(विरह - एक वेगळा दृष्टीकोन X शब्दकथा) -
पेरणा
रात्रीचे तीन वाजले होते, त्याच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती.
बायकोची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला....., अजून का बरे फोन नाही आला?
नक्कीच फ्लाईट डिले असणार.... कारण आपली बायको आपल्यावर किती जास्त प्रेम करते हे त्याला माहीत होते.
किती काळजी करतो आपण? काही नाही येईल नक्की फोन..... त्याने स्वतःलाच समजावले.
विचार करत करत किती वेळ गेला त्यालाही कळले नाही.
अचानक 4 वाजता अलार्म वाजू लागला.
बेडवरून उजव्या साईडला तो वळाला,
तेवढ्यात शेजारी त्याला घट्ट मिठी मारुन झोपलेली ती अचानक उठून बसली
आणि फ्रॉक वर करुन घाईघाईने चड्डी काढत काढत त्याला म्हणाली-
.
.
.
.
बाबा लवकर उठ घाईची शी लागलीय.
पैजारबुवा,वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
__/\__
हा हा हा निव्वळ अप्रतिम
हा नवरा नक्की आयटीतल्या