मलई

किसन शिंदे's picture
किसन शिंदे in जनातलं, मनातलं
3 Apr 2021 - 10:08 pm

महामार्गाला लागूनच असलेल्या त्या मोठ्या झोपडपट्टीत सगळं एकदम शांत होतं. हायवेवर धावणार्या जडशीळ ट्रेलरचा दणदणाट आणि त्या दिशेने भुंकणारी कुत्री यांचा आवाज सोडला तर बाकी सगळं सुमसाम. रघ्याच्या पत्र्याच्या झोपडीत मात्र रात्रीचे एक वाजले तरी साठचा बल्ब जळत होता. बाकीच्या झोपड्यातून लोकांची बत्ती केव्हाच गुल झालेली.

दहा दिवसांपूर्वीच सेन्ट्रल जेलमधून बाहेर पडलेला रघ्या.! या दहा दिवसात कुठंतरी नक्कीच नजर लावून होता. कायतरी साॅल्लीड प्लान रघ्याच्या उजाड खोपडीत नक्कीच घुमत असल्याशिवाय त्याने बाकीच्या चौघांना भेटायला बोलवलेच नसते.

”खबर पक्कीये. उद्याच माल येणारे दुकानात.
यावेळची मलई सोडायची नाय बे, हातात यायलाच पायजे." रघ्या खुरटी दाढी खाजवत बाकींच्या दमात घेत होता.

”एक पेटी हाये, एक पेटी!!" डोळे लकाकत होते रघ्याचे.

”यावेळला जर का मधेच हागलात *सडीच्यांनो, तर येकेकाची आयमाय एक करीन. सांगून ठेवतो." रघ्याने एकदम हाग्या दमच देवून टाकला.

मंग्या, बारकू, शंकऱ्या आणि पप्या एकदम सुमडीत सावरुन बसले.

”पण दादू मागल्या वेळेसारकंच, कि या येळी काय नवा झोल तयार हाय तुज्याकडं." पप्या जरा चाचरतच विचारता झाला.

खिशातली संभाजी पेटवली, त्याचे दोन चार कडक झुरके घेतले आणि रघ्यानं त्याच्या फुल्ल प्रुप प्ल्यानला सुरूवात केली. बाकीच्या चवघांनी तोंडात माती कोंबून घेतली, कारण जर का मधेच तोंड मारलं तर रघ्या चड्डीत फळा फळा मुतेपर्यंत हाणायचा हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं.

”नाय. या टायमाला नवा गेम करायचा."

"ठरल्यावेली गाडी दुकानापाशी येल. ती याच्याआदीच आपल्या ठरलेल्या वेली मंग्या आनि पप्यानं दूर टपरीपाशी थांबायचं."

”दोन चेमे खाली उतरतील, फिलिंग करायला. तिसरा गाडीतच बसून मिरर मदुन लक्श ठेवंल."

”शंकर्या गाडीच्या बाजुने सुमडीत मिररवाल्याला गोळी देवून पुढे सटकलं. मं मंग्या आनि पप्याने टपरीवरून निगून आल्लाद मलई उचलायची आनि तशीच पुडे कलटी मारायची. त्या झंडूंना कलून न देता."

”त्यातला अर्दा हिस्सा रेल्वे स्टेशनच्या पुढे पटरीवरच्या कोरड्या नाल्यात टाकायचा, आनि बाकी अर्दा घेऊन चौगांनी बी वंटास होयचं, पांडू लोकांना खबर जायच्या आत, काय?!!"

क्रमशः

कथासमाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

बुव्याला मेलच्या ड्राफ्टमध्ये, त्याची 'ओली बॅचलर स्वप्ने' सापडली. मग म्हंटलं आपण का मागे राहावं, म्हणून मी ही माझ्या ड्राफ्टमधून ही कथा काढून मिपावर टाकली. हाकानाका=))

प्रचेतस's picture

3 Apr 2021 - 10:30 pm | प्रचेतस

शीर्षक वाचून ओल्या स्वप्नांगतच काहीसं वाटलं,
येऊ दे पुढचा भाग.

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2021 - 12:56 pm | चौथा कोनाडा

ओल्या स्वप्नांगतच ....
😂

उत्तम. येऊ देत पुढचे भाग पटापट देवा.

प्रसाद गोडबोले's picture

4 Apr 2021 - 1:21 am | प्रसाद गोडबोले

पुढील भाग लिहिले आणि कथा संपुर्ण केली तर आणि तरच सविस्तर प्रतिसाद देण्यात येईल ह्याची लेखकुरावांनी कृप्या नोंद घ्यावी.

- मागील एका कथेच्या मधेच सोडलेल्या भागांमुळे निराश झालेला एक वाचक

मुक्त विहारि's picture

4 Apr 2021 - 6:16 am | मुक्त विहारि

+1

तुषार काळभोर's picture

4 Apr 2021 - 6:32 am | तुषार काळभोर

+२

सौंदाळा's picture

4 Apr 2021 - 7:46 am | सौंदाळा

+३

सौंदाळा's picture

4 Apr 2021 - 7:48 am | सौंदाळा

सर्व जुन्या सदस्यांचे ड्राफ्ट खांगाळून घेतले पाहिजेत असं वाटतंय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Apr 2021 - 8:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन आणि लेखनशैली उत्तम आहे, पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

-दिलीप बिरुटे

सुरुवात चांगली आहे.. पण खुप लवकर भाग आटोपता घेतला..
लवकर येऊद्या पुढचे भाग किसना...

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 9:34 am | ॲबसेंट माइंडेड ...

चांगली सुरूवात.

सतिश गावडे's picture

4 Apr 2021 - 1:41 pm | सतिश गावडे

पुलेशु पुभाप्र वगैरे वगैरे.

गणपा's picture

4 Apr 2021 - 2:10 pm | गणपा

बैठक जमली आहेच तर मोडू नकोस. एकटाकी लिहून काढ आणि मग वाटल्यास थोडं थोडं टाकत जा.
शुभेच्छा !!!

किसन शिंदे's picture

4 Apr 2021 - 3:12 pm | किसन शिंदे

दादुस, हे आत्ताचं नैय्ये, चारेक वर्षांपूर्वी कधीतरी लिहून ठेवलेले कलरनोट एपमध्ये. एवढ्यात काहीच लिहीलेलं नाय.

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2021 - 12:48 pm | चौथा कोनाडा

आयला, लै भारी ! ह्यो तं नुस्ता टिझर दाकवून र्‍हायला तुमी, किसनराव !
प्ल्यान सक्सेस होतो का नाय रघ्याचा ?

रंगीला रतन's picture

5 Apr 2021 - 12:57 pm | रंगीला रतन

वाचतोय

चौथा कोनाडा's picture

8 Apr 2021 - 1:25 pm | चौथा कोनाडा

+४