✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

युग प्रवाहीणी

P — Pradip kale, गुरुवार, 07/23/2020 - 10:44
युग प्रवाहीणी
-+-*-+-
समोर दिसत असलेलं भग्न राऊळ पाहताना जाणवतंय, या तुझ्या काठावर कधीकाळी वसलं असेल एखादं छोटंसं गाव अथवा एखादा शांत, एकांत आश्रम... विसावला असेल इथे, अविरत काळप्रवाहात प्रवास करणारा मानव समुह वा या अनंत प्रवासातुन मुक्तिकडे निघालेला कुणी तपस्वी तुझ्या या निळ्याशार अमृताने शिंपली असतील कुणी आपुली स्वप्ने सुर्योदयाला वाहिली असतील तुझ्या थंडगार उदकाची अर्घ्ये ऐकल्या असतील पहाटेच्या निरव शांततेत एखाद्या जनीच्या ओव्या, मंदिरातील वेदघोष किंवा कातरवेळी कुण्या बैराग्याने छेडलेली भैरवी स्मरणात असेल तुझ्या आजही एखाद्या राधेसाठी कुण्या श्रीहरीने तुझ्याच काठावर बसून वाजवलेली अलगुज तुझ्या निळ्याशार पाण्यातुन आपल्या सख्यासोबत नौका विहार करताना लाजेने चूर झालेला नवयौवनेचा साज पाहिली आहेत तु या काळाची अगणीत स्थित्यंतरे बदलणारा समाज आणि बदलणारी मने आपल्या पापांचा भार तुझ्या माथी मारून नव्याने उभे ठाकलेले चेहरे कधीतरी असह्य होऊन धारण केलेल्या तुझ्या रौद्र रुपाला पाहुन तुलाच दोष देत पांगली असेल इथली वसाहत वा मिळाली असेल त्या तपस्व्याला त्याची सायुज्यता आणि पुन्हा झालीस तु एकाकी पण तरीही तशीच स्थितप्रज्ञ, शांत... आता मी बसुन आहे इथेच तुझ्या काठावर, तुझ्याकडेच पाहत तुझ्यासारखाच संथ, शांत आणि एकाकी... शोधत आलोय तुझ्या जुन्या खुणा, शोधयचाय तुझ्या अमृतरुपी प्रवाहाने आजही भुल पडलेला एखादा राजहंस पहायचंय एखाद्या डोहात शिल्लक असलेलं तुझं स्फटीकरुपी अस्तित्व भरून घ्यायचाय पाण्याबरोबर वाहणारा तुझा अवीट गंध ऐकायचा आहे वाळूच्या कणात साठलेला, समोरच्या भग्न राऊळातील घंटानाद आणि अनुभवाचायं जनीच्या गोवर्यांगत, तुझ्या थेंबाथेंबातून मुरलेला, तो पहाटेचा वेदघोष ऐकवशील ना...... -मुक्त कलंदर (प्रदिप काळे ) __________________________________________________________ माझा ब्लॉग : मुक्त कलंदर

प्रतिक्रिया द्या
7119 वाचन

💬 प्रतिसाद (10)

अतिशय सुंदर.

प्रचेतस
गुरुवार, 07/23/2020 - 22:48 नवीन
अतिशय सुंदर. नरेंद्र शर्मा लिखित आणि भूपेन हजारिकांनी अजरामर केलेलं 'गंगा बेहती है क्यू' हे गीत आठवलं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

Pradip kale
Fri, 07/24/2020 - 06:35 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अहाहा...

सत्यजित...
गुरुवार, 07/23/2020 - 23:21 नवीन
अतिशय सुंदर! मुग्ध करुन जाणारी कविता.अगदी त्या 'युग-प्रवाहिणी'च्या काठावर नेऊन सोडणारी!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

Pradip kale
Fri, 07/24/2020 - 06:47 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्यजित...

सुरेख!!

रातराणी
Fri, 07/24/2020 - 11:30 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

Pradip kale
Fri, 07/24/2020 - 15:07 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सुंदर...

मदनबाण
Fri, 07/24/2020 - 20:16 नवीन
सुंदर...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ari Ari Ari... :- Bombay Rockers
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

Pradip kale
Fri, 07/24/2020 - 20:48 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

छान कविता

गणेशा
Fri, 07/24/2020 - 20:53 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

Pradip kale
Sat, 07/25/2020 - 06:57 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा