मसाया - Messiah

Primary tabs

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in जनातलं, मनातलं
11 May 2020 - 2:04 pm

जगभरातील धर्म पाहिले तर त्यात एक सामायिक बाब दिसून येते, ती म्हणजे प्रत्येक धर्मात असणारे अवतार, प्रेषित, देवदूत किंवा संदेशवाहक !
हे अवतार , प्रेषित यांनी लोककल्याणासाठी जन्म घेतला आणि धर्माचा प्रसार केला असे त्यांचे अनुयायी मानतात. अजुन एक कॉमन गोष्ट की हे अवतर, प्रेषित यांनी चमत्कार केलेत आणि ते पुन्हा जन्म घेतील यावर त्यांच्या अनुयायांचा ठाम विश्वास असतो.

आजच्या युगात जर कोणीएक मनुष्य पुढे आला आणि अविश्वसनीय कामे केली, लोकांनी त्याला मसीहा मानायला सुरुवात केली तर काय ? या कथासूत्राभोवती "मसाया" ही मालिका फिरते.

सिरियामधील दमास्कस मधे इसिस हल्ला करणार असते, सगळे शरणार्थी पळून जात असताना एक प्रीस्ट सारखा गृहस्थ उभा असतो, लोकांना धीर देत असतो , हे संकट जाणार अशी आशा करत असतो आणि त्याच वेळी वाळूचे वादळ येते आणि लोक हल्ल्यातून वाचतात.या घटनेमुळे लोक याला "मसाया" ( मसिहा!) मानू लागतात आणि त्याचे फोलॉअर्सची संख्या वाढू लागते सर्वांना तो शांतता आणि प्रेमाचा संदेश देतो आणि त्यांना घेउन थेट इस्राईलच्या सीमेवर जातो ! याने राजकीय पेचप्रसंग तयार होतो आणि मसाया ला अटक होते,

इस्रायली सैन्यातील सैनिक अवीराम (टोमेर सिस्ली) याच्याकडून चौकशी केली आहे. संदेष्ट्याला त्याच्या चौकशी करताना मसाया अविरामला त्याच्या भूतकाळाबद्दल सांगतो याचा परिणाम म्हणून, अविराम त्यांच्या मुलाखतीची टेप हटवितो. त्याच रात्री एवढी सुरक्षा, सीसीटीव्ही असताना मसाया रहस्यमय रीत्या गायब होतो आणि एका पवित्र ठिकाणि प्रकट होतो , तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमोर अशा घटना घड्तात कि त्यांचा मसाया हा अवतार आहे यावर विश्वास बसतो, कित्येक जणांनी हे सर्व मोबाइल , कॅमेरा मध्ये रेकोर्ड केल्याने मसाया जगभर प्रसिद्ध होतो.

CIA ची टीम या प्रकरणी इस्राईल पोलिसांना मदत करत असताना अचानक मसाया अमेरिकेत एका वादळात प्रकट होउन एका ख्रिश्चन फॅमिलिची मदत करतो.
CIA ला खात्री असते कि यामागे काही षडयंत्र आहे, आणि CIA मसाया चा भूतकाळ खणू लगते आणि दिवसेंदिवस अमेरिकेत मसायाची लोकप्रियता वाढत जाते. ,CIA च्या हाती काय लागते ? पुढे काय होते हे सीरीज मध्ये पाहणे रन्जक असेल.

मसाया धार्मिक आणि नास्तिक दोन्ही विचारधांरासाठी प्रश्न निर्माण करतो?
जर प्रेषित आला तर आपण तयार आहोत का ? नास्तिक असाल तर मग समोर घडणार्‍या घटनेची तर्क संगती कशी लागेल ?
एखादा नवीन धर्मतत्वे घेउन कोणी आले तर आपण त्यांना स्विकारु शकतो का ?

ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्स वर पाहू शकता , १० भागांच्या मालिकेचा पहिला सीझन उपलब्ध आहे.

जगभरातून या मालिकेला धार्मिक विरोध आणि टीका झेलावी लागली त्यामुळे याच्या दुसर्‍या सीझनचे भवितव्य अजून निश्चित नाही.

कलामाध्यमवेधलेखशिफारस

प्रतिक्रिया

संन्यस्त खड्ग's picture

11 May 2020 - 9:49 pm | संन्यस्त खड्ग

एका निराळा विशयावरील मालिकेचि ओळख करुन दिल्याबद्दल आभार मुनिवर ....

नक्किच पाहिली जाइल

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

11 May 2020 - 9:52 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

m

जव्हेरगंज's picture

11 May 2020 - 10:23 pm | जव्हेरगंज

पहिले एक दोन भाग बघितले होते. तितकीपण काही खास वाटली नव्हती.

mrcoolguynice's picture

12 May 2020 - 12:29 am | mrcoolguynice

Any Messiah coming forward ? For Covid vaccine ?
Or Messiah waiting now, for modern science to invent vaccine?
So afterwards Messiah can say, "Arrey isaka upaay to hamaare, Vedo me sadiyo pahale se likha hua hai... "

स्नेहांकिता's picture

12 May 2020 - 9:51 am | स्नेहांकिता

अजूनही लोकांना अशा कल्पनांमध्ये रस वाटतो याचा अर्थ आस्तिकता वाढतेय असा घ्यायचा का ?

टवाळ कार्टा's picture

12 May 2020 - 8:28 pm | टवाळ कार्टा

काही काही वेळा थोडा रेंगाळल्यासारखे वाटते पण अख्खी सिरीज मस्तय, बघताना आपण सगळे कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकत असतो, शेवटचा सीन मस्त केलाय

माझीही शॅम्पेन's picture

13 May 2020 - 12:52 pm | माझीही शॅम्पेन

मुनीवर तुम्ही सांगताय म्हणून एक दोन एपिसोड पहिले जातील , ह्या निमित्ताने लेखन सन्यास संपवला हे हि नसे थोडके :)

मोहनराव's picture

13 May 2020 - 12:57 pm | मोहनराव

वॉचींग लिस्ट मधे टाकले आहे. धन्यवाद!

प्रचेतस's picture

13 May 2020 - 1:43 pm | प्रचेतस

नेटफ्लिक्स परवडत नसल्याने बहुतांशी सिरीयल पाहिल्या जात नाहीत, मात्र कधी घेतलं तर जरूर बघेन.

मालिका बघण्यासाठी पैसे मोजावे लागतात ? भारतात ? कसे शक्य आहे ?

प्रचेतस's picture

13 May 2020 - 8:44 pm | प्रचेतस

:)
टोरेंटचा मार्ग आहेच पण आताशा स्ट्रिमिंगची इतकी सवय झालीय की डाउनलोड करून ते हार्डडिस्कमध्ये टाकून ती हार्ड डिस्क टीव्हीला जोडून बघण्याइतकाही उत्साह राहात नाही.
शिवाय काही काही फॉर्मेट टीव्हीवर चालत नाहीत ते लॅपटॉप/मोबाईलवर बघायला नकोसे वाटते.
शिवाय आधीच प्राईम, हॉटस्टार सबस्क्राइब केले असल्याने आहे तेच पुरेसे होते :)

धर्मराजमुटके's picture

14 May 2020 - 9:17 pm | धर्मराजमुटके

आपण इथे लिहिल्यामुळे उत्सुकतेपोटी ही मालिका पाहिली. शक्यतो मी वेब सिरिज पाहायच्या टाळतो कारण त्यात खुपच हिंसाचार, अश्लील दृष्ये आणि अभद्र भाषेचा उपयोग केलेला असतो. मात्र ही मालिका त्याला अपवाद ठरली. एक चांगली सुचवणी केल्याबद्द्ल आपले आभार.
अशाच प्रकारच्या मालिका कोणी बघीतल्या असतील तर इथे नक्कीच त्याबद्द्ल लिहा !

mrcoolguynice's picture

17 May 2020 - 12:39 pm | mrcoolguynice

"PataalLok"

Review plz.