✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ६)

श
श्रीगुरुजी यांनी
गुरुवार, 04/22/2021 - 08:59  ·  लेख
लेख
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे. https://www.bloomberg.com/news/articles/2021-04-21/australia-cancels-state-s-deals-with-china-s-belt-and-road इस्लाम संस्थापक महंमदाचे व्यंगचित्र फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाने प्रसिद्ध केले होते व फ्रान्स सरकारने त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने धर्मांधांसमोर लोटांगण घालून फ्रान्सच्या पाकिस्तानातील राजदूताची हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव संसदेत आणला आहे. याच्या निषेधार्थ फ्रान्सने पाकिस्तानातील आपले १५ राजनैतिक अधिकारी परत बोलाविले आहेत. https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/world-news/france-recalls-15-diplomats-from-pakistan-in-wake-of-violent-protests-101618819890891-amp.html
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
92180 वाचन

💬 प्रतिसाद (362)

प्रतिक्रिया

मार्क्सवादी साम्यवादी पक्षाचे

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/22/2021 - 10:00 नवीन
मार्क्सवादी साम्यवादी पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे चिरंजीव आशिष यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते. चीनच्या तालावर नाचणाऱ्या साम्यवादी नेत्याच्या मुलाच्या मृत्युसाठी चीननेच तयार करून जगभर पसरविलेला कोरोना विषाणू कारणीभूत ठरावा हा दुर्दैवी योगायोग आहे. https://news.rediff.com/commentary/2021/apr/22/cpim-leader-sitaram-yechurys-son-34-dies-of-covid/35c7306143cc604d0b89345a7ee59acc
  • Log in or register to post comments

CORONA व्हायरस

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 10:24 नवीन
अ़. Corona व्हायरस मानवनिर्मित आहे आणि तो चीन नी बनवला आहे? तरच जगभर पसरला आहे. WHO नी ही माहिती घेवून चीन वर कारवाई करण्यास युनो la सांगावे. भारतात खरोखर खूप कठीण प्रश्नांची पण उत्तर लोक शोधून काढतात ग्रेट. जग गेली दोन वर्ष हा व्हायरस नैसर्गिक आहे हेच समजत होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अहो WHO तर तुमच्या साहेबांचा

अमर विश्वास
गुरुवार, 04/22/2021 - 10:39 नवीन
अहो WHO तर तुमच्या साहेबांचा सल्ला घेते ना ? ते तुमच्या (ज्वाज्वल्य वगैरे वगैरे ) हिंदुत्ववादी वृत्तपत्राचे (कार्यकारी) संपादक असं म्हणाले होते .. हो तेच ते .. घराच्या घरी मुलाखती देतात - घेतात ते तेव्हड तुमच्या साहेबांना सांगा ... WHO कडून हे किरकोळ काम करून घ्यायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अहो WHO तर तुमच्या साहेबांचा

अमर विश्वास
गुरुवार, 04/22/2021 - 10:39 नवीन
अहो WHO तर तुमच्या साहेबांचा सल्ला घेते ना ? ते तुमच्या (ज्वाज्वल्य वगैरे वगैरे ) हिंदुत्ववादी वृत्तपत्राचे (कार्यकारी) संपादक असं म्हणाले होते .. हो तेच ते .. घराच्या घरी मुलाखती देतात - घेतात ते तेव्हड तुमच्या साहेबांना सांगा ... WHO कडून हे किरकोळ काम करून घ्यायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

:(

कॉमी
गुरुवार, 04/22/2021 - 10:32 नवीन
श्रद्धांजली ३४ हे काय वय झाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आशिष ह्यांच्या बद्दल मला

साहना
Fri, 04/23/2021 - 11:42 नवीन
आशिष ह्यांच्या बद्दल मला माहिती नाही पण पुत्रशोक कुणालाही होऊ नये आणि कृपया ह्या मृत्यूवर धुळवड करू नये. ज्या व्यक्ती राजकारणासाठी माणुसकी विसरतात त्यांना दोन्ही पैकी कुणाचाच लाभ मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दोन बातम्या ....

सुक्या
गुरुवार, 04/22/2021 - 12:40 नवीन
बातमी १: गेल्या वर्षी जेव्हा करोनाचा कहर सुरु झाला तेव्हा भारतात आता काय होइल या विचारानेच पोटात गोळा आला होता. परंतु भारतात मोदींनी लावलेल्या कडक लॉकडाउन मुळे तो अनियंत्रित होण्याचे बरेच मार्ग बंद झाले. पर्यायाने परीस्थीती बर्‍यापैकी नियंत्रणात होती. हे दु:स्वप्न आता संपले असे म्हणायाच्या आतच पुन्हा हा डोंब उसळ्ला. याला बर्‍यापैकी लोकांचा निष्काळजी पणा कारणीभुत आहे. "गेला करोना", "कधीतरी मरायचेच आहे तेव्हा मला काहीही फरक पडत नाही" असे बोलणारे लोक, बार, बाजार, लग्न , कुंभमेळा, निवडनुका , पब यासारख्या ठिकाणी झालेली गर्दी, मास्क लावायच्या ऐवजी उपरणे, कुठलेही कापड, साडीचा पदर किवा नाकाखाली आलेला मास्क यावरुन तरी आम्ही भारतीय लोक कधीच सुधारणार नाही याची खात्री पटते. आता तर पुढे काय हा विचार सुद्धा करवत नाही. देर आये म्हणुन आता लोकडाउन केले त्याने फरक पडावा हिच आशा आहे. बातमी २: "मै ऐसे १० डॉक्टर खडी कर सकती हु" करोना च्या आताच्या काळात शब्द्शः जीव धोक्यात घालुन अहोरात्र काम करनार्‍या डॉक्टर लोकांशी भांडणारी ही बाई. रात्रंदिवस जिवाचे रान करुन रुग्ण् सेवा करणारर्‍या लोकांना खरेच आशा वेदनादाई अनुभवातुन जायलाच हवे का? कुठुन येतो हा मग्रुरपणा? डॉक्टर, पोलीस व इतर फ्रंट्लाईनवर काम करणार्‍या लोकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी जगभरात टाळ्या / थाळ्या / घंटा वाजवल्या गेल्या. अगदी मंदीराच्या बाहेर "मंदीर बंद आहे कारण परमेश्वर आत नाही. तो जवळच्या रुग्णालयात कोविड चा ईलाज करतो आहे" अशी पाटी लाउन त्या लोकांविषयी कृतज्ञता / आदर व्यक्त केला गेला. ती भावना ह्या लोकांमधे कधी येणार? कधी शिकणार आपण हे सारे? जाता जाता : या बाईंचा हरकाम्या नोकर होस्पिटल मधे जिथे कोरोना चे रुग्ण आहेत तिथे बिना मास्क फिरतोय. आशा लोकांचे पार्श्वभाग दर दोन दिवसाला सुजवावेत या मताचा मी आहे. आपल्या आजुबाजुला असलेल्या ५० जणांचे जीव धोक्यात घालणार्या असल्या लोकांमुळेच चांगल्या गोष्टीचे मातेरे होते.
  • Log in or register to post comments

मी अशा लोकांच्या

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 12:46 नवीन
नडग्या फोडून काढव्यात ह्या मताचा आहे.हाडाचा चुरा झाला पाहिजे आयुष्भर कुबड्या घेतल्या शिवाय चालता आले नाही पाहिजे.पोलिस ना मोकळे रान ध्या ह्या मग्रूर लोकांना दोन मिनिटात जागेवर आणतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

.पोलिस ना मोकळे रान ध्या ह्या

प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/22/2021 - 13:01 नवीन
.पोलिस ना मोकळे रान ध्या ह्या मग्रूर लोकांना दोन मिनिटात जागेवर आणतील. -- या सरकारने पोलीसांना मोकळे रान दिले आहे मात्र ते फक्त 'खंडणी' वसुल करण्याकरता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

साहेब.. गल्ली चुकली.

बापूसाहेब
गुरुवार, 04/22/2021 - 13:23 नवीन
साहेब.. गल्ली चुकली. त्या बाई तुमच्याच शिवसेनेच्या आहेत. तुम्हाला तयांच्या बाजूने बोलायचे आहे.. त्याचसाठी तुम्ही मिपावर जन्म घेतलयेत ना??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

बातमी दोन. संपूर्ण व्हिडीओ.

प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/22/2021 - 12:46 नवीन

Full video of shivsena corporator misbehaving with doctors. pic.twitter.com/JfqmLJiiyL

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 21, 2021
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

या

प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/22/2021 - 12:53 नवीन
व्हिडीओत ती बाई म्हणतेय 'तू डॉक्टर होगा तेरे घर का', असे शब्द वापरायला तेही या महामारीच्या दिवसात शरम कशी वाटत नाही या गुंडसेनेला. रूग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या १३ निवासी डॉक्टरांनी राजीनामा दिला. काम खोळंबळे अन्य रुग्णांना त्रास झाला. याला जबाबदार कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

खरयं ...

सुक्या
गुरुवार, 04/22/2021 - 12:56 नवीन
खरयं ... असल्या झोपडपट्टी छाप लोकांकडुन काय अपेक्षा !! . शरम वगेरे दुर ची गोष्ट. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

झालं आता, तुम्ही पण....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 13:17 नवीन
महाराष्ट्र द्रोही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

चालतयं की. तुम्ही आम्ही एकच

सुक्या
गुरुवार, 04/22/2021 - 13:37 नवीन
चालतयं की. तुम्ही आम्ही एकच कॅटेगरी ... फक्कड कट्टा करु या . . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कधीही

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 14:10 नवीन
लाॅकडाऊन संपले की भेटूच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

ही लोकं म्हणजे गळ्यात रूमाल

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/22/2021 - 14:34 नवीन
ही लोकं म्हणजे गळ्यात रूमाल बांधून, हातात पावतीपुस्तक घेऊन, तोंडातला गुटख्याचा तोबरा पचकन थुंकून, होळी/गणेशोत्सव/दहीहंडी वगैरे कारण सांगून, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडून वर्गणी नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या रिकामटेकड्या उपद्रव्यांची टोळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

चीन संतापला आहे. "नवीन शीतयुद्ध "

चौकस२१२
गुरुवार, 04/22/2021 - 13:07 नवीन
ऑस्ट्रेलियाने व्हिक्टोरिया प्रांतात चीनच्या सहकार्याने उभारले जाणारे Belt and Road Initiative प्रकल्प रद्द केल्याने चीन संतापला आहे. "नवीन शीतयुद्ध " हे चालुच आहे ... ऑस्ट्रेलिया अमेरिकेचा स्थानिक दोस्त/ चुलत भाऊ असल्यामुळे चीन ला ह्या खेळ्या खेळाव्याचं लागतात बार्ली निर्यात वर बंदी , वाईन निर्यात वर बंदी .. पण नसर्गिक वायू आणि खनिजे यात दोघांचे अनेक वर्षाचे "पुरवठा कंत्राट" पक्के आहेत
  • Log in or register to post comments

“१८ ते ४४ वयोगटासाठी सधन वर्गाने लस विकतच घ्यावी”

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 13:16 नवीन
“१८ ते ४४ वयोगटासाठी सधन वर्गाने लस विकतच घ्यावी” https://www.loksatta.com/mumbai-news/rajesh-tope-on-oxygen-supply-in-maharashtra-shortage-of-remdesivir-pmw-88-2450980/ ज्यांनी घोटाळे केले आहेत, त्यांच्या कडून दंड आकारला तरी, महाराष्ट्र राज्यात सगळ्यांना लस फुकट मिळू शकते... सगळ्या आमदारांनी, ठरवले तर, 10,000 कोटी एका रात्रीत उभे करणे, महाराष्ट्राला सहज सहज शक्य आहे..
  • Log in or register to post comments

केंद्राच्या पाया पडतो पण आम्हाला ऑक्सिजन द्या

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/22/2021 - 13:19 नवीन
'राज्य सरकार सर्व प्रकारे अक्षरशः नम्र विनंती करायलाही तयार आहे, पाया पडायलाही तयार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कोणतीही गोष्ट करायला तयार आहे. ऑक्सिजन उपलब्धतेचा कोटा वाटप केंद्र सरकारकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉरकरुन महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे,' असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/rajesh-tope-appeal-central-government-over-oxygen-shortage-in-maharashtra/articleshow/82194344.cms दोन गोष्टी: १. ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने तातडीने दहा प्लॅन्ट उभारायचा निर्णय घेतला. चार दिवसांपूर्वीची बातमी आहे की आठवड्यात दहा प्लॅन्ट उभे करावेत हा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. बहुदा पुढील तीन-चार दिवसात ते प्लॅन्ट्स सुरू व्हावेत. https://www.indiatvnews.com/news/india/uttar-pradesh-to-set-up-10-oxygen-plants-hospitals-cm-yogi-adityanath-698586 अशाप्रकारे ऑक्सिजन प्लॅन्ट राज्यात उभे करावेत म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत आहे का? करत असल्यास कोणते? बरं विशाखापट्टणमहून मालगाडीने ऑक्सिजन येणार तेव्हा त्या टँकरसाठी आपल्याकडे चालक कमी पडतील असे कोणीतरी म्हणाले होते ना? ती अडचण दूर झाली का? २. राजेश टोपे या महाभकास आघाडी सरकारमधील एकमेव त्यातल्या त्यात बरा माणूस आहे असे आतापर्यंत मत होते. सतत मोदी आणि केंद्र सरकारच्या नावाने शंख करायच्या बाबतीत ते पण इतर मंत्र्यांप्रमाणेच आहेत असे दिसते.
  • Log in or register to post comments

राजेश टोपे चांगला माणूस आहे

आनन्दा
Fri, 04/23/2021 - 04:36 नवीन
राजेश टोपे चांगला माणूस आहे असे माझे देखील आजोंर्यंत मत होते. त्याचे बोलणे मी लक्षपूर्वक ऐकायचो आणि काही प्रमाणात मनावर देखील घ्यायचो. पण परवाची गॅस गळती त्यांनी खूपच निष्काळजीपणे हाताळली असे माझे मत झाले आहे, त्यामुळे आणि या दुसऱ्या lockdown मुळे तो कायमचा मनातून उतरला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

त्यानी भाजपचे वाभाडे काढले नि

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/23/2021 - 08:29 नवीन
त्यानी भाजपचे वाभाडे काढले नि ते माझए नावडते झाले.....:)०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

हाहा

कॉमी
Fri, 04/23/2021 - 08:32 नवीन
हाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बातमी

कॉमी
गुरुवार, 04/22/2021 - 13:34 नवीन
केंद्राने अचानकच महाराष्ट्राचा ऑक्सिजन पुरवठा कमी केला होता, तो पुनःस्थापित करण्याचा आदेश हाय कोर्टाने दिला. राज्य सरकारने विदर्भात रेमीडिसीव्हीर पुरवायचा कोर्टाचा आदेश न पाळल्याने त्यांनाही सुनावले. https://www.livelaw.in/top-stories/bombay-high-court-restores-oxygen-supply-to-maharashtra-interfering-with-centre-order-172917
  • Log in or register to post comments

चालायचेच

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/22/2021 - 13:44 नवीन
दुसर्‍या लाटेच्या सुरवातीला महाराष्ट्रात एकूण दररोजच्या नव्या रूग्णांच्या ६०-६५% रूग्ण होते पण आता इतर राज्यांमध्येही रूग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्राचा टक्केवारीत आकडा त्यामानाने आता कमी झाला आहे. अशावेळी इतर राज्येही आम्हाला ऑक्सिजन द्या ही मागणी करत असतीलच नाही का? आता उद्या छत्तिसगड सरकार तिकडच्या हायकोर्टात गेले आणि म्हटले की आम्हाला पण ऑक्सिजन हवा तर काय करायचे? भिलाईच्या कारखान्यात बनलेला ऑक्सिजन आम्ही राज्याबाहेर जाऊ देणार नाही असे छत्तिसगड सरकारने म्हटले तर? आताची परिस्थिती अशी आहे की आपण गेल्या ७५ वर्षात आरोग्यव्यवस्थेकडे केलेल्या अक्षम्य हेळसांडीची फळे भोगत आहोत हीच सत्य परिस्थिती आहे. या परिस्थितीत योगींसारखे नेते आपल्या राज्यात नवे प्लॅन्ट लावत आहेत, गडकरी-फडणवीसांसारखे राज्याला मिळेल तिथून औषधे मिळवून देत आहेत तर महाभकास आघाडीतले लोक यापैकी काहीही न करता नुसते केंद्राकडे बोट दाखवत आहेत आणि त्याहूनही वाईट- राज्यात औषधे दमणहून विरोधी पक्षांनी आणली याचे श्रेय त्यांना मिळेल म्हणून त्या औषध कंपनीच्या मालकालाच एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे उचलून पोलिस स्टेशनमध्ये आणत आहेत. चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

देशात जो गोंधळ निर्माण झाला आहे

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 13:51 नवीन
त्याचे कारण अयोग्य क्षमता नसलेला व्यक्ती पंतप्रधान पदी आहे. महाराष्ट्र मध्ये तुमच्या दृष्टी नी नालायक सरकार आहे .पण देशातील सर्व च राज्यात गोंधळाची स्थिती आहे. एका पण राज्यात आवश्यक गोष्टी चा योग्य पुरवठा नाही. सक्षम केंद्र सरकार हवं असेल तर तत्काळ पंतप्रधान असलेल्या व्यक्ती ल पदावरून बरखास्त करावे राष्ट्र पती नी. आणि योग्य व्यक्ती तिथे बसवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

त्याचे कारण अयोग्य क्षमता

गॉडजिला
गुरुवार, 04/22/2021 - 13:58 नवीन
त्याचे कारण अयोग्य क्षमता नसलेला व्यक्ती पंतप्रधान पदी आहे
माsssय. सेल्फ गोल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मोदीळीचा

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 14:09 नवीन
इफेक्ट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

सक्षम केंद्र सरकार हवं असेल

प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/22/2021 - 14:18 नवीन
सक्षम केंद्र सरकार हवं असेल तर तत्काळ पंतप्रधान असलेल्या व्यक्ती ल पदावरून बरखास्त करावे राष्ट्र पती नी. आणि योग्य व्यक्ती तिथे बसवावा. -- योग्य व्यक्ति कोण, राहुल गांधी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

त्यांच्या मनात तेच आहे.. पण

बापूसाहेब
गुरुवार, 04/22/2021 - 14:20 नवीन
त्यांच्या मनात तेच आहे.. पण उघडपणे सांगु शकत नाहीत.. !!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

योग्य व्यक्ती

१.५ शहाणा
Fri, 04/23/2021 - 11:03 नवीन
योग्य व्यक्ती म्ह्न्जे फक्त काका च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

काकांचे नांव काढण्या पुर्वी

मुक्त विहारि
Fri, 04/23/2021 - 11:11 नवीन
परमपूज्य राहुल गांधी, यांना काय वाटेल? याचे विचार पण करावा लागेल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: १.५ शहाणा

अजूनसुद्धा संपूर्ण देशाच्या १

कॉमी
गुरुवार, 04/22/2021 - 14:16 नवीन
अजूनसुद्धा संपूर्ण देशाच्या १/३ ऍक्टिव्ह केसेस महाराष्ट्रातच आहेत. हे आजिबात कमी नाही आहे. १० प्लांट उघडले हे चांगले आहेच, पण शॉर्ट टर्म रिलीफ साठी त्याचा काय उपयोग आहे ? "इन प्लेस इन विक" म्हणतायत, पण नक्की प्रोडक्शन कधी सुरु होणार आहे ? आता या घडीला महाराष्ट्रात आठवडाभर थांबणे शक्य नाही असे हजारो पेशंट आहेत. यूपी मध्ये महाराष्ट्राच्या निम्म्या सुद्धा ऍक्टिव्ह केस नाहीत. त्यांना कदाचित तितका लिवे असेल. महाराष्ट्रात तसं नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

वा

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/22/2021 - 14:24 नवीन
यूपी मध्ये महाराष्ट्राच्या निम्म्या सुद्धा ऍक्टिव्ह केस नाहीत. त्यांना कदाचित तितका लिवे असेल. महाराष्ट्रात तसं नाहीये.
इथेच काही महानुभाव म्हणत आहेत की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात सरकार नक्की आकडे लपवत आहे. त्यांच्या मते तिथे खरी परिस्थिती अशी आहे की स्मशानात मृतदेहांची रांग लागली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसर्‍या लाटेचे संकट सगळ्यात आधी महाराष्ट्रात सुरू झाले. तसे असेल तर महाराष्ट्र सरकारने सगळ्यात लवकर तयारी सुरू करायला पाहिजे होती. युपी सरकारने चार दिवसांपूर्वी ऑक्सिजन प्लॅन्टचे बांधकाम (किंवा जे काही असते ते) सुरू करायचा आदेश दिला असेल तर महाराष्ट्र सरकारने तो मागच्या महिन्यातच द्यायला हवा होता. कारण मार्चच्या २८-२९ तारखेला महाराष्ट्रात दिवसाला ४० हजार रूग्ण यायला लागले होते. युपीत जो आकडा दाखवला जात आहे त्याप्रमाणे अजूनही ४० हजार रूग्ण दिवसाला यायला लागलेले नाहीत. तरीही युपी सरकार चार दिवसांपूर्वीच ऑक्सिजन प्लॅन्टचा निर्णय घेत असेल तर इथल्या मुख्यमंत्र्यांना तसा निर्णय मागच्या महिन्यातच घेण्यापासून कोणी अडवले होते? स्वतः काही करायचे नाही आणि सतत इतरांना नावे ठेवत राहायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हो.

कॉमी
गुरुवार, 04/22/2021 - 15:18 नवीन
https://www.thehindu.com/news/national/oxygen-production-for-covid-19-management-being-doubled-says-harsh-vardhan/article34349049.ece https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-plans-to-tap-steel-and-thermal-power-plants-for-oxygen-7282181/ ह्या बातम्या दिसल्या. महाराष्ट्र सरकारने आधीच पाऊल घ्यायला पाहिजे होते हे म्हणणे रास्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

काही पण बातम्या इथे चिकटवून

नावातकायआहे
गुरुवार, 04/22/2021 - 15:27 नवीन
काही पण बातम्या इथे चिकटवून तुमचे कोणी खरे समजणार नाही. माननीय सभासदांचे असे मत आहे हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

इथेच काही महानुभाव म्हणत आहेत

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 15:54 नवीन
इथेच काही महानुभाव म्हणत आहेत की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात सरकार नक्की आकडे लपवत आहे. >>>> ईथले काही महानुभाव अधिक दैनिक भास्कर आणी ईतर देशद्रोही वृत्तपत्रे ( भाजप शासीत राज्य आकडेवारी लपवतेय ह्याची पुराव्या सकट बातमी छापल्याने देशद्रोहीच म्हणावे लागतील) असं हवे. दुरूस्ती करून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मग तुम्ही काय म्हणताय,

प्रसाद_१९८२
गुरुवार, 04/22/2021 - 14:24 नवीन
मग तुम्ही काय म्हणताय, इतर राज्यातील रुग्ण ऑक्सिजन शिवाय मरु द्यायचे ? योंगीनी उ.प्र. मधे ज्याप्रकारे केंद्राकडून मदत मिळेल ना मिळेल स्वत:च ऑक्सिजन युनिट उभारायचे प्रयत्न केले/करत आहेत तसेच प्रयत्न महा वसुली आघाडी इथे का करु शकत नाही. की फक्त केंद्राकडे बोट दाखवत राहायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

साहेब

कॉमी
गुरुवार, 04/22/2021 - 15:37 नवीन
केंद्र सरकारने जर ऑक्सिजन चे ऑलॉकेशन करण्याची जबाबदारी घेतली आहे तर जास्त रुग्णसंख्या असलेल्या राज्याला जास्त ऑक्सिजन मिळावा हे माझे म्हणणे आहे. उप्र मधला प्रोजेक्ट अति शॉर्ट टर्म साठी उपयोगाचा नाही. आता चालू क्रायसिस मध्ये उठा यांनी प्लांट उघडतो म्हणलं तरी काही उपयोग नाही. चंसूकू म्हणतात त्याप्रमाणे ते आधीच व्हायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

एक गोष्ट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/22/2021 - 16:07 नवीन
सध्या एका गोष्टीचा फार गवगवा आहे. लेखक कोण आहे, माहिती नाही. गोष्टींचं श्रेय त्यांचंच.
(महाराष्ट्रातील एका गावातील घटना) रात्री एका गावात चोर आले होते. या चोरांनी एका दुकानातून गव्हाचे पाच गव्हाचे पोते उचलले. पाराजवळ आल्यावर जाग्यावरच ते सापडले. गावातल्या लोकांनी रेटून हानले. आणि इचारलं, चांगल्या सुटाबुटातले दिसताय पाव्हनं. "चो-या का करता'' ? ते म्हणतात कसे ? '' आम्हाला हानु-मारु नका, आम्ही हे गहु सकाळी गावातच वाटणार होतो''
डिस्क्लेमर : सदरील गोष्ट काल्पनिक आहे, त्याचा विरोधी पक्ष आणि फार्मा कंपनीच्या साट्यालोट्याचा काहीही संबंध नाही. तसे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. बाकी, चालू द्या. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

हाहाहा :)

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 16:24 नवीन
हाहाहा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चक्क फुल टॉस टाकलाय तुम्ही?

आनन्दा
Fri, 04/23/2021 - 04:52 नवीन
चक्क फुल टॉस टाकलाय तुम्ही? राजेश आणि आर्मस्ट्राँग सोबत राहून गुण लागला की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ आनंदा

उपयोजक
Sat, 04/24/2021 - 08:16 नवीन
अशा भाजपद्वेषींसाठीै एकच वाक्य पुरेसे आहे. ते वाचल्याने त्यांना मनातून वेदना होतात. कितीही भाजपद्वेष केलात तरी २०२४ ला परत नरेंद्र मोदीच पंतप्रधान असणार आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

साधी केस

अनिरुद्ध.वैद्य
Fri, 04/23/2021 - 16:49 नवीन
टाकली नाही भाजपवर. वर त्या काळा बाजार करणार्या माणसला सोडुन दिले. कोन तो तन्मय फडणवीस येउन २ २ लसि घेऊन जातो, त्याला अटक सोडा सधी पोलिस तक्रारही नाही. खुशाल इन्क्वायरी करा अश्या धमक्या देत आहेत विरोधि प्क्स नेते, अन आपले ग्रुहमंत्री काय करत नाहित. kaay chaalalay kaLena.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते

सॅगी
Sat, 04/24/2021 - 09:51 नवीन
बारामतीत बिझी आहेत हो ढापलेले रेमडेसिविर वाटण्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

उत्तर प्रदेश सरकार चे काही सांग

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 13:38 नवीन
तिथे मोदी चाचं चेला आहे फक्त फेकाफेक करणार पण प्रत्यक्षात काहीच करणार नाही. सर्व बाबीत failar राज्य आहे त्याचे नका कही सांगू. केंद्र सरकार ल कसला माज आलाय .कोर्टनी थोबाड फोडले तरी ह्यांना लाज नाही. सर्व राज्यांना ऑक्सिजन ,औषध पुरवणे हे केंद्र सरकार काम नाही तर काय चीन सरकार चे काम आहे का. लायक नसलेला व्यक्ती पंतप्रधान झाला की असेच होणार. राज्य सरकार वर टीका करणारे एक वेडे आहेत किंवा '''''''. केंद्र सरकार च्या नियंत्रणात ,अधिकारात असलेल्या वस्तू चा तुटवडा झाला तरी राज्य च जबाबदार.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/22/2021 - 15:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

>>सर्व राज्यांना ऑक्सिजन ,औषध

कॉमी
Fri, 04/23/2021 - 08:46 नवीन
>>सर्व राज्यांना ऑक्सिजन ,औषध पुरवणे हे केंद्र सरकार काम नाही तर काय चीन सरकार चे काम आहे का. एकदम बरोबर. भारतातलं ७५०० मेट्रिक टन प्रतिदिन हे ऑक्सिजनचे उत्पादन आहे, ते सगळे केंद्र सरकार नियंत्रित करते (as it should be.) त्यातले ६६०० एमटी राज्यांमध्ये वाटण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. जर केंद्र सरकार ऍलोकेशन करते आहे तर ते न्याय्यच पाहिजे. तिथे रुग्णांची टक्केवारी हा एकच निकष असणार. आणि, टक्केवारी नुसार महाराष्ट्राला ऑक्सिजन सप्लाय झाला नाही, हे कोर्टाने केंद्राला सांगितले, तर इथले आयडी व्हॉट अबाऊट यूपी, व्हॉट अबाउट फलना धिकणा करतात ("चालायचंच" म्हणे.) केंद्राने महाराष्ट्राला अडचणीत टाकण्याची कामे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात आणि फक्त राज्य सरकारच्या (मान्य, खऱ्या) इनइफिशियांशी कडे बोट दाखवतात. केंद्र सरकारचे निकृष्ट प्लॅनिंग दाखवले कि पुन्हा तेच. व्हॉट अबाऊट राज्य सरकार. अरे केंद्राबद्दल एक शब्द बोलला तर मालक येऊन कोडे मारतो का काय ? खाल्ल्या थाळीला छेद, बसल्या फांदीला कापणे वैगेरे म्हणतात त्यातला प्रकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

‘मुख्यमंत्री साहेब, दोन तासात ....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/22/2021 - 13:40 नवीन
‘मुख्यमंत्री साहेब, दोन तासात तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावून दाखवा’; लग्नाच्या नियमांवरुन संताप.... https://www.loksatta.com/trending-news/maharashtra-new-strict-restrictions-under-break-the-chain-people-asks-how-to-perform-marriage-in-2-hours-scsg-91-2450829/ आनंद घ्या .....
  • Log in or register to post comments

पाच मिनिटात लग्न लागते

Rajesh188
गुरुवार, 04/22/2021 - 13:46 नवीन
दोन तास खूप झाले लग्नासाठी फक्त ब्राह्मण बोलवून नको ते विधी करत बसू नका. त्यांना फक्त दक्षिण किती मिळेल ह्याच्या शी च देणेघेणे असतें
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा