कशापायी रामराव करता घाई?
नका लावू पासपोर्ट काढायला....
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
सण वर्साचा झाला दिवाळी
भरगच्च फराळ अन् जेवनबी भारी
एकसो-बीसची खुमारीच न्यारी
एकसो-बीसची खुमारीच न्यारी...
तात्या बघे पिचकारी मारायला हो....
येऊ तशी कशी मी फारिनला?
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
गाव हाय तुमचा बत्तीस कोसं
गाडीविना बाजारात जायाचं कसं
हायवेवरनं चालन्याचा त्रास...
हायवेवरनं चालन्याचा त्रास...
होंडा गेली टायर सांधायला हो...
येऊ तशी कशी मी फारीनला?
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
प्राजुताई राहिल्या हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
नाही विचारलं टारजूभावा...
नाही विचारलं टारजूभावा...
नाना गेला "रावण" मारायला हो.....
येऊ तशी कशी मी फारीनला?
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
रामराव तुमचा सोडा हेका
गावात चाकर्या काय कमी हैत का?
तुमीच सांगा, हे बरं हाय का?
तुमीच सांगा हे बरं हाय का?
अवो, पिडांकाका लागले स्फुंदायला हो...
पिडांकाका लागले स्फुंदायला....
येऊ तशी कशी मी फारीनला? येऊ तशी कशी मी फारीनला?
[आमचे रामराव (तुमचे राम दादा!!) यांणि परदेशात नोकरी करण्याच्या विच्छेला दिल्यालं माझं उत्तार......त्यांची, पिवळी शेवंता!]
प्रतिक्रिया
16 Nov 2008 - 11:19 pm | कपिल काळे
राम चा तो लेख वाचून माझी ही झाली होती. पिडांनी योग्य शब्दांत वर्णन केले आहे.
एकलेचपणा
संपेलच आता
जाइन भारतां
माझ्या गावां
अमेरिका वारी
कसले जीवन
असले मरण
पैशांपोटीं
असे म्हणावेसे वाटत आहे
http://kalekapil.blogspot.com/
16 Nov 2008 - 11:20 pm | टारझन
आपल्या प्रतिभेला आपला खुला सलाम आहे, मी चक्क आहे त्याच चालीत हे गाणं म्हणू शकलो ...
आमचं नाव वाचूनपण आलंद झाहला...
- (पिवळा शेवगा) टारजुभाव
16 Nov 2008 - 11:23 pm | ऋषिकेश
अई भारी!
बाकी
=)) =))
भहन्नाहाट!!!!!!
-( =)) ) ऋषिकेश
16 Nov 2008 - 11:24 pm | चतुरंग
एकदम ज ह ब ह र्या हा!!
रविवार सार्थकी लागला म्हणायचा! ;)
चतुरंग
16 Nov 2008 - 11:29 pm | रेवती
विडंबन आवडलं.
आमची मैत्रिण प्राजु व आमचा पुतण्या टारूचं नाव बघून आनंद जाहला.
रेवती
17 Nov 2008 - 12:55 am | अभिज्ञ
पिडा काका,
लै भारि.
वेंट्रीलाच पैका वसूल.
:)
अभिज्ञ.
17 Nov 2008 - 12:57 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
लै जबर्या.
अवांतरः एखादी फेटा उडवायची स्मायली नाही का हो?
बिपिन कार्यकर्ते
17 Nov 2008 - 1:01 am | छोटा डॉन
अक्षरश: ठ्ठो SSS ठ्ठोSSS ठ्ठोSSS हसलो बॉ ...
असे जबरदस्त प्रासंगिक विडंबन सादर करणार्या डांबिसकाकांच्या प्रतिभेला सलाम ...
_/\_
बाकी बिपीनभौ म्हण्तात तसे "फेटा उडवायची स्मायली नाही का रे नीलकांत ? "
सिंप्ली, डांबिसकाका यु मेड माय डे !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
17 Nov 2008 - 2:08 am | नंदन
डॉन्याशी सहमत आहे. कविता-स्फुंदन आवडले :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Nov 2008 - 9:38 am | मनिष
माझाही साष्टांग नमस्कार
_/\_
17 Nov 2008 - 8:52 am | सहज
एखादी फेटा उडवायची स्मायली पाहीजेच पाहीजे!!!
:-)
17 Nov 2008 - 10:27 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो ! डांबिसखान बहोत अच्छे !
17 Nov 2008 - 2:52 am | प्राजु
धिस इज वॉट आय कॉल डांबिसकाका...!!
बर्याचदिवसांनी लेखणीची बॅट एकदम धुवाधार रन्स काढून गेली आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Nov 2008 - 6:58 am | घाटावरचे भट
आतषबाजी!!!!!!!!! =))
17 Nov 2008 - 8:29 am | अनिल हटेला
:)) =)) :)) =))
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
17 Nov 2008 - 9:05 am | विसोबा खेचर
एकसो-बीसची खुमारीच न्यारी
एकसो-बीसची खुमारीच न्यारी...
तात्या बघे पिचकारी मारायला हो....
येऊ तशी कशी मी फारिनला?
मस्त! :)
बाकी साला काय पण म्हणा, १२० पान खाऊन भररस्त्यात पचाऽऽकन थुंकण्याची मजाच निराळी! :)
तात्या.
17 Nov 2008 - 10:24 am | वेताळ
=)) <:P
वेताळ
17 Nov 2008 - 10:39 am | विनायक प्रभू
काय डांबिस आहात हो तुम्ही.
17 Nov 2008 - 10:42 am | अवलिया
खि खि खि
लय भारी हो काका...
च्यामायला पण काहि म्हणा... आमची लावणीच लय भारी
नाना
विचरतु मतिरेषा निर्विकल्पे समाधौ ।
कुचकलशयुगे वा कृष्ण सारे क्षणानाम ॥
चरतु जडमते ना सज्जनानां ना मते वा ।
मतिकृत गुणदोषा मां विभुं न स्पृशान्ति॥
17 Nov 2008 - 12:37 pm | स्वाती दिनेश
भन्नाट प्रासंगिक विडबंन..
सुलेशबाबू,बहोत बढिया!
स्वाती
18 Nov 2008 - 7:17 am | राम दादा
लईच भारी जमलय..म्हंजी बाण सही निशाने पर लगाया है...
हासुन हासुन पार हापिसात बोंब झाली..का हसतोय कुणालाच समजत नव्हतेच्...पण आयटी केबीनमध्ये सहसा कोण डोकावत नाही.नाय तर लावणी म्हणायची वेळ आली आसती..
राम दादा..
18 Nov 2008 - 9:10 am | पिवळा डांबिस
रागावला नाहीत ना!
मला वाटलं आपण रागावतां की काय!!!!
आपला नम्र,
पिवळा डाबिस
18 Nov 2008 - 9:15 am | सर्किट (not verified)
च्यामारी, कुणी आपल्या लेखनामुळे रागवेल का ह्याची काळजी करायला लागलात ?
कसं चालायचं तुमचं ह्या मिपांवर काका ?
-- (बिन्दास पुतण्या) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
18 Nov 2008 - 10:05 am | पिवळा डांबिस
आवो आपल्या जुन्या मेबरांच्यासाठी आसं विचारन्याची गरज नाय हे मलाबी म्हाईत हाये!!
पन नव्या मेंबरांसाठी इचारावं लागतय.....
बाकी तुमच्या धैर्याची आमी दाद देलो!! आमच्या **त अजून इतका दम आला न्हाय म्हणाना!!!:)
तुमच्या पावलावर पाऊल टाकन्याची महत्वाकांक्षा बाळगनारा,
पिवळा डांबिस
18 Nov 2008 - 10:22 pm | राम दादा
आपल्याला राग बिलकुल नाय आला ब्वा....उलट रचना आवडली...खुप खुप हसलो...हसवल्याबद्दल धन्यवाद..
शेवटी हसण्याने माणसाचे आयुष्य वाढते ..असेच आम्हाला हसवत रहा...
आपला
राम दादा....