✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य

ह
हेमंतकुमार यांनी
Fri, 07/31/2020 - 12:15  ·  लेख
लेख
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे. या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत: १. हात, जंतू, पाणी आणि साबण २. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज. वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय. आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
107307 वाचन

💬 प्रतिसाद (243)

प्रतिक्रिया

+१

हेमंतकुमार
Sat, 10/31/2020 - 19:42 नवीन
झूंज चालू असतानाच्या कालावधीत शरीरात प्रयत्नरत वीषाणू असणारच आणि ते संक्रमित होऊ शकणार
होय, बरोबर. खास करून ज्यांच्यात अँटीबॉडीज लवकर निर्माण होताहेत ते तर बऱ्यापैकी विषाणू घेऊन असतात.
  • Log in or register to post comments

भांग !

हेमंतकुमार
Tue, 11/03/2020 - 21:23 नवीन
कोविडवरील प्रभावी औषधाचा शोध चालूच आहे. आज अखेर सुमारे तीनशे औषधांचे शास्त्रीय रुग्ण प्रयोग चालू आहेत. त्यापैकी एक रोचक असल्याने लिहितो. या औषधाचे नाव आहे cannabidiol (CBD). मुळात ते Cannabis sativa या वनस्पतीपासून मिळवले जाते. शुद्ध मराठीत ही आहे भांग ! Image removed. या औषधाला विषाणू विरोधी आणि दाहप्रतिबंधक गुणधर्म आहेत. हे औषध विशिष्ट मेंदू विकारांसाठी याआधीच वापरात आहे. सध्याचे त्याचे प्रयोग आता शेवटच्या टप्प्यात आहेत
  • Log in or register to post comments

रोचक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/04/2020 - 16:42 नवीन
प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

https://www.loksatta.com

मराठी_माणूस
Wed, 11/04/2020 - 14:44 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/suffering-from-sudden-deafness-due-to-infection-abn-97-2319446/ आधी मेंदु बद्दल वाचले होते आता हे .
  • Log in or register to post comments

म मा ,

हेमंतकुमार
Wed, 11/04/2020 - 16:29 नवीन
या विषाणूमुळे छोट्या रक्तवाहिन्यांच्या अस्तराला इजा होते. >>> दाह. त्यातून संबंधित अवयवांना इजा पोहोचते, ही मूलभूत गोष्ट आहे. काही तुरळक रुग्णांच्या बाबतीत कानाच्या आतील एका नाजूक भागाला इजा झाल्याचे आढळले आहे. यावर अधिक अभ्यास चालू आहे. अर्थात अजून दोन्ही गोष्टींचा कार्यकारणभाव पुरेसा सिद्ध झालेला नाही
  • Log in or register to post comments

एक बातमी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/05/2020 - 09:04 नवीन
आजच्या लोकसत्ता नागपूर आवृत्तीत एक बातमी होती. गरम पाणी आणि काढ्याच्या अतिरेकामुळे धडधाकट व्यक्तींनाही नवे आजार. विषाणू शरीरात शिरल्यावर घशाच्या त्वचेवर फार काळ राहत नाही, लगेचच तो पेशीमधे प्रवेश करतो. त्यामूले काढा, गरमपाण्याची वाफ किंवा गरम पाणी घेतल्याने विषाणूपासून प्रतिबंध होण्याबाबत कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. तेव्हा या गैरसमजांना बळी पडू नये असा सल्ला डॉ.भूमकर यांनी दिला आहे. खरं तर आता आठ महिन्यानंतर अशा बातम्या येणे म्हणजे फार उशीर झालेला असतो. करोनाचा प्रतिबंध म्हणून आत्तापर्यंत लोकांनी काय काय उपाय केले असतील हे त्यांना आणि देवांनाच ठाऊक. विषाणू प्रतिबंधासाठी मधे मधे मालेगावचा काढ्याबद्दल असेच बोलले जात होते, नंतर मूळव्याधाच्या बातम्या येऊ लागल्या. खरं तर लोकांची काहीही चूक नसते, आरोग्यासाठी महत्वाचे म्हणजे जीव वाचविण्यासाठी असे सर्व प्रयोग होत असतात आणि नव्या आजाराची सुरुवात झालेली असते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

https://www.loksatta.com

मराठी_माणूस
गुरुवार, 11/05/2020 - 11:49 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/excessive-hot-water-and-extraction-also-cause-new-ailments-to-the-stubborn-abn-97-2320430/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+११

हेमंतकुमार
गुरुवार, 11/05/2020 - 14:31 नवीन
वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत. योग्य त्या सल्ल्याविन्या केलेले स्व-उपचार तापदायक ठरतात.
  • Log in or register to post comments

‘फेलुदा’

हेमंतकुमार
Mon, 11/09/2020 - 21:05 नवीन
टाटा उद्योगाने तयार केलेली ‘फेलुदा’ ही कोविड निदानाची चाचणी (RT-PCR ला समकक्ष ) आता उपलब्ध झाली आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे 75 मिनिटात तिचा निकाल मिळतो. ती प्रयोगशाळेत करायला तुलनेने खूप सोपी आहे. महिन्याला दहा लाख चाचण्या करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. बातमी https://www.thehindu.com/news/national/tatamd-launches-new-test-for-covi...
  • Log in or register to post comments

वैज्ञानिक..

हेमंतकुमार
गुरुवार, 11/12/2020 - 13:42 नवीन
फायझर कंपनीच्या अत्याधुनिक लशीसाठी पडद्यामागे राहून ज्यांनी काम केले ते वैज्ञानिक आहेत डॉ. उगुर साहीन व डॉ. उझ्लेम तुरेसी. अल्प परिचय इथे :
  • Log in or register to post comments

कोवीड होउन गेलेल्या व्यक्तीला

मराठी_माणूस
Sun, 11/15/2020 - 10:15 नवीन
कोवीड होउन गेलेल्या व्यक्तीला किती काळा नंतर भेटणे योग्य (म्हणजे संसर्गाची शक्यता शुन्य)
  • Log in or register to post comments

म मा ,

हेमंतकुमार
Sun, 11/15/2020 - 13:53 नवीन
साधारण एक महिन्याने जरूर भेटा. भेटताना सुरक्षित अंतर आणि दोघांनी मुख्यपट्ट्या लावायच्या, ही काळजी अधिक महत्त्वाची.
  • Log in or register to post comments

लोकशिक्षण !

हेमंतकुमार
Sat, 11/21/2020 - 19:52 नवीन
आताच सहयाद्री वाहिनीच्या बातम्या पाहिल्या. संपूर्ण बातम्या होईपर्यंत निवेदिकेचे तोंड पूर्ण मोकळे असते. बातम्या संपताना त्या कोविड विरोधी त्रिसूत्रीचे आवाहन करतात. ते करत असतानाच त्या तोंडावर पट्टी व्यवस्थित बांधून घेतात. मगच बातम्या संपतात. सुरेख लोकशिक्षण ! अभिनंदन !
  • Log in or register to post comments

कुमारजी ह्या बातमी मध्ये किती

जिन्क्स
Sat, 11/21/2020 - 21:22 नवीन
कुमारजी ह्या बातमी मध्ये किती तथ्य आहे असं वाटतं?? https://www.cnbc.com/2020/11/18/who-warns-vaccine-wont-help-countries-fend-off-current-wave-of-infections-.html
  • Log in or register to post comments

जिंक्स,

हेमंतकुमार
Sun, 11/22/2020 - 10:01 नवीन
होय, त्यात तथ्य आहे. १. सध्या युरोप-अमेरिकेत दुसरी लाट तेजीत आहे २. आजारी लोकांना लवकर रोगमुक्त करायला प्रभावी औषधाची गरज आहे; अजून ती भागलेली नाही ३. प्रतिबंध त्रिसूत्री अजूनही दीर्घकाळ महत्वाची आहे पण लोक बेफिकीर होताहेत ४. लसीकरण यशस्वी व व्यापक व्हायला बराच काळ जाईल. तोपर्यंत रोगप्रसार चालू राहतो ५. अंशतः रोगनियंत्रण होत राहिले तरी २०२१ देखील झगडण्यात जाईल हा अंदाज.
  • Log in or register to post comments

https://www.loksatta.com/desh

मराठी_माणूस
Sun, 11/22/2020 - 18:32 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/who-suspends-remdesivir-from-list-of-medicines-after-warning-against-use-on-covid19-patients-2333763/ ज्या औषधाच एव्हढा बोलबला होता , काळाबाजार होत होता असेही ऐकले होते , त्या औषधा बद्दल आता ही बातमी. सामान्य लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा.
  • Log in or register to post comments

दुहेरी अँटिबॉडी उपचार

हेमंतकुमार
Mon, 11/23/2020 - 20:44 नवीन
सौम्य ते मध्यम कोविड झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी Regeneron कंपनीच्या दुहेरी अँटिबॉडी उपचारास अमेरिकी औषध प्रशासनाने मान्यता दिली आहे. ही मान्यता 'तातडीचे उपचार' (EUA) या सदराखाली दिली आहे.
  • Log in or register to post comments

हर्ड इम्युनिटि बद्दल ची एक

मराठी_माणूस
Tue, 11/24/2020 - 10:40 नवीन
हर्ड इम्युनिटि बद्दल ची एक बातमी. https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/23112020/0/0/ (ह्या पानावर सगळ्यात खाली)
  • Log in or register to post comments

म मा

हेमंतकुमार
Tue, 11/24/2020 - 10:52 नवीन
बातमी रोचक आहे. पण मुळात सामूहिक प्र-शक्ती कशी येईल यावर तज्ज्ञांचे उघड दोन गट पडलेत. १. ती नैसर्गिक आजारातून येईल : इथे मग टक्केवारीचे विविध आकडे येतात २. ती १ नुसार येणार नसून लसीकरणानेच येईल.
  • Log in or register to post comments

डॉकजी, मला वाटते जर्मन

माहितगार
Tue, 11/24/2020 - 18:00 नवीन
डॉकजी, मला वाटते जर्मन लोकांचा मूळ रिपोर्ट बघणे श्रेयस्कर असावे कारण मराठी दैनिकाच्या वार्ताहराने कोणत्या आधारावर भारतातील वैविध्याशी संबंध जोडला ? महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत कमी वैविध्यता होती का की म्हणून मुबंईत बराच पसरला. वृत्तपत्रिय वार्तांकने हेडलाईन बनवण्याच्या नादात मूळ रिसर्च रिपोर्टचे तीन तेराही करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मागा,

हेमंतकुमार
Tue, 11/24/2020 - 18:08 नवीन
वृत्तपत्रिय वार्तांकने हेडलाईन बनवण्याच्या नादात मूळ रिसर्च रिपोर्टचे तीन तेराही करू शकतात.
>>> + ११२२ या विषयातल्या पेपरच्या बातम्या मी गांभीर्याने घेत नाही. कोणी इथे विचारले तरच बघतो.
  • Log in or register to post comments

सलाम !

हेमंतकुमार
गुरुवार, 11/26/2020 - 12:17 नवीन
करोना रुग्णांची सेवा करण्यासाठी मृत्यूचाही पराभव करुन परतणारे डॉक्टर जलील पारकर https://www.loksatta.com/mumbai-news/doctor-jalil-parkar-who-saw-death-a... तेथे कर माझे जुळती !
  • Log in or register to post comments

सुधारित दुवा

हेमंतकुमार
गुरुवार, 11/26/2020 - 12:19 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/doctor-jalil-parkar-who-saw-death-and-returned-to-serve-at-covid-icu-sgy-87-2338693/
  • Log in or register to post comments

नवे तंत्र RT-LAMP

हेमंतकुमार
Sun, 11/29/2020 - 21:50 नवीन
कोविड निदानासाठी प्रचलित RT-PCR या पद्धतीपेक्षा एक नवीन तंत्रज्ञान (RT-LAMP) आता भारतात उपलब्ध झाले आहे. पहिल्या पद्धतीपेक्षा त्याचे पुढील फायदे आहेत : १. या तंत्रात महागडी उपकरणे लागत नाहीत २. ३० मिनिटात निष्कर्ष हाती येतो. ३. संबंधित चाचणीची रसायने ४ डिग्री C तापमानात -म्हणजे साध्या फ्रिजमध्ये- ठेवता येतात. ४. यासाठी अतिकुशल तंत्रज्ञांची गरज नसते. ५. निष्कर्ष RT-PCR शी समकक्ष आहेत.
  • Log in or register to post comments

चाचणी बरोबर असण्याची

मराठी_माणूस
Mon, 11/30/2020 - 11:21 नवीन
चाचणी बरोबर असण्याची टक्केवारी कीती आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

म मा,

हेमंतकुमार
Mon, 11/30/2020 - 11:32 नवीन
म मा, ICMR च्या प्रमाणीकरणानुसार नव्या पद्धतीची : १. सकारात्मक (+ve) निर्णयक्षमता १००% आणि २. नकारात्मक (-ve) निर्णयक्षमता ९९.३८% अशी आहे. म्हणजेच उत्तम. (https://www.thehindu.com/sci-tech/science/rt-lamp-a-new-technology-for-detecting-covid-19/article33201609.ece)
  • Log in or register to post comments

https://www.loksatta.com

मराठी_माणूस
Tue, 12/01/2020 - 11:53 नवीन
https://www.loksatta.com/agralekh-news/serum-institute-files-rs-100-crore-case-against-volunteer-who-claimed-vaccine-made-him-ill-zws-70-2342073/
विचार करायला लावणारा लेख.
  • Log in or register to post comments

हे तर छान...

हेमंतकुमार
Tue, 12/01/2020 - 21:12 नवीन
साखळी तुटली, तर प्रत्येकाला करोनाची लस देण्याची गरज नाही -आयसीएमआर बातमी
  • Log in or register to post comments

हे साखळी तुटणे म्हणजे नक्की

मराठी_माणूस
Wed, 12/02/2020 - 09:18 नवीन
हे साखळी तुटणे म्हणजे नक्की काय होते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

ममा

हेमंतकुमार
Wed, 12/02/2020 - 10:46 नवीन
ममा संसर्ग साखळीचा अर्थ असा असतो: समजा एक व्यक्ती बाधित आहे. तिच्यापासून दुसरी, पुढे दुसरी पासून तिसरी अशा तऱ्हेने साथ पसरत जाते. आता हे पसरण्याचे मार्ग आपल्याला माहित आहेतच. ते म्हणजे बाधित व्यक्तीच्या शिंकणे, खोकणे इत्यादीतून बाहेर पडलेले सूक्ष्मकण इतरांपर्यंत पोहोचणे. जर आपण प्रतिबंध-त्रिसूत्री व्यवस्थित अमलात आणली तर ही साखळी तुटू शकते. म्हणजेच, आपल्या जवळपास जरी बाधित व्यक्ती असली तरी तिच्यापासून आपल्याला होणारा संसर्ग रोखता येतो.
  • Log in or register to post comments

पण मग ही प्रतिबंध-त्रिसूत्री

मराठी_माणूस
Wed, 12/02/2020 - 11:09 नवीन
पण मग ही प्रतिबंध-त्रिसूत्री कीती काळा पर्यंत अमलात आणायला हवी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

म मा ,

हेमंतकुमार
Wed, 12/02/2020 - 11:28 नवीन
किती काळ याचे उत्तर तज्ञ समितीने अभ्यास करून द्यावयाचे असते. सध्या तरी तसे काही मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध झालेले दिसत नाही. माझ्या मते अजून पाच सहा महिने तरी ते पाळावे असे वाटते.
  • Log in or register to post comments

एक शंका अशी आहे की, ज्या

मराठी_माणूस
Wed, 12/02/2020 - 19:12 नवीन
एक शंका अशी आहे की, ज्या वेळेस कडक टाळेबंदी होती, म्हणजे लोक बाहेर फिरु शकत नव्हते, एक मेकांना भेटु शकत नव्हते तेंव्हाच का नाही ही साखळी तुटली. आता टाळेबंदीत खुप शिथीलता आहे, दिवाळीत तर खुपच गर्दी झाली होती , त्याचे फोटोही वर्तमान पत्रात छापुन आले , पण रुग्णवाढ मात्र कमी आहे . असे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

म मा ,

हेमंतकुमार
Wed, 12/02/2020 - 19:25 नवीन
आतापर्यंतच्या माझ्या अभ्यासानुसार काही शक्यता व्यक्त करतो. ( याला अंतिम उत्तर समजू नये) १. कडक टाळेबंदीच्या काळात रोगजंतू ‘खूप जोरात’ होता. तेव्हा बहुसंख्य लोकांमध्ये त्याच्या विरोधी अँटीबॉडीज निर्माण झालेल्या नव्हत्या. तेव्हा अल्प संपर्कही रोग फैलावत राहिला. २. पुढे जंतूमध्ये जनुकीय बदल झाले. त्याचा संसर्ग क्षमतेवर काही परिणाम झाला असावा. ३. अजून पुढच्या टप्प्यात लोकांमध्ये वाढत्या प्रमाणावर अँटीबॉडीज निर्माण होत राहिल्या. त्यातून समूह प्रतिकारशक्तीही वाढत राहिली.
  • Log in or register to post comments

ओके.

बाप्पू
Wed, 12/02/2020 - 19:43 नवीन
ओके. म्हणजे हर्ड ईम्युनिटी काम करतेय असे तुम्हाला वाटते का?? आणखी एक प्रश्न. एकदा कोरोना होऊन गेल्यावर पून्हा होईल का?? आजवरची आकडेवारी काय सांगते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

म्हणजे जर असेच चालु राहीले तर

मराठी_माणूस
Wed, 12/02/2020 - 20:18 नवीन
म्हणजे जर असेच चालु राहीले तर हा संपेल का ? (गृहीतकःजंतूमध्ये दुसरे काही जनुकीय बदल झाले नाहीत तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

होय,

हेमंतकुमार
Wed, 12/02/2020 - 21:13 नवीन
संपणार आहेच, फक्त किती काळाने याचे उत्तर काळच देईल ! (सुमारे २ वर्षांत आटोक्यात येणार हा अंदाज)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

बापू,

हेमंतकुमार
Wed, 12/02/2020 - 19:57 नवीन
१
. म्हणजे हर्ड ईम्युनिटी काम करतेय असे तुम्हाला वाटते का? >>>
होय काही प्रमाणात नक्की करते आहे. २.
एकदा कोरोना होऊन गेल्यावर पून्हा होईल का?? >>>
होय, पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आकडेवारी बाजूला ठेवू. मुद्दा असा आहे, की संसर्गनंतर ज्या अँटीबॉडीज शरीरात निर्माण होत आहेत, त्या किती काळ संरक्षण देतील यावर एकमत नाही. जनुकीय बदल झालेल्या नव्या स्वरूपातील विषाणूने संसर्ग केल्याचे थोडेफार वृत्तांत वाचण्यात आले आहेत.
  • Log in or register to post comments

काही दिवसांपूर्वी कोरोनाची

Bhakti
Wed, 12/02/2020 - 20:33 नवीन
काही दिवसांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणत panic केलं .आता म्हणत आहेत लवकर साखळी तुटू शकते.विश्वास कशावर ठेवावा? एवढ्या लवकर हर्ड इम्युनिटी येऊ शकते? लंडन मधील लसीबद्दल माहिती असेल तर नक्की द्यावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

भक्ती ,

हेमंतकुमार
Wed, 12/02/2020 - 21:10 नवीन
इंग्लंडमधील लस
ही लस Pfizer ची असून तिची वैशिष्ट्ये : • शुद्ध लस; टिकाऊ • RNA प्रकारची. • साठवणीसाठी उणे ७० C तापमान आवश्यक • २ डोस ; २१ दिवसांच्या अंतराने • प्रयोगादरम्यान ती ६५ वयावरील गटात ९४% उपयुक्त ठरली आहे. • लस देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरला आहे. त्यात वृद्धाश्रमातील लोक, ८० वयावरील लोक आणि नंतर आरोग्यसेवकांचा क्रम आहे.
  • Log in or register to post comments

प्रयोगादरम्यान ती ६५ वयावरील

मराठी_माणूस
गुरुवार, 12/03/2020 - 09:27 नवीन
प्रयोगादरम्यान ती ६५ वयावरील गटात ९४% उपयुक्त ठरली आहे.
ही टक्केवारी कशी ठरवली जाते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

सोपे तर्कशास्त्र

सुबोध खरे
गुरुवार, 12/03/2020 - 10:19 नवीन
सोपे तर्कशास्त्र आज भारतात ९0 लाख लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक सकारात्मक चाचणी केलेल्या प्रकरणामागे चाचणी न केलेले ९ लोक असतात. म्हणजेच आपल्याकडे आतापर्यंत ९ कोटी व्यक्ती कोव्हीड झालेल्या आहेत. लस येईपर्यंत हि संख्या 10 कोटीच्या वर असेल लसीचा एक डोस फक्त २०० रुपये आहे असे गृहीत धरू (अंदाजे- कमीत कमी ) यात 100 / - रुपये शुद्ध नफा म्हणून देईल. कल्पना करा की दर 3 महिन्यांनी हि लस परत परत द्यावी लागली तर दर तीन महिन्यांनी लस बनवणाऱ्या कंपन्यांना 1000 कोटी नफा आहे. मग कोणती कंपनी असे रुग्ण सोडेल. तुम्हाला पुन्हा संसर्ग होउ शकतो अशी भीती घातली तर हे रुग्ण नक्की त्यांचे ग्राहक होणार आहेत. म्हणूनच सर्व *अभ्यास * असे दर्शवितो की प्रतिपिंडे 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. सात महिने प्रतिपिंडे टिकतात अशा अभ्यास निबंधाना प्रसिद्धी मिळत नाही The study revealed that 90 per cent of subjects have detectable antibodies up to seven months post contracting Covid-19. https://www.cidrap.umn.edu/news-perspective/2020/10/studies-show-long-term-covid-19-immune-response#:~:text=The%20researchers%20found%20that%2090,3%20weeks%20after%20symptoms%20appeared. https://health.economictimes.indiatimes.com/news/diagnostics/antibodies-detectable-up-to-7-months-after-covid-infection-number-depends-on-severity-of-disease/78872271#:~:text=19%20serology%20test.-,The%20study%20revealed%20that%2090%20per%20cent%20of%20subjects%20have,the%20virus%2C%22%20Voldhoen%20said. Immunity to the Coronavirus May Last Years, New Data Hint https://www.nytimes.com/2020/11/17/health/coronavirus-immunity.html मी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व दिग्गज आणि मान्यवर लोकांना हा प्रश्न विचारला आहे की जर मूळ कोविड 19 विषाणूमुळे संसर्ग झाला असताना रोग प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही तर एक डीनेचर्ड किंवा लाइव्ह अटेन्युएटेड (लसीचा) व्हायरस यापासून तितकी चांगली रोगप्रतिकारक क्षमता कशी मिळू शकेल. म्हणजेच ज्यांना कोव्हीड झाला आहे त्यांची प्रतिकारशक्ती लसी मुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्ती पेक्षा नक्क्कीच जास्त सरस असेल. आणि जर हा विषाणू दर काही महिन्यात उत्क्रांत होत असेल तर लस अगदीच निरुपयोगी ठरेल कारण त्या विषाणूचे विश्लेषण करून लस बनावे पर्यंत त्याची परत उत्क्रांती झालेली असेल. मुंबईतील सर्वच मोठ्या रुग्णालयांतील दिग्ग्ज वैद्यकीय तज्ञा कडून मला याचे उत्तर अजून मिळालेले नाही. बहुसंख्य डॉक्टर की लस उत्पादकांनी विणलेल्या मानसिक जाळ्यात अनवधानाने ओढले गेले आहेत का असा प्रश्न निर्माण होतो आहे. अशी वेळ आली आहे की डॉक्टरानी वेळेत जागृत होणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की क्षयरोग प्रतिपिंडे संसर्गापासून आपले संरक्षण करीत नाहीत परंतु आपण प्रतिकारशक्ती प्राप्त करतो. कसे? सीएमआय cell mediated immunity (टी पेशींद्वारे पेशी द्वारे असणारी प्रतिकारशक्ती) . एकही लस उत्पादक सीएमआय बद्दल बोलत नाही. का? ते सीएमआयवर आधारित लस तयार करू शकत नाहीत. डॉक्टर अनवधानाने कम्पन्यांच्या सूरात गाणे गात आहेत का अशी शंका येत आहे ? आपण डॉक्टरांना एकदा कोव्हीड झाल्यानं पुन्हा संसर्ग होऊ शकेल अशी भीती पसरवत असलेले मी पहात आहे. भारतात खात्रीलायक पुनसंसर्गाची (reinfection) किती प्रकरणे आहेत? तीन भारतात आतापर्यंत एकंदर संसर्ग झालेले रुग्ण किती ९० लाख. म्हणजे पुनः संसर्गाची प्रकरणे किती ३० लाखात एक रस्त्यावर मरण्याची आपली शक्यता किती आहे (अपघात) 1: 10000. मग ही भीती मानसिक( भयगंड) नाही का ?.
  • Log in or register to post comments

ICMR: 3 cases of coronavirus

सुबोध खरे
गुरुवार, 12/03/2020 - 10:21 नवीन
ICMR: 3 cases of coronavirus re-infection in India, 24 globally The Indian Council of Medical Research (ICMR) on Tuesday said at least three cases of Covid-19 re-infection have been reported from across the country so far, whereas 24 such cases have been found globally. https://health.economictimes.indiatimes.com/news/diagnostics/icmr-3-cases-of-coronavirus-re-infection-in-india-24-globally/78651504
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा