कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा ।
श्री गणपती देवी पार्वती महादेव
वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा।
सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक
भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा ।
आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।
विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा।
राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा।
जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।।
सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात।
स्वदेशीमाता भाषालिपी देवता संस्कृती सार्वभौमतेचा ठेऊया मान। वन्देमातरम म्हणुनीया पागानकाफीरद्वेषाचा पुरलासे अन्त। जयदेव।।२।।
उडुंबरदेवांचे दर्शनीहा उभा ठाकला। साष्टांगे नमन प्रणिपात केला।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला। समस्तसृष्टीसदेवा मंगल आरतीने ओवाळीला। जयदेव।।३।।
दत्त दत्त ऐसें सेवेलागलें येशुध्यान। हरपले मन झालें उन्मन।
मी तुं पणाची झाली बोळवण। ख्रिसमसट्री वटवृक्ष उंबरदेव एकचीम्हणे श्री ब्रह्मज्ञान। जयदेव।।४।।
प्रतिक्रिया
18 Dec 2019 - 10:09 am | श्वेता२४
प्रयत्न केला पण मला जमलं नाही :( श्री ख्रिसमसट्री देवा रागवू नको बा;)
18 Dec 2019 - 11:21 am | माहितगार
सुप्रभात आणि नमस्कार
खरय वृत्ते छन्द चाल इत्यादी अस्मादिकांचा प्रांत नव्हे, :( मी केवळ मतितार्थाची काळजी घेउ शकतो इतर कुणास यात सुयोग्य सुधारणा करता आल्यास स्वागतच असेल. मनमोकळ्या अभिप्रायासाठी अनेक आभार.
__/\__
18 Dec 2019 - 4:40 pm | जालिम लोशन
बााऊन्सर गेला
18 Dec 2019 - 7:18 pm | माहितगार
__/\__