श्रद्धांजली
गेल्या वर्षभरात, म्हणजे २०१८च्या साधारण अखेरीपासून ते आतापर्यंत मिपाने आणि मिपाकरांनी तीन मिपाकर बघता बघता कायमचे गमावले. आज २०१९ची दीपावली साजरी करतानाच्या उत्सवाला ह्या दुःखाचीही काळी किनार आहे.
लिहिण्याचे, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य अबाधित असले पाहिजे, संस्थळावरील वातावरण मुक्त असले पाहिजे हे धोरण बाळगून मिसळपावची स्थापना करणारे तात्या अभ्यंकर उर्फ चंद्रशेखर अभ्यंकर एक उमदे, अवलिया व्यक्तिमत्त्व होते. शास्त्रीय संगीत आणि त्यासंबंधित घराणी, गायक, व्यक्तिचित्रे ह्याबरोबरच इतरही खुसखुशीत लेखन करणारे, आवडलेल्या लिखाणाला दिलखुलास प्रतिसाद देणारे, तितक्याच हिरिरीने न पटलेल्या मुद्द्यांवर वाद घालणारे, माणूसवेडे तात्या मिपाच्या सुरुवातीच्या दिवसांत मिपाचा यूसपी होते असे म्हणायला हरकत नाही. त्यांंनी नुसतेच संस्थळ सुरू केले असे नाही, तर अनेक गुणी माणसेही घेऊन आले, त्यांना मिपाकर बनवले, मैत्री केली, मिपापरिवार घडवला, वाढवला. मजरूह सुलतानपुरी ह्यांचा प्रसिद्ध शेर आहे, त्यात किंचित बदल करून म्हणावेसे वाटते की,
वो अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया
दुर्दैवाने आपल्या कारवाँची साथ मात्र तात्यांनी अचानक आणि लवकर सोडली..
तात्या अभ्यंकर ह्यांचे
मिपावरील व
त्यांच्या ब्लॉगवरील लेखन.
***
सुरुवात झाली बोका-ए-आझमच्या अकाली जाण्याने. मिपावरचा अभ्यासू, शैलीदार लेखन करणारा, सिद्धहस्त असा हा लेखक. आपल्या विनयशील आणि साध्या स्वभावाने अनेकांचा आवडता झालेला, प्रचंड लोकसंग्रह बाळगून असलेला बोका. मिपावरील बोक्याचे लेखन म्हणजे मिपाचे वैभव आहे. बोक्याच्या अकाली जाण्याने मिपा आणि मिपाकर वाचकांचे आणि बोक्याच्या मित्रपरिवाराचे कायमचे नुकसान झाले.
एक उत्तम लेखक आपल्यातून निघून गेला आणि त्याची उणीव यापुढे कायम भासणार याची खंत आहेच, त्याहीपेक्षा एक मनस्वी, सहृदय व्यक्ती आता आपल्यात कधीच नसेल, ही खंत अधिक डाचणारी आहे. ही तूट भरून निघणारी नव्हे.
बोका-ए-आझम ह्यांचे
मिपावरील लेखन.
***
हे दोन धक्के पुरेसे नव्हते, म्हणून वरुण मोहिते ह्यांच्या निधनाची बातमी लागोपाठ आली. मिपाच्या सुरुवातीच्या काळापासून मिपावर असलेल्या मोहिते ह्यांचे लहान वयात अकाली जाणे अतिशय दु:खद आणि धक्कादायक होते. भरपूर वाचन करणारा, अनेकविध अनुभव गाठीशी असणारा उमदा मित्र अनेक मिपाकरांनी गमावला.
वरूण मोहिते ह्यांचे
मिपावरील लेखन.
***
तात्या, बोका-ए-आझम आणि वरुण मोहिते ह्या तिघांनाही मिपातर्फे विनम्र श्रद्धांजली. तुमच्या लेखनातून मिपावर तुमचं अस्तित्व आणि मिपाकरांच्या मनात तुमची आठवण अबाधित राहील.


प्रतिक्रिया
विनम्र श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
विनम्र श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
:-( आदरांजली _/\_
सर्वांचे
तात्या व्यतरिक्त कोणाला
प्रत्यक्षात कुणाचीच भेट झाली
भावपूर्ण आदरांजली...
तिघांना हि व्यवस्थित ओळखत
> वरूण यांच्या आजाराची कल्पना
In reply to तिघांना हि व्यवस्थित ओळखत by सुबोध खरे
नाही
In reply to > वरूण यांच्या आजाराची कल्पना by एमी
ईश्वरेच्छा बलीयसी
In reply to नाही by सुबोध खरे
रिहॅबबद्दल त्याने स्वतःच
In reply to नाही by सुबोध खरे
माझ्या मते ...
In reply to रिहॅबबद्दल त्याने स्वतःच by एमी
ईश्वर सर्व मृतात्म्यांना चिरशांती देवो