एक जुना वाडा
भंगलेले तुळशी वृंदावन
विरलेली स्वप्नं
अन् उदास माझं मन
परसातल्या चाफ्याला
आता येत नाहीत फुलं
अंगणात कधीच
खेळत नाहीत मुलं
ओसरीवरचा चौफाळा
वाऱ्यासोबत रडणारा
दारातील पिंपळ
दिवसभर झडणारा
गंजलेले तावदान
कुजलेली खिडकी
धुळीने माखलेली
उतरंडीची मडकी
माळवदातील घरटं
चिमणीने सोडलंय
दारावरचं आडनाव
केंव्हाच मोडलंय
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5993
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता भारी..
धन्यवाद
In reply to कविता भारी.. by गणेशा
आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण
In reply to धन्यवाद by मनोज
मस्त. मीही एक कविता जुन्या
वा मस्त आहे कविता..
In reply to मस्त. मीही एक कविता जुन्या by प्रमोद देर्देकर
धन्यवाद!
In reply to मस्त. मीही एक कविता जुन्या by प्रमोद देर्देकर
चित्रदर्शी कविता!
धन्यवाद
In reply to चित्रदर्शी कविता! by मन्या ऽ
अच्छा! हे माहिती नव्हते.. मी
In reply to धन्यवाद by मनोज
कविता छान आहे, पण आवडली
धन्यवाद वीणा
In reply to कविता छान आहे, पण आवडली by वीणा३