कशापायी रामराव करता घाई?
नका लावू पासपोर्ट काढायला....
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
सण वर्साचा झाला दिवाळी
भरगच्च फराळ अन् जेवनबी भारी
एकसो-बीसची खुमारीच न्यारी
एकसो-बीसची खुमारीच न्यारी...
तात्या बघे पिचकारी मारायला हो....
येऊ तशी कशी मी फारिनला?
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
गाव हाय तुमचा बत्तीस कोसं
गाडीविना बाजारात जायाचं कसं
हायवेवरनं चालन्याचा त्रास...
हायवेवरनं चालन्याचा त्रास...
होंडा गेली टायर सांधायला हो...
येऊ तशी कशी मी फारीनला?
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
प्राजुताई राहिल्या हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
नाही विचारलं टारजूभावा...
नाही विचारलं टारजूभावा...
नाना गेला "रावण" मारायला हो.....
येऊ तशी कशी मी फारीनला?
येऊ तशी कशी मी फारीनला हो...येऊ तशी कशी मी फारीनला?
रामराव तुमचा सोडा हेका
गावात चाकर्या काय कमी हैत का?
तुमीच सांगा, हे बरं हाय का?
तुमीच सांगा हे बरं हाय का?
अवो, पिडांकाका लागले स्फुंदायला हो...
पिडांकाका लागले स्फुंदायला....
येऊ तशी कशी मी फारीनला? येऊ तशी कशी मी फारीनला?
[आमचे रामराव (तुमचे राम दादा!!) यांणि परदेशात नोकरी करण्याच्या विच्छेला दिल्यालं माझं उत्तार......त्यांची, पिवळी शेवंता!]
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8522
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशीच अवस्था
साष्टांग णमस्कार्स
हा हा हा हा
पिवळ्या डांबीसा खल्लास प्रासंगिक विडंबन!!
आवडलं.
लै भारि.
ठ्ठो....
असेच म्हणतो ...
In reply to ठ्ठो.... by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच म्हणतो....
In reply to असेच म्हणतो ... by छोटा डॉन
+१
In reply to ठ्ठो.... by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +१ by सहज
हाहाहा.
झकास
) ) बैलोबा
एकसो-बीसची
झक्कास आहे
डांबिस
खि खि खि लय
भन्नाट..
आयला आपण तर आचाट पडलो भाऊ...
थँक्यू!!
In reply to आयला आपण तर आचाट पडलो भाऊ... by राम दादा
काळजी
In reply to थँक्यू!! by पिवळा डांबिस
अवो नाय! तसं नाय!!
In reply to काळजी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
डांबिसराव...
In reply to थँक्यू!! by पिवळा डांबिस