त्या स्वप्नांना..
काय करु? समजत नाही.
मनास माझ्या मी
कसा आवर घालु?
हे मज आता उमजत नाही..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
काही श्रावणातल्या पावसाची
तर काही बहरलेल्या वसंताची..
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
घोटभर चहाची
अन् भरपुर गप्पांची
झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी जागवाया जात नाही..
स्वप्न आहेत ती
शरदातल्या चांदणरातींची
हेमंतातल्या ऊबदार रजईतली
पण झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना
आता मी चेतवाया जात नाही...
- दिप्ती भगत
(१५मे,२०२०)
काव्यरस
Taxonomy upgrade extras
वाचने
4549
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख रचना
स्वप्न आहेत ती
स्वप्न आहेत ती काही श्रावणातल्या पावसाची तर काही बहरलेल्या वसंताची.. स्वप्न आहेत ती घोटभर चहाची अन् भरपुर गप्पांची स्वप्न आहेत ती शरदातल्या चांदणरातींची हेमंतातल्या ऊबदार रजईतलीकाय तरल.. वासहमत आहे!
In reply to स्वप्न आहेत ती by गणेशा
दिप्ती मस्त
धन्यवाद!