पण माझ्या अनुभवावरून मी सांगतोय. कदाचित मी चुकीचा आहे असू शकतो

तर याचा अर्थ असा आहे की एक ऐवजी चार भाकरी खाऊ लागला असे नाही तर एक मोबाईल ऐवजी चार मोबाईल वापरला जाऊ लागला आहे त्यामध्ये सुद्धा 2-2 सिम असतात तसेच गरजेपेक्षा जास्त टीव्ही बघितला जाऊ लागला त्यामुळे चैनल चा रिचार्ज वाढले आणि आपण जितका विचार करतो की आपण मोबाईल मध्ये २५० चा रिचार्ज करूया के ३०० तितका विचार ही लोक करत नाहीत हा माझा अनुभव आहे.
माझा परिचितांच्या एक उदाहरण देतो एक 22 वर्षाची मुलगी पूर्वी कामाला जायची काय 4-5 हजार पगार मिळायचा. तिचे वडील पोल्ट्रीमध्ये काम करतात पगार तितका नाही आहे. तर लोक डॉन मध्ये या मुलीचे काम गेले. घरांमध्ये एक 80 वर्षाची म्हातारी आजी असते आणि एक भाऊ बारावी झालेला आहे तर ह्या तिघांकडे सुद्धा मोबाईल आहेत आता घरात कमावणारे फक्त एक ते वडील आहेत मुलगा बारावी झाल्यानंतर मोबाईल साठी हट्ट धरून बसला आणि त्याला मोबाईल घेऊन दिला गेला आता एकच घरात गरज नसताना सुद्धा पाच ते सहा सिम आहेत
नाही म्हटलं तरी हजार एक रुपये महिन्याचा रिचार्ज वर घालवले जातात.
हे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून तुम्हाला माझा अनुभव सांगितला आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत तिच्या ची गरज नसताना सुद्धा वापरल्या जातात वापरल्या जातात याला हरकत नाही पण आपल्या मिळकतनुसार आणि या गरजेच्या वस्तू नसतील तर त्या वापरायला हवेत का, इतक्या मोठ्या प्रमाणात यावर खर्च केला गेला पाहिजे का हा प्रश्न आहे.
मोबाईलचा रिचार्ज करताना आपन चार वेळा विचार करतो 250 रिचार्ज करू कि ३०० कोणता फायद्यात पडेल पण हे लोक असा विचार करत नाहीत सरसकट खर्च करून मोकळे होतात. टीव्ही चा रिचार्ज सुद्धा तसेच आहे गरज नसताना सुद्धा एचडी चॅनल्स रिचार्ज केले जातात.

त्यामुळेच मी म्हटले कि डिजिटल युगात खर्च थोडा वाढलेला आहे. कोणाला पटेल का पटणार नाही पण माझ्या अनुभवावरून मी सांगतोय. कदाचित मी चुकीचा आहे असू शकतो