मसाया - Messiah
जगभरातील धर्म पाहिले तर त्यात एक सामायिक बाब दिसून येते, ती म्हणजे प्रत्येक धर्मात असणारे अवतार, प्रेषित, देवदूत किंवा संदेशवाहक !
हे अवतार , प्रेषित यांनी लोककल्याणासाठी जन्म घेतला आणि धर्माचा प्रसार केला असे त्यांचे अनुयायी मानतात. अजुन एक कॉमन गोष्ट की हे अवतर, प्रेषित यांनी चमत्कार केलेत आणि ते पुन्हा जन्म घेतील यावर त्यांच्या अनुयायांचा ठाम विश्वास असतो.
आजच्या युगात जर कोणीएक मनुष्य पुढे आला आणि अविश्वसनीय कामे केली, लोकांनी त्याला मसीहा मानायला सुरुवात केली तर काय ? या कथासूत्राभोवती "मसाया" ही मालिका फिरते.
सिरियामधील दमास्कस मधे इसिस हल्ला करणार असते, सगळे शरणार्थी पळून जात असताना एक प्रीस्ट सारखा गृहस्थ उभा असतो, लोकांना धीर देत असतो , हे संकट जाणार अशी आशा करत असतो आणि त्याच वेळी वाळूचे वादळ येते आणि लोक हल्ल्यातून वाचतात.या घटनेमुळे लोक याला "मसाया" ( मसिहा!) मानू लागतात आणि त्याचे फोलॉअर्सची संख्या वाढू लागते सर्वांना तो शांतता आणि प्रेमाचा संदेश देतो आणि त्यांना घेउन थेट इस्राईलच्या सीमेवर जातो ! याने राजकीय पेचप्रसंग तयार होतो आणि मसाया ला अटक होते,
इस्रायली सैन्यातील सैनिक अवीराम (टोमेर सिस्ली) याच्याकडून चौकशी केली आहे. संदेष्ट्याला त्याच्या चौकशी करताना मसाया अविरामला त्याच्या भूतकाळाबद्दल सांगतो याचा परिणाम म्हणून, अविराम त्यांच्या मुलाखतीची टेप हटवितो. त्याच रात्री एवढी सुरक्षा, सीसीटीव्ही असताना मसाया रहस्यमय रीत्या गायब होतो आणि एका पवित्र ठिकाणि प्रकट होतो , तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांसमोर अशा घटना घड्तात कि त्यांचा मसाया हा अवतार आहे यावर विश्वास बसतो, कित्येक जणांनी हे सर्व मोबाइल , कॅमेरा मध्ये रेकोर्ड केल्याने मसाया जगभर प्रसिद्ध होतो.
CIA ची टीम या प्रकरणी इस्राईल पोलिसांना मदत करत असताना अचानक मसाया अमेरिकेत एका वादळात प्रकट होउन एका ख्रिश्चन फॅमिलिची मदत करतो.
CIA ला खात्री असते कि यामागे काही षडयंत्र आहे, आणि CIA मसाया चा भूतकाळ खणू लगते आणि दिवसेंदिवस अमेरिकेत मसायाची लोकप्रियता वाढत जाते. ,CIA च्या हाती काय लागते ? पुढे काय होते हे सीरीज मध्ये पाहणे रन्जक असेल.
मसाया धार्मिक आणि नास्तिक दोन्ही विचारधांरासाठी प्रश्न निर्माण करतो?
जर प्रेषित आला तर आपण तयार आहोत का ? नास्तिक असाल तर मग समोर घडणार्या घटनेची तर्क संगती कशी लागेल ?
एखादा नवीन धर्मतत्वे घेउन कोणी आले तर आपण त्यांना स्विकारु शकतो का ?
ही मालिका तुम्ही नेटफ्लिक्स वर पाहू शकता , १० भागांच्या मालिकेचा पहिला सीझन उपलब्ध आहे.
जगभरातून या मालिकेला धार्मिक विरोध आणि टीका झेलावी लागली त्यामुळे याच्या दुसर्या सीझनचे भवितव्य अजून निश्चित नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यु
(No subject)
पहिले एक दोन भाग बघितले होते.
Any Messiah coming forward ?
रोचक !
काही काही वेळा थोडा
मुनीवर तुम्ही सांगताय म्हणून
वॉचींग लिस्ट मधे टाकले आहे.
नेटफ्लिक्स परवडत नसल्याने
नेटफ्लिक्स परवडत नसल्याने बहुतांशी सिरीयल पाहिल्या जात नाहीत
:)
धन्यवाद !
"PataalLok" Review plz.