Skip to main content

शिव सेनेचे काय होणार ?

लेखक हस्तर यांनी गुरुवार, 31/10/2019 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय २०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

वाचने 59270
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

सगळंच मोडलं, सरकार राष्ट्रपती राजवटीत गेलं तर अपक्षांना आमदारकीचा फायदा होणार नाही. त्यामुळे ते बहुमत सिद्ध करण्यावेळी भाजपला मत देतील. शिवसेना तटस्थ राहिल्यास भाजप ११६ वि ११० अशी काठावर पास होऊ शकते?

राज्यात सत्ता स्थापन करणे bjp ची गरज आहे . आणि सेना हाच योग्य पक्ष आहे bjp साठी बहुमत सिद्ध करण्यासाठी. राष्ट्रपती राजवट bjp भविष्यात कधीच इथे पाय रोवू शकणार नाही. अपक्ष आमदारांच्या पाठिंबा सर्व मंत्री पद धावे लागेल. Bjp वाल्यांना मंत्री मंडळात जागाच शिल्लक राहणार नाहीत

ईडी पीडा टळो आणि माझं बाळ उप मुख्य मंत्री होवो असे म्हणत उद्धव ठाकरे भाजपाशी समजोता करतील.

तमाम मराठी जनतेच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून

https://www.lokmat.com/editorial/editorial-instability-state-power-it-in... भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याची देशातील किमान १५ राज्यांत सरकारे आहेत. या बहुतेक राज्यातील जनता सेनेवर या ना त्या कारणाने नाखूश आहे हे कसे?

सेना स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतेय.सेनेलला धड वचक ठेवता येत नाहिये ना धड धोबीपछाड टाकता येतोय या सगळ्या गोंधळात सेना त्यांच्या अपरिुक्वपणाचे मुक्त दर्शन घडवतेय

भारत देशाच्या लोकशाहीत अनेक घोळ आहेत. त्याचे पुरेसे स्पष्टीकरण संविधानात नाही . या वर संबित पात्रा यांचे एक भाषण ही तू नळी वर आहे पण ते म्हणे भाजपाचे कोणीतरी असल्याने अनेक जण फाट्यावर मारतात. भारत देशात " पक्ष" या संस्थेची व्याख्या संविधानाच्या कुठल्याही पानावर आहे का ? संघटना करण्याचे स्वात्रंत्र्य इतका उल्लेख जरूर आहे. आपण मत पक्षाला देतो की माणसाला याचे विवेचन संविधानात आहे का ? माझया मते नाही. या मूलभूत घोळामुळे पक्षशिस्त वगैरे ला पक्षात शिक्षा असली तर कायद्यात नाही ! युती या गोष्टीला कायद्यात काही अर्थ नाही ! त्यामुळे जातीयवादी म्हणून आयुष्यभर ज्या पवारांनी भाजपाला हिणवले त्यांनी आता महाराष्ट्राची " काळजी" मला असा पवित्रा घेऊन हिंदुत्व वादी शिवसेनेशी सोयरीक केली तर त्यात नवल ते काय ? कारण अशी सोयरीक लोकांची फसवणूक असली तरी संविधानाला अमान्य नक्कीच नाही असे इतिहासाचं सांगतो.

यदाकदाचित आदित्य मुमंत्री झाला तर राऊत श्रेय घेणार होते पण त्यांना "शिवसेना स्वाभिमानी पक्ष" याचा विसर पडला हे कां अध्यक्ष सोनियांनी नकार देऊन आठवण करून दिली. त्यामुळे मा. पवारांचा शर्टही ओलाच राहणार का?

राष्ट्रवादीने पुलोद च्या " प्रयोगाचा हवाला देऊन शरद पवार यानाच मुख्यमंत्री पद द्यावे अशी अट आता टाकावी . पुलोद चा प्रयोग संजय राऊताना आवडला आहे अशी कबुली त्यांनी दिली आहे . यात अनेक पक्षी भा ज पा मारू शकेल . पवार शेकाकर्यांच्य आत्महत्या थांबवू शकतात की नाही हे जनतेला आजमावून पहाताही येईल . सेनेची काहीशी जिरवता येईल . फडणवीस हा ब्राह्मण मुख्यामंत्री कसा होऊन शकतो असा तळतळाट बर्याच जणांचा झाला आहे त्या जखमेवर भा जा पा ने फुंकर घातली असा संदेशही जाईल तसेच एवीतेवी गडकरी पवार हे " तसे" दोस्त आहेत . पवारांचा " हात" धरून मोदी राजकारण शिकले ई ई गोडवे गाउन आपली आपटी अन आपत्ती दोन्ही भा ज पा ला लपविता येईल .

In reply to by चौकटराजा

महाराष्ट्र मध्ये भाजप बॅक फूट वॉर जाईल ,खडसे मुंडे तावडे सगळे मागे सारले आहेत ,फक्त फडण २० सध्या चेहरा आहेत ,जसे अटल जी गेल्यावर नमो यायला १० वर्षे लागली तसे होईल

उत्तम मनोरंजन चालू आहे. "एकच सत्य .. मुख्यमंत्री आदित्य" च्या घोषणा बाजूच्या गल्लित काही शिवसैनिकानी कालच दिल्या. 'रोखठोक' लिहिणारे ऐनवेळेस 'रोख' घेउन नमते घेतात असा अनुभव होता पण ह्यावेळी तसे दिसत नाही.

भाजपा ने शिवसेनेला बाहेरुन पाठींबा देऊन शिवसेनेस सरकार बनवू द्यावे. राऊत साहेब कसे सरकार चालवतात ते बघावे.

निवडणुकी अगोदर सर्व्हे वर आपला विश्वास दाखवून जनतेनी भोळा पण दाखवून दिला. निकाल लागले सर्व sarvye तोंडावर पडले. सरकार युती चेच बनणार. संजय राऊत नाच्या bjp च्या परवानगी नेच भोळ्या जनतेला अजुन मूर्ख बनवत आहे

मी काही भा जा पा वाला नाही पण माझया मते पुन्हा निवडणुका हा शिवसेना नावाच्या सत्तापिपासू व कोणताही विधीनिषेध नसलेल्या पक्षाला ठेचण्याचा एकमेव मार्ग आहे ! अर्थात त्यात राज्यपालाची भूमिका निरणांयक !

आधी हाताने थोबाडं फोडून घेतली , आता कमळ बघून गाळात रुतत जायचं ... काहीही करा , जनता जनार्दन भोळी ती भोळिच राहणार ,, त्यांचं काही नाही व्हायचं ...

जे बाळा साहेबांनी त्यांच्या हयातीत केले होते .. ते मला नाही वाटत , आता कुणाला जमेल .. ते यथेच्छ खिल्ली उडवायचे .. मग समोर कमळाबाई असो कि इटालियन किटली ... कुणाचीही खैर ठेवायचे नाहीत .. राज तास प्रयत्न करतोय पण ते एक खांबी नेतृत्व आहे .. बाळासाहेबांनी सामान्यातूनच लोकनेते घडवले आणि हे दोघे ( उद्धव आणि राज ) खुर्चीची स्वप्न बघतायत .. मला नाही वाटत त्यांच्या हाती काही येईल .. हे असेच चालू राहिले तर शिवसेना हा , कॉर्पोरेट पक्ष बनेल हळूहळू आणि सामान्य जनतेवरची पकड सुटत जाईल .. जो , जनतेला आवर्जून वेळ देतो आणि निदान एका तरी ज्वलंत प्रश्नावर आंदोलन छेडतो तोच लोकनेता होऊ शकतो आणि त्याला मग मरण नाही .. उदाहरण द्यायचेच झाले तर श्रीमान बच्चू कडू यांचे देता येईल ..

In reply to by खिलजि

बाळासाहेबांनी सुरेश प्रभू त्यांना पैसे पोहोचवत नाहीत म्हणुन प्रभुना मंत्री मंडळातून काढून टाका असे वाजपेयींना सांगितले . पुराव्यासाठी ह्या फिती मध्ये १५ ते १८ मिनिटे पहा. सध्याचा शिवसेनेचा मुख्यमंत्री पद आणि गृह, अर्थ, नगर विकास आणि महसुल ही खाती यांचा अट्टाहास हा कशासाठी आहे हे त्यावरून कळेल. https://www.youtube.com/watch?v=cVC8_jgTf6E

भाजप कुठे नीतिमत्ता ठेवतो? शिवसेनेचे चुकले हे मान्य पण १) पुण्यात शिव सेने ला एक पण जागा दिली नाही २) राणे हा शिव सेने चा शत्रू असून पक्षात घेतलंच ना ३) बऱ्याच सहकार मंत्र्यां ना पावन करून ह्यावेळी तिकीट दिले ४) आमचे ठरलेय ,पण काय ?

In reply to by हस्तर

भाजपा ने जेंव्हा त्यांच्या काही मित्र पक्षांना त्यांच्या कमळ चिन्हावर निवडणुक लढवण्यास भाग पाडले, तेथेच मला तर त्यांची चुक वाटली होती.. मित्र पक्ष मग तो आठवलेंचा असुद्या नाहीतर जानकरांचा. आमच्या जवळील दौंड मध्ये तर असे ऐकले होते की, राष्ट्रीय समाज पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यानंतर ,फॉर्म भरण्या अगोदर राहुल कुल यांच्या हातात भाजपा चा एबी फोर्म पडला. ७०० च्या आसपास मताधिक्क्याने ते निवडुन ही आले. परंतु आपल्या पक्षाचे अस्तित्व याद्वारे मिटु शकते हे मला वयक्तीक वाटते. तसेच, भाजपा ने ५०-५० मान्य केले होते का? हा कळीचा मुद्दा आहे, आणि त्यांनी तो जर मान्य केला असेल तर शिवसेनेची भुमिकाच चुकीची असे तर स्पष्ट पणेआपण म्हणु शकत नाहीच. तरीही मला वयक्तिक वाटते भाजपा -शिवसेने चे सरकार येइल. परंतु भाजपाने याआधीच्या काही वर्षात, महबुबा मुफ्ती बरोबर आधी केलेले सरकार, गोवा आणि कर्नाटकातील सत्ता घेतानाचे राजकारण हे पाहता शिवसेनेने राष्ट्रावादी बरोबर जावु नये अशी म्हणण्याची नैतिकता गमावलेली आहेच. आणि त्याबरोबर २०१४ मध्ये राष्ट्रवादी च बाहेरुन पाठिंबा दाखवुन बहुमत सिद्ध करताना, शिवसेनेला ५ वर्षे कोंडित पकडले होतेच, हे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही. राज्यपालाने मात्र, कोणत्याही पक्षाची बाजु ऐकुन न घेता, मोठ्या पार्टीला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलवले पाहिजेच. ९ तारखे पर्यंत आधीचे सरकारचा कार्यकाळ आहे, त्या अगोदर नविन सरकार चे गटबंधन झालेले हवे. पण अजुन ही राज्यपाल कोणाला सत्तास्थापणे साठी बोलावत नाही, आणि येथे ही मग राज्यपाल असे का करत नाही हा प्रश्न उपस्थीत होतोच. राष्ट्रवादी ने माझ्या मते विरोधी पक्षात राहुन काम करावे, प्रभावी काम केल्यास २०२४ मध्ये राष्ट्रावादी सत्तेत नक्कीच येइल असे माझे मत आहे, कारण गेल्या ५ वर्षात भाजपाचे काम जनतेला दिसले आहेच, आणि नंतरच्या ५ वर्षात असेच चित्र राहिल असा माझा अंदाज आहे. असो

आमच्या घरात सर्व लोकमान्य पक्ष सामावले आहेत .. काका कट्टर शिवसैनिक .. बाळासाहेबांनी स्वतः आमच्या दुकानाचे उदघाटन केले होते .. तर दोन मामा राष्ट्रवादीत आणि एक मामा कट्टर काँग्रेस .. चुलत मामा सर्व शिवसेनेत आणि भाजपात .. आजोळच्या गणपतीला खरी धमाल यायची .. मिरवणूक बघण्यासारखी असायची .. पाच घरात एकच गणपती त्यामुळे सर्वजण यथेच्छ आपल्या पक्षाच्या टोप्या घालून मिरवायचे आणि नाचायचे .. आमच्या सारख्या पाहुण्या मंडळींचे हाल व्हायचे .. मी तर तीनही टोप्या खिशात घालून फिरायचो .. शिवसैनिकांमध्ये भगवी , तर भाजपाची त्या मामालोकांच्या गँगमध्ये ,, माझ्या सख्ख्या मामांची राष्ट्रवादी तर मोठ्या मामाची हातवाली .. विचारू नका .. एक मात्र नक्की , राजकारण घराघरात घुसले आहे आणि त्यांचे बुरसटलेले विचारही .. त्यामुळे , मी सहसा गणपतीला जाणे टाळतो .. नकोसे वाटते आणि या साऱ्या पक्षांचा मनापासून राग येतो , ज्यांनी गणपतीही सोडला नाही .. तर आपल्यासारख्या सामान्यांची काय भिशाद...

सध्यातरी काही माहित नाही आहे .. कधी पुढील खेपेला जाणे झाले तर कळेल .. कुणीतरी भाऊ असतील जे नुकतेच तिथे भरती झाले असतील .. बघू टोपी भेट मिळाली कि घ्यायची ..

कदाचित तिथे फक्त एकच माणूस आहे ज्याला लोक आधीपासूनच ओळखतात .. आणि त्याचं जाणं या लोकांना बिलकुल आवडलं नसेल .. असो "" राजकारण "" हा मुळातच घाणेरडा विषय आहे .. इथे कुणी कुणाचा नसतो .. आपला विषय जरा आवडीचा होता म्हणून भाष्य केले आठवणींसहित अन्यथा मी या धाग्यांवर फिरकतही नाही .. मतदानपण वेळ असेल तरच करतो अन्यथा नाही .. यावेळेस केले नाही .. दिवाळीची साफसफाई करत होतो .. मत द्या आगर नका देऊ .. दोन्हीची उत्तरे सारखीच आहेत .. आमच्या इथे अजूनही रस्ते धड नाहीत , मुंबईत राहूनही तर गावखेड्यातली वार्ताच नको .. सर्व साले , चप्पल फेकून मारण्याच्या लायकीचे आहेत .. या नेत्यांना ,, जींकडेजींकडे रस्ते खराब आहेत तिथे ओळीने खांबांना बांधून ठेवले पाहिजे , धूळ खात .. मग रात्री सोडायचे घरी जेवणासाठी फक्त , सकाळ झाली कि पकडून आणायचे आणि पुन्हा बांधायचे असे किमान सात दिवस तरी राजरोसपणाने केले पाहिजे .. एक व्रत समजून .. तर कुठे देशाचे भले होईल , अन्यथा नाही ..

प्रत्येक नेत्याने फिरवलेल्या वक्तव्याची लोकमत चाचपणी करण्यासाठी बेताल,त्रिताल,,झपताल ठेवलेले असतात. प्रक्षोभ झाल्यास त्या ढग्ग्याला फोडता येते. डॉन लोकही असे करतात हे एका कादंब्रीत आहे. लास्ट डॉन /मेरटा ?

शिवसेने बरोबर चर्चा आता राज्यस्तरावर करावी. केंद्रिय नेतृत्व आताच मध्ये बोलणार नाही. - अमित शहा, भाजपा. याचा अर्थ असा ही असु शकतो की यांनी ५०-५० फॉर्मुला आधी बोलले असल्याने, आता शिवसेनेच्या भुमिकेला उत्तर देणे जमत नसेल. आणि निवडणुकी आधी, भाजपाला जवळजवळ २२० ते २४० शीट येवुन त्यांना शिवसेनेची तशी जास्त अडचन होणार नाही असा अतीआत्मविश्वास भाजपाला झाला असल्याने त्यांनी ५०-५० मान्य केलेले असु शकते..

In reply to by गणेशा

अमित शहा बोलले होते फडणवीस बोलणार मी असले बोलले नव्हतो मग फडणवीस अमित शहा ह्यानं म्हणणार तुम्ही कोण ठरवणारे मग अमित शहा स्वतःहून हात बाहेर काढणार

In reply to by हस्तर

मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याबाबत भाजपने कानावर हात ठेवले आहेत. सत्तेचे समसमान वाटप म्हणजे मुख्यमंत्रिपदाचे वाटप कसे होऊ शकते, असा सवाल भाजपच्या सूत्रांनी केला. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे शिवसेनेचा जो दावा आहे, त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती नाही. शिवसेनेसोबत झालेल्या चर्चेत मंत्रिमंडळात निम्म्या-निम्म्या जागावाटपाचे ठरले होते, अशी माहिती देण्यात आली. https://www.esakal.com/maharashtra/shivsena-bjp-politics-government-231…

भा जा पा चा पूर्वीचा अवतार जनसंघ असा लब्बाड नव्हता ! हे प्रमोद महाजन अवतरले आणि यांनी ठरावले की काँग्रेसला भा ज पा चे राजकीय गुरु करायचे ! ती शिकवण म्हणजे आयडीयालॉजी गेली खड्ड्यात ! आता महाजनांचीच शिकवण राऊत वापरीत आहेत !

तेलुगु देशम सारखे शिवसेनेचे खासदार त्यांचा लोकसभा-राज्यसभा पक्ष भाजपात विलीन करतील का ?

एकंदर या काथ्याकुटाचा कंटाळा आला आहे. बेताल वक्तव्ये आणि सामान्य जनतेचा कळवळा दाखवण्यासाठी गहिवर काढणारी भाषणे अति झाली. आता सरकार कोणी का बनवेना, माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्यात अजिबात रस राहिलेला नाही

In reply to by सुबोध खरे

अगदी अगदी . मतदान करायला गेलो हाच मूर्खपणा केला. मतदान करा , आमच्या पक्षाला, आणि नंतर गद्दारी. तो करतो तर आम्ही का नाही? मग कशाला स्वाभिमानाच्या गमजा?

सेनेशी जर लग्न झालं असत माझ तर मी कधीच घटस्फोट दिला असता... काय हि रोजची कटकट.. धड नांदत नाही .. गेली पाच वर्ष युतीत असून सतत धुसफूस.. कंटाळा आला,, महाराष्ट्राची जनतापण ना!!!! द्याचं ना एक मत तर एका पक्षला बहुमत द्यायच ना, मग भले काँग्रेस का असेना.. आणि तिकडे बारामतीकर आणि त्यांचे समर्थक हे विसरतात कि लोकांना जर ते हवे असते तर त्यांना १०५ + आणि भाजप ला ५० असते चित्र असते.. पण उन्माद असा दाखवता आहेत कि जणू स्वतःला २०० जागा मिळाल्यात दुर्दैवाने प्रादेशिक पक्ष हे आता बहुतेक एका एका कुटंबाचे खाजगी उद्योग झाले आहेत, पवार साहेब पूर्वी काँग्रेस मधून बाहेर पडले नसते तर बरे झाले असते असे आता वाटते , निदान महाराष्ट्र भाजप आणि काँग्रेस अशी तरी लढत असती .. घराणेशाही नि त्यांना आणि शिवसेनेला दोघांना हि खड्यात घातलाय, काँग्रेस तर काय गेली ७० वर्षे एकाच कुटुंबावर चालतोय

राम मंदिर अभियोगाची सुनावणी संपली आहे. निकाल केंव्हाही येवू शकतो आणि तो राम मंदिर बांधण्याच्या बाजूने यायची शक्यता खूपच जास्त आहे. शिवसेनेने हा धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने भा. ज प सरकार , शपतविधी ची टाळाटाळ करत आहे त्यावरून त्यांना मध्यावधी निवडणूक हवी आहे आणि त्या लादल्याचा दोष शिवसेनेवर फोडायचा आहे. वरील दोन घटनाचे एकत्रीकरण करून हा निष्कर्ष काढता येईल कि अल्प मातामधले सरकार स्थापायचे , ते पडले कि निवडणुका ! राम मंदिर च्या लाटेवर एकहाती सत्ता !! हा भा ज प चा प्लान असू शकतो. शिवसेना अस्थित्वाची लढाई लढते आहे आणि ह्या विनाश काळात अगदीच बालिश पणे वागते आहे. ह्या घोळत संजय राउत आणि उद्धव हे उथळ , पवार संधिसाधू आणि फडणीस हे संतुलित नेते म्हणून महाराष्ट्रासमोर आले आहेत.

In reply to by तर्री

फडणीस हे संतुलित नेते > संतुलित ज्या जागी दुसरेच वाचले राममंदिर वरून जिंकणे ९० च्या दशकात होत होते ,आता कोणाला जास्त रस नाही अन्यथा शिव सेने वॉर जेवढे मिपावर धागे निघाले तेवढे राममंदिर वॉर निघायला पाहिजे होते

In reply to by तर्री

त्यांनी आतापर्यंत सातत्याने योग्य राजकीय चाली केल्याचा इतिहास नाईलाजाने स्वीकारावाच लागतो. त्यात मागच्या निवडणूकीत युती होईल या समजात ते तोंडघशी पडले होते हे एकमेव त्यांचे अपयश होते असे वाटते, अर्थात मी जाणकार नाही समजण्यात चूक होऊ शकते

राम मंदिर बांधून झाले . म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत. फक्त up आणि बिहार मध्येच असले प्रकार घडतात . परत निवडणूक झाली आणि राम मंदिर पण झाले तरी दोन्ही bjp आणि शिवसेना पराभूत होतील आणि राष्ट्रवादी सत्तेच्या जवळ पोचेल.

In reply to by Rajesh188

शरदपवारांनी जो एकहाती किल्ला लढविला त्यामुळे ते युद्धात निष्णात आहेत हे सिद्ध झाले आहे च.

In reply to by जॉनविक्क

छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्ली च्या तख्तापुढे झुकणार नाही असं पावसात भिजत भिजत म्हणायचं आणि मग दिल्लीत परवानगी घ्यायला जायचं ते पण एकेकाळी ज्यांना परदेशी म्हटलं त्या मॅडमची ? फारच 'जाणतं' राजकारण!

In reply to by जॉनविक्क

"द्याट ब्रेक्स अवर अलायन्स" एवढं एक वाक्य ऐकण्यासाठी दिल्ली वाऱ्या!!! दिल्लीतले नेते नाहीत, गल्लीतलेच.

म्हणून हुरुळून जावून येथील जनता bjp ला मतदान करेल असे नाही वाटत. काही अंशी सहमत आहे. जनता हुरळून जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. भा ज प ला threshold मते आताच आहेत मतदार संघानुसार फक्त ३% ते ५% विरोधकांची मते फिरण्याची आवश्यकता आहे. तेवढी मिळाली कि भा ज प १५० पर्यंत पोहोचेल. तेवढी रसद राम मंदिर पुरवू शकेल. ही मते तरुणाई कडून नाही येणार पण ४०+ वायोगटा कडून येतील. क्ष - भाग एवढाच कि कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि सेना ह्यांनी युती करून भा ज प विरुद्ध महा गठबंधन केले तर काय होईल हा आहे. ह्या मध्ये शिवसेना संपेल हे निश्चित आहे. त्यांची १६% मतांची जी वोट बॅंक आहे ती कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी मुळे उध्वस्त होईल. कोन्ग्र्स आणि राष्ट्रवादी ला अनुक्रमे बाळसे आणि नवसंजीवनी मिळेल हे माझे मत. तरीही भा ज प हा मोठा पक्ष राहील ( १०० +).

In reply to by तर्री

लोक शिवसेनेला जेवढे वैतागले आहेत तेवढे नाही पण आता सध्या भाजप ला पण वैतागले आहेत दररोज च्या रडगाण्याने राष्ट्रवादी खुद्द फायदा उठवेन

In reply to by हस्तर

राष्ट्रवादी आपल्या परंपरागत मतदार संघातच जागा जिंकले आहेत त्यामुळे फेर निवडणुकीत त्यांना फारसा फायदा होणार नाही. शिवसेनेने असंगाशी संग केल्यामुळे त्यांचे अनेक कुंपणावरील मतदार नाराज होऊन शिवसेने ऐवजी भाजपला मतदान करतील. या उलट युती केल्यामुळे भाजप मधील अनेक चांगल्या उमेदवारांना जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे नाराज असलेल्या अशा अनेक चांगल्या उमेदवारांना फेरनिवडणुकीत तिकीट मिळेल आणि नाराज शिवसेनेच्या मतदारांची मते मिळू शकतील. शिवाय जर भाजप ने आयात उमेदवारांच्या ऐवजी मूळ भाजपसंघाशी एकनिष्ठ उमेदवार निवडले तर कुंपणावर बसलेले भाजपचे मतदार आपल्याकडे वाळवून भाजप सव्वाशे ते एकशे चाळीस तरी जागा मिळवू शकेल. आणि शिवसेना ५० च्या आत येईल. या वेळेस काहीही न करता काँग्रेसला मिळालेला फायदा कमी होऊन त्यांच्याही जागा कमी होतील.

In reply to by सुबोध खरे

तुमचे हे मत भाजपा च्या बाजूने विचार करून आहे . पहिली गोष्ट , पुन्हा निवडणूका लगेच होणार नाहीत . झाल्या तर सर्वात जास्त फायदा राष्ट्रवादी ला च होईल हे bjp आणि सेने ला पण माहित आहे . युती न करता लढल्यास शिवसेना आणि bjp यांची मते वेगवेगळी होतील . वंचित बहुजन आघाडी ला जेव्हडी मते विधानसभा क्षेत्रात मिळाली , तेव्हड्या पेक्षा कमी फरकाने हारलेले 23 जण काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे आहेत , आणि 5 ठिकाणी v.b.a दुसऱ्या नंबर वर आहे , तुम्हाला असे वाटत नाही का , या 23 ठिकाणी राष्ट्रवादी पण काही उपाय करतील ? निदान 10 ठिकाणी तरी बदल होईल , आणि यात दौंड सहित काही जागा निवडून येतील ? बाकी राम मुद्दा , 370 राष्ट्रीय सुरक्षा हे सगळे ठीक आहे पण महाराष्ट्राचा विकास या मुद्द्यावर bjp kaa निवडणुकीत उतरली नाही , हे कळत नाही . 2014 च्या 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा , ला त्यांनीच 2019 ला उत्तर दिले असते तर आता वेगळे चित्र दिसले असते , आणि ह्याचा फटकाच त्यांना बसला आहे , हे आपण का मान्य करत नाही काय माहीत . असो.. बाकी राज्यपाल यांनी याआधीच निपक्ष पणे सर्वात मोठा पक्ष जो bjp आहे , त्यांना सरकार स्थापने साठी पाचारण करावयास हवे होते हे माझे मत . पण ते जर राम मंदिर निकालाची वाट पाहत असतील तर त्याचा निकाल काय लागणार हे त्यांना आधीच माहिती आहे हे सुद्धा पुढे येते आणि राज्यपाल पण त्यांचेच ऐकून वेळ काढू पणा करत आहेत हे सुद्धा आपण नाकारू शकत नाही . ह्या अश्या वागण्यानेच bjp चा पण वैताग लोक करत असतील असे मला वाटते

In reply to by गणेशा

फेर निवडणूक झाल्या तर भाजप ३७०, राम मंदिर यावरच प्रचार करेल असे आपल्याला वाटते का? ते इतके दुधखुळे असते तर देशात इतक्या ठिकाणी निवडून आलेच नसते. फेर निआवडणूक झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची ची मते अजूनच कमी होतील. कारण भाजपाला कंटाळून काही लोकांनी त्यांना मते दिली होती ते लोक सध्याच्या त्यांच्या नाकर्तेपणाकडे बघून परत भाजपला मत देण्याची शक्यता आहे. बाकी राज्यपालांनी सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले असते तर शिवसेनेने पक्षपात केला म्हणून त्यांच्यावर (आणि भाजप वर) टीकेची झोड उठवली असती. राम मंदिर निकालाचा महाराष्ट्रात सत्तेशी काहीही संबंध नाही. माझ्यासारखे असंख्य भाजपचे सहानुभूतीदार लोक आहेत ज्यांना राम मंदिराशी काहीही घेणे देणे नाही. केवळ मुस्लिम/ अल्पसंख्याक यांचे लांगुलचालन करूनच सत्ता मिळवता येते या सिद्धांताला छेद देणारे एक स्मारक यापलीकडे आम्ही त्याकडे पाहत नाही. किंवा भाजप हा शुद्ध आणि पवित्र पक्ष आहे असेही आम्ही मानत नाही.

केवळ घराणेशाही वर

चाललेला पक्ष नाही आणि अगदी तळागाळातील माणूसही तेथे उच्च स्थानी पोहोचू शकतो म्हणून भाजपला मत देणाया गटातील माझ्यासारखे लोक आहेत. शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस मध्ये अशी परिस्थिती अजिबात नाही. कोळशाच्या व्यापारात हात काळे होणारच परंतु त्या पक्षातील लोकांच्या आपल्या निष्ठा आजमितीला तरी देशाबाहेर विकल्या गेलेल्या नाहीत.

In reply to by सुबोध खरे

तुमच्या वयक्तिक मतांबद्दल आक्षेप नाहीच . पण भाजप ने 2019 च्या निवडणुकीत मात्र विकासा पेक्षा राष्ट्रीय मुद्दयांवर भर दिला आहे , हे त्यांच्या भाषणातुन स्पष्ट दिसत होते , मग हा दुधखुळे पणा होता की आम्हाला पर्याय नाहीच haa अति आत्मविश्वास होता ? बाकी कोणी कोणत्या पक्षाला का मतदान करतात हे मुद्दे आणि कारणे वेगवेगळे असतात .आणि सगळ्यांनाच त्यांचे मत योग्य वाटते . बाकी
फेर निआवडणूक झाल्या तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादीची ची मते अजूनच कमी होतील. कारण भाजपाला कंटाळून काही लोकांनी त्यांना मते दिली होती ते लोक सध्याच्या त्यांच्या नाकर्तेपणाकडे बघून परत भाजपला मत देण्याची शक्यता आहे
नाकर्ते पणा कशाचा ? जे सत्तेत आहे त्यांनी त्यांचा कर्ते पणा दाखवावा . ज्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता पण सोडून भाजपा मध्ये जातो . उभी छेद वगैरे म्हणून , किती तरी नेते राष्ट्रवादी मधून भाजप घेतो त्यांच्याकडून कर्तेपणा ची अपेक्षा का ?.. तर त्यांनी ठोस कामावर का निवडणुक लढवू नये ? विकास झाला , स्वछ नीती हे जे त्यांचे समर्थक बोलतात , तेच त्यांनी दाखवून द्यायचे होते , नक्कीच त्यांना 120-130 सीट तरी मिळाली असती . भाजपा च्या नाकर्तेपणा मुळे आता विरोधात मतदान झाले असे हि मग तुमच्या विधानावरून वाटते .
बाकी राज्यपालांनी सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले असते तर शिवसेनेने पक्षपात केला म्हणून त्यांच्यावर (आणि भाजप वर) टीकेची झोड उठवली असती
मग काय केले पाहिजे राज्यपालांनी ? वेळ जाई पर्यंत आपल्याकडे कोणी येतोय का हि वाट पाहायची ? आणि नाहीच aale कोणी तर राष्ट्रपती राजवट लागू करायची ? त्यांनी त्यांचे काम करायचे ase माझे मत , मोठ्या पक्षाला बोलावले पॅबीजे होते , सरकार स्थापन करण्याचा पाहिला हक्क भाजपा चा आहे आता , शिवसेना , आणि राष्ट्रवादी he नंतरचे . Bjp चे काय म्हणणे आहे मग ? शिवसेनेने 2014 प्रमाणे लाचारीने आमच्याकडे यावे आणि आपण सरकार स्थापन करावे, असे ? उलट त्यांनी सरकार स्थापन करायला जावे , आणि नाही झाले तर शिवसेने मुळे नाही झाले ase म्हणून विरोधी पक्षात बसू असे म्हणून शिवसेने वर टीकेची झोड उठवून द्यावी .. आणि नंतरच्या निवडणुकीत शिवसेना विश्वास दर्शक नाही म्हणून शिवसेne ला मतदान करणाऱ्या काही लोकांची मते हि आपल्या पारड्यात झुकवावी . पण कसे आहे त्यांना हि सरकारच बनवायचे आहे , म्हणून हा घोळ चालू आहे , दिसताना शिवसेना दिसत असली तरी भाजपा सुद्धा ह्या सर्व खेळाला कारणीभूत आहेच .

In reply to by गणेशा

सत्तेच्या खेळात कोणीही धुतल्या तांदुळाचा नाही. भाजपच्या जागा पूर्ण बहुमताला कमी आहेत. संजय राऊत यांनी ५ वर्षे बेताल वक्तव्ये करून भाजपच्या एका मोठ्या गटाला दुखावलेले आहे (आणि त्याना श्री उद्धव ठाकरे यांची फूस होती अशी त्यांची खात्री होती) या गटाला असे वाटते आहे कि शिवसेनेला अजिबात भीक घालू नये. याउलट काही लोक असे आहेत ज्यांना असे वाटते आहे कि शिवसेना हा मित्र पक्ष आहे त्यांना जिथे "तोंड मारायचे आहे ते मारून येउ द्या". मग शांतपणे बसून चर्चा करून सरकार स्थापन करता येईल. शिवसेनेस माहिती आहे कि आपल्याला शेवटी भाजप शिवाय पर्याय नाही परंतु भाजपच्या मागे फरफटत जायची त्यांची तयारी नाही. गेल्या पाच वर्षेत केलेली वक्तव्ये आता उलटल्यामुळे त्यांना भाजपशी सामंजस्याने वागणे कठीण होऊन बसले आहे. दोन्ही पक्षांचा असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार आहे. राज्यपालांच्या दृष्टीने शिवसेना भाजप यांची युती निवडणुकीपूर्वींची आहे. त्यामुळे त्यांनी येऊन राज्य स्थापनेचा दावा करावा हे घटनात्मक दृष्ट्या योग्य आहे. त्यांनी असे काही केले नाही तर ८ नोव्हेंबर नंतर त्यांना भाजपला बोलावणे घटनेच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे. तोवर ते थंड बसले आहेत अर्थात त्यांचा राष्ट्र्पतींशी संपर्क असेलच आणि राष्ट्रपती हे तर स्वतः सर्वोच्च न्यायालयात वकील होते.त्यामुळे घटनेप्रमाणे जे काही आवश्यक आहे तेवढे ते करणारच. या सर्व प्रकरणात शिवसेनेचा धीर सुटू लागेल असा श्री फडणवीसांचा होरा आहे म्हणून तेही गप्प आहेत. नाहीच सरकार स्थापन झाले आणि राष्ट्रपती राजवट लागली तर शिवसेनेवर खापर फोडून ६ महिन्यांनी फेर निवडणूक घेता येईल असा त्यांचा हिशेब आहे. बाकी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला शिवसेनेबरोबर फार काळ जाता येणार नाही हेही स्वच्छपणे माहिती आहे. त्यामुळे उगाच ६-८ महिने सरकार चालवून मग फडणवीसांना ते अर्पण करणे किंवा त्यानंतर फेरनिवडणूक घेऊन आपल्या जागा कमी करण्यात त्यांना रस नाही. सोनिया गांधी यांनी तर शिवसेनेबरोबर जाण्यास स्वच्छ नकार दिला आहे.(निधर्मी म्हटले कि शिवसेनेसारख्या हिंदुत्व वादी पक्षा बरोबर जाऊन आपले इतर राज्यात नुकसान करून घेण्याची त्यांची तयारी नाही) शिवाय त्यांचा श्री शरद पवार यांच्यावर बिलकुल विश्वास नाही. तसा तो उद्धव ठाकरे याना पण अजिबात नाही. २०१४ मध्ये श्री शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊन शिवसेनेस तोंडघशी पडले होते हे श्री उद्धव ठाकरे विसरणे कदापि शक्य नाही). श्री शरद पवार सोयीचे असले कि निधर्मी असतात आणि तरी शिवसेनेसारख्या पक्षाशी युती चालते किंवा भाजपाला पाठिंबाही देता येतो. त्यांच्याकडे कोणतीही ठोस विचारसरणी नाहीच. केवळ सोनिया गांधी याना पंतप्रधानपदास विरोध करण्यासाठी स्थापन झालेला हा पक्ष आता त्याचे मूळ कार्यकारणचे राहिलेले नाही. ती केवळ निवडून येऊ शकेल अशा उमेदवारांची स्वार्थासाठी बांधलेली मोट आहे. ते एकदा शिवसेनेला गूळ लावतात मग म्हणतात जनादेश भाजपलाच आहे आणि आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश आहे. मग परत म्हणतात दुसरा पर्याय असेल तर आम्ही त्याचा विचार करू. श्री शरद पवारांना दिल्लीत जाऊन श्रीमती सोनिया गांधी यांची भेट घेण्याचे कारणच काय आहे? सगळे सत्तेचा सारीपाट खेळत आहेत. दोन पावले पुढे, एक पाऊल तिरके आणि एक पाऊल मागे असे चालू आहे या सर्व लफड्यात हे गुऱ्हाळ चालवून शिवसेनेची (आणि भाजपची) जितकी नाचक्की करता येईल तितकी काँगेस राष्ट्रवादी करण्याच्या प्रयत्नात आहे. बाकी जनतेला कोण विचारतो?

In reply to by सुबोध खरे

प्रतिसाद आवडला. -- सध्याचा तमाशा करुन सेना, भाजपा बरोबर स्वत:चे नुकसान देखील करत आहे हे माझ्या सारख्या सर्वसामन्य माणसाला कळते, तर ते शिवसेनेच्या नेतृत्व व नेत्यांना का कळू नये ? हाच प्रश्न पडलाय ! --

In reply to by सुबोध खरे

तुम्ही लिहिले 90% बरोबर आहे . राष्ट्रवादी हा निवडून येणाऱ्या नेत्यांची मोट आहे , हे मात्र या निवडणुकीने पुसले आहे असे मला वाटते .भल्या भल्या नेत्यांना पाडले आहे त्यांनी , त्यात शरद पवार यांच्या मुळे काँग्रेस ला पण फायदाच झाला आहे यावेळेस. शिवसेनेची नाचक्की काँग्रेस राष्ट्रवादी करत नाही असे हि मला वाटते . शिवसेना आणि भाजपा यांनी त्यांचे बघून घेतले तर बाकी कोणी मध्ये येणारच नाही . उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे दोन्ही main नेते दिल्लीत भेटतात , तसे शिवसेनेचे आणि भाजपा चे का भेटत नाही , युती मग पटत नव्हते तरी दोघांनी स्वार्था साठी केली होती का ? हा संदेश पण जनतेत जातो आहेच .. 2014 ला शिवसेना मागे आली नसती तर भाजपा राष्ट्रवादी च्या पाठींब्यावर सत्तेत येणार होतीच . त्यामुळे हे काँबिनेशन टिकले किती असते आणि आता कसे 6 महिनेच टिकेल वगैरे जर तर च्या गोष्टी आहेत . भाजपा आणि शिवसेने ने एकत्र चर्चा करून प्रश्न सोडवावा आणि सत्तेत यावे .ज्यांना एकत्र बसून चर्चा करता येत नाही त्यांनी युती , राष्ट्रवादी , काँग्रेस यावर बोलूच नये .. आणि राष्ट्रवादी ने विरोधी पक्षात बसावे ase माझे मत . आणि हेच होण्याची चिन्हे आहेत ..

In reply to by गणेशा

२०१४ मध्ये सिंचन पासून अनेक घोटाळे नुकतेच उघडकीस आले होते त्यामुळे राष्ट्रवादीला फेर निवडणूक फारच महागात पडली असती याशिवाय भाजपच्या १२२ जागा होत्या. त्यामुळे अधिक २२ आमदार "मिळवणे" फारच सोपे होते. यामुळे अधिक गडबड न करता राष्र्टवादीने भाजपाला पाठिंबा देऊन प्रश्न निकालात काढला होता. मुळात शिवसेना (६३), काँग्रेस (४२) आणि राष्ट्रवादी (४१) या तिन्ही पक्षात त्यांच्या जागा सर्वात कमी होत्या. तेंव्हा या विळ्याभोपळ्याच्या मोटेत त्यांच्या हातात काहीच पडले नसते. तुमच्या घोटाळ्याबद्दल आम्ही आस्ते कदम जाऊ हे भाजप कडून वचन घेऊन राष्ट्रवादीने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला असेही ऐकिवात आले होते. ख खो दे जा आता परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या जागा ५४ या शिवसेनेच्या जागां(५६) पेक्षा २ नेच कमी आहेत. शिवाय जनता घोटाळ्यांबद्दल विसरली आहे. श्री शरद पवारांनी आपले मार्केटिंग फार उत्तम करून घेतले आहे. पावसात भिजणे इ इ. शिवाय भाजपने बरेच "गणंग आयात करून" आपली प्रतिमा मालिन केली आहे आणि आता त्यांच्या जागा १२२ वरून १०६ पर्यंत खाली आल्या आहेत. म्हणून राष्ट्रवादीने "विळ्याभोपळ्याचि मोट" बांधून आपली मान घोटाळ्यांच्या चौकशीतुन काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्या साठी श्री शरद पवारांनी दिल्ली दौरा सुद्धा केला श्री संजय राऊत यांच्याशी बऱ्याच बैठकी खलबते केली. परंतु काँग्रेस श्रेष्ठी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास अजिबात तयार नाहीत आणि त्यांची सेक्युलर प्रतिमा शिवसेनेबरोबर मलिन होते आहे. त्यामुळे काँग्रेसकडून थंडा प्रतिसाद मिळाल्यावर आज श्री शरद पवारांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आहे असे सांगून शिवसेनेच्या तोंडाला पाने पुसली. शिवसेना सुद्धा जागा ६३ च्या ५६ झाल्या असताना भाजप बरोबर ५०-५० ची मागणी करताना भाजपचा पराभव झाला असल्यासारखे वागत होते. आजही भाजपच्या जागा कमी झाल्या असल्या तरी तो एकच पक्ष १०० ओलांडून पुढे आहे हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. बाकी equal (समान) आणि equitable (प्रमाणात) या दोन शब्दात शिवसेना गल्लत करीत आहेत असा भाजप श्रेष्ठींचा पवित्रा आहे. भाजपने १५२ जागा लढवल्या आणि शिवसेनेने १२४ असे असताना भाजपने ५०-५० आणि अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदास मान्यता दिली असेल हे मान्य करणे कठीणच आहे.

In reply to by सुबोध खरे

तुम्ही लिहिता ते विश्लेषण म्हणून चांगले वाटले तरी ते तसेच असेल असेच काही वाटत नाही . उदा. 2014 ला आपल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला झाकण्यासाठी राष्ट्रवादी ने पाठींबा दिला , मला वाटते 122 पासून 145 गाठायला अवघड नव्हते , म्हणून bjp च्याच लोकांनी शिवसेने ला नाममात्र पदे देता यावीत म्हणून खेळलेली ती चाल होती. आणि पार्टी विथ डिफरन्स ह्या इमेज ला येथेच पहिला सुरुंग लावला गेला . गाडीभरून पुरावे असणारे हेच , पुढे राष्ट्रवादी च्या नेत्याना जेल मध्ये टाकण्याच्या भाषा करणारे , पुढे गप्प झाले , अगदी मोदींनी पवार यांना राजकीय गुरु म्हणणे आणि बारामती मध्ये भेट घेणे हे सुद्धा घडले . मग आधी तावा तावा ने बोलणे आणि नंतर गळा भेट घेणे हे उघड दिसत होते . नंतर या निवडणुकीत पवारांनी मार्केटिंग केले , पावसात भिजले ect. याबद्दल . राष्ट्रवादी आणि काँग्रेस नावाला पण न ठेवण्याचा चंग बांधलेली bjp .आणि स्वतःच्या अतिआत्मविश्वासात रमून , विकास सोडून भरकटलेल्या मुळे त्यांच्या विरोधात मते गेली , हे bjp आणि समर्थक कधी मान्य करणार ? पवार 2014 ला पण होते . त्यामुळे मार्केटिंग , वगैरे मला काही वाटत नाही . पवारांची तळागाळात पोहचण्याची क्षमता विरोधक हि मान्य करतील , त्यामुळे स्वछ प्रतिमा , पार्टी विथ डिफरन्स , acche din , विकास हे 2014 चे कुठलेच बिरुद भाजपा ला मिरवता आले नाही . तरी वंचित मुळे 10-20 सीट्स चा tari फायदा युती ला झाला हे ते पण नाकारणार नाही .. त्यामुळे 100 च्या वर जरी उमेदवार निवडून आले तरी bjp ला लोकांची पुर्ण सहानभूती अजूनही मिळवता आली नाही , आणि हे हेरूनच शिवसेने ने आग्रही भूमिका मांडली. शरद पवार यांना काँग्रेस चा प्रतिसाद मिळाला नाही .म्हणून ते विरोधात बसणार म्हणाले असे तुम्ही म्हणत आहात , निवडणूक निकाला पासून ते हेच म्हणत आले आहेत . Tv वरती तुम्ही पाहिले असेल , बाकी त्या मागचे काही तेच जाणो .. राहता राहिला काँग्रेस चा प्रश्न , मला वयक्तिक पहिल्या पासून वाटते ते सत्तेत पाठींबा देणार नाही , कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्यांचेच प्राबल्य सत्तेत राहील , मग विरोधात बसने काय वाईट हे वाटणे चूक नाहीच , त्यामुळे bjp प्लस सेना सत्तेत येईल हेच माझे पहिल्या पासून म्हणणे आहे . शिवसेना 2014 चा आणि त्यानंतर च्या फेरफाटीचा बदला घेत आहे हे मात्र नक्की . बघू येणारा आठवडा सगळे उत्तरे घेऊन येईलच .

In reply to by सुबोध खरे

भाजपच्या जागा कमी होण्याचे कारण युति हेच आहे. २०१४ प्रमाणे भाजपाने युती न करता निवडणूक लढवली असती तर जागा वाढल्या असत्या असे मला वाटते. बर्‍याच ठिकाणी भाजपाचा उमेदवार नाही म्हणून लोकांनी शिवसेनेला मते दिली आहेत...

In reply to by सुबोध खरे

विश्लेषण उत्तम केले आहे. किंतु आता सगळ्यांनी घाटाचे पाणी पिले आहे. वंचित, ओवैसी, पवार आणि कोंग्रेस काही जागावर धोरणात्मक युति करू शकतात. असे झाले तर भाजपाला भारी पडेल. तेव्हा तेलही गेले तुपहि गेले व धुपाटने राहिले ऐसी अवस्था होईल. तरीही माझा आतला आवाज सांगतो की शिवसेना भाजपाबरोबर जाईल. आणि पदरात जास्त मंत्रीपदे पाडुन घेईल

In reply to by तर्री

बरोबर आहे. मी ह्याच वयोगटात आहे आणि राममंदिर होईपर्यंत तरी मला भाजपाला मतदान करावे लागेल (आणि युती असली तर नाईलाजाने युतीला). कारण दुसरा कोणताही पक्ष ह्या मुद्द्याच्या बाजूने लढू शकत नाही.

लोकहो, मोदी, शहा व फडणविसांच्या मनात नक्की काय आहे? तिकीट वाटप नेमकं कोणत्या आधारावर झालं? भाजपच्या घसरणीला तिथपासनं सुरुवात झालीये. एकीकडे बावनकुळेंसारखे कार्यप्रवीण निष्ठावान डावलायचे आणि दुसरीकडनं आयारामांना आयात करायचं. त्याच वेळेस शिवसेनेलाही शिरजोर होऊ द्यायचं नाही. त्याकरता तिकीट वाटपात जमेल तितकी संदिग्धता ठेवायची. म्हणून युती लांबली. याचा अर्थ काय लावायचा? मोदी शहांनी फडणविसांना खच्ची करायला मुद्दाम खेळी केली आहे का? की फडणवीसही या खेळात सामील आहेत? आज फडणवीस एकाकी पडलेले वाटतात का? बीबीसी मराठीवर हा लेख वाचला : https://www.bbc.com/marathi/india-50290626 संजय राऊत फाटक्या तोंडचे आहेत हे सगळ्यांना माहितीये. पण भाजपच्या चुकांची चर्चा होत नाही. ती व्हावी म्हणून हा संदेश. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अहो मग शिल्लक कोण ? चिक्कीताई खडसे सगळ्यांचा गेम झालाय फडण २० गेले तर राहिले कोण ? विखे कि गडकरी

शिव्या सेना बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन विभाग झाले आहेत असे वाटते. एकाचे प्रमुख, मुखदुर्बळ उद्धव उपाख्य डॉ. जेकिल आणि दुसऱ्या शिव्या सेनाविभागाचे प्रमुख संजय उपाख्य मिस्टर हाईड .