✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Coronaचे साईड इफेक्ट्स

म
मंदार कात्रे यांनी
Tue, 05/12/2020 - 11:59  ·  लेख
लेख
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ... आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ... आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !! ''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार'' संपादक मंडळ
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
102980 वाचन

💬 प्रतिसाद (211)

प्रतिक्रिया

दिशाभूल

चौकस२१२
Mon, 05/18/2020 - 04:47 नवीन
"आलेल्या संकटाबद्दल जिथे मेडिकल प्रोफेशन मधील माणसे दिशाभूल करीत आहेत तिथे सामान्य माणसाचे काय ? कोणत्या देशातील ? निदान मिपावर जे डॉक्टर लिहितात ते तरी तसले काही करीत नाहीत उलट आपल्या परीने यौग्य माहितीच पसरवत आहेत ..इतर देशात हि , हि टीका होत नाहिये .. हा जरूर कि आरोयग्य अधिकाऱ्यांचे काही निर्णय चुकले त्यावर टीका होतीय पण ती अशी नाही कि "तुम्ही दिशाभूल केलीत" तर उलट तुम्ही वेळीच काही गोष्टींवर बंदी आणली नाही ? उदाहरणार्थ ऑस्ट्रेलीतील सिडनी य सर्वात मोठ्या शहरात रुबी प्रिन्सेस या क्रूझ शिप वरील प्रवाश्यांना शहरात लगेच का येऊ दिले? म्हणजे एकूण समाजाचा विश्वास मेडिकल प्रोफेशन वर आहेच उलट त्यांचे कौतुकच चाललंय !
↩ प्रतिसाद: चौकटराजा

भरपूर उदाहरणे आहेत ...

चौकटराजा
Mon, 05/18/2020 - 09:40 नवीन
भरपूर उदाहरणे आहेत. मिपावर असे डॉ लोक नाहीत याचे कारण मिपावर एक तळमळ वाले डॉ सोडले तर दुसरे लिहितच नाहीत. आयुवेदाने करोना बरा होतो पसून होमिओपाथी, हायड्रोक्विनाईन, अंटी वायरल मेदिसिन्स "विर" ने शेवट होणारी, गरम पाणी, काढे एक ना अनेक इथपासून डॉ विशवरूप रोयचौधरी सारखे लोक म्हणतात फन्ड साठी जागतिक आरोग्य सँघटनेचा कट . एवढेच नव्हे सर्वात मोठी दिशानूल की बरेच डॉ., हे ही सांगत आहेत की यात 60 च्या वरचे फारच प्रमाण आहे. खरे तर 60 च्या वरचे भटकणारे नाहीतच .60 च्या वरचा करोनाने आजारी पडून किडनी फेल्ने मेला तरी तो जर करोना वाला ठरत असेलही.
↩ प्रतिसाद: चौकस२१२

गापै, तुम्ही एकट्यानं हा धागा लढवला

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 00:34 नवीन
त्याचं प्रथम कौतुक करतो ! सगळा देश लॉकडाऊन करण्यापेक्षा करोनाबाधितांना कसोशिनं शोधून क्वारंटाईन करणं केंव्हाही योग्य ठरलं असतं. या सर्व कळकळीमागे तुमचा हेतू हा आहे > करोनामुळे मोदी हा नेता मोडीत निघू नये मोदी फकिरीवृत्तीचे आहेत त्यांना अशा किरकोळ गोष्टींची फिकीर वाटेल हा समज योग्य नाही. एकदा निर्णय घेतला की ते स्वतः सुद्धा कधी त्यावर अवाक्षर काढत नाहीत. नोटाबंदीवर इतक्या चर्चा झडल्या, १००% चलन परत अर्थव्यवस्थेत आलं. ते स्वतः म्हणाले होते की ४.५० लाख कोटींच्या नोटा लोक गंगेत सोडतील. त्यांचे दिवंगत सहकारी श्रीयुत जेटली त्यांचा बचाव करायला म्हणाले की ४.५० लाख कोटी काय त्यापेक्षा किती तरी अधिक पैसा नष्ट झाला जो फेक करंसीच्या रुपात अर्थव्यवस्थेत सक्रीय होता. तरी मोदींनी त्यांना जरा सुद्धा करेक्ट करायचा प्रयत्न केला नाही. नोटाबंदी ही खर्‍या १४.५० लाख कोटीं पैकी ४.५० लाख कोटी बाद करण्यासाठीची योजना होती. तुम्ही अर्थमंत्री आहात का वनमंत्री ? असं काही सुद्धा मोदी म्हणाले नाहीत. बुलेट ट्रेनसारखी १.१० लाख कोटींची योजना देशाला देण्यापूर्वी ते स्वतः म्हणाले होते की या बुलेट ट्रेनमधे कुणी बसणार नाही, पण आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे हा दणका जगाला द्यायलाच हवा ! इतका थोर विचार देणारा नेता कर्जाची परतफेड कशी होईल, बुलेट ट्रेनचा उपयोग नक्की कुणाला, पर्यावरणाचं काय होईल इतक्या फालतू गोष्टींचा विचार कशाला करेल ? आता तुम्ही कधी मोदींना बुलेट ट्रेनबद्दल बोलतांना ऐकलंय का ? तो विषय संपला. फकिर कधी मागे वळून बघत नाही. ४ हजार कोटींचा सरदार पटेलांचा पुतळा उभा केला नसता तर देशाला स्टॅट्यू ऑफ लिबर्टीची उंची कळली असती का ? जिएसटीमुळे देशात कमालीची स्वस्ताई होईल. तो स्वातंत्र्योत्तर भारतातला देशाच्या अर्थव्यवस्थेचा गेम चेंजर असेल. रात्री बारा वाजता पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमधे भूतो न भविष्यती असा अपूर्व सोहळा घडवून फुल स्वींगमधे जिएसटी आला. आज तीन वर्ष झाली, व्यावसायिकांनी एमारपीवर जिएसटी लावून, आधीच्या किंमतीत अंतर्भूत असलेला नफा काहीही न करता लाटला. परिणामी जनतेला जिएसटीचा भुर्दंड बसला तो त्यांनी आता आयुष्यभर भोगायचा. अजूनही जिएसटी रिटर्न्स सुरळीत होऊ शकली नाहीत. पण एकदा निर्णय घेतला की घेतला, पुन्हा त्याबद्दल अवाक्षर काढायचं नाही, याला म्हणतात आत्मविश्वास ! फकिराच्या लेखी पश्चात्ताप कधी ऐकलायं का ? ती सामान्यांची वृत्ती झाली. आता तुम्हाला वाटेल की याचा लॉकडाऊनशी काय संबंध ? तर तुम्हाला या फकिरीवृतीच्या निर्णय कौशल्याची कल्पना यावी. २१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन का केला ? ते फक्त विरोधकांना दाखवून द्यायला केला की मी एक उडी मारायला सांगायचा अवकाश जनता शीर्षासन करुन उड्या मारायला तयार आहे. याला म्हणतात पॉवर ! त्या वेळी २४ तारखेला आपण संपूर्ण देश लॉकडाऊन करणार आहोत याची मोदींना कल्पना नव्हती असं तुम्हाला वाटतं का ? त्याच वेळी ३ दिवसांची मुदत देऊन सर्वांना सुखरुप घरी जायला सांगितलं असतं तर इतका मोठा अनर्थ टळला नसता का ? पण असे प्रष्न केवळ सामान्यांना पडतात. मोदींसारखा विज्ञाननिष्ठ नेता कसा विचार करतो ? जेंव्हा बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी तज्ञांनी सांगितलं की ढगाळ हवामानात टार्गेट दिसत नाहीत त्या वेळी मोदींनी काय सांगितलं ? जर आपल्या फायटर प्लेन्सनां त्यांची टार्गेट दिसत नसतील तर त्यांच्या रडारवर आपली प्लेन्स दिसणार नाहीत ! मी तारीख आणि वेळ ठरवली म्हणजे ठरवली. तुम्ही निघा ! खलास, आहे का काही त्यावर पुन्हा चर्चा ? तद्वत, २१ तारखेला आपण जाहीर केलं की २४ तारखेला फुल लॉकडाऊन होणारे आणि ही बातमी करोना वायरसला समजली तर ? तेंव्हा आपण करोनावर गुप्तपणे अचानक स्ट्राईक करायचा ! आता देशहिताचा निर्णय घेतोयं म्हटल्यावर जनतेची फिकीर कशाला, ते कोणताही स्ट्राईक झेलतील. अशा प्रकारे फकिराला कोणत्याही गोष्टीनी काहीही फरक पडत नाही. तो काहीही घेऊन आलेला नसतो, सगळी मालमत्ता देशाची असते आणि फकीर झाल्या गोष्टींचा कधीही विचार करत नाही.

उत्तम प्रतिसाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/18/2020 - 15:17 नवीन
संक्षिसेठ, उत्तम प्रतिसाद. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मर्मावर घाव

मराठी कथालेखक
Mon, 05/18/2020 - 21:02 नवीन
छान लिहिलंय.
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सर्वात म्हत्वाचे म्हणजे फकिरांना

आयर्नमॅन
Tue, 05/19/2020 - 20:20 नवीन
काळ वेळ अजिबात समजत नाही
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

फकिरीवृतीच्या

चौकस२१२
Mon, 05/18/2020 - 06:34 नवीन
संक्षी आपले "फकिरीवृतीच्या निर्णय कौशल्याची कल्पना आणि त्याचे अपरिणाम" हे लिखाण रोचक वाटले .. थोडक्यात आपले म्हणे असे आहे असे वाटते कि " मोदी हे फकीर वृत्तीचे असल्यामुळे इतरांचा फारसा विचार ना करिता त्यांनी kovida कारणास्तव देशभर बंदी आणणे यासारखे निर्णय घेतले " आपल्या लिखाणावरचे हे माझे निरीक्षण जर बरोबर असेल तर मग तोच तर्क वापरला तर इतर देशातील राष्ट्राध्यक्षांनी कि जे विविध राजकीय विचारसरणी चे आहेत ते "फकीर नसताना" सुद्धा त्यांनी साधारण पाने "देशबंदीचे " निर्णय कसे घेतले २-३ उदाहरणे देतो ( माफी मी परत मला माहिती असलेल्या देसहनबद्दल बोलतोय आणि या दशांची भारताशी तुलना होऊ शकत नाही पण येथे मुद्दा फक्त या "फकीर वृत्तीचा आहे ) १) नू झीलंड , स्त्री पंतप्रधान कौटिम्बक १ मूल, डावी ( दाव्यातील डावी ) विचारसरणी २) ऑस्ट्रेलिया पुरुष पंतप्रधान,बायको + २ मुली उजव्या विचारसरणीचे ( आणि आपण धार्मिक आहोत हे उघडपणे सांगणारे "चर्च गोइंग ") ३) ऑस्ट्रेलाईतील व्हिक्टोरिया राज्याचे मुख्यमंत्री : पुरुष , बायको + ३ मुले डाव्या विचारसरणीचे आणि यांनी इतर राज्यांचं मानाने जास्त कडक बंदी आणली मग हे सगळे फकीर नसताना कसे काय

फकीरी निर्णयावर खुद्द फकीर अवाक्षर काढत नाही

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 09:33 नवीन
तिथे जनतेचा काय पाड ? त्यामुळे लॉकडाऊन केला म्हणजे केला ! त्यावर चर्चा होऊ शकत नाही, तो विषय संपला ! आपण फक्त फकीरीवृत्ती म्हणजे काय यावर बोलू शकतो. २१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ? पण इतका फालतू आणि उघड विचार फक्त सामान्य माणूस करतो. फकीराची दूरदृष्टी आणि अंतर्ज्ञान याचा थांग सामान्यांना कसा लागणार ? गटारीतल्या गॅसवर चहा करणारा माणूस हा फकीराचा प्रेरणा स्त्रोत असतो. त्यामुळे फकीराच्या आर्थिक डावपेचांचा कुणालाही थांगपत्ता लागणं मुश्कील. गेल्या ६ वर्षात इतक्या भयानक आर्थिक करामती झाल्या, कित्येक लाख कोटींच नुकसान झालं; पण त्या जनतेला ते दिसेल तर शप्पत ! याला म्हणतात फकीरी किमया. फकीर हा नेहेमी अचानक अ‍ॅटॅक करतो, तो कुणाला सावध होण्याची संधीच देत नाही. २४ तारखेचा लॉकडाऊन नोटाबंदीच्या निर्णयापेक्षाही गुप्त ठेवणं आवश्यक होतं. कारण काय तर जनता कोणताही स्ट्राईक झेलायला तयार आहे; (त्यांना गेली ६ वर्ष आपण याचसाठी तयार केलंय), पण करोना वायरसला बितंबातमी लागता कामा नये. तुम्हाला वाटेल फकीरी वृत्तीचा इतका गहन विचार कसा असू शकेल ? तर स्वतः मोदीजी भर शास्त्रज्ञांच्या काँन्फरान्समधे म्हणाले आहेत, भारतानं प्लास्टिक सर्जरी हजोरो वर्षांपूर्वीच शोधली होती आणि याचा पुरावा आहे आमचा गणपती. खलास ! काय बिशादे कुणाची पुढे बोलायची ?

स्वतः मोदीजी भर

वामन देशमुख
Mon, 05/18/2020 - 10:30 नवीन
स्वतः मोदीजी भर शास्त्रज्ञांच्या काँन्फरान्समधे म्हणाले आहेत, भारतानं प्लास्टिक सर्जरी हजोरो वर्षांपूर्वीच शोधली होती आणि याचा पुरावा आहे आमचा गणपती
ते भाषण ऐकायला मला खरंच आवडेल. इथे लिंक देता का प्लीज?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

+++ट्वेनटीन लाख करोड

गोंधळी
Mon, 05/18/2020 - 10:41 नवीन
https://www.youtube.com/watch?v=NeIWu1NLuzE तुम्हाला वाटेल फकीरी वृत्तीचा इतका गहन विचार कसा असू शकेल ? तर स्वतः मोदीजी भर शास्त्रज्ञांच्या काँन्फरान्समधे म्हणाले आहेत, भारतानं प्लास्टिक सर्जरी हजोरो वर्षांपूर्वीच शोधली होती आणि याचा पुरावा आहे आमचा गणपती. खलास ! काय बिशादे कुणाची पुढे बोलायची ?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

फकिरी वृत्तीचे कारण

चौकस२१२
Mon, 05/18/2020 - 10:44 नवीन
.माझा प्रश्न साधा होता फकिरी वृत्तीचे कारण आपण दिलेले रोचक वाटले होते म्हणून विचारायचा प्रयत्न केला आणि ते कारण जगातील इतर राष्ट्राध्यक्षांचं भूमिकेबरोअबर ताडून बघायचाच प्रयत्न केलं .. म्हणलं जर मोदी फेकीतर म्हणून लोकडोवन तर बाकीचे देश नेते पण फकिराच्या असेल पाहिजेत... पएकूण काय मोदी विरोध... हा अजेंडा दिसतोय.. जाऊ द्या .
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

भारतीय जनतेची व

गोंधळी
Mon, 05/18/2020 - 10:58 नवीन
देशाची चिंता वाटते. जनतेला मुर्ख बनवले जात आहे हे पाहुन त्रास होतो.
↩ प्रतिसाद: चौकस२१२

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/18/2020 - 15:05 नवीन
सहमत....! -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: गोंधळी

पुन्हा वाचाल का ?

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 11:23 नवीन
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?
↩ प्रतिसाद: चौकस२१२

कसेही ..

चौकटराजा
Mon, 05/18/2020 - 13:19 नवीन
त्यावेळी इतका प्रसार झालेला देखील नव्हता. पण सर्जिकल स्ट्राईक चे व्यसन लागलेल्या मोदीना ते मान्य कसे व्हावे ? आता त्यात वाईट असे होऊ शकले असते की आज देखील क्लस्टर्स ऑफ इन्फेक्शन ऐवजी कम्युनिटी इन्फेक्शन ही स्थिती देखील येऊ शकली असती. वर मी जे केदारनाथ चे उदाहरण दिले आहे ते त्या अर्थाने .दोन मतप्रवाह निर्माण होणे हे माणसातच घडते पण निसर्ग दोघांच्याही बाजूने कधीच दान टाकीत नाही. शेवटी ज्या मतप्रवाहाच्या पारड्यात निसर्गाचे दान पडते तो शहाणा बाकी मूर्ख . जीता वोही सिकंदर ! माझ्या मते टेस्ट टेस्ट अँन्ड टेस्ट हा एक मार्ग होता पण भारतीय संदर्भात १३० कोटी वगरे टेस्ट अशक्य ! त्यामुळे सामाजिक कायिक अंतर .पण इथे ४० कोटी लोक आज मिळवू आज खाऊ या पातळीला जगत आहेत तिथे सर्व फॉर्म्युले नापास ! आता एकच उरला आहे तुम्ही व तो देव दोघे काय ते बघून घ्या !
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

चौरा,

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 13:40 नवीन
> आता एकच उरला आहे तुम्ही व तो देव दोघे काय ते बघून घ्या ! याचे मोदींनी नवे ब्रँडींग केले आहे "आत्मनिर्भरता अभियान " !
↩ प्रतिसाद: चौकटराजा

खिक्.. :D

मोदक
Mon, 05/18/2020 - 13:44 नवीन
खिक्.. :D
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सॉलीड चौकटराजासाब

अभ्या..
Mon, 05/18/2020 - 14:23 नवीन
राजेशाही मोजड्यांचा फोटो पाठवा काका. मान गये.
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वामन देशमूख, चौकस २१२,

मामाजी
Mon, 05/18/2020 - 15:23 नवीन
वामन देशमूख, चौकस २१२, आपल्या माहिती साठी ही लिंक पाठवत आहे.. हे संकलन गांधीवीदी विचारसरणीचे श्री धर्मपाल, यांनी, ब्रिटीशांनी १६५० ते १८५० च्या दरम्यान संपूर्ण भारतात केलेल्या अनेक चाचण्यांच्या /अहवालांच्या आधारावर केलेले आहे. लढाईत किंवा शिक्षेत कापले गेलेले नाक व कान प्लास्टिक सर्जरीने परत बसवण्याची विद्या भारताीयांना प्रचीन काळा पासुन अवगत आहे असे ब्रिटीशांनी नमूद कपून ठेवलेले आहे. मूळ वाक्यरचना .( This operation is not uncommon in India, and has been practiced from time immemorial.) https://drive.google.com/open?id=1tN2xMm65nQj0Pn9K8ukwvSUvZVjqlK7t
↩ प्रतिसाद: चौकस२१२

प्रतिसादातल्या प्रत्येक गोष्टीचा विडिओ यू ट्यूबवर आहे

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 10:39 नवीन
काही तज्ञांनी मार्क झुकेरबर्गला हे विडीओ काढण्याची विनंती केली होती. यावर मार्क म्हणाला अशा युगपुरुषाचे विडीओज काढणं अवमान होईल. एक वेळ मी स्वतःचा अकाऊंट यू ट्यूबवरुन काढेन पण ते विडीओज काढणार नाही, असं ऐकिवात आहे.

हे घ्या

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 10:45 नवीन
Narendra Modi relates stem-cell and plastic surgery to our age old science
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वारलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/18/2020 - 15:08 नवीन
=)) प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आसुरी आनंद

वामन देशमुख
Mon, 05/18/2020 - 16:02 नवीन
सामान्य भारतीय जनतेला त्रास देऊन मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का?

नक्कीच

चौकस२१२
Mon, 05/18/2020 - 17:05 नवीन
नक्कीच , नक्कीच मोदींना आसुरी आनंद मिळत असावा ( अक्यार्डिंग टू सम मिपाकर ) -एक तर ते फकीर आहेत - दुसअरे असे कि त्यांना सर्जिकल स्ट्राईक चे व्यसन लागले आणि त्यांनी हे व्यसन इंग्लड , इटली, ऑस्ट्रेलिया आणि काही प्रमाणात ट्रम्प तात्या यांना लावले त्यामुळे हे सर्व खुले लोक आपल्याच जनतेला ठेचायला उत्सुक आहेत - दुसरे असे कि हे सगळे थोतांड आहे ! - डॉक्टर लोकं सगळे महामूर्ख आहेत , ते लोकांची दिशाभूल करीत आहेत - लवकरच मोदीनं मोडीत काढून तिथे बारामतीच्या राजाची नेमणूक करण्यात येणार आहे ( उदोहोजींची कशी काहीतरी करून संसदेत ढकलणूक केली गेली तशी )आणि ते नुसता एक पत्र लिहणार आणि कारोंना पळून जाणार .. नवीन गृहमंती खाते तब्लिघी जमाती पैकी कोणाकडे तरी दिले जाणार मग सगले आलबेल... चला घराबाहेर पडा राडा घालुयात कसलं काय कारोंना आणि कसला काय सगळं थोडांत ... ताजी बातमी : मला एक गुप्त बातमी लागली ती अशी कि भांडी थाळ्या बनवण्याच्य वयवसायाने मोदींना ना काही तरी गुपचूप मोठी स्पॉन्सरशिप दिली आणि त्यामुळे त्यांनी भांडी थाळ्या वाजवा असे फर्मान काढले .. लोकांनी लगेच केले, भांड्यांना आणि थाळ्यांना पोचे आले ..आणि लोकअन्चे नुकसान झाले .. आणि नवीन भांड्याचा खप वाढला... अर्थत काही शहाण्या लोंकांनी मोदींचे ना ऐकल्या मुळे त्यांच्या भांड्यांना काह्ही झाले नाही आणि त्यांचे पैसे वाचले. याला "थाळी घोटाळा" असे नाव देण्यात येणार आहे आणि पी चंदम्बरम , मणिशंकर अय्यर , इत्यादींची एक चौअक्शी समिती नेमली जाणार आहे ( लल्लू आणि भुजबळ त्याला बहरून कन्सल्टिंग देणार)
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

मुद्दा असा आहे

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 17:53 नवीन
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?
↩ प्रतिसाद: चौकस२१२

करोडो लोकांना 3 दिवसात एक

धनावडे
Tue, 05/19/2020 - 11:25 नवीन
करोडो लोकांना 3 दिवसात एक जागेवरून दुसरीकडे हलवणे शक्य आहे? आणि त्यामुळे गावाकडे कोरोना पसरला असता त्याच काय?
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आपआपल्या राज्यात परत जाणार्

प्रसाद_१९८२
Tue, 05/19/2020 - 13:03 नवीन
आपआपल्या राज्यात परत जाणार्‍या मजूरांची, जी संख्या सध्या समोर येत आहे तेवढे मजूर, तुम्ही म्हणताय तसे तीन दिवसात आपआपल्या घरी गेले असते ? उगा मोदींचा विरोध करायचा म्हणून काहिही लिहायचे. ---
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सहमत...

यश राज
Tue, 05/19/2020 - 13:32 नवीन
उगा मोदींचा विरोध करायचा म्हणून काहिही लिहायचे.
तीव्र सहमत.. मुळात ३ दिवसात एवढे सगळे मजुर आपापल्या गावी कसे गेले असते. आणि समजा जरी त्याना जावु दिले असते तर परीस्थीती चिघळली नसती याची खात्री कोणी देवु शकतो का? जर तसे झाले असते तर हेच प्रश्न वेगळ्या स्वरुपात मोदिंना विचारले असते. जसे की , "कोरोनामुळे सगळ्या जगात हाहाकार उडालेला दिसत असुन मोदींनी लॉकडाऊन जाहीर करायला ३ दिवस ऊशीर का केला, मजुरांना स्थलांतर करण्याला परवानगी का दिली?, आता जर मजुरांमार्फत इतर ठिकाणी जर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्याला जवाबदार कोण" इत्यादी इत्यादी. चीत भी मेरी पट भी मेरा..
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

+१००

चौकस२१२
Tue, 05/19/2020 - 18:14 नवीन
चीत भी मेरी पट भी मेरा.. अगदि बरोबर टोकाचा अन्ध मोदि द्वेश मग सगल बकिच जग जे करत आहे ते मोदिन्नि केल मह्न्जे चुकच ..
↩ प्रतिसाद: यश राज

मार्मिक

मंदार कात्रे
Mon, 05/18/2020 - 17:55 नवीन
मार्मिक
↩ प्रतिसाद: चौकस२१२

मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का?

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 17:51 नवीन
> सामान्य भारतीय जनतेला त्रास देऊन मोदींना नक्कीच आसुरी आनंद मिळत असावा, नाही का? अजिबात नाही ! फकीर आनंद आणि दु:ख यापलिकडे गेलेला असतो. नोटाबंदीत रांगेत उभे राहून प्रामाणिक लोकांनी हाकनाक प्राण गमावले. पण सर्व जग माया आहे, इथे ये-जा चालूच राहाणार असा विचार फकीर करतो. त्यामुळे जनतेचा छ्ळ वगैरे कसा होईल ? करोडो लोकांना स्वतःच्या घरी पोहोचायला शेकडो मैल पायपीट करावी लागली पण फकीरी वृत्तीला हा सर्व खेळच आहे, त्यात वैषम्य वाटून घेण्यासारखं काही नाही.
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

फकिरी वृत्तीचे तुणतुणे

चौकस२१२
Mon, 05/18/2020 - 19:04 नवीन
मोदिन्न महित नहि पन हे जे काय लिहिताय आणि परिस्थितीवर मात कशी करीत येईल त्याऐवजी फकिरी वृत्तीचे तुणतुणे लावलाय त्यामुळे निश्चितच असुरी आनंद मिळत असावा
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमचा मुद्दाच हुकतोयं !

संजय क्षीरसागर
Mon, 05/18/2020 - 19:58 नवीन
२१ तारखेला ट्रायल लॉकडाऊन केल्यावर, लोकांना घरी जाण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देऊन, २५ तारखेला देश लॉकडाऊन केला असता तर आज करोडो लोकांवर नाहक लादलेली दयनीय परिस्थिती, कोणताही सरकारी खर्च न होता टळली नसती का ?
↩ प्रतिसाद: चौकस२१२

Sushruta

मदनबाण
Mon, 05/18/2020 - 16:25 नवीन
Image removed. Sushruta

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Samjho Na Kuch To Samjho Na...

मदननबाणजी, आपल्या माहितीसाठी.

मामाजी
Mon, 05/18/2020 - 18:13 नवीन
मदननबाणजी, आपल्या माहितीसाठी.. https://drive.google.com/open?id=1tN2xMm65nQj0Pn9K8ukwvSUvZVjqlK7t
↩ प्रतिसाद: मदनबाण

वैदिक विमान....

गोंधळी
Tue, 05/19/2020 - 12:02 नवीन
वैदिक विमान....https://www.washingtonpost.com/news/worldviews/wp/2015/01/04/indians-invented-planes-7000-years-ago-and-other-startling-claims-at-the-science-congress/ आणि अणूबॉम्ब (जो महाभारतात वापरला होता),दूरचित्रवाणी द्वारे परिषद(video conference)असे असंख्य शोध आपण लावलेले आहेत. या सगळ्याचा डेटाबेस ज्या ढगात(cloud storage) साठवून ठेवला आहे त्याचा फक्त शोध घेतला पाहिजे इस्रो ने बस. आणि आदरणीय मोदीजी हे करुन राहतील यात शंकाच नाही.
↩ प्रतिसाद: मामाजी

महर्षी सुश्रुतां पासून ते थोतांडी, फकिरी, नोटाबंदी, घरबंदी, टाळ

चामुंडराय
Mon, 05/18/2020 - 21:27 नवीन
ह्या धाग्याचा आवाका बराच मोठा आहे. महर्षी सुश्रुतां पासून ते थोतांडी, फकिरी, नोटाबंदी, घरबंदी, टाळेबंदी, सर्जिकल स्ट्राईक पर्यंत !! चला, मंडळींच्या भावनांचा निचरा तर होतो आहे ह्या निमित्ताने, हे हि नसे थोडके.

ह्या धाग्याचा आवाका बराच मोठा

वामन देशमुख
Mon, 05/18/2020 - 23:38 नवीन
ह्या धाग्याचा आवाका बराच मोठा आहे.

खरंच हसून गार झालो राव!

↩ प्रतिसाद: चामुंडराय

संपुर्ण लॉकडाऊन आवश्यकच

मराठी कथालेखक
Tue, 05/19/2020 - 00:06 नवीन
असे मानणार्‍यांना दोनच प्रश्न १) लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते ? २) लॉक डाउन मागे घेण्याचे निकष काय होते / असतील. या दोन प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी सह) कुणी देवू शकेल काय ?

वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी

मोदक
Tue, 05/19/2020 - 02:30 नवीन
वस्तुनिष्ठ उत्तरे (आकडेवारी सह) कुणी देवू शकेल काय ? हो. भारत सरकारला माहितीच्या अधिकाराअंतर्गत हे दोन प्रश्न विचारा.
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते

चौकस२१२
Tue, 05/19/2020 - 04:49 नवीन
१) लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते ? - रोगाचा प्रसार तर होणार त्यामुळे हाती एकच होते कि प्रसाराचा वेग मंदावयाचा ( फ्लॅट थे कर्व) जेणे करून आहे ती वैद्यकीय सुविधा हे "लोड" हाताळू शकतील आणि त्या सुविधा वाढव्याला जरा वेळ मिळेल आणि हा प्रयोग बऱ्याच देशात यशस्वी झालं असे सध्या तरी म्हणता येईल येथील आलेख बघा https://www.google.com/search?q=world+corona+stats&rlz=1C1CAFB_enAU612AU612&oq=world+corona+stats&aqs=chrome..69i57j0l2.5631j0j9&sourceid=chrome&ie=UTF-८ हे करितां ना सामाजिक स्वास्थ्य कि आर्थिक मंदी यात वैचारिक वाद होते यात शंका नाही ..परंतु जेव्हा भांडवलषयी सरकारे सुद्धा स्वास्थ्याला उद्योगा पेक्षा प्राधान्य देतात ( ऑस्ट्रेलिया लिबरल पक्ष ) तेवहा असा प्रकारचाच "लोकडोवन" हे कडू औषध घेणे किती महत्वाचे होते ते कळते ( अर्थात आंधळा विरोध नसेल तर) २) लॉक डाउन मागे घेण्याचे निकष काय होते / असतील. वरील भाग १ जर साधय करू शकले तर टप्या टप्या ने निर्बंध कमी करणे हा विचार आहे त्याआधी हाती घेतलेले उपाय - चाचण्यांचे प्रमाण वाढवणे - सर्वात जास्त परिणामकारी निर्बंध आधी ( बऱ्याच देशात अंतर्राष्ट्रूया प्रवांमुळे प्रसार झाला आणि त्यानंतर स्थानिक प्रसार ) - आर्थिक मदत ( इंगलंड ने ८०$ पगार सरकारने दिले , ऑस्ट्रेलिया ने बेकारी भत्ता दुपार केलं आणि महिना ३००० डॉलर ज्यानं नोकरी आहे त्यांना देऊ केले ६ महिन्यासाठी आणि दोन्ही देशात बंडवालशे पक्ष सत्तेत आहेत हे लक्षात घ्या, पाळणाघरांची सबसिडी वाढवली ) - सतत माहिती (डेटा ) गोल करीत राहणे निर्बंध कमी करणे करणे उलट्या पद्धतीने जे निर्बंध उठवल्याने प्रसार कमीत कमी वाढेल - मर्यादित शिथिलता - शाळा सुरु - डेटा कोणाकडेच "मॅजिक बुलेट " नाहीये
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

दुरुस्ति

चौकस२१२
Tue, 05/19/2020 - 04:52 नवीन
इंगलंड ने ८०% ...असे वाचावे दोन्ही देशात भांडवलशाही .. असे वाचावे
↩ प्रतिसाद: चौकस२१२

ग्रेटच

अभ्या..
Tue, 05/19/2020 - 11:52 नवीन
कोणाकडेच "मॅजिक बुलेट " नाहीये
हा साक्षात्कार तर एपिक. हे भान कधी तर स्वतःला पाहिजे तेवढ्या ब्लेम गेम खेळून झाल्यावर. आपण करतोय काय अन त्याचे परिणाम काय होणारेत ह्याचे इतकेही भान नसू नये. जरा कुठे लॉकडाऊन काय आहे ते कळायला लागले की मस्त टार्गेट सापडले. करोन जिहाद. जमाती तर पहिल्यापासूनच आहेत ना? कार्यक्रम कधी घेतला, कधी संपला, कसे अडकले? का अडकले? सगळे ते सांगूच शकतात ना. पण मिडीयासमोर असे चित्र उभे की तो मौलाना साद का कोणतरी एक मोठी करोनाने भरलेली सुटकेस घेऊन जमातींना करोना वाटत बसलाय अन लोकांना ते करोनाचे विषाणू मल्टीलेव्हल मार्केटिंगने सगळीकडे पाठवतोय. पुढे काय. महिनाभर नुसता कंठशोष. त्या मौलानाचे तोंड पाहूनच कंटाळा आला. आज त्याचे घर सापडले, उद्या फार्म हाऊस सापडले, पर्वा बँक अकाउंट सापडले, तेरवा जावई सापडला अन इतक्या गाड्या अन इतके पैसे. देशातल्या सगळ्या मुसलमानासमोर प्रश्नचिन्ह. कुणी मुस्लीम भाजीवाल्यावर बंदी घालतोय तर कुणी धर्माचा बोर्ड लावून फळे विकतोय. देशभरातले सगळे जमाती सापडले पण हा मौलाना अजुन नाही सापडला. का नाही सापडला हे विचारायचे नाही. अशा लॉकडाऊनमध्ये सगळे अधिकार असताना दिल्ली पुलिस अन आसपासची राज्ये स्वतःकडेच असताना तो आधी डोवालला भेटू शकतो पण आता सापडत नाही. किती मेले जमाती? आता सध्या सगळे मृत आहेत त्यांना सगळ्यांनाच ह्या जमातीद्वारे झालेले का इन्फेक्शन? ती तर माणसेच होती ना? अगदी त्यांना ठरवून कॅरीयर/इन्फेक्टेड केले तर सग्ळे काय कोरोनाप्रुफ होते का? सब्जेक्ट बंद म्हनले की आता तो सब्जेक्ट बंद. त्या पिरियडमध्ये कधीपर्यंत संपेल ह्याचा अंदाज आलेला का? बर वाढले तर काय होईल ह्याचा अंदाज. इल्ला. नंतर चीन. तो ट्रंप तिकडे म्हणाला की सगळ्याला कारणीभूत चीनच. लगेच सग्ळीकडे बोंबाबोंब चीनच्या नावाने. आता अमेरिकाही त्यांच्यावर बंदुका ताणतीय तर घ्या आपली पण ताणून. बरं अगदी पुढे जाऊन सापडलाच चीन. काय करणारे? दोन तीन चॅनेले नुसते ट्रंप पेंटागॉनला अदेश देतोय अन चीन कसा बेक्कार सापडलाय ह्यावर दिवसदिवस दळण दळताहेत. इकडे तो जिनपिंग अन तिकडे ट्रंप. मधे दोन चार युध्दनौकांचे ग्राफिक्स. होत काहीच नाही. होणारही काही नाही. सुरुवातेला चीनने फालतू पीपीई किट अन टेस्टिंग किट पाठवल्याच्या बोंबा. झाले काय? काही नाही. अभिमानाने सांगायचे की आम्ही इतके पीपीई किट अन मास्क देशात तयार केले. अरे ते नॉनवोव्हन पॉलीप्रॉपलीन फॅब्रिक गेल्याच वर्षीच्या प्लास्टिक बॅनमध्ये वन टाईम युज मटेरिअल नको म्हनून बॅन झालेले. तेम्व्हाचेही आदेश संदिग्धच. बर मटेरिअल कुठून येते त्याचे? फार थोडे आपण बनवतो बाकी येते अर्थात चीनमधूनच. आम्ही फक्त गेल्या वर्षी सरकारने पिशव्या बनवू नका म्हणून बंद केलेले. आता त्याचे मास्क आणि पीपीई किटस बनवतो. अजून एक हळूच ब्लेमगेम मागास राज्यातले मजूर. तेच कारणीभूत सर्वांना. त्यांनीच वाढवल्या झोपडपट्ट्या अन बकालपणा. त्यांना तेवढेच करायचे असते तर त्याम्च्या राज्यात नाही का करु शकत? इथे त्यांची काय गरज होती हे समजणार आहेच येत्या महिन्यात. आपल्यालाही कळणारे अन त्यांच्या गृहराज्यालाही. त्यांचे तिकडचे बापही तसेच. आधी ट्रेनच्या नावाने शंख, मग बसच्या नावाने, ट्रकने येत मरणारे चालत निघाले की त्यांना राज्य बंद करणारे. एपिक अ‍ॅक्चुअली. दोनतीन महिने लोकं घरात अडकवले की काय होणारे हे खरंच माहीत नसते का? अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू आणि वर्क फ्रॉम होम ह्याशिवाय भारतात जग नसतेच का? दिअवसाच्या अन आठवड्याच्या पगारावर जगणारी कीती जनता देशात आहे ह्याचा काहीच अंदाज नाही का? अ‍ॅक्चुअली काहीच सेव्हिंग नसणारी अन फक्त हातावर पोट असलेली कीती जनता किती दिवस निभवू शकेल हे सर्व? पाण्याची खोली सरासरी ५ फूट आहे म्हनल्यावर सगळेच पानी पाच फूट खोल नसते. एखादा महिना उधार उसनवारी करुन कसेतरी निभवता येईल. दोन महिने पूर्ण होऊन पुढेही काही अंदाज दिसेना म्हनल्यावर काय करणार लोक? बर त्यांनी गावाकडे जायचे म्हनाले की पसरेल कोरोना म्हणायचे. कुठून कुठे पसरतोय? शहराकडून गावाकडे? मग गावे आधीपासून अडकलीत त्यांचे काय? इतके दिवस चाललेली व्यवस्था एका झटक्यात बंद करून जगण्याची नवीन पध्दती सुरु करायची म्हनले तर कसे व्ह्वावे. नॉर्मल माणसाला नॉर्मल परिस्थितीत साधे गाव बदलायचे ठरवले तर लगेच रुळत नाही. आता इतक्या सर्वांनी अशा विपरीत परिस्थितीचा सामना कसा करायचा? असा सामना करतानाही गर्दी जमवायची नाही, हे फॉर्म भरा, तिथे रजिस्ट्रेशन करा, हे अ‍ॅप डाउनलोड करा, इतक्याच वेळात करा आणि असेच करा नाहीतर लाठ्या खा असे सांगताना भारतातल्या सर्वात गरीब, सर्वात अडाणी, सर्वात मजबूर अन सर्वाधिक त्रासलेल्या माणसाचा विचार होता का? सुरुवातीला लॉकडाउन हे ह्याचे उत्तर आहे असा समज करुन दिला गेला, नंतर काही औशधांची चर्चा झाली, इम्म्युनिटी वाढवण्याची चर्चा झाली, प्लाज्मा थेरपी झाली, नंतर ऑक्स्फर्डाहून वॅक्सिन येणारे ही चर्चा. आता आपल्याला कोरोनासोबतच राह्यचेय अन कुणाकडेच मॅजिक बुलेट नाही ही चर्चा. खरे आहे हे. कुणाकडेच उपाय नाहीये तर करु नका प्लीज उपाय. केल्या उपायाचे अपाय निस्तरणार आपणच. कारण गर्वसे कहो हम आत्मनिर्भर है.
↩ प्रतिसाद: चौकस२१२

अरेरे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/19/2020 - 14:16 नवीन
मास्तराचे अभ्यास पत्र. स.न.वि.वि. अभ्या...अरेरे..... सर्वच्या सर्व म्हणजे टोटल प्रतिसाद दुर्दैवी आहे, विरोध करायचा म्हणून करायचा म्हणून विरोध स्पष्ट दिसत आहे. असे निगेटीव्ह विचार कराल तर कसा आत्मनिर्भर बनेल भारत. शेनीटायजरने हात धुवा आणि नाकाला रुमाल-बीमाल बांधून कामाला लागा. इकडं तिकडं स्पर्श होणार नै ते बघा. गोळ्या, सुया, पोती, कंगवे, फण्या याच्या भरवशावर राहू नका. ज्या दिवशी काही दवा-दारु येईल त्या दिवशी ते रांगेतल्या लोकांना अनुक्रमे सगळं मिळणार आहे. आपल्या देशातील सगळ्यांना रांगेत उभे राहून वस्तू घेण्याचा आणि मरण्याचा अनुभव आहेच. बाकी रोगाने सर्वेच्या सर्व मरणार नै, असे समजून वागा. शेजारी पाजारी, गावात, तालुक्यात जिल्ह्यात कोरोनावाला एखादा रुग्ण बरा होऊन आला असेल तर त्यांच्या स्टो-या वाचू नका. फूलं उधळून त्यांचं गल्लीत स्वागत करीत बसू नका. डॉक्टर, पोलीस आणि नर्सेसला त्यांचं काम त्यांना करु द्या. सोललेले पाय, जखमा, मेलेले लोक आठवू नका. पायी चालणार्‍या गर्भार महिला मजूर त्यांच्या वेदना आणि तत्सम गोष्टी पाहु नका. कोणाला सांगून त्रास करुन घेऊ नका. शक्यतो, टीव्ही पाहू नका म्हणजे ते लोक दिसणार नाहीत. पेपरं वाचू नका. आपल्या मित्रांना- आप्तस्नेहींना पोटापाण्याच्या जुगाडावर फोकस करायचा सांगा. आलेच एखाद्या फोरमवर, वाट्स्पवर तर तिकडे फार वाद घालू नका. शेठ काहीबाही बोलून जातात आणि त्यांच्या समर्थकांना जसे कवितेत नसलेला आशय शोधावा लागतो तसे ते नसलेल्या गोष्टी आणि काहीच्या काही स्पष्टीकरणं आणि उदात्त हेतू वगैरे सांगत फिरत असतात. अशाच विचारांनी भारत दोन हजार नव्याण्णव मधे सुखी होणार आहे असे समजून नाकासमोर चालत राहा. तान घ्यायचा नाय. पण, आपल्याला जे दिसतं ते बोलल्याशिवाय राह्यचं नाय. जीवाला जपा. कुटुंबाला जपा. काळजी घ्या. शुभंम भवतू - दिलीप बिरुटे (अभ्याचा मास्तर)
↩ प्रतिसाद: अभ्या..

शंकराचार्य

चौकस२१२
Tue, 05/19/2020 - 17:54 नवीन
देशातल्या सगळ्या मुसलमानासमोर प्रश्नचिन्ह. ! असा सर्वसाधारण भारतीय म्हणलं नाहीये .. उगाच काहीतरी काय सांगताय.. मूलमानांच्या मुल्लांवर टीका होत होती ..कारण त्यातील काही मुल्लाणी जे तारे तोडले कि आला पुढे हे सब झूट आणि मशिदीत एकत्र आलात तर सुरक्षित ...! उद्या जर एकाधे शंकराचार्य असे म्हणले असते कि देवळात देवापाशी आलात ना तर रोगापासून भीती नाही " तरीही त्याला सर्वसामान्य माणूस मूर्खपणाचा म्हणेल मुसलमान समजलात एक जरी चूक दाखवली कि लगेच इस्लामफोबिया..! वाह
↩ प्रतिसाद: अभ्या..

तुमच्या प्रतिसादाबद्दल

मराठी कथालेखक
Tue, 05/19/2020 - 17:13 नवीन
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण वस्तुनिष्ठ निकष म्हणजे साधी सरळ आकडेवारी सांगता येईल का ? म्हणजे एकूण अ‍ॅक्टिव केसेस अमूक इतक्या, किंवा एकूण केसेस (अ‍ॅक्टिव्ह + बरे झालेले + मृत) अमूक इतक्या, किंवा दिवसाला इतक्या केसेस मिळत असतील तर लॉकडाऊन सुरु व त्याचप्रमाणे लॉकडाऊन मागे घेण्याचे सांख्यिकीय निकष काय असतील ? किंवा हॉस्पिटल्सची (किंवा आयसीयू वा व्हेंटिलेटर) संख्या किंवा हॉस्पिटल्सची संख्या व रुग्णांची संख्या याचे काही गुणोत्तर. अगदी काहीही निकष असतील तरी ते इथे सांगता येतील का ? कोणते निकष चूक की बरोबर वगैरे मी म्हणत नाहीये. पण निकष काय होते/ आहेत याची उत्सुकता आहे. जसे एखादा पाण्याचा वॉल्व चालू करण्याचे साधे निकष असतात की टाकीतील पाणी अमू़क इतक्या पातळी पर्यंत खाली आले की वॉल्व चालू करावा व अमूक इतक्या पातळी पर्यंत वर चढले की वॉल्व बंद करावा.
↩ प्रतिसाद: चौकस२१२

हा प्रतिसाद चौकस२१२ यांना

मराठी कथालेखक
Tue, 05/19/2020 - 17:43 नवीन
हा प्रतिसाद चौकस२१२ यांना होता.
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

गणितातले सरळ सोडवता येणारे

चौकस२१२
Tue, 05/19/2020 - 18:26 नवीन
तुम्ही विचारता तसे हे सरळ सोडवता येणारे गणित नाहीये आणि मी हि काही संख्याशास्त्राण्या किंवा सांसर्गिक रोग तद्न्य नाही ( आणि तुम्ही पण नसावे ) निकष बंद करण्याचा: हा होता कि ( येथील अनुभवावरून सांगतो) - रोग परदेशातून येतोय ते प्रवासाची आधी बंद करा .. वाट पाहू नका - वैद्यकीय तज्ज्ञ (स्थानिक आणि इतर देशात) काय तातडीचे संशोधन करीत आहेत आणि आधीचं अनुभवावरून याचाच फैलाव कास होऊ शातो यासाठी विचारांची देवन घेवाण - वयस्कर लोकांनावर जास्त बंधन आधी हि व्यदकीय माहिती त्यामुळं;शाळेचं आधी वृद्धाश्रम आधी बंद - सर्वत वाईट काय होईल आणि त्यास्तही किती तयारी करीत येईल याचा अंदाज असे टप्पे घेत गेले सरकार.. आता यात अजून काय निकष असतील ते सरकार दरबारी विचाले तरच काळातील.. आणि काय उत्तर देणार या तुमचं प्रश्नाला ? जे दिसतंय ते असे कि निर्बंध काम करीत आहेत, आणि करताना पोटाला चिंता घाव्या लागतोय.. २) निर्बंध उठवणायचे : वरील चाय उलटे.. आता बघू दुर्दवाने भारतात टोकाला जय्च्चच या वृत्ती मुले एक गट असा कि २१ दिवस झाले कि सगळे जादूने २२ वय दिवशी सुरळीत असे मानणारा आणि दुसरा गट १ दिवस तरी बंधन कशाला.. मग सोसा
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

लॉकडाऊनचे निकष ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/19/2020 - 10:19 नवीन
१) लॉकडाऊन करण्याचे निकष काय होते ? ऑ... लॉकडाऊनला काही निकष होते ? काहीही निकष नव्हते. भाईयो और बहनो, आज रात बारां बजह से सब बंद रहेगा. काहीही आगा न पीछा. चैन तोड़ायची होती म्हणे. च्यायला, त्या पेक्षा मेणबत्त्या आणि थाळीचा टास्क मनोरंजन म्हणून मस्त होता, लोकांनी वराती काढून त्यात नाविन्य तरी आणले होते. २)लॉक डाउन मागे घेण्याचे निकष काय होते / असतील. ऑ.. लॉकडाऊनमुळे जे धुपाटणे हाती आले आहे त्यामुळे त्यांनाही अजुन समजलेले नाही की करावे तरी नेमके काय करावे. आता आम्हाला कोरोना बरोबर जगायला शिकायचं आहे, हे त्याचं उत्तर. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

लॉकडाऊनला काही निकष होते ?

मराठी कथालेखक
Tue, 05/19/2020 - 17:19 नवीन
लॉकडाऊनला काही निकष होते ? काहीही निकष नव्हते.
माझे मतही असेच आहे, पण तरी दुसरी बाजूही ऐकावी म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न विचारुन बघितला आहे.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा