✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?

ह
हस्तर यांनी
Tue, 11/12/2019 - 19:17  ·  लेख
लेख
बघा मुद्दे पटले तर १) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती २) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच ३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच ४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच , परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५ ५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
51418 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

अमलबजावणी वेळ संपल्यावरच.

कंजूस
Tue, 11/12/2019 - 19:26 नवीन
अमलबजावणी वेळ संपल्यावरच. लेखी दिली आहे ना मुदत.
  • Log in or register to post comments

कोणाला ?

हस्तर
Tue, 11/12/2019 - 19:28 नवीन
कोणाला ? झालि पन राजवट सुरु
  • Log in or register to post comments

Give a dog bad name before

सुबोध खरे
Tue, 11/12/2019 - 19:34 नवीन
Give a dog bad name before you hang him या उक्तीप्रमाणे राज्यपाल आजच काय उद्या रात्री साडे आठ पर्यंत थांबले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसला काही आमदारांच्या सह्यांचे पत्र आणता आले नसते. कारण काँग्रेसला शिवसेनेबरोबर जायचेच नाही त्यामुळे त्यांनी हे गुऱ्हाळ अजून दोन दिवस चालवले असते मग शांतपणे राष्ट्रपती राजवट लावली असती तर पक्षपाताचा आरोप झाला नसता. आता त्यांना आरडा ओरडा करण्याची भरपूर संधी मिळाली आहे. अर्थात श्री मोदी किंवा श्री फडणवीस याना अशा बोम्ब मारल्याने काहीही फरक पडत नाही हे गेल्या ५ वर्षात दिसले आहेच. पाहू या पुढे काय होतंय ते.
  • Log in or register to post comments

दर रोज नविन गुग्ली

हस्तर
Tue, 11/12/2019 - 19:43 नवीन
दर रोज नविन गुग्ली
  • Log in or register to post comments

चुकीच्या पद्धतीने राष्ट्रपती राजवट

Rajesh188
Tue, 11/12/2019 - 20:23 नवीन
फक्त आणि फक्त युद्ध काळात किंवा राज्य सरकार राज्य घटने प्रमाणे चालत असेल(राज्यातील लोकांचे हित जपणे हे घटने विरूद्ध नाही) तरच राष्ट्रपती राजवट शेवटचा उपाय म्हणून लागू करने हे घटनाकरणा सुधा अपेक्षित होते . राज्यावर वर राज्यातील लोकांना सत्तेबाहेर ठेवून केंद्राची राजवट लादणे चुकीचे आहे कोर्टाने ताबोडतोप केंद्र चा निर्णय रद्द करावा . 356 कलम घटने मधून हटवण्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांनी आग्रह धरला पाहिजे . नाहीतर दुसरा पर्याय निर्माण करावा . जे निवडून आले आहेत त्या सर्व पक्षातील 1 व्यक्ती निवडून त्यांनी राज्याचा कारभार चालवावा . केंद्राची लुडबुड देश बंधुत्व ला धोकादायक ठरू शकते
  • Log in or register to post comments

चूक दुरुस्ती

Rajesh188
Tue, 11/12/2019 - 20:24 नवीन
राज्य घटने प्रमाणे चालत नसेल असे वाचावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

राष्ट्रपती राजवट आली असली तरी

सुबोध खरे
Tue, 11/12/2019 - 20:32 नवीन
राष्ट्रपती राजवट आली असली तरी चार दिवसांनी शिवसेनेने किंवा काँग्रेस किंवा कोणत्याही पक्षाने आपल्याला १४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचे लेखी पत्र दिले तर त्यांना परत सरकारात सत्ता स्थापन करता येते. कलम ३५६ काढून टाकले आणि "तामिळनाडूने उद्या आम्ही लिट्टे बरोबर एकत्र होऊन वेगळा तामिळ प्रदेश स्थापन करतो" असे म्हटले किंवा "नागा प्रदेशच्या किंवा काश्मीरच्या लोकनियुक्त सरकारने आम्ही भारतापासून फुटून स्वतंत्र होतो" असे म्हटले तर केंद्र सरकार काय करू शकेल? Under Article 356 of the Constitution of India, in the event that a state government is unable to function according to constitutional provisions, the Central government can take direct control of the state machinery महाराष्ट्रासारख्या देशातील सर्वात शांत प्रदेशात राहून असे लिहिणे सोपे आहे. तेंव्हा एकांगी लिहू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

महाराष्ट्र सारख्या राज्यात

Rajesh188
Tue, 11/12/2019 - 20:44 नवीन
महाराष्ट्र सारख्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई ही विशिष्ट हेतूने केली आहे राज्यपाल हा निःपक्ष असावा जो पर्यंत पदावर आहे. स्व स्वार्थासाठी केंद्रात सत्तेवर असणारे राज्यांच्या हिताला तिलांजली देतील तर लोक असाच विचार करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

१४५ उभे करून

चौकस२१२
Wed, 11/13/2019 - 05:56 नवीन
उगाच राज्यपालांना बळीचा बकरा करताय.. अजूनही बहुतेक तांत्रिक दृष्ट्या कोण्ही १४५ उभे करून सत्ता स्थापनेचा दावा करू शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

356 कलम घटने मधून हटवण्यासाठी

सुबोध खरे
Wed, 11/13/2019 - 09:13 नवीन
356 कलम घटने मधून हटवण्यासाठी सर्वच प्रादेशिक पक्षांनी आग्रह धरला पाहिजे . याचा आणि आता तुम्ही करत असलेल्या सारवा सारवीचा कुठे संबंध आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

देश महत्वाचा

चौकस२१२
Wed, 11/13/2019 - 06:01 नवीन
केंद्राची लुडबुड देश बंधुत्व ला धोकादायक ठरू शकते! काय? देश महत्वाचा मग राज्य.. (अर्थात अन्याय होऊ नये हे खरे) पण भारत्तात तरी घटनात्मक द्रिष्टया देश आधी बनला आणि मग राज्य अमेरिके किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या आधी राज्यसदृश्य "कॉलनी " आणि त्यांचे फेडेरेशन झाले असे भारतात झाले नाही . किंवा युनाइटेड किंग्डम मध्ये स्कॉटलंड / इंग्लंड. इत्यादी आहेत तसेही भारतात नाही उगाच हा राज्य/ देश वाद कशाला ? साहेब तुंहाला खरा राग कसला आलाय? राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ला सत्ता स्थापित आली नाही याचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

राष्ट्रपती हेच

Rajesh188
Tue, 11/12/2019 - 20:34 नवीन
राष्ट्रपती हेच भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतील असे एकदाचे जाहीर करा. त्या पदाला सुद्धा वजन येईल आणि लोकशाही चे जे धिंडवडे निघत आहेत ते सुद्धा निघणार नाहीत
  • Log in or register to post comments

राष्ट्रपती हेच भारतातील सर्व

सुबोध खरे
Wed, 11/13/2019 - 09:18 नवीन
राष्ट्रपती हेच भारतातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतील असे एकदाचे जाहीर करा. राष्ट्रपती हे सर्व देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत तेंव्हा राज्याचे आपोआप होतातच. पंतप्रधान, सरन्यायाधीश, लष्करप्रमुख या सर्वाना राष्ट्र्पतीच शपथ देतात अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा राज्यपाल शपथ देतात ती सुद्धा राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणूनच. ते अगोदरच घटनाकारांनी जाहीर केलेले आहे. प्रतिसाद देण्याच्या अगोदर आपला पूर्वग्रह बाजूला ठेवा आणि नीट अभ्यास करून प्रतिसाद द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

राष्ट्रपती राजवट

Rajesh188
Wed, 11/13/2019 - 20:34 नवीन
राष्ट्रपती राजवट हा पर्याय अत्यंत कठीण प्रसंगी च वापरला जावा. आणि घटनेत 356 कलमाचा उल्लेख आहे म्हणून ते कलम वापरणे योग्य नाही आणि मला वैयक्तिक रित्या ते बिलकुल पटत नाही. राष्ट्रपती हा देशाच्या प्रमुख असतो हे मान्य आहे. पण ती एक तांत्रिक बाब आहे. लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी चा सरकार चालवण्यात सहभाग असणे खूप गरजेचं आहे.कारण ते लोकांचे प्रतिनिधित्व करतात आणि जनतेला बांधील असतात. राष्ट्रपती राजवटी मध्ये प्रशासन राज्य चालवते आणि ते जनतेला बांधील नसते. लोकांच्या समस्या समजून घेवून सरकार दरबारी मांडणे,स्थानिक विकासाच्या योजना सरकार ल सादर करून ती काम करून घेणे. आणि लोकांच्या समस्या ऐकणे हे सरकार स्थापन झाल्यावर घडते.. राष्ट्रपती राजवट ही यंत्र सारखी चालते . महानगर पालिका पासून नगर पंचायत पर्यंत आणि जिल्हा परिषद पासून ग्राम पंचायती पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्या मागे लोकांच्या लहान समूहाचा सुद्धा निर्णय प्रक्रियेत सहभाग असावा हा हेतू आहे. लोकांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग च नसेल तर तो देश ते राज्य आपले आहे ही भावना जोर धरत नाही. म्हणूनच स्थानिक भाषेत राज्य कारभार चालविला जातो जेणेकरून राज्यकर्ते आपले आहेत राज्य आपले आहे असे लोकांना वाटेल . राष्ट्रपती राजवट लोकशाही chya मुळावरच घाव घालते.. सरकार स्थापन करणे कठीण होत असेल तर फेर निवडणुका हाच योग्य पर्याय आहे . राष्ट्रपती राजवट हा पर्याय असूच शकत नाही ..निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जास्तीतजास्त 2 ते महिने च राष्ट्रपती राजवट कठीण प्रसंगी असावी त्या पेक्षा जास्त काळ बिलकुल नसावी . घटनेत तरतूद असली तरी. आणि हेच dr बाबासाहेब आंबेडकर ना वाटत होते . 356 कलमाचा गैरवापर करू नका . कारण लोकशाही ला ते हानिकारक आहे. हे माझे मत मला नाही वाटत चुकीचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राष्ट्रपती राजवट हा पर्याय

सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 09:58 नवीन
राष्ट्रपती राजवट हा पर्याय असूच शकत नाही परत साफ चूक राष्ट्रपती राजवट हा एक तात्पुरताच आणि एक पर्याय आहे हे लक्षात न घेताच आपलं म्हणणं पुढे रेटताय. मागच्या विधानसभेची मुदत संपली आहे. नवी विधानसभेचे गठन झालेले नाही. जोवर सरकार स्थापन होत नाही तोवर नवीन आमदारांचा शपथविधी होऊ शकत नाही आणि जोवर शपथविधी होत नाही तोवर त्यांना कोणताही घटनात्मक/ कायदेशीर अधिकार नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही पक्षाला सरकार बनवण्यात अपयश आले आणि ६ महिन्यांनी फेर निवडणुका झाल्या तर आता निवडून आलेल्या आमदारांना एक छदाम सुद्धा पगार किंवा निवृत्तीवेतन मिळणार नाही. घोडे बाजार चालू असे पर्यंत सरकार अस्तित्वातच नाही हि स्थिती येऊ नये म्हणून "घटनाकारांनी" राष्ट्रपती राजवटीचा तात्पुरता पर्याय ठेवलेला आहे त्यामागे फार मोठा विचार आहे. आजमितीला अगदी उदयाला सुद्धा कोणताही पक्ष जर १४५ आमदारांच्या संमतीचे सह्यांचे पत्र घेऊन राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापन करू शकतात लहान बाळ चालायला लागेपर्यंत त्याला आई आधार देते तसा हा प्रकार आहे. परत एकदा सांगतो पूर्वग्रह बाजूला ठेवून विस्तृतपणे वाचून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

राष्ट्रपती राजवटी मध्ये

सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 11:54 नवीन
राष्ट्रपती राजवटी मध्ये प्रशासन राज्य चालवते आणि ते जनतेला बांधील नसते. हे एक अत्यंत चुकीचे विधान. राष्ट्रपती राजवट येते तेंव्हा विधानसभेचे हक्क लोकसभेकडे जातात. याच हक्कांचा वापर करून जम्मू आणि काश्मीर मध्ये कलम ३७० आणि ३५ अ हे रद्द केले गेले आहे.( अभ्यास वाढवा). आणि "लोकसभा जनतेला बांधील नसते " हे तितकेच बेजबाबदार विधान आहे.( मग कुणाला बांधील असते?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सकाळ

इरसाल
Wed, 11/13/2019 - 09:40 नवीन
एक सकाळ पेपर सोडला तर इतर सर्व ठिकाणी मा. शरद पवार यांचा अत्युच्च महिमा गाताना कोणीच दिसत नाही. का. काका स्वतःच भ्रमाचा भोपळा बनवुन बसलेत.
  • Log in or register to post comments

तरि पण तेच

हस्तर
Wed, 11/13/2019 - 12:52 नवीन
तरि पण तेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

https://www.lokmat.com/mumbai

हस्तर
Wed, 11/13/2019 - 17:13 नवीन
https://www.lokmat.com/mumbai/all-speechless-mla-sharad-pawar-looks-security-guard-vidhan-bhavan/ राज्यातील या नाट्यमय राजकीय घडामोडींचे सुत्रधार म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

काका नी टाकलेला गुगली सेनेला

विजुभाऊ
Wed, 11/13/2019 - 11:04 नवीन
काका नी टाकलेला गुगली सेनेला अजूनही समजलेला नाहिय्ये. एका फटक्यात सेनेला इतिहासजमा केले आहे. उद्धव अजूनही रा काँ सोबत चर्चेचे गुर्हाळ खेळत बसले आहेत. सोनिया नी स्पष्टपणे सेने सोबत प्रत्यक्ष सत्तेत बसणार नाही हे सांगूनही काका नी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावे बाहेरून पाठिंबा नको हे टुमणे चालुच ठेवले आहे राज्यपालांचे काही चुकले असे वाटत नाही. कारण सेना काय किंवा रा कॉ क्या याना बहुमत सिद्ध करन्न्यासाठी अप्रत्यक्षपणे ७२ तासाम्पेक्षाही जास्त वेळ मिळाला होता. काकांनी सेनेचा मस्त गेम केला हे मात्र नक्की. सेनेच्या नेतृत्वाला हे लक्ष्यात येईल त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. ती ऑलरेडी गेलेलीच आहे. आता उरलाय तो सेनेचा निव्वळ फुगा तो ही हवा गेलेला
  • Log in or register to post comments

महाराष्ट्र सारख्या राज्यात

prahappy
Wed, 11/13/2019 - 11:08 नवीन
महाराष्ट्र सारख्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई ह्या वरून एकंदरीत मंडळी वादविवाद करत आहेत त्या साठी हे २ मुद्दे १. अजित पवार ह्यांनी काल दुपारी आम्हाला ८.३० पर्यंत वेळ कमी पडेल म्हणून जास्त वेळेची मागणी केली , शिवसेनेनी पण तशीच केली पण ती वेळ गेलयावर आणि ह्यांनी खूप आधी २. भाजप ला बोलवलं , सेनेला बोलावलं , राष्ट्रवादी ला बोलवलं मग काँग्रेस ला का नाही हा अजून एक मुद्दा - उत्तर असं कि काँग्रेस नि अजून गटनेता निवड केलेली नाही , राज्यपाल बोलावणार तरी कोणाला ? सगळ्याच चॅनेल चा TRP हा स्काय हाय असल्याने त्यांना पुढील वाटचाली साठी हे महाशिवाघडीचं सरकारच हवंय , मी त्यात अजिबात " BIAS" वेगैरे शब्द वापरणार नाही , हे सरकार आलं तरच लोकं tv बघत बसणारेत म्हणून अश्या महत्वाच्या बातम्या ते सोयीस्कर पणे टाळणार , अजून एक उदाहरण म्हणजे शिवसेनेनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावलं वेगैरे , आज सपशेल माघार घेतलीये ह्या बातम्या ते कितीवेळ चालवणार हे मला माहितीये बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहातच
  • Log in or register to post comments

अजित पवार ह्यांनी काल दुपारी

prahappy
Wed, 11/13/2019 - 11:10 नवीन
अजित पवार ह्यांनी काल दुपारी आम्हाला ८.३० पर्यंत वेळ कमी पडेल म्हणून जास्त वेळेची मागणी केली , शिवसेनेनी पण तशीच केली पण ती वेळ गेलयावर आणि ह्यांनी खूप आधी - त्यामुळेच राज्यपालांनी निर्णय घेतला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: prahappy

शिवसेना सोडून आणखी कोणत्याही

जॉनविक्क
Wed, 11/13/2019 - 11:11 नवीन
शिवसेना सोडून आणखी कोणत्याही पक्षाचे सत्तेत यायचे स्वप्न भंगले नसल्याने, सब चंगासी!
  • Log in or register to post comments

शिवसेनेने शेपूट घातलंय--

सुबोध खरे
Wed, 11/13/2019 - 11:19 नवीन
शिवसेनेने शेपूट घातलंय-- राज्यपालांनी आम्हाला वेळ दिला नाही याबद्दलची कलम १४ आणि २१ खाली मूलभूत अधिकारांचे उल्लंघन म्हणून दाखल करायची "रिट याचिका" त्यांनी मागे घेतली आहे. आता तोंड लपवण्यापुरती राष्ट्रपती राजवटीविरोधी याचिका दाखल करणार म्हणत आहेत. हि याचिका "रिट अर्ज" नसल्याने ती रांगेत लागून दोन चार वर्षांनी सुनावणीस येईल. येथे मला स्ट्रेपसील्स ची जाहिरात आठवते आहे. त्यात एक सिंह "मोठी गर्जना" करण्याचा प्रयत्न करतो परंतु आवाज नुसता "म्यांव" असा येतो https://www.youtube.com/watch?v=wLu4RMICW1o
  • Log in or register to post comments

सेनेची म्यावम्याव बरीच वर्षे

विजुभाऊ
Wed, 11/13/2019 - 11:32 नवीन
सेनेची म्यावम्याव बरीच वर्षे चालू आहे. या निमित्ताने ते उघडकीस आले इतकेच.
  • Log in or register to post comments

येवढे होऊनही, लीलावतीला

राघव
Wed, 11/13/2019 - 12:58 नवीन
येवढे होऊनही, लीलावतीला अजूनही आशा आहेत. अवांतरः जर पुढे कधी "आपलं काही चुकलं काय" असा प्रश्न सेनेला स्वतःला विचारावासा वाटलाच तर आणि ते उत्तर होकारार्थी आलं तर, सेना कोणाला जबाबदार धरेल?
  • Log in or register to post comments

हा काय प्रश्न झाला?

मूकवाचक
Wed, 11/13/2019 - 17:49 नवीन
खोटारडेपणा आणि अहंकाराला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव

हा हा हा... भारी! =))

राघव
गुरुवार, 11/14/2019 - 11:11 नवीन
हा हा हा... भारी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

काही मूलभूत कार्यक्रम ज्यात

सुबोध खरे
Wed, 11/13/2019 - 18:26 नवीन
काही मूलभूत कार्यक्रम ज्यात शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विचारसरणीतच विरोध आहे तेथे हे सरकार नक्की कसे चालेल? सामना मध्ये श्री राऊत सनसनाटी वक्तव्ये करतात ती श्री फडणवीसांनी हसून साजरी केली होती. पण महाशिवआघाडीचे घटक सहन करतील का? उदा. त्यांनी असे वक्तव्य केले मुस्लिम व्होट बँक राजकारणाला आळा घालण्यासाठी मुसलमानांचा मताधिकारच रद्द करा. https://timesofindia.indiatimes.com/india/Bar-Muslims-from-voting-writes-Shiv-Sena-MP-Sanjay-Raut/articleshow/46901031.cms उद्या मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा आल्यावर नक्की काय होणार?
  • Log in or register to post comments

सेनेची वर्तणूक बघून लोकं धक्का बसल्यासारखे का वागत आहेत ?

जॉनविक्क
Wed, 11/13/2019 - 18:37 नवीन
असो, फक्त सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले असल्याने तसेही सब चँगासी, किती सांगू मी सांगु कोणाला, आज आंनदी आनंद झाला. असो... खरे बिंडोक ते ही आहेत ज्यांनी सेना - भाजप मधे काय ठरलंय याची शहानिशा न करता मतदान केलंय आणी महाराष्ट्राला राष्ट्रपती राजवटीत ढकलले. एक सुज्ञ मतदार म्हणून शरम वाटते या आळशीपणाची बाकी उद्धवजींच्या बेरकीपणाची तगडी कसोटी लागली आहे, आत्तापर्यंतफक्त पवार आणी उद्धव ठाकरे यांच्या भोवती समीकरणे फिरली आहेत, बेरकी उद्धड आणी अनुभवी व अनपेक्षित पवार जोडगोळी काय चमत्कार करते हे बघणे खरेच उत्सुकतेचा विषय आहे.
  • Log in or register to post comments

सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न

सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 11:27 नवीन
सेनेचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले असल्याने असं झालंय असं अजून तरी म्हणता येत नाही. आणि माझ्या सारखे लोक जे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे समर्थक आहेत त्यांना शिवसेना महा आघाडी बरोबर जाते आहे हे अजिबात रुचणारे नाही. हे म्हणजे "सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला" असे म्हणावे लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

शिव सेने ने खूप नंतर

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 12:42 नवीन
शिव सेने ने खूप नंतर हिंदुत्वाचा मुद्दा पकडला होता,काँग्रेस बरोबर ह्या आधी पण आघडी केली होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

होय

सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 12:46 नवीन
होय बाळासाहेबांच्या कारकिर्दीत अगदी सुरुवातीलाच त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली होती. "बाळासाहेबांच्या काळात असं होतं, तसं होतं " याबद्दल गहिवर काढणाऱ्यांनी आणि बाळासाहेब ठाकरे धुतल्या तांदुळासारखे होते असे म्हणणार्यांनी पण विचार करावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

जनता पक्षा च्या पाठींब्यावर

गणेशा
गुरुवार, 11/14/2019 - 15:59 नवीन
जनता पक्षा च्या पाठींब्यावर शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते ..he हि नमूद करावेसे वाटते .. त्यामुळे कोणी कधी काय केले he पाहिले तर कोणीच कुठली विचारसरणी पुर्ण आचरणात आणत नाही .. मला वाटते नाशिक महानगर पालिके वर , भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहेच . असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

बरोबर.

शाम भागवत
गुरुवार, 11/14/2019 - 16:17 नवीन
बरोबर. पण मग नंतर जनता पक्षाचे नामोनिशाण उरले नाही. शेकाप पण काँग्रेस बरोबर गेला होता. पण मग नंतर शेकापचे नामोनिशाण उरले नाही. डावे, समाजवादी पण भाजपा विरोधात काँग्रेस बरोबर गेले होते. आज तेही उरले नाहीत. जॉर्ज फर्नांडिस यांना मानणारे बरेच जण होते. ग प्र प्रधान, ना ग गोरे, मधु दंडवते, कॉ. डांगे वगैरे बरीच चांगली तत्वनिष्ठ माणसे होती. आता तर त्यांची नावेही आठवत नाहीत. अनुयायी कुठून मिळणार? आता काँग्रेस विरोधातला आपला अवकाश संपवून, शिवसेना गेलीय काँग्रेस व राकाँला जिवदान द्यायला. कोणाची इच्छा असो वा नसो. यात भाजपाच मोठा होत जाणार आहे. फक्त त्यासाठी भाजपाने पेशन्स दाखवला की झाले. ते तो दाखवत आले आहेत. आपल्या दृष्टीने ५ वर्ष खूप मोठी असतात. पण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने ५ -१० वर्ष हा काळ फारच छोटा आहे. मी विचारसरणीवर बोलत नाहीये. ध्रुवीकरण कसे होत चाललेय ते सांगतोय. भाजपाच्या २ खासदारांवरून भाजप मोठा कसा झाला ते सांगतोय. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

हे म्हणजे "सूर्याचा किरण

जॉनविक्क
गुरुवार, 11/14/2019 - 14:40 नवीन
हे म्हणजे "सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला" असे म्हणावे लागते
असेल असेल असेही असेल. पण आपला संपूर्ण प्रतिसाद म्हणजे कर्ण चाक अडकल्यावर अर्जुनाला धर्माची आठवण करून देतो तसा वाटतो म्हणून आपल्यासारख्यासाठी श्रीकृष्णाचा तेंव्हा कुठे गेला होता तुझा (युती) धर्म असे म्हणावे लागते, नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सूर्याचा किरण अंधाराला सामील

गणेशा
गुरुवार, 11/14/2019 - 16:09 नवीन
सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला" Hi लाईन खूपच मस्त आहे .. सूर्याचा किरण अंधाराला सामील झाल्यावर पहाटेचा उदय होतो हे मात्र नक्की ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सूर्याचा किरण अंधाराला सामील

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 16:32 नवीन
सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला" सुर्य कोण ? भाजपा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

सूर्याचा किरण अंधाराला सामील

सुबोध खरे
Fri, 11/15/2019 - 09:48 नवीन
सूर्याचा किरण अंधाराला सामील झाला" हि ओळ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती श्री संभाजीराजे मोंगलाना जाऊन मिळाले होते त्याबद्दल लिहिली आहे. बाकी ज्याने त्याने आपल्या "आकलनशक्तीप्रमाणे अर्थ काढावा".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

मी तर म्हणतो काही दिवसांनी

ट्रम्प
Wed, 11/13/2019 - 20:21 नवीन
मी तर म्हणतो काही दिवसांनी होवू द्या पुन्हा निवडणूक आणि पडूद्या गाड़ी वर फर्नांडिस आणि आठा , उठा ला त्या शिवाय यांचा माज मोडणार नाही . एकदा यांची जिरली की पुन्हा राकॉ आणि कॉ कडे ढूंकून ही बघणार नाहीत . भापा आणि शेना दोघे ही हिंदुत्वा ला तिलांजली देवून सत्ते साठी एकमेंकाची आरत सुटले आहेत त्यांना मतदान करणारे निव्वळ मूर्ख बावळट ठरले आहेत .
  • Log in or register to post comments

काही गरज नाही फर्नांडिस आणि

ट्रम्प
Wed, 11/13/2019 - 21:53 नवीन
काही गरज नाही फर्नांडिस आणि आठा उठा ला ओवाळत बसण्याची !!!! यांच्या राक्षशी महत्वकांशे मुळेच महाराष्ट्रात ही दयनीय अवस्था झाली आहे . कोण बरोबर आणि कोण चुकीचे वागत आहे याचा विचार न करता पुढील निवडणुकीत मतदार या दोन्ही पक्षांना विरोधात निश्चित बसवीणार !!!! जरा चकोरीबद्ध जीवन सोडून इतर लोकांचे विचार ऐकले तर भापा आणि सेनेला जनक्षोभ समजून येईल . गोरगरीब , कामगार ,शेतकरी आणि मध्यमवर्गीय लोकांनी आघाडीपेक्षा जास्त बहुमत युतीला दिले होते , त्या लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी यांनी लवकरात लवकर सरकार स्थापण करावयास हवे होते . आता तेच मतदार भापा सेने च्या नेत्यांचे जीवन असह्य करुन टाकतील कारण हेच लोक मतदान ची टक्केवारी वाढवत असतात .
  • Log in or register to post comments

फक्त सेना चुकीची वागली

Rajesh188
Wed, 11/13/2019 - 22:11 नवीन
फक्त सेना चुकीची वागली आणि bjp ची काहीच चूक नसेल असा विचार करणे एकतर्फी झाले . काही तरी आगावू पना bjp नी केला असणार त्या शिवाय शिवसेना टोकाची भूमिका घेणार नाही. Bjp हा पक्ष मी म्हणेल तोच कायदा असा विचार करणारा आहे .गुजरात मध्ये आतापर्यंत तोच प्रकार चालू आहे.. काळी बाजू मीडिया ला हाताशी धरून लपवून ठेवण्यात bjp तरबेज आहे. फक्त हिंदू वादी आहे म्हणून bjp ला मत देणे योग्य नाही
  • Log in or register to post comments

"कॉन्स्पिरसी थेरी "

चौकस२१२
गुरुवार, 11/14/2019 - 03:12 नवीन
"कॉन्स्पिरसी थेरी " प्रमाणे काह्ही असू शकतं पण साधा प्रश्न आहे - ज्याचे ५६ आहेत त्याने मुख्य पदाचा आग्रह धरावा का? आणि का? - जनतेने युती ला जास्त जागा दिल्या हे दिसते आहे आणि त्यामुळे सेनेनं ने जरूर भाजपशी अंतर्गत घासाघीस करावी पण एक तर चव्हाटयावर जे केले ते करू नये आणि दुसरे त्यापेक्षा हि वाईट म्हणजे सरळ जनादेश सोडून राष्ट्रीय बरोबर पाट लावण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचे विचित्र समर्थन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

फक्त सेना चुकीची वागली आणि

जॉनविक्क
गुरुवार, 11/14/2019 - 10:16 नवीन
फक्त सेना चुकीची वागली आणि bjp ची काहीच चूक नसेल असा विचार करणे एकतर्फी झाले .
तुम्हला ना अगदी काही म्हणजे काहीच कळतंच नाही बघा, अहो फक्त आणी फक्त शिवसेनेचेच सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले असताना, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आंनदी आंनद झाला म्हणून हत्तीवरून वाटायची सोडून हे काय भलतेच विधान ? (अंजावर स्वतःची राजकीय लाल करायची हौस नसलेला निष्पक्ष)- जॉनविक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मुंबई मध्ये bjp शी युती

Rajesh188
Wed, 11/13/2019 - 22:17 नवीन
मुंबई मध्ये शिवसेनेची bjp शी युती मराठी लोकांच्या हिताची आहे हा एक प्लस पॉइंट आहे . गुजराती,मारवाडी,मराठी हे सूत्र मुंबई मध्ये 100 टक्के यशस्वी होते. हिंदी भाषिक लोकांना त्या मुळे मुंबई chya राजकारणात ढवळा ठवळ करता येत नाही त्यांना लांब ठेवता येते. ज्यांना स्वतःची राज्य नीट चालवता येत नाहीत ती लोक मुंबई महानगर पालिकेत न जाणेच मुंबई chya फायद्याचं आहे Bjp,शिवसेना ह्यांची युती चा हाच सर्वात मोठा फायदा मुंबई ,महाराष्ट्र la आहे
  • Log in or register to post comments

हिंदी भाषिक लोकांना त्या मुळे

सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 11:24 नवीन
हिंदी भाषिक लोकांना त्या मुळे मुंबई chya राजकारणात ढवळा ठवळ करता येत नाही त्यांना लांब ठेवता येते. काय सांगताय? कृपा शंकर सिंह, गोविंदा, संजय निरुपम, मुरली देवरा, प्रिया दत्त, चरणसिंह सप्रा हे सर्व हिंदी( अमराठी) भाषिक नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

Bjp आणि सेना युती करून

Rajesh188
गुरुवार, 11/14/2019 - 13:39 नवीन
सेना आणि bjp युती करून लढली तेव्हा तेव्हा हिंदी भाषिक जास्त नगरसेवक किंवा आमदार मुंबई मधून निवडून आले नाहीत. हिंदी भाषिक(म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार) एवढंच अर्थ मर्यादित आहे. सप्रा पंजाबी आहेत.आणि प्रिया दत्त पासून संजय निरुपम पर्यंत सर्व राजकारण मधून बाद झाले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

परतीचे मार्ग

शा वि कु
गुरुवार, 11/14/2019 - 09:55 नवीन
अश्याप्रकारे चव्हाट्यावर आरडाओरड करून भाजप सेनेने परतीची दारं (निदान काही वर्षांपुरती) बंद केली आहेत. आणि पब्लिक समोर आक्रस्ताळेपणा सेनेनच केला. त्यामुळे सेनाच जबाबदार ह्या स्थितीसाठी.
  • Log in or register to post comments

सरकार पाडण्यामागे?

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 11/14/2019 - 10:02 नवीन
नेमके कोणते सरकार पडले? कधी नव्हे ते (जवळ जवळ पाच दशकांनी) एखाद्या राज्य सरकारने मुख्यमंत्री न बदलता महाराष्ट्रात आपला कार्यकाळ पूर्ण केला. योगायोगाने यापूर्वी अन आता तसे करणारे दोन्ही मुख्यमंत्री वैदर्भियच आहेत. तेव्हा स्व. वसंतराव नाईक अन आता देवेंद्र फडणवीस.
  • Log in or register to post comments

राष्ट्रपति राजवट आल्यामुळे

मराठी_माणूस
गुरुवार, 11/14/2019 - 11:45 नवीन
राष्ट्रपति राजवट आल्यामुळे काय समस्या आहे ? तसेही सत्तेसाठी झुंजणार्‍या लोकांच्या मनात "सामान्य लोकांच्या समस्या सोडवणे" हा मुद्दा अस्तीत्वातच नाहीय्ये.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा