शिव सेनेचे काय होणार ?

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
31 Oct 2019 - 6:44 pm
गाभा: 

ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच

जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

प्रतिक्रिया

सगळंच मोडलं, सरकार राष्ट्रपती राजवटीत गेलं तर अपक्षांना आमदारकीचा फायदा होणार नाही. त्यामुळे ते बहुमत सिद्ध करण्यावेळी भाजपला मत देतील.
शिवसेना तटस्थ राहिल्यास भाजप ११६ वि ११० अशी काठावर पास होऊ शकते?

राज्यात सत्ता स्थापन करणे bjp ची गरज आहे .
आणि सेना हाच योग्य पक्ष आहे bjp साठी बहुमत सिद्ध करण्यासाठी.
राष्ट्रपती राजवट bjp भविष्यात कधीच इथे पाय रोवू शकणार नाही.
अपक्ष आमदारांच्या पाठिंबा सर्व मंत्री पद धावे लागेल.
Bjp वाल्यांना मंत्री मंडळात जागाच शिल्लक राहणार नाहीत

रमेश आठवले's picture

31 Oct 2019 - 8:48 pm | रमेश आठवले

ईडी पीडा टळो आणि माझं बाळ उप मुख्य मंत्री होवो असे म्हणत उद्धव ठाकरे भाजपाशी समजोता करतील.

वकील साहेब's picture

1 Nov 2019 - 2:59 am | वकील साहेब

तमाम मराठी जनतेच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून

हस्तर's picture

1 Nov 2019 - 11:48 am | हस्तर

https://www.lokmat.com/editorial/editorial-instability-state-power-it-in...

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची देशातील किमान १५ राज्यांत सरकारे आहेत. या बहुतेक राज्यातील जनता सेनेवर या ना त्या कारणाने नाखूश आहे

हे कसे?

मनिष's picture

1 Nov 2019 - 1:28 pm | मनिष

Shivsena

जॉनविक्क's picture

1 Nov 2019 - 4:14 pm | जॉनविक्क

सेना स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतेय.सेनेलला धड वचक ठेवता येत नाहिये ना धड धोबीपछाड टाकता येतोय
या सगळ्या गोंधळात सेना त्यांच्या अपरिुक्वपणाचे मुक्त दर्शन घडवतेय

भारत देशाच्या लोकशाहीत अनेक घोळ आहेत. त्याचे पुरेसे स्पष्टीकरण संविधानात नाही . या वर संबित पात्रा यांचे एक भाषण ही तू नळी वर आहे पण ते म्हणे भाजपाचे कोणीतरी असल्याने अनेक जण फाट्यावर मारतात. भारत देशात " पक्ष" या संस्थेची व्याख्या संविधानाच्या कुठल्याही पानावर आहे का ? संघटना करण्याचे स्वात्रंत्र्य इतका उल्लेख जरूर आहे. आपण मत पक्षाला देतो की माणसाला याचे विवेचन संविधानात आहे का ? माझया मते नाही. या मूलभूत घोळामुळे पक्षशिस्त वगैरे ला पक्षात शिक्षा असली तर कायद्यात नाही ! युती या गोष्टीला कायद्यात काही अर्थ नाही ! त्यामुळे जातीयवादी म्हणून आयुष्यभर ज्या पवारांनी भाजपाला हिणवले त्यांनी आता महाराष्ट्राची " काळजी" मला असा पवित्रा घेऊन हिंदुत्व वादी शिवसेनेशी सोयरीक केली तर त्यात नवल ते काय ? कारण अशी सोयरीक लोकांची फसवणूक असली तरी संविधानाला अमान्य नक्कीच नाही असे इतिहासाचं सांगतो.

यदाकदाचित आदित्य मुमंत्री झाला तर राऊत श्रेय घेणार होते पण त्यांना "शिवसेना स्वाभिमानी पक्ष" याचा विसर पडला हे कां अध्यक्ष सोनियांनी नकार देऊन आठवण करून दिली.
त्यामुळे मा. पवारांचा शर्टही ओलाच राहणार का?

राष्ट्रवादीने पुलोद च्या " प्रयोगाचा हवाला देऊन शरद पवार यानाच मुख्यमंत्री पद द्यावे अशी अट आता टाकावी . पुलोद चा प्रयोग संजय राऊताना आवडला आहे अशी कबुली त्यांनी दिली आहे . यात अनेक पक्षी भा ज पा मारू शकेल . पवार शेकाकर्यांच्य आत्महत्या थांबवू शकतात की नाही हे जनतेला आजमावून पहाताही येईल . सेनेची काहीशी जिरवता येईल . फडणवीस हा ब्राह्मण मुख्यामंत्री कसा होऊन शकतो असा तळतळाट बर्याच जणांचा झाला आहे त्या जखमेवर भा जा पा ने फुंकर घातली असा संदेशही जाईल तसेच एवीतेवी गडकरी पवार हे " तसे" दोस्त आहेत . पवारांचा " हात" धरून मोदी राजकारण शिकले ई ई गोडवे गाउन आपली आपटी अन आपत्ती दोन्ही भा ज पा ला लपविता येईल .

चौकटराजा's picture

2 Nov 2019 - 8:31 pm | चौकटराजा

झी चोवीस तास वर अशी बातमी आलेलीही आहे की शरद पवार मुक्या मंत्री व आदित्य उमु !

महाराष्ट्र मध्ये भाजप बॅक फूट वॉर जाईल ,खडसे मुंडे तावडे सगळे मागे सारले आहेत ,फक्त फडण २०
सध्या चेहरा आहेत ,जसे अटल जी गेल्यावर नमो यायला १० वर्षे लागली तसे होईल

दुसऱ्या पक्षांचं जाऊ द्या. स्वाभिमानाच्या वक्तव्याचं काय झालं? गद्दारी?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Nov 2019 - 7:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम मनोरंजन चालू आहे. "एकच सत्य .. मुख्यमंत्री आदित्य" च्या घोषणा बाजूच्या गल्लित काही शिवसैनिकानी कालच दिल्या. 'रोखठोक' लिहिणारे ऐनवेळेस 'रोख' घेउन नमते घेतात असा अनुभव होता पण ह्यावेळी तसे दिसत नाही.

धर्मराजमुटके's picture

3 Nov 2019 - 8:45 pm | धर्मराजमुटके

भाजपा ने शिवसेनेला बाहेरुन पाठींबा देऊन शिवसेनेस सरकार बनवू द्यावे. राऊत साहेब कसे सरकार चालवतात ते बघावे.

Rajesh188's picture

3 Nov 2019 - 9:18 pm | Rajesh188

निवडणुकी अगोदर सर्व्हे वर आपला विश्वास दाखवून जनतेनी भोळा पण दाखवून दिला.
निकाल लागले सर्व sarvye
तोंडावर पडले.
सरकार युती चेच बनणार.
संजय राऊत नाच्या bjp
च्या परवानगी नेच
भोळ्या जनतेला अजुन
मूर्ख बनवत आहे

चौकटराजा's picture

4 Nov 2019 - 10:28 am | चौकटराजा

मी काही भा जा पा वाला नाही पण माझया मते पुन्हा निवडणुका हा शिवसेना नावाच्या सत्तापिपासू व कोणताही विधीनिषेध नसलेल्या पक्षाला ठेचण्याचा एकमेव मार्ग आहे ! अर्थात त्यात राज्यपालाची भूमिका निरणांयक !

आधी हाताने थोबाडं फोडून घेतली , आता कमळ बघून गाळात रुतत जायचं ... काहीही करा , जनता जनार्दन भोळी ती भोळिच राहणार ,, त्यांचं काही नाही व्हायचं ...

जे बाळा साहेबांनी त्यांच्या हयातीत केले होते .. ते मला नाही वाटत , आता कुणाला जमेल .. ते यथेच्छ खिल्ली उडवायचे .. मग समोर कमळाबाई असो कि इटालियन किटली ... कुणाचीही खैर ठेवायचे नाहीत .. राज तास प्रयत्न करतोय पण ते एक खांबी नेतृत्व आहे .. बाळासाहेबांनी सामान्यातूनच लोकनेते घडवले आणि हे दोघे ( उद्धव आणि राज ) खुर्चीची स्वप्न बघतायत .. मला नाही वाटत त्यांच्या हाती काही येईल .. हे असेच चालू राहिले तर शिवसेना हा , कॉर्पोरेट पक्ष बनेल हळूहळू आणि सामान्य जनतेवरची पकड सुटत जाईल ..
जो , जनतेला आवर्जून वेळ देतो आणि निदान एका तरी ज्वलंत प्रश्नावर आंदोलन छेडतो तोच लोकनेता होऊ शकतो आणि त्याला मग मरण नाही .. उदाहरण द्यायचेच झाले तर श्रीमान बच्चू कडू यांचे देता येईल ..

रमेश आठवले's picture

4 Nov 2019 - 8:21 pm | रमेश आठवले

बाळासाहेबांनी सुरेश प्रभू त्यांना पैसे पोहोचवत नाहीत म्हणुन प्रभुना मंत्री मंडळातून काढून टाका असे वाजपेयींना सांगितले . पुराव्यासाठी ह्या फिती मध्ये १५ ते १८ मिनिटे पहा. सध्याचा शिवसेनेचा मुख्यमंत्री पद आणि गृह, अर्थ, नगर विकास आणि महसुल ही खाती यांचा अट्टाहास हा कशासाठी आहे हे त्यावरून कळेल. https://www.youtube.com/watch?v=cVC8_jgTf6E

भाजप कुठे नीतिमत्ता ठेवतो?
शिवसेनेचे चुकले हे मान्य पण
१) पुण्यात शिव सेने ला एक पण जागा दिली नाही
२) राणे हा शिव सेने चा शत्रू असून पक्षात घेतलंच ना
३) बऱ्याच सहकार मंत्र्यां ना पावन करून ह्यावेळी तिकीट दिले
४) आमचे ठरलेय ,पण काय ?

भाजपा ने जेंव्हा त्यांच्या काही मित्र पक्षांना त्यांच्या कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्यास भाग पाडले, तेथेच मला तर त्यांची चुक वाटली होती.. मित्र पक्ष मग तो आठवलेंचा असुद्या नाहीतर जानकरांचा. आमच्या जवळील दौंड मध्ये तर असे ऐकले होते की, राष्ट्रीय समाज पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर ,फॉर्म भरण्या अगोदर राहुल कुल यांच्या हातात भाजपा चा एबी फोर्म पडला. ७०० च्या आसपास मताधिक्क्याने ते निवडुन ही आले. परंतु आपल्या पक्षाचे अस्तित्व याद्वारे मिटु शकते हे मला वयक्तीक वाटते.

तसेच, भाजपा ने ५०-५० मान्य केले होते का? हा कळीचा मुद्दा आहे, आणि त्यांनी तो जर मान्य केला असेल तर शिवसेनेची भुमिकाच चुकीची असे तर स्पष्ट पणेआपण म्हणु शकत नाहीच.

तरीही मला वयक्तिक वाटते भाजपा -शिवसेने चे सरकार येइल.

परंतु भाजपाने याआधीच्या काही वर्षात, महबुबा मुफ्ती बरोबर आधी केलेले सरकार, गोवा आणि कर्नाटकातील सत्ता घेतानाचे राजकारण हे पाहता शिवसेनेने राष्ट्रावादी बरोबर जावु नये अशी म्हणण्याची नैतिकता गमावलेली आहेच.
आणि त्याबरोबर २०१४ मध्ये राष्ट्रवादी च बाहेरुन पाठिंबा दाखवुन बहुमत सिद्ध करताना, शिवसेनेला ५ वर्षे कोंडित पकडले होतेच, हे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही.

राज्यपालाने मात्र, कोणत्याही पक्षाची बाजु ऐकुन न घेता, मोठ्या पार्टीला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलवले पाहिजेच. ९ तारखे पर्यंत आधीचे सरकारचा कार्यकाळ आहे, त्या अगोदर नविन सरकार चे गटबंधन झालेले हवे. पण अजुन ही राज्यपाल कोणाला सत्तास्थापणे साठी बोलावत नाही, आणि येथे ही मग राज्यपाल असे का करत नाही हा प्रश्न उपस्थीत होतोच.

राष्ट्रवादी ने माझ्या मते विरोधी पक्षात राहुन काम करावे, प्रभावी काम केल्यास २०२४ मध्ये राष्ट्रावादी सत्तेत नक्कीच येइल असे माझे मत आहे, कारण गेल्या ५ वर्षात भाजपाचे काम जनतेला दिसले आहेच, आणि नंतरच्या ५ वर्षात असेच चित्र राहिल असा माझा अंदाज आहे.

असो

हस्तर's picture

4 Nov 2019 - 12:44 pm | हस्तर

^^^ चौकटराजा

खिलजि's picture

4 Nov 2019 - 12:58 pm | खिलजि

आमच्या घरात सर्व लोकमान्य पक्ष सामावले आहेत .. काका कट्टर शिवसैनिक .. बाळासाहेबांनी स्वतः आमच्या दुकानाचे उदघाटन केले होते .. तर दोन मामा राष्ट्रवादीत आणि एक मामा कट्टर काँग्रेस .. चुलत मामा सर्व शिवसेनेत आणि भाजपात .. आजोळच्या गणपतीला खरी धमाल यायची .. मिरवणूक बघण्यासारखी असायची .. पाच घरात एकच गणपती त्यामुळे सर्वजण यथेच्छ आपल्या पक्षाच्या टोप्या घालून मिरवायचे आणि नाचायचे .. आमच्या सारख्या पाहुण्या मंडळींचे हाल व्हायचे .. मी तर तीनही टोप्या खिशात घालून फिरायचो .. शिवसैनिकांमध्ये भगवी , तर भाजपाची त्या मामालोकांच्या गँगमध्ये ,, माझ्या सख्ख्या मामांची राष्ट्रवादी तर मोठ्या मामाची हातवाली .. विचारू नका .. एक मात्र नक्की , राजकारण घराघरात घुसले आहे आणि त्यांचे बुरसटलेले विचारही .. त्यामुळे , मी सहसा गणपतीला जाणे टाळतो .. नकोसे वाटते आणि या साऱ्या पक्षांचा मनापासून राग येतो , ज्यांनी गणपतीही सोडला नाही .. तर आपल्यासारख्या सामान्यांची काय भिशाद...

हस्तर's picture

4 Nov 2019 - 1:02 pm | हस्तर

मनसे ?

सध्यातरी काही माहित नाही आहे .. कधी पुढील खेपेला जाणे झाले तर कळेल .. कुणीतरी भाऊ असतील जे नुकतेच तिथे भरती झाले असतील .. बघू टोपी भेट मिळाली कि घ्यायची ..

मनसे ला १३ वर्षे झालित राव , एक पण माणुस नाहि ?

कदाचित तिथे फक्त एकच माणूस आहे ज्याला लोक आधीपासूनच ओळखतात .. आणि त्याचं जाणं या लोकांना बिलकुल आवडलं नसेल .. असो "" राजकारण "" हा मुळातच घाणेरडा विषय आहे .. इथे कुणी कुणाचा नसतो .. आपला विषय जरा आवडीचा होता म्हणून भाष्य केले आठवणींसहित अन्यथा मी या धाग्यांवर फिरकतही नाही .. मतदानपण वेळ असेल तरच करतो अन्यथा नाही .. यावेळेस केले नाही .. दिवाळीची साफसफाई करत होतो .. मत द्या आगर नका देऊ .. दोन्हीची उत्तरे सारखीच आहेत .. आमच्या इथे अजूनही रस्ते धड नाहीत , मुंबईत राहूनही तर गावखेड्यातली वार्ताच नको .. सर्व साले , चप्पल फेकून मारण्याच्या लायकीचे आहेत .. या नेत्यांना ,, जींकडेजींकडे रस्ते खराब आहेत तिथे ओळीने खांबांना बांधून ठेवले पाहिजे , धूळ खात .. मग रात्री सोडायचे घरी जेवणासाठी फक्त , सकाळ झाली कि पकडून आणायचे आणि पुन्हा बांधायचे असे किमान सात दिवस तरी राजरोसपणाने केले पाहिजे .. एक व्रत समजून .. तर कुठे देशाचे भले होईल , अन्यथा नाही ..

प्रसाद_१९८२'s picture

4 Nov 2019 - 1:45 pm | प्रसाद_१९८२

उद्धव आणि ‘बेताल’

https://www.tarunbharat.net//Encyc/2019/11/4/agralekh-04-nov-2019.html

प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या वक्तव्याची लोकमत चाचपणी करण्यासाठी बेताल,त्रिताल,,झपताल ठेवलेले असतात. प्रक्षोभ झाल्यास त्या ढग्ग्याला फोडता येते.
डॉन लोकही असे करतात हे एका कादंब्रीत आहे. लास्ट डॉन /मेरटा ?

एकुलता एक डॉन's picture

5 Nov 2019 - 12:25 am | एकुलता एक डॉन

नाहि ब्वा
मि तरि नाही

रमेश आठवले's picture

5 Nov 2019 - 1:38 am | रमेश आठवले

तबल्यावरील तालाचा एक प्रकार आहे. त्याला म्हणतात आडाचौताल .

शिवसेने बरोबर चर्चा आता राज्यस्तरावर करावी. केंद्रिय नेतृत्व आताच मध्ये बोलणार नाही. - अमित शहा, भाजपा.

याचा अर्थ असा ही असु शकतो की यांनी ५०-५० फॉर्मुला आधी बोलले असल्याने, आता शिवसेनेच्या भुमिकेला उत्तर देणे जमत नसेल.
आणि निवडणुकी आधी, भाजपाला जवळजवळ २२० ते २४० शीट येवुन त्यांना शिवसेनेची तशी जास्त अडचन होणार नाही असा अतीआत्मविश्वास भाजपाला झाला असल्याने त्यांनी ५०-५० मान्य केलेले असु शकते..

हस्तर's picture

4 Nov 2019 - 4:00 pm | हस्तर

अमित शहा बोलले होते
फडणवीस बोलणार मी असले बोलले नव्हतो
मग फडणवीस अमित शहा ह्यानं म्हणणार तुम्ही कोण ठरवणारे
मग अमित शहा स्वतःहून हात बाहेर काढणार

मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली.

https://www.esakal.com/maharashtra/shivsena-bjp-politics-government-231950

चौकटराजा's picture

4 Nov 2019 - 4:18 pm | चौकटराजा

भा जा पा चा पूर्वीचा अवतार जनसंघ असा लब्बाड नव्हता ! हे प्रमोद महाजन अवतरले आणि यांनी ठरावले की काँग्रेसला भा ज पा चे राजकीय गुरु करायचे ! ती शिकवण म्हणजे आयडीयालॉजी गेली खड्ड्यात ! आता महाजनांचीच शिकवण राऊत वापरीत आहेत !

रमेश आठवले's picture

4 Nov 2019 - 7:59 pm | रमेश आठवले

तेलुगु देशम सारखे शिवसेनेचे खासदार त्यांचा लोकसभा-राज्यसभा पक्ष भाजपात विलीन करतील का ?

भाजपा मधे निम्म्यहुन लोक आयात केलेल आहेत

एकंदर या काथ्याकुटाचा कंटाळा आला आहे.

बेताल वक्तव्ये आणि सामान्य जनतेचा कळवळा दाखवण्यासाठी गहिवर काढणारी भाषणे अति झाली.

आता सरकार कोणी का बनवेना, माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्यात अजिबात रस राहिलेला नाही

कंजूस's picture

6 Nov 2019 - 10:38 am | कंजूस

अगदी अगदी .
मतदान करायला गेलो हाच मूर्खपणा केला.
मतदान करा , आमच्या पक्षाला, आणि नंतर गद्दारी.
तो करतो तर आम्ही का नाही? मग कशाला स्वाभिमानाच्या गमजा?

चौकस२१२'s picture

5 Nov 2019 - 10:02 am | चौकस२१२

सेनेशी जर लग्न झालं असत माझ तर मी कधीच घटस्फोट दिला असता... काय हि रोजची कटकट.. धड नांदत नाही .. गेली पाच वर्ष युतीत असून सतत धुसफूस.. कंटाळा आला,, महाराष्ट्राची जनतापण ना!!!! द्याचं ना एक मत तर एका पक्षला बहुमत द्यायच ना, मग भले काँग्रेस का असेना..
आणि तिकडे बारामतीकर आणि त्यांचे समर्थक हे विसरतात कि लोकांना जर ते हवे असते तर त्यांना १०५ + आणि भाजप ला ५० असते चित्र असते.. पण उन्माद असा दाखवता आहेत कि जणू स्वतःला २०० जागा मिळाल्यात
दुर्दैवाने प्रादेशिक पक्ष हे आता बहुतेक एका एका कुटंबाचे खाजगी उद्योग झाले आहेत, पवार साहेब पूर्वी काँग्रेस मधून बाहेर पडले नसते तर बरे झाले असते असे आता वाटते , निदान महाराष्ट्र भाजप आणि काँग्रेस अशी तरी लढत असती .. घराणेशाही नि त्यांना आणि शिवसेनेला दोघांना हि खड्यात घातलाय, काँग्रेस तर काय गेली ७० वर्षे एकाच कुटुंबावर चालतोय

राम मंदिर अभियोगाची सुनावणी संपली आहे. निकाल केंव्हाही येवू शकतो आणि तो राम मंदिर बांधण्याच्या बाजूने यायची शक्यता खूपच जास्त आहे. शिवसेनेने हा धोका लक्षात घेणे गरजेचे आहे.

ज्या पद्धतीने भा. ज प सरकार , शपतविधी ची टाळाटाळ करत आहे त्यावरून त्यांना मध्यावधी निवडणूक हवी आहे आणि त्या लादल्याचा दोष शिवसेनेवर फोडायचा आहे.

वरील दोन घटनाचे एकत्रीकरण करून हा निष्कर्ष काढता येईल कि अल्प मातामधले सरकार स्थापायचे , ते पडले कि निवडणुका ! राम मंदिर च्या लाटेवर एकहाती सत्ता !! हा भा ज प चा प्लान असू शकतो.

शिवसेना अस्थित्वाची लढाई लढते आहे आणि ह्या विनाश काळात अगदीच बालिश पणे वागते आहे.

ह्या घोळत संजय राउत आणि उद्धव हे उथळ , पवार संधिसाधू आणि फडणीस हे संतुलित नेते म्हणून महाराष्ट्रासमोर आले आहेत.

हस्तर's picture

5 Nov 2019 - 12:59 pm | हस्तर

फडणीस हे संतुलित नेते > संतुलित ज्या जागी दुसरेच वाचले
राममंदिर वरून जिंकणे ९० च्या दशकात होत होते ,आता कोणाला जास्त रस नाही अन्यथा शिव सेने वॉर जेवढे मिपावर धागे निघाले तेवढे राममंदिर वॉर निघायला पाहिजे होते

त्यांनी आतापर्यंत सातत्याने योग्य राजकीय चाली केल्याचा इतिहास नाईलाजाने स्वीकारावाच लागतो. त्यात मागच्या निवडणूकीत युती होईल या समजात ते तोंडघशी पडले होते हे एकमेव त्यांचे अपयश होते असे वाटते, अर्थात मी जाणकार नाही समजण्यात चूक होऊ शकते

राम मंदिर बांधून झाले .
म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत.
फक्त up आणि बिहार मध्येच असले प्रकार घडतात .
परत निवडणूक झाली
आणि राम मंदिर पण झाले तरी दोन्ही bjp आणि शिवसेना पराभूत होतील आणि राष्ट्रवादी सत्तेच्या जवळ पोचेल.

शरदपवारांनी जो एकहाती किल्ला लढविला त्यामुळे ते युद्धात निष्णात आहेत हे सिद्ध झाले आहे च.

छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली च्या तख्तापुढे झुकणार नाही असं पावसात भिजत भिजत म्हणायचं
आणि
मग दिल्लीत परवानगी घ्यायला जायचं ते पण एकेकाळी ज्यांना परदेशी म्हटलं त्या मॅडमची ?

फारच 'जाणतं' राजकारण!

ज्याला मी युद्ध म्हटले ते मतदानाच्या सोबतच लढून झाले

हस्तर's picture

7 Nov 2019 - 1:14 pm | हस्तर

आनि हा तह होता

"द्याट ब्रेक्स अवर अलायन्स" एवढं एक वाक्य ऐकण्यासाठी दिल्ली वाऱ्या!!!
दिल्लीतले नेते नाहीत, गल्लीतलेच.

तर्री's picture

5 Nov 2019 - 3:18 pm | तर्री

म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत. काही अंशी सहमत आहे.

जनता हुरळून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. भा ज प ला threshold मते आताच आहेत मतदार संघानुसार फक्त ३% ते ५% विरोधकांची मते फिरण्याची आवश्यकता आहे. तेवढी मिळाली कि भा ज प १५० पर्यंत पोहोचेल. तेवढी रसद राम मंदिर पुरवू शकेल. ही मते तरुणाई कडून नाही येणार पण ४०+ वायोगटा कडून येतील.

क्ष - भाग एवढाच कि कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि सेना ह्यांनी युती करून भा ज प विरुद्ध महा गठबंधन केले तर काय होईल हा आहे.
ह्या मध्ये शिवसेना संपेल हे निश्चित आहे. त्यांची १६% मतांची जी वोट बॅंक आहे ती कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी मुळे उध्वस्त होईल. कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी ला अनुक्रमे बाळसे आणि नवसंजीवनी मिळेल हे माझे मत. तरीही भा ज प हा मोठा पक्ष राहील ( १०० +).

लोक शिवसेनेला जेवढे वैतागले आहेत तेवढे नाही पण आता सध्या भाजप ला पण वैतागले आहेत दररोज च्या रडगाण्याने
राष्ट्रवादी खुद्द फायदा उठवेन

राष्ट्रवादी आपल्या परंपरागत मतदार संघातच जागा जिंकले आहेत त्यामुळे फेर निवडणुकीत त्यांना फारसा फायदा होणार नाही.

शिवसेनेने असंगाशी संग केल्यामुळे त्यांचे अनेक कुंपणावरील मतदार नाराज होऊन शिवसेने ऐवजी भाजपला मतदान करतील.

या उलट युती केल्यामुळे भाजप मधील अनेक चांगल्या उमेदवारांना जागा मिळाल्या नव्हत्या.

त्यामुळे नाराज असलेल्या अशा अनेक चांगल्या उमेदवारांना फेरनिवडणुकीत तिकीट मिळेल आणि नाराज शिवसेनेच्या मतदारांची मते मिळू शकतील.

शिवाय जर भाजप ने आयात उमेदवारांच्या ऐवजी मूळ भाजपसंघाशी एकनिष्ठ उमेदवार निवडले तर कुंपणावर बसलेले भाजपचे मतदार आपल्याकडे वाळवून भाजप सव्वाशे ते एकशे चाळीस तरी जागा मिळवू शकेल. आणि शिवसेना ५० च्या आत येईल.

या वेळेस काहीही न करता काँग्रेसला मिळालेला फायदा कमी होऊन त्यांच्याही जागा कमी होतील.

तुमचे हे मत भाजपा च्या बाजूने विचार करून आहे .

पहिली गोष्ट , पुन्हा निवडणूका लगेच होणार नाहीत .
झाल्या तर सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादी ला च होईल हे bjp आणि सेने ला पण माहित आहे .
युती न करता लढल्यास शिवसेना आणि bjp यांची मते वेगवेगळी होतील .

वंचित बहुजन आघाडी ला जेव्हडी मते विधानसभा क्षेत्रात मिळाली , तेव्हड्या पेक्षा कमी फरकाने हारलेले 23 जण काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे आहेत , आणि 5 ठिकाणी v.b.a दुसऱ्या नंबर वर आहे , तुम्हाला असे वाटत नाही का , या 23 ठिकाणी राष्ट्रवादी पण काही उपाय करतील ? निदान 10 ठिकाणी तरी बदल होईल , आणि यात दौंड सहित काही जागा निवडून येतील ?

बाकी राम मुद्दा , 370 राष्ट्रीय सुरक्षा हे सगळे ठीक आहे
पण महाराष्ट्राचा विकास या मुद्द्यावर bjp kaa निवडणुकीत उतरली नाही , हे कळत नाही .
2014 च्या 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा , ला त्यांनीच 2019 ला उत्तर दिले असते तर आता वेगळे चित्र दिसले असते , आणि ह्याचा फटकाच त्यांना बसला आहे , हे आपण का मान्य करत नाही काय माहीत .

असो..
बाकी राज्यपाल यांनी याआधीच निपक्ष पणे सर्वात मोठा पक्ष जो bjp आहे , त्यांना सरकार स्थापने साठी पाचारण करावयास हवे होते हे माझे मत .
पण ते जर राम मंदिर निकालाची वाट पाहत असतील तर त्याचा निकाल काय लागणार हे त्यांना आधीच माहिती आहे हे सुद्धा पुढे येते आणि राज्यपाल पण त्यांचेच ऐकून वेळ काढू पणा करत आहेत हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही . ह्या अश्या वागण्यानेच bjp चा पण वैताग लोक करत असतील असे मला वाटते

सुबोध खरे's picture

6 Nov 2019 - 10:13 am | सुबोध खरे

फेर निवडणूक झाल्या तर भाजप ३७०, राम मंदिर यावरच प्रचार करेल असे आपल्याला वाटते का?

ते इतके दुधखुळे असते तर देशात इतक्या ठिकाणी निवडून आलेच नसते.

फेर निआवडणूक झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची ची मते अजूनच कमी होतील. कारण भाजपाला कंटाळून काही लोकांनी त्यांना मते दिली होती ते लोक सध्याच्या त्यांच्या नाकर्तेपणाकडे बघून परत भाजपला मत देण्याची शक्यता आहे.

बाकी राज्यपालांनी सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले असते तर शिवसेनेने पक्षपात केला म्हणून त्यांच्यावर (आणि भाजप वर) टीकेची झोड उठवली असती.

राम मंदिर निकालाचा महाराष्ट्रात सत्तेशी काहीही संबंध नाही.

माझ्यासारखे असंख्य भाजपचे सहानुभूतीदार लोक आहेत ज्यांना राम मंदिराशी काहीही घेणे देणे नाही. केवळ मुस्लिम/ अल्पसंख्याक यांचे लांगुलचालन करूनच सत्ता मिळवता येते या सिद्धांताला छेद देणारे एक स्मारक यापलीकडे आम्ही त्याकडे पाहत नाही.

किंवा भाजप हा शुद्ध आणि पवित्र पक्ष आहे असेही आम्ही मानत नाही.

केवळ घराणेशाही वर चाललेला पक्ष नाही आणि अगदी तळागाळातील माणूसही तेथे उच्च स्थानी पोहोचू शकतो म्हणून भाजपला मत देणाया गटातील माझ्यासारखे लोक आहेत.

शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही.

कोळशाच्या व्यापारात हात काळे होणारच परंतु त्या पक्षातील लोकांच्या आपल्या निष्ठा आजमितीला तरी देशाबाहेर विकल्या गेलेल्या नाहीत.

तुमच्या वयक्तिक मतांबद्दल आक्षेप नाहीच .

पण भाजप ने 2019 च्या निवडणुकीत मात्र विकासा पेक्षा राष्ट्रीय मुद्दयांवर भर दिला आहे , हे त्यांच्या भाषणातुन स्पष्ट दिसत होते , मग हा दुधखुळे पणा होता की आम्हाला पर्याय नाहीच haa अति आत्मविश्वास होता ?

बाकी कोणी कोणत्या पक्षाला का मतदान करतात हे मुद्दे आणि कारणे वेगवेगळे असतात .आणि सगळ्यांनाच त्यांचे मत योग्य वाटते .

बाकी

फेर निआवडणूक झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची ची मते अजूनच कमी होतील. कारण भाजपाला कंटाळून काही लोकांनी त्यांना मते दिली होती ते लोक सध्याच्या त्यांच्या नाकर्तेपणाकडे बघून परत भाजपला मत देण्याची शक्यता आहे

नाकर्ते पणा कशाचा ? जे सत्तेत आहे त्यांनी त्यांचा कर्ते पणा दाखवावा .
ज्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता पण सोडून भाजपा मध्ये जातो . उभी छेद वगैरे म्हणून , किती तरी नेते राष्ट्रवादी मधून भाजप घेतो त्यांच्याकडून कर्तेपणा ची अपेक्षा का ?.. तर त्यांनी ठोस कामावर का निवडणुक लढवू नये ?
विकास झाला , स्वछ नीती हे जे त्यांचे समर्थक बोलतात , तेच त्यांनी दाखवून द्यायचे होते , नक्कीच त्यांना 120-130 सीट तरी मिळाली असती .
भाजपा च्या नाकर्तेपणा मुळे आता विरोधात मतदान झाले असे हि मग तुमच्या विधानावरून वाटते .

बाकी राज्यपालांनी सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले असते तर शिवसेनेने पक्षपात केला म्हणून त्यांच्यावर (आणि भाजप वर) टीकेची झोड उठवली असती

मग काय केले पाहिजे राज्यपालांनी ? वेळ जाई पर्यंत आपल्याकडे कोणी येतोय का हि वाट पाहायची ? आणि नाहीच aale कोणी तर राष्ट्रपती राजवट लागू करायची ?
त्यांनी त्यांचे काम करायचे ase माझे मत , मोठ्या पक्षाला बोलावले पॅबीजे होते , सरकार स्थापन करण्याचा पाहिला हक्क भाजपा चा आहे आता , शिवसेना , आणि राष्ट्रवादी he नंतरचे .

Bjp चे काय म्हणणे आहे मग ? शिवसेनेने 2014 प्रमाणे लाचारीने आमच्याकडे यावे आणि आपण सरकार स्थापन करावे, असे ?
उलट त्यांनी सरकार स्थापन करायला जावे , आणि नाही झाले तर शिवसेने मुळे नाही झाले ase म्हणून विरोधी पक्षात बसू असे म्हणून शिवसेने वर टीकेची झोड उठवून द्यावी .. आणि नंतरच्या निवडणुकीत शिवसेना विश्वास दर्शक नाही म्हणून शिवसेne ला मतदान करणाऱ्या काही लोकांची मते हि आपल्या पारड्यात झुकवावी .

पण कसे आहे त्यांना हि सरकारच बनवायचे आहे , म्हणून हा घोळ चालू आहे , दिसताना शिवसेना दिसत असली तरी भाजपा सुद्धा ह्या सर्व खेळाला कारणीभूत आहेच .

सुबोध खरे's picture

6 Nov 2019 - 12:22 pm | सुबोध खरे

सत्तेच्या खेळात कोणीही धुतल्या तांदुळाचा नाही.
भाजपच्या जागा पूर्ण बहुमताला कमी आहेत. संजय राऊत यांनी ५ वर्षे बेताल वक्तव्ये करून भाजपच्या एका मोठ्या गटाला दुखावलेले आहे (आणि त्याना श्री उद्धव ठाकरे यांची फूस होती अशी त्यांची खात्री होती) या गटाला असे वाटते आहे कि शिवसेनेला अजिबात भीक घालू नये.
याउलट काही लोक असे आहेत ज्यांना असे वाटते आहे कि शिवसेना हा मित्र पक्ष आहे त्यांना जिथे "तोंड मारायचे आहे ते मारून येउ द्या". मग शांतपणे बसून चर्चा करून सरकार स्थापन करता येईल.
शिवसेनेस माहिती आहे कि आपल्याला शेवटी भाजप शिवाय पर्याय नाही परंतु भाजपच्या मागे फरफटत जायची त्यांची तयारी नाही. गेल्या पाच वर्षेत केलेली वक्तव्ये आता उलटल्यामुळे त्यांना भाजपशी सामंजस्याने वागणे कठीण होऊन बसले आहे.
दोन्ही पक्षांचा असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार आहे.
राज्यपालांच्या दृष्टीने शिवसेना भाजप यांची युती निवडणुकीपूर्वींची आहे. त्यामुळे त्यांनी येऊन राज्य स्थापनेचा दावा करावा हे घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे. त्यांनी असे काही केले नाही तर ८ नोव्हेंबर नंतर त्यांना भाजपला बोलावणे घटनेच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे. तोवर ते थंड बसले आहेत अर्थात त्यांचा राष्ट्र्पतींशी संपर्क असेलच आणि राष्ट्रपती हे तर स्वतः सर्वोच्च न्यायालयात वकील होते.त्यामुळे घटनेप्रमाणे जे काही आवश्यक आहे तेवढे ते करणारच.
या सर्व प्रकरणात शिवसेनेचा धीर सुटू लागेल असा श्री फडणवीसांचा होरा आहे म्हणून तेही गप्प आहेत. नाहीच सरकार स्थापन झाले आणि राष्ट्रपती राजवट लागली तर शिवसेनेवर खापर फोडून ६ महिन्यांनी फेर निवडणूक घेता येईल असा त्यांचा हिशेब आहे.
बाकी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शिवसेनेबरोबर फार काळ जाता येणार नाही हेही स्वच्छपणे माहिती आहे. त्यामुळे उगाच ६-८ महिने सरकार चालवून मग फडणवीसांना ते अर्पण करणे किंवा त्यानंतर फेरनिवडणूक घेऊन आपल्या जागा कमी करण्यात त्यांना रस नाही. सोनिया गांधी यांनी तर शिवसेनेबरोबर जाण्यास स्वच्छ नकार दिला आहे.(निधर्मी म्हटले कि शिवसेनेसारख्या हिंदुत्व वादी पक्षा बरोबर जाऊन आपले इतर राज्यात नुकसान करून घेण्याची त्यांची तयारी नाही) शिवाय त्यांचा श्री शरद पवार यांच्यावर बिलकुल विश्वास नाही. तसा तो उद्धव ठाकरे याना पण अजिबात नाही. २०१४ मध्ये श्री शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन शिवसेनेस तोंडघशी पडले होते हे श्री उद्धव ठाकरे विसरणे कदापि शक्य नाही). श्री शरद पवार सोयीचे असले कि निधर्मी असतात आणि तरी शिवसेनेसारख्या पक्षाशी युती चालते किंवा भाजपाला पाठिंबाही देता येतो. त्यांच्याकडे कोणतीही ठोस विचारसरणी नाहीच. केवळ सोनिया गांधी याना पंतप्रधानपदास विरोध करण्यासाठी स्थापन झालेला हा पक्ष आता त्याचे मूळ कार्यकारणचे राहिलेले नाही. ती केवळ निवडून येऊ शकेल अशा उमेदवारांची स्वार्थासाठी बांधलेली मोट आहे. ते एकदा शिवसेनेला गूळ लावतात मग म्हणतात जनादेश भाजपलाच आहे आणि आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश आहे. मग परत म्हणतात दुसरा पर्याय असेल तर आम्ही त्याचा विचार करू. श्री शरद पवारांना दिल्लीत जाऊन श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे कारणच काय आहे? सगळे सत्तेचा सारीपाट खेळत आहेत. दोन पावले पुढे, एक पाऊल तिरके आणि एक पाऊल मागे असे चालू आहे
या सर्व लफड्यात हे गुऱ्हाळ चालवून शिवसेनेची (आणि भाजपची) जितकी नाचक्की करता येईल तितकी काँगेस राष्ट्रवादी करण्याच्या प्रयत्नात आहे.
बाकी जनतेला कोण विचारतो?

प्रसाद_१९८२'s picture

6 Nov 2019 - 1:06 pm | प्रसाद_१९८२

प्रतिसाद आवडला.
--

सध्याचा तमाशा करुन सेना, भाजपा बरोबर स्वत:चे नुकसान देखील करत आहे हे माझ्या सारख्या सर्वसामन्य माणसाला कळते, तर ते शिवसेनेच्या नेतृत्व व नेत्यांना का कळू नये ? हाच प्रश्न पडलाय !
--

तुम्ही लिहिले 90% बरोबर आहे .

राष्ट्रवादी हा निवडून येणाऱ्या नेत्यांची मोट आहे , हे मात्र या निवडणुकीने पुसले आहे असे मला वाटते .भल्या भल्या नेत्यांना पाडले आहे त्यांनी , त्यात शरद पवार यांच्या मुळे काँग्रेस ला पण फायदाच झाला आहे यावेळेस.

शिवसेनेची नाचक्की काँग्रेस राष्ट्रवादी करत नाही असे हि मला वाटते .
शिवसेना आणि भाजपा यांनी त्यांचे बघून घेतले तर बाकी कोणी मध्ये येणारच नाही .

उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे दोन्ही main नेते दिल्लीत भेटतात , तसे शिवसेनेचे आणि भाजपा चे का भेटत नाही , युती मग पटत नव्हते तरी दोघांनी स्वार्था साठी केली होती का ? हा संदेश पण जनतेत जातो आहेच ..

2014 ला शिवसेना मागे आली नसती तर भाजपा राष्ट्रवादी च्या पाठींब्यावर सत्तेत येणार होतीच . त्यामुळे हे काँबिनेशन टिकले किती असते आणि आता कसे 6 महिनेच टिकेल वगैरे जर तर च्या गोष्टी आहेत .

भाजपा आणि शिवसेने ने एकत्र चर्चा करून प्रश्न सोडवावा आणि सत्तेत यावे .ज्यांना एकत्र बसून चर्चा करता येत नाही त्यांनी युती , राष्ट्रवादी , काँग्रेस यावर बोलूच नये ..
आणि राष्ट्रवादी ने विरोधी पक्षात बसावे ase माझे मत .
आणि हेच होण्याची चिन्हे आहेत ..

सुबोध खरे's picture

6 Nov 2019 - 7:43 pm | सुबोध खरे

२०१४ मध्ये सिंचन पासून अनेक घोटाळे नुकतेच उघडकीस आले होते त्यामुळे राष्ट्रवादीला फेर निवडणूक फारच महागात पडली असती याशिवाय भाजपच्या १२२ जागा होत्या. त्यामुळे अधिक २२ आमदार "मिळवणे" फारच सोपे होते. यामुळे अधिक गडबड न करता राष्र्टवादीने भाजपाला पाठिंबा देऊन प्रश्न निकालात काढला होता.
मुळात शिवसेना (६३), काँग्रेस (४२) आणि राष्ट्रवादी (४१) या तिन्ही पक्षात त्यांच्या जागा सर्वात कमी होत्या. तेंव्हा या विळ्याभोपळ्याच्या मोटेत त्यांच्या हातात काहीच पडले नसते.

तुमच्या घोटाळ्याबद्दल आम्ही आस्ते कदम जाऊ हे भाजप कडून वचन घेऊन राष्ट्रवादीने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला असेही ऐकिवात आले होते.
ख खो दे जा

आता परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या जागा ५४ या शिवसेनेच्या जागां(५६) पेक्षा २ नेच कमी आहेत. शिवाय जनता घोटाळ्यांबद्दल विसरली आहे.

श्री शरद पवारांनी आपले मार्केटिंग फार उत्तम करून घेतले आहे. पावसात भिजणे इ इ.
शिवाय भाजपने बरेच "गणंग आयात करून" आपली प्रतिमा मालिन केली आहे आणि आता त्यांच्या जागा १२२ वरून १०६ पर्यंत खाली आल्या आहेत. म्हणून राष्ट्रवादीने "विळ्याभोपळ्याचि मोट" बांधून आपली मान घोटाळ्यांच्या चौकशीतुन काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्या साठी श्री शरद पवारांनी दिल्ली दौरा सुद्धा केला श्री संजय राऊत यांच्याशी बऱ्याच बैठकी खलबते केली.
परंतु काँग्रेस श्रेष्ठी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास अजिबात तयार नाहीत आणि त्यांची सेक्युलर प्रतिमा शिवसेनेबरोबर मलिन होते आहे.
त्यामुळे काँग्रेसकडून थंडा प्रतिसाद मिळाल्यावर आज श्री शरद पवारांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आहे असे सांगून शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसली.

शिवसेना सुद्धा जागा ६३ च्या ५६ झाल्या असताना भाजप बरोबर ५०-५० ची मागणी करताना भाजपचा पराभव झाला असल्यासारखे वागत होते. आजही भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी तो एकच पक्ष १०० ओलांडून पुढे आहे हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

बाकी equal (समान) आणि equitable (प्रमाणात) या दोन शब्दात शिवसेना गल्लत करीत आहेत असा भाजप श्रेष्ठींचा पवित्रा आहे. भाजपने १५२ जागा लढवल्या आणि शिवसेनेने १२४ असे असताना भाजपने ५०-५० आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदास मान्यता दिली असेल हे मान्य करणे कठीणच आहे.

तुम्ही लिहिता ते विश्लेषण म्हणून चांगले वाटले तरी ते तसेच असेल असेच काही वाटत नाही .
उदा.
2014 ला आपल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला झाकण्यासाठी राष्ट्रवादी ने पाठींबा दिला ,
मला वाटते 122 पासून 145 गाठायला अवघड नव्हते , म्हणून bjp च्याच लोकांनी शिवसेने ला नाममात्र पदे देता यावीत म्हणून खेळलेली ती चाल होती. आणि पार्टी विथ डिफरन्स ह्या इमेज ला येथेच पहिला सुरुंग लावला गेला .
गाडीभरून पुरावे असणारे हेच , पुढे राष्ट्रवादी च्या नेत्याना जेल मध्ये टाकण्याच्या भाषा करणारे , पुढे गप्प झाले , अगदी मोदींनी पवार यांना राजकीय गुरु म्हणणे आणि बारामती मध्ये भेट घेणे हे सुद्धा घडले .

मग आधी तावा तावा ने बोलणे आणि नंतर गळा भेट घेणे हे उघड दिसत होते .

नंतर या निवडणुकीत पवारांनी मार्केटिंग केले , पावसात भिजले ect.
याबद्दल .
राष्ट्रवादी आणि काँग्रेस नावाला पण न ठेवण्याचा चंग बांधलेली bjp .आणि स्वतःच्या अतिआत्मविश्वासात रमून , विकास सोडून भरकटलेल्या मुळे त्यांच्या विरोधात मते गेली , हे bjp आणि समर्थक कधी मान्य करणार ? पवार 2014 ला पण होते . त्यामुळे मार्केटिंग , वगैरे मला काही वाटत नाही . पवारांची तळागाळात पोहचण्याची क्षमता विरोधक हि मान्य करतील , त्यामुळे स्वछ प्रतिमा , पार्टी विथ डिफरन्स , acche din , विकास हे 2014 चे कुठलेच बिरुद भाजपा ला मिरवता आले नाही .
तरी वंचित मुळे 10-20 सीट्स चा tari फायदा युती ला झाला हे ते पण नाकारणार नाही .. त्यामुळे 100 च्या वर जरी उमेदवार निवडून आले तरी bjp ला लोकांची पुर्ण सहानभूती अजूनही मिळवता आली नाही , आणि हे हेरूनच शिवसेने ने आग्रही भूमिका मांडली.

शरद पवार यांना काँग्रेस चा प्रतिसाद मिळाला नाही .म्हणून ते विरोधात बसणार म्हणाले असे तुम्ही म्हणत आहात ,
निवडणूक निकाला पासून ते हेच म्हणत आले आहेत . Tv वरती तुम्ही पाहिले असेल , बाकी त्या मागचे काही तेच जाणो ..

राहता राहिला काँग्रेस चा प्रश्न , मला वयक्तिक पहिल्या पासून वाटते ते सत्तेत पाठींबा देणार नाही , कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्यांचेच प्राबल्य सत्तेत राहील , मग विरोधात बसने काय वाईट हे वाटणे चूक नाहीच , त्यामुळे bjp प्लस सेना सत्तेत येईल हेच माझे पहिल्या पासून म्हणणे आहे .

शिवसेना 2014 चा आणि त्यानंतर च्या फेरफाटीचा बदला घेत आहे हे मात्र नक्की .

बघू येणारा आठवडा सगळे उत्तरे घेऊन येईलच .

संजय पाटिल's picture

7 Nov 2019 - 12:42 pm | संजय पाटिल

भाजपच्या जागा कमी होण्याचे कारण युति हेच आहे. २०१४ प्रमाणे भाजपाने युती न करता निवडणूक लढवली असती तर जागा वाढल्या असत्या असे मला वाटते. बर्‍याच ठिकाणी भाजपाचा उमेदवार नाही म्हणून लोकांनी शिवसेनेला मते दिली आहेत...

भंकस बाबा's picture

6 Nov 2019 - 6:59 pm | भंकस बाबा

विश्लेषण उत्तम केले आहे.
किंतु आता सगळ्यांनी घाटाचे पाणी पिले आहे. वंचित, ओवैसी, पवार आणि कोंग्रेस काही जागावर धोरणात्मक युति करू शकतात. असे झाले तर भाजपाला भारी पडेल. तेव्हा तेलही गेले तुपहि गेले व धुपाटने राहिले ऐसी अवस्था होईल.
तरीही माझा आतला आवाज सांगतो की शिवसेना भाजपाबरोबर जाईल. आणि पदरात जास्त मंत्रीपदे पाडुन घेईल

बरोबर आहे. मी ह्याच वयोगटात आहे आणि राममंदिर होईपर्यंत तरी मला भाजपाला मतदान करावे लागेल (आणि युती असली तर नाईलाजाने युतीला).
कारण दुसरा कोणताही पक्ष ह्या मुद्द्याच्या बाजूने लढू शकत नाही.

गामा पैलवान's picture

5 Nov 2019 - 6:34 pm | गामा पैलवान

लोकहो,

मोदी, शहा व फडणविसांच्या मनात नक्की काय आहे? तिकीट वाटप नेमकं कोणत्या आधारावर झालं? भाजपच्या घसरणीला तिथपासनं सुरुवात झालीये.

एकीकडे बावनकुळेंसारखे कार्यप्रवीण निष्ठावान डावलायचे आणि दुसरीकडनं आयारामांना आयात करायचं. त्याच वेळेस शिवसेनेलाही शिरजोर होऊ द्यायचं नाही. त्याकरता तिकीट वाटपात जमेल तितकी संदिग्धता ठेवायची. म्हणून युती लांबली.

याचा अर्थ काय लावायचा? मोदी शहांनी फडणविसांना खच्ची करायला मुद्दाम खेळी केली आहे का? की फडणवीसही या खेळात सामील आहेत? आज फडणवीस एकाकी पडलेले वाटतात का? बीबीसी मराठीवर हा लेख वाचला : https://www.bbc.com/marathi/india-50290626

संजय राऊत फाटक्या तोंडचे आहेत हे सगळ्यांना माहितीये. पण भाजपच्या चुकांची चर्चा होत नाही. ती व्हावी म्हणून हा संदेश.

आ.न.,
-गा.पै.

अहो मग शिल्लक कोण ? चिक्कीताई खडसे सगळ्यांचा गेम झालाय
फडण २० गेले तर राहिले कोण ? विखे कि गडकरी

शुभांगी दिक्षीत's picture

5 Nov 2019 - 7:13 pm | शुभांगी दिक्षीत

..

रमेश आठवले's picture

5 Nov 2019 - 10:35 pm | रमेश आठवले

शिव्या सेना
बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन विभाग झाले आहेत असे वाटते. एकाचे प्रमुख, मुखदुर्बळ उद्धव उपाख्य डॉ. जेकिल आणि दुसऱ्या शिव्या सेनाविभागाचे प्रमुख संजय उपाख्य मिस्टर हाईड .

एकुलता एक डॉन's picture

6 Nov 2019 - 12:58 am | एकुलता एक डॉन

good cop bad cop routine

रविकिरण फडके's picture

6 Nov 2019 - 9:55 pm | रविकिरण फडके

शिवसेनेत फूट पडून २०-२५ आमदार भाजपाच्या बाजूला येतील, हीही शक्यता आहेच की.
फडणवीस शांत आहेत असे दिसते आहे पण ते काही शांत बसलेले नसणार.

किती तरी वर्ष महारष्ट्र नी एकपेक्षा अनेक पक्षांची सरकारे बघितली पण एवढं नालायक पण कधीच बघितला नाही.
फक्त दुसरे च सत्र चालू आहे एकसंघ राजवटीचे .
सेना आणि bjp ह्या राजकीय पक्षांचे.
किती ही गैर जिम्मेदार वागणूक.
ह्यांना राज्याच्या हिता पेक्षा स्वतःच्या इगो ची जास्त काळजी आहे.
हिंदू वादी स्वतःला label चिकटवून घेतलं आहे आणि राज्यातील बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या हाताशी खेळायला ह्या दोन
नालायक राजकीय पक्षांना काहीच वाटत नाही.
Bjp सर्व दोष सेनेला देवू शकत नाही bjp सुद्धा तेवढीच जबाबदार आहे.
राष्ट्रपती राजवट लागू होवून नंतर निवडणूक झाली तर bjp आणि सेना ह्या दोन्ही पक्षांचे नामोनिशाण ह्या राज्य मधून मिट वले जाईल.

५ वर्षा आधी तर आम्ही वडे दिले आम्ही चिकन सूप दिले से चालले होते

शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून विचारणा करण्यात आली आहे. आता शिवमहाआघाडी होणार काय ?

रमेश आठवले's picture

11 Nov 2019 - 6:52 am | रमेश आठवले

पवारांनी पाठिंब्या साठी खालील अटी घातल्या आहेत.
१. हा पोरखेळ नाही.स्वतः मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागेल. उंटावरुन शेळ्या हाकता येणार नाहीत.
२. तुमच्यावर दोन रिमोट कन्ट्रोल असतील. एक माझ्या कडे आणि दुसरा सोनियाकडे.
३. तुमच्या कुत्र्याचे मुस्काट दाबावे लागेल.
४. मागच्य वेळेस भाजपाच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना केंद्रातील तुमच्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगितले नव्हते. तसे आता चालणार नाही. आधी अरविंद सावंतांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

चौकस२१२'s picture

11 Nov 2019 - 8:05 am | चौकस२१२

टीव्ही वरील सोपं ऑपेरा ची दुकान जी चालतात / कथा रखडत जातात त्या मागचे मुख्य कारण असते कि आधीच करार करताना/ किंवा कुटुंबामध्ये गोष्टी ठरवताना स्पष्टपणा नसणे .. गोष्टी संदिग्ध ठेव्याच्या ,, मग नंतर हे घोळ.. युती मध्ये कोणाचे किती आले तर सत्ता कशी वाटपायची यावर काही नक्की ठरले नवहते काय? कि दोन्ही पक्षांना हे आधीच ठरवणे सोयीचे नवहते
जे काय असेल हा तमाशा व्हायला नको होता

- शिवसेनेला आपण जिकली, कशी भाजपाची जिरवली असे आत्ता वाटत असले पण त्यांचा "चंद्रशेखर " होऊ शकतो आणि त्यांची सत्तेसाठी लाचारी उघडी पडू शकते हे कळत नाही का ? आधीच बाळासाहेबांनंतर मराठी माणसाच्या मनातून शिवसेना उतरली त्यात हे राडे
- मग भाजपने करायला तरी काय पाहिजे होत?
कधी नव्हे ते १००+ जागा मिळाल्या ते सुद्धा महाराष्ट्रात ते करताना शिवसेनेचे लोढणे होईल असे वाटले नसले
दुर्दवी .
आता निवडणूक झालाय तर सुक्या बरोबर ओलं जळत तशी परस्थिती भाजपची होणार
- राष्ट्रवादी ला फायदाच बसून गम्मत बघा, अजूनही जनतेने त्यांना स्वीकरलेलं नाहीये पण या उन्मादात लोक ते विसरणार .
- काँग्रेस काय चालू आहे .. दुकान एकूणच थंड आहे नाहीतरी

जॉनविक्क's picture

11 Nov 2019 - 9:13 am | जॉनविक्क

जर सरकार स्थापन झाले नाही तर भाजपमधे मेगाभरती झालेल्यांचे काय होणार हा खरा प्रश्न बनेल

चौकस२१२'s picture

11 Nov 2019 - 10:22 am | चौकस२१२

हो बरोबर भाजपला भोवलेली अजून एक चूक.. सातारकर भाजपात? लोक हसत राहिली ,,त्यांनी खरा तर "स्वयंभू" स्वतत्र राहाव कोणत्या पक्षात कसे काय जमणार ! वंशजांचं!

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मर्सिडीझ साठी पठाणी व्याजावर कॉ+ रा कॉ महा आघाडी कडून कर्ज घेतले आहे. त्याचे पठाणी व्याज त्यांना दर महिन्याला हप्त्याहप्त्याने द्यावे लागणार आहे. त्याचे पहिले डाऊन पेमेंट अरविंद सावंत या अवजड उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याने भरावे लागले आहे.

(महाआघाडीने मुळातच शिवसेनेस रालोआ( NDA) मधून बाहेर पडा असे निर्वाणीचे पत्र दिलेले आहे.)

यानंतर आम्ही म्हणून तिथेच गाडी चालवायची, आम्हाला नको त्या रस्त्यावर ती न्यायची नाही, अशा अनेक अटी घालून ते शिवसेनेस जेरीस आणून शेवटी उद्धव ठाकरे यांचे एच डी कुमारस्वामी करणार यात शंका नाही.

श्री मोदी आणि शहा हे बोलत नाहीत परंतु कधीही "गोष्टी विसरत नाहीत". तेंव्हा फेरनिवडणूक होतील तेंव्हा शिवसेनेस परत आपल्या बरोबर घेतील याची शक्यता फारच कमी आहे.

त्यातून शिवसेनेने हिंदुत्ववादाची गाय सोडून निधर्मांधांची बकरी पिळायला घेतली आहे. तेंव्हा उद्या लग्नात आम्हाला गोमांसाचा नैवेद्य हवा म्हणून ते अडून बसले तर शिवसेनेची फार मोठी अडचण होणार आहे.

आज केवळ भाजपला विरोध म्हणून काँग्रेसने त्यांना टेकू दिला तरी उद्या तो नक्कीच काढून घेणार आहेत कारण मतभेद "मूलभूत विचारात" आहेत. ( येथे कोण बरोबर कोण चूक असा मुद्दा नाही प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असेल).

बाकी शरद पवार यांच्या इतका धूर्त आणि पाताळयंत्री नेता महाराष्ट्रात नाही. सर्वात प्रथम ते शिवसेनेकडून किमान समान कार्यक्रम लिहून मागतील. त्यानंतर गृह ( आपले खटले प्रलंबित करण्यासाठी) किंवा महसूल( पैशावाचून सगळंच अडतं) सारखी महत्त्वाची खाती मागतील.

मुळात जर राज्यपालांनी त्यांच्याकडे सरकारला साथ देणाऱ्या पक्षाच्या आमदारांची यादी लेखी स्वरूपात मागितली तर या कटकटी मर्सिडीझ मध्ये बसायच्या अगोदरच सुरु होतील. त्या

तून काँग्रेसची( राष्ट्रवादीची संस्कृती वेगळी नाही) संस्कृती हि च "खा आणि खाऊ द्या" अशी असल्यामुळे काँग्रेसचे आमदार आपली अर्थपूर्ण कामे करण्यासाठी सेनेच्या मंत्रांकडे अशक्य मागण्या करतील आणि त्या पूर्ण करणे कठीण आणि न करणेहि कठीण.
उदा. एखाद्या रस्त्याचे कंत्राट आपल्या माणसाला देण्याचे ठरवले असेल आणि एखादा आमदार ते कंत्राट माझ्या माणसालाच मिळायला हवे म्हणून अडून बसला तर असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती होईल. आतापर्यंत अशी कामे झाली नाही तर भाजपच्या नावाने सामना मध्ये गरळ ओकून गप्प बसता येत होते. आता "सरकारही आपलेच आणि वृत्तपत्रही आपलेच."

श्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवल्याने (आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद आणि ते सुद्धा पहिली अडीच वर्षेच मिळाले पाहिजे अशी मागणी) त्यासाठी द्यायला लागणारी किंमत त्यांना आयुष्यभर छळत राहील अशीच परिस्थिती आहे.

मी बाळासाहेबांना वचन दिले आहे कि एक दिवस मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल हे वारंवार म्हणत होते. तो आत्ताच आणि आजच झाला पाहिजे का?मुळात आपले १२४ पैकी केवळ ५६ आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री आमचाच आणि तो आत्ताच असा हट्ट धरणे किती समंजसपणाचे आहे.
आणि हि पहिलीच वेळ आहे का? पूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हता का? शिवसेना पाच वर्षातच संपणार होती का?

आता महाआघाडी मुंबई महापालिकेत सुद्धा भाजपला सोडचिट्ठी द्या म्हणून हटून बसणार तिथे २२७ पैकी शिवसेनेच्या ८४ आणि भाजपच्या ८२ जागा आहेत. तेथे आता काँग्रेसच्या ३१ आणि राकॉच्या ९ नगरसेवकांच्या "आधारावर" शिवसेनेस काम करावे लागेल आणि हे लोक सुद्धा आता आपला वाटा ओरबाडून मागतीलच. उद्या एखाद्या विधेयकाला भाजप ने विरोध केला तर ते पास करण्यासाठी हे ४० नगरसेवक शिवसेनेस त्यांच्याच न्यायाप्रमाणे ५०-५० "द्या" म्हणून सांगतीलच. आणि हा खेळ जोवर शिवसेना सरकार चालवेल तोवर ते खेळणार कारण "आहेत त्या दिवसात मिळेल तितके पोट भरून घ्या" हीच मनोवृत्ती असणार आहे.

एकंदर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ अशी स्थिती करून ठेवली आहे.

एक दिवस मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल
फक्त एक दिवस?

चौकस२१२'s picture

11 Nov 2019 - 4:11 pm | चौकस२१२

डॉक्टर तुमची हि प्रतिक्रया मुख माध्यमाकडे पण पाठवा समर्पक आहे

गामा पैलवान's picture

11 Nov 2019 - 6:05 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तुमच्या या संदेशाशी सहमत आहे. शिवसेनेने काँग्रेस व/वा पवारांचा पाठींबा आजिबात घेऊ नये या मताचा मी आहे. त्यापेक्षा सेनेने कुणालाही बाहेरून पाठिंबा द्यावा आणि दोनेक वर्षांत पक्ष मजबूत करून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात.

मात्र एक गोष्ट इथे प्रामुख्याने उठून दिसते, ती म्हणजे शिवसेना वगळता बाकी कोणीच मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट धारण करायला तयार नाही. त्यामुळे बाहेरून पाठिंबा द्यायचा तर तो कोणाला हा यक्षप्रश्न आहेच. म्हणून बहुधा शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत आक्रमक दिसते आहे.

काहीही असलं तरी पुढील दोन वर्षं सेनेस पक्ष मजबूत करायला भरपूर मेहनत घ्यावी लागेल.

आ.न.,
-गा.पै.

गड्डा झब्बू's picture

11 Nov 2019 - 10:47 am | गड्डा झब्बू

ABP माझा वरील हे विश्लेषण बरोबर वाटतंय.
...असा असेल भाजपचा "गेम ऑफ पेशन्स!

लहानपणी शाळेतल्या वर्गातल्या मुलास म्हटले की तुझी पेन्शल दे तर तो म्हणायचा त्याबदल्यात तुझे वासाचे खोडरबर दे.

विजुभाऊ's picture

11 Nov 2019 - 11:05 am | विजुभाऊ

बहुतेक बारामतीचे काका , कॉम्ग्रेस सोबत संसार थाटतील सेना त्याना बाहेरून पाठिंबा देईल.

सुबोध खरे's picture

11 Nov 2019 - 11:36 am | सुबोध खरे

असे होणार नाही. बारामतीचे काका इतके दुधखुळे नाहीत. कारण चुकून माकून हे सरकार उभे राहिले तर पहिल्या काही दिवसातच कोसळेल

उंट होऊन गाडी ओढण्यापेक्षा उंटाच्या गाडीत बसून उंट हाकणे जास्त सोयीचे, आरामाचे असते एवढा अनुभव तर राजकारणात त्यांना आहेच.

मग (शिवसेनेस) त्यापेक्षा भाजपच्या सरकारात उपमुख्यमंत्रीपद (आणि इतर मंत्रीपदे) काय वाईट होते?

"तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला" असे भांडण काय कामाचे

गड्डा झब्बू's picture

11 Nov 2019 - 11:37 am | गड्डा झब्बू

असे होण्याची शक्यता कमी आहे. मग ज्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदा साठी एवढी अडेलतट्टू भूमिका घेतली तिचे काय? चर्चेद्वारे महायुतीत १६ मंत्रिपदे अशीही मिळाली असती बाहेरून पाठींबा दिल्यावर तीपण मिळणार नाहीत. मंत्रिपद मिळवण्याची महत्वाकांक्षा असलेल्या व निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांत असंतोष पसरेल व फाटाफूट होण्याची शक्यताही वाढेल. एकवेळ भिन्न विचारसरणीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर कॉंग्रेसच्या पाठींब्यावर बेभरोशी-अल्पजीवी सरकार स्थापन करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतलेला शिवसेनेला परवडेल पण राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या संयुक्त सरकारला बाहेरून पाठींबा देणे त्यांना कदापि परवडणार नाही.
मी मतदानाचा पहिल्यांदा अधिकार बजावल्या पासून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कट्टर मतदार होतो. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची निवड बाळासाहेबांनी केली तेव्हापासून कट्टरपणा नाहीसा होऊन केवळ शिवसेनेचा सहानुभूतीदार मतदार राहिलो. पूर्वी संघटनेच्या जोरावर शाखा शाखांमधून चालणारी शिवसेना आता सामना मधून वाचाळवीर चालवत असलेले बघून तर आजपर्यंत सेनेशिवाय कुठल्याही पक्षाला मत न दिलेल्या माझ्यासारख्या कित्येक बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या मनात तिच्याविषयी घृणा उत्पन्न झाली नसेल तरच नवल. वानखेडे स्टेडीयमची खेळपट्टी उखडून झाल्यावर पुढे बरीच वर्षे काहीतरी उखडण्यासाठी हात शिवशिवत असलेल्या काही नतद्रष्टांनी आता संघटनेचा पायाच उखडून टाकला आहे. उद्धव ठाकरेंना विनाशकाले विपरीत बुद्धी झाली आहे एवढे नक्की.

सुबोध खरे's picture

11 Nov 2019 - 12:07 pm | सुबोध खरे

अहो असे वादग्रस्त विधान सार्वजनिक न्यासावर करायचे नसते.
बाळासाहेबांची पुण्याई, आई भवानीचा आशीर्वाद, मराठी बाणा आणि स्वाभिमान कुठे गेला?

आमच्या नेते मंडळींनी बेताल विधाने करण्यास मागेपुढे पाहिले नाही मग आम्ही मतदारांनी आमच्या भावना व्यक्त करण्यात का मागे हटावे.
>>>बाळासाहेबांची पुण्याई, आई भवानीचा आशीर्वाद, मराठी बाणा आणि स्वाभिमान कुठे गेला? >>>
हे सर्व काही बाळासाहेबांबरोबरच पंचतत्वात विलीन झाले असे म्हणायची पाळी आणली आहे आमच्यावर त्यांच्या वारसदारांनी.
कुठे आमचे नित्यस्मरणीय बाळासाहेब आणि कुठे हा नित्यतिरस्करणीय संजय राउत. यापुढे भाजप, शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मिम, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी गेलाबाजार नोटा समोरचे बटण दाबीन पण शिवसेना आणि मनसेला कधीही मत देणार नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Nov 2019 - 1:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

निवडणूकी नंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपा ने प्रचाराच्या वेळी अनेकदा जाहिर पणे सांगितले होते.

अगदी मोदी आणि शहांनी सुध्दा जाहीर सभेत बोलताना फडणवीसच मुख्यमंत्री होतील असेच म्हणाले होते.

"मी परत येईन" अशी भाजपाची जाहिरातही बर्‍याच वेळा पाहिली होती.

ज्यावेळी त्यांच्या गळ्यात गळे घालून निवडणुक लढवली तेव्हाच का बरे अक्षेप घेतला नाही? मग जनतेची फसवणूक कोणी केली? सत्याची बाजू कोणाची आहे?

भाजपाने ५०:५० चे आश्वासान दिले तरी केव्हा होते? २४ ऑक्टोबर च्या आधी की नंतर?

पैजारबुवा,

वरचे सगळे नविन रिप्लाय वाचले.. त्यातल्या बर्याचस्या रिप्लाय मध्ये , भाजपा बरोबर आणि शिवसेना, कॉन्ग्रेस , पवार सगळे चूकच हेच जाणवले.. असो. थोड्या वेगळ्या कोणातुन लिहितो.

मुळात गेल्या ५ वर्षापुर्वी भाजपा आणि शिवसेनेची भांडणे चव्हाट्यावर आली होतीच. त्यात खुद्द सेनाप्रमुखांनी युतीत आम्ही २५ वर्षे सडलो असे वक्तव्य केले होते.
त्यामुळे मुळात युती करण्याअगोदर भाजपा आणि शिवसेना यांना हे मुद्दे आठवलेच पाहिजे होते.. मग चुक शिवसेनेची असली तर भाजपाची पण तितकीच होती.

बहुमता मध्ये जर युती आली तर आपसात बोलुन थोडे नमते घेवुन थोडे अधिक-उने चे राजकारण त्यांना जमले पाहिजे होते.

भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर निवडनुक लढवता आली नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक कितीही ही भाजपाच्या बाजुने बोलत असले तरी विकासाच्या बाजुने काहीच जास्त बोलायला नसल्याने एकटे लढल्यास आपला पराभव होउ शकतो, असे भाजपा ला कदाचीत आधीच वाटले असेल असे मला वाटते. त्यामुळेच त्यांनी युती केली असेल. त्यामुळे युती न करता भाजपा १४५+ राहिली असती हे मला पटत नाही, उलट आता आलेले काही सीट्स जे ४-५ हजाराच्या आतिल फरकाने जे आलेत ते सुद्धा पडले असते.
त्यामुळे पराभव होईल असे आधी वाटत असेल तर निदान सत्ता स्थापन होतच नसेल तर २.५ वर्षे मुख्यमंत्री पण इतर खाती आपल्या कडे ठेवुन त्यांनी जनतेचा आदर ठेवला असा संदेश द्यायला हवा होता. आणि जर बहुमतात येवुन सत्ता स्थापण करायचीच नसेल तर मग वेगळेच लढायचे होते ना ? म्हण्जे शिवसेना आपल्याला फरफटत पाठिंबा देइनच ही भावनाच कशाला ठेवली पाहिजे होती.. म्हणजे सोबत फक्त स्वताच्या पदाच्या लोभासाठीच असा ही संदेश समाजात जातोच. त्यामुळे शिवसे

शिवसेने मात्र जी भुमिका शेवट पर्यंत घेतली, ती माझ्यासाठी आश्चर्यकारक होती, कारण माझय म्हणण्याने, भाजप + शिवसेना हेच सत्तेत बसतील असे वाटत होते.
मुळात त्यांनी येव्हड्या टोकाची भुमिका घेण्यात कदाचीत २०१४ पासुनची त्यांची भाजपा बरोबर चाललेली फरफट असेल असे आता वाटत आहे. त्यामुळे हे कारण पुढे करुन आम्हाला तुम्हीच नको असेच ह्यांच्या मनात मागे असेल, मुख्यमंत्री पद हे कारण ही असु शकते.. आणि ही शक्यता नाकारता येत नाही..

शरद पवार हे तळागाळात पोहचलेले नेत्रुत्व आहे, त्यांचा उभा पक्ष फोडुन , त्यांचे राजकारण संपले अशी वल्गना भाजपा करत राहिली.. कोणी कितीही धुर्त, पाताळयंत्री म्हणाले तरी आज या देशात त्यांच्या इतका राजकारणी माणुस शोधुन सापडणार नाही... राष्ट्रावादी संपली, अतिआत्मविश्वास, अहम हे सारे त्यांनी एका वारामध्ये जमिन दोस्त केले.. आणि वयक्तीक पणे मला तरी ते योग्यच वाटते आहे.
गोव्यात, मेहबुबा मुफ्ती बरोबर भाजपाने काय केले हे आपण पाहिलेच आहे, त्यामुळे ते तेंव्हा पाताळयंत्री, साम दाम दंड भेद वापरणारे वाटत होतेच,, त्यामुळॅ आपण काही केले तरी चालतय, मात्र इतर धुर्त . पाताळयंत्री हे बोलणे मला योग्य वाटत नाही.
त्या पेक्शा , सगळे एकाच माळेचे मणी असे मला वाटते..

( थोडेशे वयक्तीक : जरी यावेळेस मी राष्ट्रावादी ला वोट नाही करु शकलो, तरी मला नक्कीच शरद पवार यांचा एक राजकारणी म्हणुन आदर वाटतो, असेच माझे मत बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या बद्दल पण होतेच. हे तिनही माझे सर्वात आवडीचे नेते आहेत. आणि सद्य परिस्थीत अहंकाराला जमिनीवर आणण्यासाठी शरद पवारांची गरज होतीच)

मुळात आपल्या मित्रपक्षांबरोबर व्यवस्थीत राहुन नंतर येणार्‍या काळात सत्ता स्थापुन पवारांना आणि कॉन्ग्रेस ला वर डोके न काढुन देण्याची ही संधी भाजपा आणि शिवसेने ने गमावली आहे. आणि त्यामुळे आपल्याला विकासा वर बोलता न येणे, राष्ट्रावादी ला नावे ठेवुन त्यांचेच नेते पळवणे , आणि आपण हात वर केला तरी निवडुन येइल अशी भावना ठेवणे यामुळे मतदारांनी ही वेळ भाजपा वर आणली आहे असे माझे स्पष्ट मत आहे, भले शिवसेना हे त्याचे कारण झाले असले तरी त्यांना पण ही परिस्थीती माहित आहे..

टक्केवारीच्या आधारावर बोलायचे झाले तर भाजपा व शिवसेना वेगवेगळी लढली असती तर त्या दोघांची मते वाढली असती व मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसची मते कमी झाली असती अस दिसतंय. तसेच पुढच्या वेळेस भाजपा व शिवसेना वेगवेगळी लढली तर दोन्ही पक्षात बंडखोरी अजिबात होणार नाही. पाय खेचण्याचा प्रश्नच शिल्लक राहणार नाही. हे दोन्ही यावेळचे प्रश्न पुढच्या निवडणूकीत दोघांचेही सुटणार आहेत. :)

मी मायबोलीवर पुण्याच्या स्थितीबद्दल बोलताना जे लिहिल आहे ते खाली डकवतोय. ते उदाहरण म्हणून पहायला हरकत नाही. असाच अभ्यास खरतर इतर ठिकाणांचा केला पाहिजे.

पण अजून निवडणूक आयोगाने सांख्यकीय डाटा उपलब्ध केलेला नसल्याने महत्वाची बाब म्हणजे लढवलेल्या जागेनुसार मिळालेली मतांची टक्केवारी काढता येत नाही.

उदा. २०१४ ला लढवलेल्या जागांनुसार भाजपाला 31.15% मते मिळाली होती तर सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता ती 27.8% होती.
यावेळेस महाराष्ट्राचा विचार करता ती २५.७% आहे पण लढवलेल्या जागांनुसार अजून टक्केवारी कळलेली नाही.

असो.
----------------------------------------------------
शिवसेनेची भरपूर मते (अंदाजे ८०% तरी) मनसे कडे वळली आहेत. २०१४ ला १००९४१ (५१.१५%) मते होती मेधाताईंना. ती थोडी १०५२४६ (५२.५%) वाढली आहेत यावेळेस.

मात्र म॑नसेच्या शिंदेसाहेबांची मागील निवडणूकीतील २१३९२ वरून थेट ७९७५१ वर गेली आहेत. पुढच्या निवडणूकीत भाजप व शिवसेना वेगळे लढले की मनसे कडे गेलेली मते परत शिवसेनेकडे येतील. मग मनसे परत ७९७५१ वरून २१३९२ वर. त्याबरोबर पाटलांचा लीड परत मेधाताईं एवढा म्हणजे ६५००० होईल.

२०१४ साली शिवसेनेला ३६२७९ मते होती. त्यातली फारच थोडी पाटलांकडे आली आहेत. त्यावेळेस इतर दोन भिडूंनी मिळवलेली मते खालीलप्रमाणे
काँग्रेस ६७१३
राका २८१७९

ट्क्केवारीच्या आधारावर अभ्यास करताना सापडले आहे हे.

काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकदिलाने निवडणूक लढवलीय. शिवसेना व भाजपाने एकमेकांचे प्रचंड पाय ओढले आहेत. भाजपाची मते काँगेस व राष्ट्रवादीला गेलेली दिसत नाहीयेत तर ती नोटा किंवा अपक्षांकडे जास्त गेली आहेत.

या निवडणूकीत एकमेकांचे पाय ओढले तरी पुढच्या निवडणुकीत स्वतःच्या पायावर उभे राहूनच निवडणूक लढवायला लागणार आहे.

एकंदरीत धमाल चाललीय. मस्त ध्रुवीकरण चाललंय.

चौकस२१२'s picture

11 Nov 2019 - 3:38 pm | चौकस२१२

- हातात आलेली संधी दोघांनी घालवली हे मान्य आणि परत त्यात तमाशा झाला
- भाजपाला हि सेनेची गरज होती हा हि तर्क पटला परंतु शेवटी आकडे बघता सर्वांपेक्षा दुप्पट जागा जिंकलेल्या पक्षाने मुख्यमंत्री पद का घालवावे याचे उत्तर "भाजपणाने नमतं घयायला पाहिजे होत" असे जे म्हणतात त्यांनी दयावे ! हे म्हणजे मी २० रुपये घालतो तू ८० घाल पण घेतलेल्या लाडवातील ८० मी खाणार असले
- ५ वर्षे नांदताना किती त्रास दिला.. तोड्याची होती ना युती
- मला तरी शिवसेनेचा आततायी पणा वाटतोय आता उगाच मराठी शिवसेना / मोदी शाहह गुजराथी म्हणून भाजप गुजराथी असले विचित्र तर्क लढवणे हे शोभत का
- राहता राहिला पवार साहेबानाचा बद्दल चा "आदर",, हं काय बोलायचं शिकलेले आणि मुरब्बी माणूस सुरवातीला जनतेला घेऊन चालणार नेता खूप आदर होता पण जातीचं राजकारण तसेच खुसपट काढत देशासाठी जेवहा ३७० किंवा पाकिस्तान विरुद्ध घेतलेल्या खंबीर भूमिकेला सुद्धा विरोध या गोष्टी पाहून आता तो आदर राहिला नाही .
- घराणेशाही बद्दल ओंगळ पणा चालू आहे त्यात एकट्या पवारांना दोष देता येणार नाही .. थोडा फार कम्युनिष्टांच्यात ( शिल्लक असतील तर) आणि भाजपत ( मूळ) कमी एवढेच
- भाजप वर जनता नाराज आहे हे खरे आणि त्यानं झटका दिला हे पण चांगले पण जनतेला ना राष्ट्रवादीला १००+ दिल्या ना काँग्रेस ला. हे कसे विसरयाचे ?
- भाजपाची महाराष्ट्रातील आजची परिस्थिती पाहून वाजपेयींचे १३ दिवसाचे सरकार आठवते !

चौकस जी तुमचे मते कळाली आणि ती ही त्या त्या मुद्द्यांवर योग्य आहेतच.

- शिवसेना जास्त चुकीची होती हे मान्य आहेच, पण फक्त सीट्स जास्त म्हणुन मुख्यमंत्री आमचाच पाहिजे नाहितर युती नकोच हे पण माझ्या मते चुकीचेच.
१०० सिट्स असणे म्हणजे आम्हीच विजेते हे ही चुकच. मुळात विकासावर न बोलता, विकास न दाखवता १०० प्लस येवु शकतात हेच चुकीचे असे माझे वयक्तिक मत.
उलट विकासावर लढले असते आणि मग १०० प्लस आणले असते तर लोकांच्या दृष्टीने तेच मुख्यमंत्री पदाला योग्य हे ते म्हणु शकले असते.
पण हे १०० प्लस कसे आले, शिवसेने पेक्शा जवळ जवळा ३० जागा जास्त लढुन, इतर मित्र पक्षांना पण आपल्या चिन्हावर लढण्यास सांगुन. आणि राष्ट्रवादीतील आमदारांना फोडुन आपल्याकडे आणुन. बर हे नेते नुसते आले का ? तर त्यां बरोबर त्यांचे काही कार्यकरते, नगरसेवक असली लाईनच आत आली.
मग १०० प्लस आणले हे जरी आकडे म्हणुन खरे असले तरी, नैतिकता, विकासावर निवडुन आणले, कोर भाजपाचे किती आणले आणि निवडुन येणार्या मुळीतुन किती आले हे ठोस ते तरी सांगु शकतील का हा प्रश्न आहेच.
त्यामुळे मोठा पक्ष असला म्हणुन, तोच पुर्ण राज्यभर मान्यता पावलेला पक्ष असा अर्थ नाहीच होत. असो. हा वादादीत मतांचा मुद्दा असु शकतो यावर थांबतो.

-- खिशात राजिनामे असुन युती तोडता आली नाही, कारण त्यांना माहीत होते १२२ पासुन बहुमत जास्त दूर नाही त्यामुळे रडतखडत जगा आणि योग्य वेळी डाव टाका, ते चुकीचेच असले तरी आता हेच राजकारण चालते , मग हे चुकीचे म्हणायचे असेल तर २०१४ ला पवारांचा घेतलेला पाठिंबा, गोव्याचे सरकार, काश्मिर चे मेहबुबा बरोबरचे सरकार ही कुठली नितिमत्ता ? त्यामुळे शिवसेना चुक समोर दिसत असली तरी त्याचे मुळे हे २०१४ पासुन होणार्‍या फरफटीत आहे असे मला वाटते..

-- गुजराथी, मराठी, हिंदु, मुसलमान असल्या गोष्टींचा विट आला आहे जनतेला, अहो विकासा वर बोला नाही तर घरी बसा, २०१४ ला कॉग्रेस - रा.कॉ. ला घरीच बसवले होते, उलट आता ३० % पण लोकल विकासावर भाजपा सामोरे आले असते तरी तेच जिंकले असते.

-- पवार , ३७० ला राष्ट्रवादीने विरोध केला नाही, ना त्या विरोधात त्यांनी मतदान केले. (पाकिस्तान बद्दलचा मुद्दा मी कधी ऐकला नाही, मध्यतंरी शरद पवार काहीतरी त्यावरुन बोलत होते ते, पण मी ऐकले नाही). पवारांना विरोध करुन,स्वता मोदी ही २०१४ नंतर बारामतीला गळाभेट घेवुन गेलेच, त्याबरोबर भाजपा सरकारनेच त्यांना देशातील २ नंबरची पदवी दिली, आणि वसंत साखर कारखान्याजवळ मोदिंनी त्यांना राजकिय गुरु असे हि संबोधले, नव्हे त्यांचय करंगळीला धरुन राजकारण शिकले असे ही वाक्य जोडले. त्यामुळे पवार यांच्या बद्दल विरोधक पण सिस्थीत राहतात, तर मग त्यांच्याबद्दल एक राजकारणी म्हणुन ओढा वाढतोच.

(वयक्तीक: मी बारामतीचा, माझ्या घरातील, माझ्या आजुबाजुला असणार्‍या त्या(९० च्या दशकात) तरुंणा ना दिलेला रोजगार, शेती बद्दल आणि त्या पुरक उद्योग धंद्याबद्दल शेतकर्‍यांना दिलेले ज्ञान आणि ते उद्योग, तेथील स्तिथी, ह्यामुळे पण कदाचीत त्यांच्याबद्दल मत असण्याचा भाग असेलच.
तरीही असे समजु नये मी डोळे झाकुन मत देतो, अटलबिहारी वाजपेयी यांच्या साठी मी शरद पवार यांच्या विरोधात बारामती मतदार संघात मत दिलेले मला आजही आठवते. असो अटल बिहारी मोठे की शरद पवार यात मी पडणार नाही, दोन्हीही माझ्या साठी चांगलेच, आणि त्याच बरोबर मुंबईत राहिल्याने पाहिलेले बाळासाहेब ही आणि त्यांचे बोलणे मला आवडीचे)

- घराणे शाही, कोण मोठे कोण छोटे असल्या पेक्षा आपण काय केले आणि काय करणार यावरच वोट दिले पाहिजे... बाकी काय .

गणेशा's picture

11 Nov 2019 - 5:47 pm | गणेशा

चुकुन , Vasantdada Sugar Institute च्या ऐवजी कारखाना असे लिहिलेले आहे.

शाम भागवत's picture

11 Nov 2019 - 6:24 pm | शाम भागवत

शरद पवार साहेब व मोदीजी हे दोघे सध्याच्या काळातले खरे मुरब्बी नेते आहेत. संघटन कला, प्रशासन कौशल्य, इव्हेंट मॅनेजमेंट, माणसांची पारख, स्मरणशक्ती व हजरजबाबीपणा वगैरे गुण दोघांचेही तोडीस तोड आहेत. परमेश्वराने त्या दोघांना राजकारण करण्यासाठी खूप गुणसंपत्ती बहाल केलेली आहे व त्या दोघांनी स्वबळावर त्यात वाढही केलेली आहे.

फक्त त्या दोघांची राजकारण करण्याची पध्दत वेगवेगळी आहे.
पवारसाहेब तात्कालीन फायद्याला महत्व जास्त देतात तर मोदीजी दिर्घकालीन फायद्यासाठी अल्पकालीन फायदा सोडायला तयार असतात असे मला वाटते. त्याचा परिणाम असा होतो की, पवारांचे बरेच सहकारी ५ वर्षात बदलेले दिसतात. तर तसे काही घडताना मोदींजींच्या बाबतीत दिसत नाही.

थोडक्यात राजकारण करण्याच्या पध्दतीत दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत.
असो.

सुबोध खरे's picture

11 Nov 2019 - 6:33 pm | सुबोध खरे

पूर्वग्रह स्पष्ट दिसतो आहे.
पण हे १०० प्लस कसे आले, शिवसेने पेक्शा जवळ जवळा ३० जागा जास्त लढुन,
पण ३०च जागा (१९%) जास्त लढून ४९ (८७%) जागा जास्त कशा आल्या हो? (१०५ वि ५६)
हवेतून पडल्या का?
आणि मतांची टक्केवारी
भाजप २५.७५ %
आणि
शिवसेना १६.४१ %
म्हणजे ५७ % मते जास्त मिळाली भाजपला.

बाकी जाणत्या राजाने "पावसात भिजून एवढं दैदिप्यमान यश" प्राप्त केलं वगैरे वगैरे मीडियात आपला उदो उदो करून घेतला आहे.
त्यांना जागा "५४ च" आहेत आणि मतांची टक्केवारी" १६. ७१ टक्के "आहे.
आकडेवारी खोटं बोलत नाही.
शब्द कसेही फिरवा.

हस्तर's picture

11 Nov 2019 - 7:01 pm | हस्तर

त्यांना जागा "५४ च" आहेत ?

मोदि लाट असताना एवढ्या पण येइल असेल कोणाल तरि वाटले होते का?

सुबोध खरे's picture

11 Nov 2019 - 7:43 pm | सुबोध खरे

राष्ट्रीय आणि स्थानिक प्रश्न यावर मतदार फार वेगळा विचार करतात.

असं नसतं तर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र येथे प्रचंड मोदी लाट असताना भाजपला सत्तेपासून वंचित का राहायला लागले असते.

हा पण काकासाहेबांनी आपलाच "उदो उदो" करण्यासाठी केलेला "प्रचार" आहे आणि आश्चर्य म्हणजे भले भले त्याला बळी पडताना दिसतात.

असे नसते तर काँग्रेसला कुणीही पावसात भिजत प्रचार न करता ४४ जागा मिळाल्या असत्या का? काही महिन्यापूर्वी बालेकिल्ल्यातील एकुलती एक जागा (नांदेड) (४८ पैकी) केवळ मिळवणारा काँग्रेस पक्ष आज किंग मेकर म्हणून काका साहेबाना "पण" खुंटीवर टांगून कसा बसला आहे?

चौकस२१२'s picture

12 Nov 2019 - 3:52 am | चौकस२१२

-"- बोलता, विकास न दाखवता १०० प्लस येवु शकतात हेच चुकीचे असे माझे वयक्तिक मत..." ह कौल जन्तेन दिला जन्तेल कोइन्ग्रेस्स पहिजे अस्ति तर चित्र उलत अस्त !
- पवार साहेबांच्या पूर्वीच्या कार्याबद्दल (पुलोद वैगरे) आदर आहेच, जसा यशवंरावबदल होता पण आणीबाणीत ते जेव्हा मूग गिळून गप्प बसले तेव्हा आदर कमी झाला तसेच
पवारांनी महाराष्ट्रात जे घाणेरडे जातीचे राजकारण केले त्याबद्दल काय? ३७० बद्दल बोलले नाहीत मग काय उपकार केले? एवढया मोठ्या "राष्टवादी" नेत्याने यात सकारात्मक भाग घेतला असता तर मान जास्त वाढला असता .
- भाजपचे सोयीचे राजकारण ( मेगा भरती , मुफ्ती वैगरे) हे गैर आहेच भाजप ची काँग्रेस कडे वाटचाल असेही वाटते कदाचित आधी सत्ता मगच कार्यक्रम राबवणे शक्य यामुळे तसे केले असेल... काँग्रेस ची अमर्याद सत्ता सहन करणाऱ्या आंधळ्या जनतेला आता भाजपाची अमर्याद सत्ता बोचू कशी शकते ? थोडी तरी संधी द्या ?
खुलासा मी भाजपचा समर्थक नाही आणि आंधळा भक्त तर नाहीच नाही फक्त सुदृढ लोकशाही मध्ये सतत एकाच पक्ष ( काँग्रेस) आणि एकाच विचार हे यौग्य नाही आणि भाजप ने काही यौग्य निर्णय+ वाजपेयी, अडवाणी मोदी सारख्यांची देशनिष्ठ यामुळे सध्या पारडं त्यांचं झुकतं माझ्य मनी... एवढेच

हा अत्यन्त सौम्य भासणारा व्यक्ती वयक्तिमत्व शिवसेनेस पूरक नसूनही सगळ्यांना पुरून उरला आणि आता त्याला पक्षाबाहेरील शतृसोबत दोन हात करायची संधी मिळते आहे, काय होईल ते काळच जाणो पण भाजपशी काडीमोड घ्यायची धमक दाखवून त्याने कोणतेही राजकीय नुकसान करून घेतले नाही हे 100% सत्य.

ती काँगी वा राकाँगी ला एका मर्यादेपलीकडे जुमानेल हा प्रश्नच येत नाही. नेत्यांमागील विविध गोष्टींचा ससेमीरा चुकवणे वा लांबवणे यापलीकडे शिवसेना फार भीक घालणार नाही आणी इतक्या तरुण वयात सत्ताकेंद्र बनायची संधी तो अथवा आदित्य सोडत असेल तर तर त्यांनी राजकारण सोडून द्यावे. मागच्या वेळी भाजपाने युती करता करता तोडली त्याचा अतिशय व्यवस्थित वचपा शिवसेनेने काढला आहे. याक्षणी सरकार स्थापन झाल्यानंतरच्या अडचणी हा मुद्दाच नाही मग भलेही 13 दिवसात सरकार गडगडले तरीही

प्रसाद_१९८२'s picture

11 Nov 2019 - 7:47 pm | प्रसाद_१९८२

शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी वाढीव मुदत द्यायला राज्यपालांचा नकार. आता पुढे काय ?

प्रसाद_१९८२'s picture

11 Nov 2019 - 8:15 pm | प्रसाद_१९८२

अगदी शेवटच्या घटकेला पवारांनी तथाकथित वाघाचा 'पोपट' केला. ;))
सत्ता स्थापन करायच्या आधी ही अवस्था, पुढे सत्ता स्थापन केल्यावर काय होईल.

जेवढी मजा बाहुबलि , वार , रेस बघताना नाहि आलि तेवढी ह्या १० दिव्सत आलि

मदनबाण's picture

11 Nov 2019 - 10:16 pm | मदनबाण

शिव सेनेचे काय होणार ?
सार्वजनिक वस्त्रहरण झाले ! :)))
स्वतःच्या पायावर कुर्‍हाड कशी मारुन घ्यायची याचे प्रात्यक्षिकच सेनेने करुन दाखवले ! :)))

P1
P2
जाता येता भगवा आणि शिवाजी महाराज यांच्या नावाचा बाजार मांडणारे आता भगवा दहशतवाद असा जगावेगळा शोध लावणार्‍यांच्या पक्षाशी घरोबा करायला चाललेले दिसले आहेत ! गळ्यात गमछा आणि खाली लुंगी घालुन केम छो ची पोस्टरबाजी करणारी ही मंडळी मराठी जनते समोरच आता उघडी पडली आहेत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fire Power Demonstration By Sudarshan Chakra Corps Of Indian Army With BM 21 & Pinaka Missiles

गड्डा झब्बू's picture

12 Nov 2019 - 1:01 am | गड्डा झब्बू

बिडी जलैले जिगरसे पिया.....जिगर मा बडी आग है.....
शिवसैनिक असूनहि आज खूष असलेला एक मतदार!

रमेश आठवले's picture

11 Nov 2019 - 10:20 pm | रमेश आठवले

आपण बाळ ठाकरे यांचा पप्पु आहोत असे उद्धवने सिद्ध केले आहे.

एकुलता एक डॉन's picture

11 Nov 2019 - 11:22 pm | एकुलता एक डॉन

१८+

"लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार" चा गुन्हा दाखल करावा
शिवसेने ने कांग्रेस-राष्ट्रवादी वर

गड्डा झब्बू's picture

12 Nov 2019 - 12:55 am | गड्डा झब्बू

खल्लास. एक नंबर!

एकुलता एक डॉन's picture

12 Nov 2019 - 1:17 am | एकुलता एक डॉन

कुणी फोडू नये म्हणून हॉटेलात राहायच.
कुणी फोडून काढू नये म्हणून हॉस्पिटलात.

रमेश आठवले's picture

12 Nov 2019 - 1:24 am | रमेश आठवले

धोबीका कुत्ता ना घरका ना घाटका- हुआ लिलावतिके खाट का.

गड्डा झब्बू's picture

12 Nov 2019 - 2:24 am | गड्डा झब्बू

काम के ना काज के, दुश्मन अनाज के .....
काल सकाळीच त्या राण्यांच्या जेष्ठ पुत्रांनी व्यक्तव्य केले होते कि या संज्या राऊतला लवकरच शिवसैनिकच चोपतील म्हणून....
त्याचा एवढा धसका घ्यायचा का राव सेनेच्या या वाचाळवीर ढाण्या वाघाने?
आमच्या भाषेत एक म्हण आहे ......XXची नाही पत, पण नाव गणपत... अगदी तस्से झाले हो या राउताचे.

सुबोध खरे's picture

18 Nov 2019 - 10:20 am | सुबोध खरे

नुसतीच शिवसेना नव्हे तर काकासाहेब सुद्धा लटकत बसले आहेत.

सगळेच लटकत बसले आहेत हे खरे. भाजपा मनादेशा ऐवजी जनादेशाचा मान राखायला शिकणार का हा प्रश्न आहे.

पंजाब, काश्मीर, बिहारमध्ये तर त्यांना काहीच वाटले नाही महाराष्ट्राबाबत दुजाभाव का ? आख्या आशियामधील सर्वोत्कृष्ट पक्षीय कार्यालय दिल्लीत बांधणाऱ्या, व विनाकारण मुंबईतील रिजर्व बँक ऑफिस अहमदाबादला हलवणाऱ्या भाजपा फक्त निरंकुशतेचा खंदा समर्थक असेल तर ते राज्यपातळीवर योग्य वाटत नाही

सेक्रेड गेम्स महाराषट्रा पोलिटिक्स https://www.youtube.com/watch?v=jNzf9kSCKWk

हस्तर's picture

13 Nov 2020 - 5:09 pm | हस्तर

एक वर्ष

शिवसेनेच्या ऊर्दू कॅलेंडरवर 'जनाब बाळासाहेब ठाकरे'; भाजपने संधी साधली
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shivsena-publish-ur...