✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

न्यूड फोटो शूट

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 02/01/2021 - 20:25  ·  लेख
लेख
एका अभिनेत्रीची न्यूड फोटोशूटवरची मुलाखत पाहीली. तिचं नाव वनिता खरात. ती म्हणतेय, "आत्तापर्यंत आयुष्यात कधी स्लीव्हलेस सुद्धा घातलं नव्हतं आणि आता न्यूड फोटो. या सगळ्याच्या यशाचं श्रेय जातं ते दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांना त्यांनी हे सगळं अक्षरशः पटापट दोन तासात उरकलं. हे दोघे आजूबाजूला असताना माझ्या अंगावर कपडा नाही याचं मला काहीही वाटलं नाही" पुढे ती म्हणते, "या शूटनंतर छान वाटते आहे. कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. आज मी पतंग तरी समोर धरला भविष्यात भूमिकेची गरज असेल तर मी समोर पतंगसुद्धा ठेवणार नाही" मुलाखतकार विचारते, तुमच्या या शूटचा पतंग हा अविभाज्य भाग आहे पण मग पतंगच का ? याबाबत ती म्हणते की मला उंच उडायचे आहे. पतंगासारखं फ्लाय हाय हा संदेश यातून द्यायचा आहे. आतापर्यंत सौंदर्याच्या कल्पना म्हणजे सडपातळ, गोरा रंग अशा होत्या. पण आता यापुढे गोरं नसलेलं, जाड हेही सौंदर्य असू शकतं हे यातून मला सांगायचं आहे. यातून सौंदर्याच्या व्याख्या बदलायच्या आहेत. पण प्रश्न हा की खरंच या खटाटोपामधून सौंदर्याच्या व्याख्या बदलतील का ? मुलाखतीची लिन्क पहील्या कमेंटमधे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36128 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

कपडे वापरण्याचा उधेश बदलत गेला

Rajesh188
Tue, 02/02/2021 - 11:16 नवीन
मुळात कपडे हे शरीराचे थंडी,उन,धूळ,कीटक ह्या पासून रक्षण करण्यासाठी वापरले जातात. आणि पायात चप्पल किंवा बुट वापरायचे कारण पायाचे रक्षण करणे विंचू काटे ह्या पासून. नंतर त्या मध्ये बदल होवून शरीर सुंदर दिसण्यासाठी कपडे वापरू जावू लागले आणि मुळ हेतू च बाजूला ला पडला. अत्यंत तंग कपडे परिधान करणे हा त्या मधिकच प्रकार पण तंग कपड्याने शरीराला त्रास होतो.नसा दबल्या जातात,हालचाल करण्यास मर्यादा येते आणि बरेच अनिष्ट परिणाम होतात. चप्पल बाबतीत तेच उंच टाचेच्या चप्पल मुळे पायावर अनंत अत्याचार होतात. आणि मुळ हेतू लाच हरताळ फासला जातो. खूप थंडी आहे तरी काहीतरी फॅड मनात ठेवून आघुड कपडे वापरणे म्हणजे माणूस खरोखर बुध्दीमान आहे ह्या वर च प्रश्न चिन्ह निर्माण करणे आहे. बाकी काही हार्मोन्स मुळे सुंदर तेचा भास होतो. रिअल मध्ये ते सौंदर्य असतं नाही. Mansa पेक्षा बाकी प्राणी,पक्षी हे अत्यंत सुंदर आहेत पण हार्मोन्स आपल्याला त्यांना सुंदर समजण्याची अनुमती देत नाही.(सुंदर ह्या शब्दाचा अर्थ काही ठिकाणी आकर्षक असा घ्यावा )
  • Log in or register to post comments

कुणी कुठले कपडे घालावेत ,

राजाभाउ
Tue, 02/02/2021 - 11:25 नवीन
कुणी कुठले कपडे घालावेत , किंवा घालू नयेत हा वैयक्तिक प्रश्न आहे, प्रत्येकाची सौंदर्याच्या व्याख्याही वेगवेगळी असु शकते आणि ती काळानुरुप, वयानुरुप बदलू शकते. तसेच या ताईनी फोटोशुट केले तेही ठिकच, ज्याना बघयचे त्यानी बघा नाहीतर बघु नका. पण या ताई मुलाखतीत बॉडी पॉसिटीव्ह वगैरे बोलतात, तर या ताई एका मराठी प्रसिध्द विनोदी कर्येक्रमात काम करतात आणि त्यात (ईतर अनेक कर्येक्रमात प्रमाणे) लट्ठपणा, कातडीचा रंग, टकलेपणा यावर जोरदार विनोद असतात मग हे कस चालत ?हा प्रश्न निर्माण होतो. एकुणच हा प्रसीध्दीचा भाग असावा, ही मुलाखत दिली नसती तर कितीजणाना अस काही फोटोशुट झाल हे कळल असत ?
  • Log in or register to post comments

सवंग प्रसिद्धीसाठी पूर्वी

श्रीगुरुजी
Tue, 02/02/2021 - 11:35 नवीन
सवंग प्रसिद्धीसाठी पूर्वी ममता कुलकर्णी, पूनम पांडे, प्रोतिमा बेदी अशांंनी हे प्रकार केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

सहमत.

साहना
Tue, 02/02/2021 - 11:47 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

न्यूड चित्रं/फोटो शूट हे

राघव
Tue, 02/02/2021 - 13:21 नवीन
न्यूड चित्रं/फोटो शूट हे खरंतर चित्रकार/फोटोग्राफरची कला दाखवण्याचं साधन आहे. बॉडी आर्टीस्टचं त्यात तसं महत्त्व कमी असतं. ज्यांना फॉर्म वर मेहनत घेऊन चित्रं अधिक चांगली करायची आहेत त्यातले अनेकजण ह्या पद्धतीचा उपयोग करत असतात. न्यूड चित्रकला/फोटोशूटकडे कला या दृष्टीनं बघणं हे सगळ्यांना सहज शक्य नसतं. त्यासाठी जो कलाकार ही कलाकृती करतोय, त्याच्या दृष्टीकोनातून याकडे बघायला हवं. न्यूड्सच्या अतिशय सुंदर अशा कलाकृती जालावर सापडतील. रंगसंगती, प्रकाशछाया, प्रसंग ह्या आणि अशा अनेक गोष्टी त्यात महत्त्वाच्या असतात. मुख्य म्हणजे विषय काय, कशासाठी हे न्यूड चित्र/फोटो करायचाय तो त्यात मांडता आला पाहिजे आणि तो तसा लोकांपर्यंत फोचला देखील पाहिजे. ज्या कलाकारानं हे शूट केलेलं आहे त्यानं खरतंर याबद्दल बोललं पाहिजे, बॉडी आर्टीस्ट याबद्दल काय आणि किती बोलणार? बाकी अश्लीलता वगैरे सामाजिक संस्कृतीच्या कॅटेगरीत येतात. समाज जर तेवढा प्रगल्भ नसला आणि न्यूड वगैरेचे प्रयत्न सार्वजनिक जागेत केल्यास, गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याचीच शक्यता जास्त. तारतम्य बाळगून वागलेले कधीही चांगले.
  • Log in or register to post comments

उत्तम प्रतिसाद

चांदणे संदीप
Tue, 02/02/2021 - 14:33 नवीन
राघवशेठ, प्रतिसाद आवडला. वरचे काही प्रतिसाद वाचून जाम हसायला आलं. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

+१

शा वि कु
Tue, 02/02/2021 - 14:37 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

+१ सहमत

राजाभाउ
Tue, 02/02/2021 - 15:56 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

उत्तम प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 02/02/2021 - 16:16 नवीन
आवडला....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

वनिता ने जरूर नग्न फोटो शूट

गणेशा
Wed, 02/03/2021 - 08:44 नवीन
वनिता ने जरूर नग्न फोटो शूट करावे... पण त्या आधी जरा शरीरा कडे पण लक्ष द्यावे... आधी व्यायाम, सुडोलता या कडे पण पहावे.. निदान न्यूड फोटो शूट मध्ये काय दाखवायचे ते तरी नीट असावे..
  • Log in or register to post comments

येन केन प्रकारेण

मुक्त विहारि
Wed, 02/03/2021 - 09:14 नवीन
अशी गोष्ट आहे ... कामे मिळवायला अशी प्रसिद्धि उपयोगी पडण्याची शक्यता असते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अशा प्रसिद्धीने भविष्यात अशीच

श्रीगुरुजी
Wed, 02/03/2021 - 10:01 नवीन
अशा प्रसिद्धीने भविष्यात अशीच कामे मिळू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पैसा मिळतो ना...

मुक्त विहारि
Wed, 02/03/2021 - 10:08 नवीन
मग झाले... राम तेरी गंगा मैली, हा सिनेमा आठवला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अश्लीलता आणि नग्नता यांचा

सुबोध खरे
Wed, 02/03/2021 - 10:23 नवीन
अश्लीलता आणि नग्नता यांचा एकमेकांशी थेट संबंध नाही. पूर्ण कपडे घातलेलय व्यक्तीने कामुक हावभाव करणें यात अश्लीलता असू शकते आणि संपूर्ण नग्न असताना सुद्धा त्यात अजिबात अश्लीलता नसते. सुडौल शरीराचे नग्न चित्र, शिल्प किंवा छायाचित्र मनात कामुक भावना चाळवतीलच असे नव्हे. अर्थात आंबट शौकीन आणि हलकट लोकांना काहीही चालतं. परंतु सवंग लोकप्रियते साठी "कलेची गरज" इ मुलामा देऊन अशा मुलाखती देणाऱ्या नट्या या तर वारयोषितेच्या पेक्षा निम्न दर्जाच्या असतात. वारयोषिता तरी पोटाची खळगी भरण्या साठी असे करत असतात. तात्पर्य-- अश्लीलता हि नग्नतेत नसून नग्नता कशा तर्हेने मंडळी जाते यात आहे. बाकी सर्वाना माझे मत पटेल असे नाही आणि तसा आग्रहही नाही
  • Log in or register to post comments

पटत आहे ...

मुक्त विहारि
Wed, 02/03/2021 - 10:25 नवीन
पटत आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत !

साहना
Wed, 02/03/2021 - 10:30 नवीन
सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

Sahamat

स्वलिखित
Wed, 02/03/2021 - 19:26 नवीन
Sahamat
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सहमत!

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 02/03/2021 - 23:02 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अवांतर, या विषयावर राजेश आणि

आनन्दा
Wed, 02/03/2021 - 11:39 नवीन
अवांतर, या विषयावर राजेश आणि मुवि हातात हात घालून भांडताना बघितले आणि कृतकृत्य झालो :) बाकी तो फोटोशूट बघितला मुद्दाम जाउन, त्यात काय नग्न आहे काहीच कळले नाही.. जे काही होते ते फार किळसवाणे होते. अवांतर, हार्मोन प्रोब्लेम व्यतिरिक्त अन्य कारणाने येणारी स्थूलता स्वीकारार्ह नाही, किमान गौरवली तरी जाऊ नये असे माझे मत आहे. ते त्या व्यक्तीसाठी देखील चांगले नाही. असो, मला कोण विचारतय?
  • Log in or register to post comments

सहमत

सर्वसाक्षी
Wed, 02/03/2021 - 15:04 नवीन
देह सुडौल असेल तर अभिमानाने दाखवावा, नपेक्षा 'झाकली मूठ'बंदच ठेवावी. या बाइंना एका अत्यंत दर्जेदार अशा विनोदी कार्यक्रमात आधी पाहिलेलं होतं त्यामुळे केवळ ह्याच का त्या हे पाहायला चित्र पाहिलं. ओंगळ वाटलं, झालंच तर चित्रणकौशल्य वगैरेही काही जाणवलं नाही असो, कदाचित संक्रातीत पतंग ऊड्वण्याची प्रथा लक्षात घेता एखाद्या पतंग निर्मात्याने तर हा उपद्व्याप केला नसेल ना? (चित्राचा उत्कर्षबिंदू पतंग हे वे.सा.न.ल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

@ आनन्दा

चौथा कोनाडा
गुरुवार, 02/04/2021 - 17:31 नवीन
@ आनन्दा,
ते फार किळसवाणे होते.
किळसवाणे अजिबात वाटले नाही मला, इन फॅक्ट काहीच वाटले नाही ! बाकी विनोदी कार्यक्रमातील त्या ताईंच्या सादरीकरणाचा मी फॅन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

कथेला गरज आहे म्हणून नग्न होण्यास हरकत नाही

Rajesh188
Wed, 02/03/2021 - 17:04 नवीन
ह्या वाक्याचा खरा अर्थ काय हे अजुन तरी मला समजला नाही. स्त्री शरीर नग्न दाखवणे ही कथेची गरज असते की नग्न प्रसंग एक तरी कथेत असावा अशी च कथा असावी ही निर्मात्याची गरज असते नक्की काय अर्थ घ्यावा. फक्त चेहऱ्यावर चे हावभाव बदलून उत्तम रोमान्स दाखवता येतो हे जुन्या चित्रपटातील नायिकांनी सिद्ध केलेले आहे आता शरीर नग्न दाखवून सुद्धा त्या नायिकांनी सारखा परिणामकारक प्रसंग चित्रित होत नाही इथे डायरेक्टर कमी पडतात . वर राघव ह्यांनी सांगितल्या प्रमाणे आर्ट म्हणजे काय हेच खोलात जावून समजून घेतले जात नाही म्हणून शरीर उघडे करायला लागत आहे.
  • Log in or register to post comments

इतर व्यक्तीने

शा वि कु
Wed, 02/03/2021 - 17:42 नवीन
इतर व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने नग्न चित्रण केल्यावर आपण तिरस्टायचे काय कारण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

संस्कृती बुडते, भावना

चौथा कोनाडा
Wed, 02/03/2021 - 17:56 नवीन
संस्कृती बुडते, भावना दुखावतात म्हणून ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

असे चित्रीकरण सार्वजनिक

श्रीगुरुजी
Wed, 02/03/2021 - 18:16 नवीन
असे चित्रीकरण सार्वजनिक केल्यानंतर त्यावर व्यक्त होण्याचा सर्वांना हक्क आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

इतर व्यक्तीने स्वतःच्या

सुबोध खरे
Wed, 02/03/2021 - 18:38 नवीन
इतर व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने नग्न चित्रण केल्यावर आपण तिरस्टायचे काय कारण ? तोंडाला लिपस्टिक लावून माडीच्या खिडकीत बसलं तर खालून जाणार्याने शिट्टी मारली तर रडारड करू नये. सदर बाईंना उद्या एखाद्याने "बोट लावीन तिथे वळकट्या" म्हणून हिणवले तर त्यांनी "बॉडी शेमीन्ग" म्हणून बोंबाबोंब करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

_/\_

शा वि कु
Wed, 02/03/2021 - 18:47 नवीन
लिपस्टिक अनालॉजी वाचून हात जोडावेच लागले. स्वतः आपल्या निर्णयाने कपडे उतरवले म्हणून व्यक्तीच्या शरीरावर हिणकस बोलणे तुम्हाला पटत असेल तर जरूर बोला. मला नाही पटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बरं, सौम्य उदाहरण देतो.

श्रीगुरुजी
Wed, 02/03/2021 - 19:19 नवीन
बरं, सौम्य उदाहरण देतो. एखादा माणूस विदूषकी प्रावरणे परीधान करून भर रस्त्यात सर्वांसमोर वेडेवाकडे अंगविक्षेप करीत नृत्य करायला लागला, तर त्यावर फिदीफिदी हसणे हा उपस्थितांचा हक्क आहे. वैयक्तिक कृत्यांवर उपस्थितांनी हसणे अयोग्य आहे, असा आक्षेप अयोग्य ठरेल कारण सार्वजनिक केलेली गोष्ट फक्त वैयक्तिक असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

हसण्याचा हक्क

शा वि कु
गुरुवार, 02/04/2021 - 21:04 नवीन
तुम्हाला हसू येणे आणि हसणे ह्याबाबत काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र, विवस्त्र छायाचित्राने अशी कोणती गोष्ट बदलली म्हणे, किंवा अशी कोणती माहिती दिली, ज्याने तुम्हाला ह्याधीची संभाषणाची आणि काय बोलावे या संदर्भातल्या नैतिकतेची जाणीव बदलली, आणि शरीरावरचे जोक, किंवा शरीर कसं आहे ह्यावर बोलणं तुम्हाला मान्य होतं ? हा स्टॅन्ड मधला बदल (अस्युमिंग, कि वस्त्रांकीत व्यक्तीच्या शरीरावर जोक करणे, हे काहीप्रमाणात तरी तुम्हाला अयोग्य वाटते. तसं नसेल तर इग्नोर मारा पूर्ण प्रतिसाद.) मग, त्या व्यक्तीने आपला वस्त्रविरहित फोटो टाकल्यावर ह्यात काय बदलले ? त्या व्यक्तीने असे जोक करायचा लायसन्स दिला, कि आपण ह्या जोक्स बाबत निगरगट्ट आहोत असा निर्वाळा दिला ? नक्की काय झालं ? आधी ती व्यक्ती जाड दिसत नव्हती का ? तुमच्या उदाहरणांचा संदर्भात, वेडेचाळे हे तुमच्यासाठी कायमच हास्यास्पद होते. विदूषक कपडे घालून होता तेव्हा वेडेचाळे जोक करण्यासाठी ऑफ द लिमिट नव्हते. कपडे काढल्यावर पण ह्यावर तुम्ही हसालच. माझा प्रश्न तो नाही. ह्याधी ऑफ द लिमिट जोक कपडे काढल्यावर कसा स्विकार्ह्य होतो, हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हे नक्की काय लिहिलंय आणि मला

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/04/2021 - 21:12 नवीन
हे नक्की काय लिहिलंय आणि मला नक्की काय विचारलंय ते समजले नाही. सार्वजनिक नग्नावस्थेत वावरणे हे माझ्यासाठी कायमच अनैतिक होते, आहे व असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

:)

शा वि कु
गुरुवार, 02/04/2021 - 21:50 नवीन
हे नक्की काय लिहिलंय आणि मला नक्की काय विचारलंय ते समजले नाही.
"बोट लावीन तिथे वळकट्या" (श्रेय) हा विनोद, एखाद्या नववारी साडी घातलेल्या स्थूल बाईवर केला तर चालेल का तुम्हाला ? नसल्यास का नाही चालत ? विवस्त्र फोटो असलेल्या व्यक्तीवर हा विनोद चालतो का तुम्हाला ? असल्यास का चालतो ? हा स्टॅन्ड बद्दलण्यामागचं कारण काय ? याउप्पर, विदूषक पब्लिक मध्ये चाळे करतो, त्याप्रमाणे, साड्यांमधून सुद्धा पोटं दिसतातच. तिथेही, सार्वजनिक ठिकाणी पोटं दाखवली म्हणून, "बोट लावीन तिथे वळकट्या" जोक चालतील का ? :) नसल्यास का नाही ?
सार्वजनिक नग्नावस्थेत वावरणे हे माझ्यासाठी कायमच अनैतिक होते, आहे व असेल.
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुळात धाग्याचा विषय विनोद हा

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/04/2021 - 22:05 नवीन
मुळात धाग्याचा विषय विनोद हा नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

लो कल्लो बात !

शा वि कु
गुरुवार, 02/04/2021 - 22:14 नवीन
इथं तुम्हीच फिदीफिदी हसणे कसे स्वाभाविक आहे म्हणत होता. विनोद किंवा बाईंची थट्टा कशी स्वीकाराह्य आहे सांगत होता... असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सार्वजनिक विनोदी चाळे हे

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/04/2021 - 22:20 नवीन
सार्वजनिक विनोदी चाळे हे हास्यास्पदच असतात. पण त्याचा येथे काय संबंध आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

सहमत आहे...

मुक्त विहारि
Fri, 02/05/2021 - 08:06 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सहमत आहे ....

मुक्त विहारि
Fri, 02/05/2021 - 08:07 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+1

मुक्त विहारि
Fri, 02/05/2021 - 08:07 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

स्वतः आपल्या निर्णयाने कपडे

सुबोध खरे
Wed, 02/03/2021 - 19:23 नवीन
स्वतः आपल्या निर्णयाने कपडे उतरवले म्हणून कशाला उगाच लंगडे समर्थन करताय? कपडे उतरवून सार्वजनिक न्यासावर टाकलाय त्यांनी आणि वर मुलाखत पण दिली आहे ती कशासाठी? आपल्या घरात विवस्त्र नाही झाल्या आहेत त्या. या दोन्हीत फरक समजून घ्यायचाच नसेल तर तुमचंच खरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शा वि कु

ही कोण वनिता खरात ?

सामान्यनागरिक
Wed, 02/03/2021 - 17:36 नवीन
ही कोण वनिता खरात ? कोणी खास व्यक्ती आहे का? जिच्यामुळे समाज परिवर्तन घडु शकेल? तुमच्या आमच्या जीवनांत काहीतरी वेगळे घडू शकेल ? तुम्ही आम्ही तिच्याबद्दल का चर्चा करतोय ? अश्या लोकांना अनुल्लेखानेच मारावे. आपल्याबद्दल लोकांनी चर्चा करावी, प्रसिद्धी व्हावी हाच तिचा उद्देश होता आणि तो सफ़ल झाला अन्यथा मिपावरील विद्वान मंडळींनी तिची कधी दखल तरी घेतली असती का? नग्न होऊन कॅमेऱ्यासमोर येणे याशिवाय तिच्याकडे ईतर काही आहे का? मग ती तेच करणार ! तुम्ही आम्ही वायफ़ळ चर्चा करुन वाय-झेड पणा करणार
  • Log in or register to post comments

बरोबर

Bhakti
Wed, 02/03/2021 - 22:47 नवीन
बर ती न्यूड फोटोग्राफीपण नाहीये.हाफ न्यूड फोटोग्राफी पण नाही.चतकोर वगैरे आहे.वनिताजी प्रोतिमा बेदी यांच टाईमपास पुस्तक वाचा, मुंबई किनाऱ्यावरचा फोटो पहा..पण त्यांना नंतर लक्षात आलं की हा स्टंटबाजीचा प्रकार घडला आहे आणि आपला वापर झालाय. न्यूड आर्टिस्टचा अपमान करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

नै पण

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 02/03/2021 - 23:00 नवीन
बाकीच्या गोष्टींवर चर्चा केली तर फरक पडतो का आयुष्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्यनागरिक

अमूक तमूक एका व्यक्तीने असं

Bhakti
Wed, 02/03/2021 - 23:17 नवीन
अमूक तमूक एका व्यक्तीने असं का केलं,तसं का नाही केलं अशी चर्चा करत बसलो आणि ती अमूक तमूक पाहिजे तेच करणार मग कशाला उपद्व्याप! उदात्तीकरण !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

बाकीच्या गोष्टींवर चर्चा केली

नर्मदेतला गोटा
गुरुवार, 02/04/2021 - 13:55 नवीन
बाकीच्या गोष्टींवर चर्चा केली तर फरक पडतो का आयुष्यात?
सही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

फ़रक म्हणजे काय यावर अवलंबुन आहे.

सामान्यनागरिक
Wed, 02/10/2021 - 13:23 नवीन
ईतर काही चांगल्या गोष्टींवर चर्चा केली तर ज्ञानात भर पडते. त्या ज्ञानाचा वापर करुन आयुष्यात काही बदल घडवायचा की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. य:कश्चित वनिता खरात आणि तुचे नग्न अंग या बद्दल चर्चा करुन काय मिळणार आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

सदर व्हिडिओ मी बघितला नाही पण

मराठी कथालेखक
Wed, 02/03/2021 - 18:48 नवीन
सदर व्हिडिओ मी बघितला नाही पण सिनेमा वगैरे क्षेत्रातील व्यक्ती बहूधा प्रसिद्धीकरिताच काही तरी करत राहतात, हॉट फोटोशूट वगैरे नेहमीचंच झालंय. एखादी अभिनेत्री अंगभर कपड्यांत खूप सुंदर दिसत असली तरी तसा फोटोशूट करुन तो बातमीचा विषय होणार नाही. आपण काय कपडे घालायचे हा प्रत्येकाचा व्यक्तीगत प्रश्न होईल. पण नग्नता मग ती किती प्रमाणात चालू शकेल वगैरे पण ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मी घरात देखील बर्मुडा वगैरे घालत नाही. घरात , तसेच सोसायटीत फिरताना नेहमी फॉर्मल फुलपँट /ट्रॅक पँट/नाइट पँट व टी शर्ट घालतो. एखाद्या कामानिमित्त वा फिरायलाही बाहेर जाताना बहूधा टीशर्टही नको वाटतो, फॉर्मल फुल शर्टच घालायला आवडते. एखाद्या छोट्या ग्रुपमध्ये वगैरे बाहेर गेलो तरी स्विमिंग पुल मध्ये उतरत नाही. पोहता येत नाही हे तर आहेच पण कपडे उतरवून नुसती चड्डी घालून पाण्यात उतरायला प्रशस्त वाटत नाही. मला जे आवडत नाही ते इतरांनाही तसंच वाटावं असा माझा आग्रह नाही... पण तरी माझ्या आसपासच्या लोकांनी (स्त्री,पुरुष, लहान मुले अशा सर्वांनीच ) व्यवस्थित कपडे घातलेले असतील तर मला अधिक बरं वाटतं पण आग्रह नाही.
  • Log in or register to post comments

गोट्या... अरे अगदी ज्वलंत

मदनबाण
Wed, 02/03/2021 - 19:16 नवीन
गोट्या... अरे अगदी ज्वलंत विषयावर धागा विणला आहेस की रे ! उघडा डोळे आणि पतंग पहा नीट ! :))) सामन्य मुलगी जेव्हा "बोल्ड" होते असं वाक्य व्हिडियोच्या खाली आहे, म्हणजे नग्न फोटो शुट करणे हीच बोल्डनेसची नवी व्याख्या झाली हे आज समजले ! :))) बरं बोल्डनेसच्या गप्पा व्हिडियोत आहेत म्हणाव्या तर... तसा फोटो काढण्याची भूमिका काय ? हा प्रश्न चुकीचा ठरावा, सरळ नागडा / नग्न फोटो म्हणावे ! बोलण्यात / लिहण्यात तरी लाज का बाळगावी ? शरीरापलिकडे जाउन माणूस पहा असं व्हिडियोत लिहलेलं पाहुन जाम हसलो ! साला, नागडं होउनच कॉन्फिडन्स वाढत असेल तर कठीण आहे ! :))) असो,,, हल्लीच सोमण काका देखील नागडे धावले आहेत, हे तुम्हाला कळलचं असेल म्हणा ! जाता जाता :- ०:५९ सेकंदाला एक मेसेज दिसतो :- This effect requires GPU acceleration !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Counting Stars - OneRepublic (violin/cello/bass cover) Simply Three
  • Log in or register to post comments

दुष्टपणा बघा

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 02/03/2021 - 22:57 नवीन
त्यांच्यावर केस झाली !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हो हो

नर्मदेतला गोटा
गुरुवार, 02/04/2021 - 13:55 नवीन
हो हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

कापडं घाला नका घालू

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 02/03/2021 - 22:56 नवीन
शरीर तेवढं सुदृढ ठेवा! फॅट शेमिंग नै, पण आजार होतात हो लठ्ठ माणसांना उगाच म्हणून आपलं मत! बाकी चालू द्या! ग्रीक रोमन भारतीय मंदिरांमधल्या शिल्पाएव्हढे नाही तरी अगदी बेढब कॅटेगरीत पडाल असलं घेऊन काय फोटोशूट करायला बंदी असायला हवी !
  • Log in or register to post comments

देह सुडौल असेल तर अभिमानाने

विंजिनेर
Wed, 02/03/2021 - 23:27 नवीन
देह सुडौल असेल तर अभिमानाने दाखवावा, नपेक्षा 'झाकली मूठ'बंदच ठेवावी.
सौंदर्याच्या आणि सुडौलपणाच्या कल्पना कालानुरूप बदलत जातात. अश्मयुगात हाच देह सुंदर म्हणून गणला जात होता (तेव्हा सुदैवाने मिसळपाव नव्हतं, नाही तर खैर नव्हती :) ) Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा