✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कागदफूल

इ
इरामयी यांनी
Sun, 04/28/2019 - 11:29  ·  लेख
लेख
मम्म्मी, what is bougainvillea? माझी छोटी मला विचारत होती. मी तिला बोगनवेलीचं चित्र दाखवलं, थोडीशी माहिती वाचून दाखवली आणि मग माझं मलाच कळलं नाही की माझं मन भूतकाळात कधी घरंगळलं ते. माझ्या लहानपणी आम्ही मुली बोगनवेलीच्या फुलांना कागदी फुलं म्हणत असू. उन्हाळ्याच्या सुट्टया लागण्याच्या जरा आधीपासून आजूबाजूच्या घरांच्या कुंपणांवर एखाद्या सिद्धहस्त कलावंताने चितारल्यागत लगडलेली ती गडद गुलाबी पर्णसादृश फुलं म्हणजे बोगनवेलीची फुलं. या बिनवासाच्या फुलांची मला आणि माझ्या मैत्रिणींना कसली मोहिनी होती काय जाणे! कुंपणांचे शेंडे गुलाबी व्हायला लागले की आमच्या नजरा अधूनमधून सततच शेजाऱ्यापाजाऱ्यांची कुंपणं चाचपायला सुरुवात करत. कागदी फुलं यायला लागली. आता आठवड्या दोन आठवड्यात बहर येईल. मग खूप खूप मज्जा! ती फुलं खुडणं म्हणजे एक कौशल्याचं काम. कारण या फांद्या संपूर्णपणे काट्यांनी मढलेल्या. त्यामुळे अगदी अलगदपणे ती पानांसारखी दिसणारी फुलं काढायची आणि हाताला ओरखडे पडू नाही द्यायचे हे काम काही सोपं नसायचं. आणि आम्ही सगळ्या मुली लहानखुऱ्या. फुलं असायची झाडांच्या शेंड्यावर. मग एकीने ओणवं उभं रहायचं आणि दुसरीने तिच्या पाठीवर चढायचं. तिसरी मैत्रीण सोबत असेल तर तिने फ्रॉकची झोळी करून त्यात फुलं गोळा करायची. आणि या गडबडीत एखादा वात्रट काटा बोटाचं किंवा तळहाताच्या मागच्या भागाचं किंवा थेट गळ्याचं किंवा गालाचं चुंबन घ्यायचाच. किंवा कधी एकही ओरखडा येऊ दिला नाही म्हणून खूष व्हावं तर ओणवं राहिलेली मुलगी अचानक काही कारणास्तव हलायची आणि मग दोघीही फुलांसकट तोंडघशी! ती कागदफुलं फुलं आंम्ही वहीत दडपून ठेवायचो आणि मग काही दिवसांनी वहीच्या पानांचा वास त्या फुलांना येऊ लागे. निदान मला तरी तो यायचा. कारण मी तो कौतुकाने घरात कोणाला देऊ केला तर माझी हसून बोळवण केली जायची. तुझं आपलं काहीतरीच असतं. तुला कागदी फुलं आवडतात त्यामुळे तुला हे असले कसले कसले वास येतात! आम्हांला कुणाला नाही येत वहीचा वास फुलांना. कागदी फुलांची अजून एक गंमत सांगते. ही फुलं केसांत अडकवलेली छान दिसायचीच पण ती मोगऱ्याच्या किंवा अश्याच छान वासाच्या जाई किंवा जुईच्या गजऱ्यात मधोमध माळून देवीच्या तसबिरीला वाहिली की सुद्धा खासच शोभून दिसायची. आता हल्ली धकाधकीच्या शहरी जीवनात बोगनवेलीची फुलं खुडणं कित्येक वर्षांत राहूनच गेलंय. अगदी विसर पडला होता. आज छोटीच्या प्रश्नामुळे त्या लहानपणीच्या नाजूक गुलाबी आठवणी जाग्या झाल्या आणि मी माझ्या मुलांना सांगून लगोलग बाहेर पडले. घराजवळच्या एका चर्चच्या कुंपणावरची मऊसर गुलाबी कागदफुलं मला जोरजोराने हाका मारत होती: "ए, धांदरट. किती वर्षांपासून तुला हाका मारतोय. म्हटलं ही वेडी मुलगी आम्हांला विसरली की काय...?" मी त्यांना म्हटलं, आलेच बघा तुम्हांला घरी घेऊन जायला. पण आज माझ्यासाठी नाही हं, माझ्या छोट्या मुलीसाठी...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
लेख
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
15462 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

छान लिहिलंय हं!

वामन देशमुख
Sun, 04/28/2019 - 11:45 नवीन
>> म्हटलं ही वेडी मुलगी आम्हांला विसरली की काय...? छान लिहिलंय हं!
  • Log in or register to post comments

खूप छान लिहलंय. मिपावर स्वागत

प्रमोद देर्देकर
Sun, 04/28/2019 - 12:42 नवीन
खूप छान लिहलंय. मिपावर स्वागत . येवू दे अजून.
  • Log in or register to post comments

मस्तच।

कंजूस
Sun, 04/28/2019 - 12:49 नवीन
मस्तच।
  • Log in or register to post comments

सुंदर मनोगत !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 04/28/2019 - 12:59 नवीन
सुंदर मनोगत !
  • Log in or register to post comments

+1

जालिम लोशन
Sun, 04/28/2019 - 12:59 नवीन
छान
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इरामयी
Sun, 04/28/2019 - 14:36 नवीन
माझ्या पहिल्यावाहिल्या लिखाणाला असे उत्तेजनात्मक प्रतिसाद मिळतील असं वाटलं नव्हतं. मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इरामयी
Sun, 04/28/2019 - 14:36 नवीन
माझ्या पहिल्यावाहिल्या लिखाणाला असे उत्तेजनात्मक प्रतिसाद मिळतील असं वाटलं नव्हतं. मनःपूर्वक आभार!
  • Log in or register to post comments

अभिनंदन, छान लिहिलंय, स्वागत

अभ्या..
Sun, 04/28/2019 - 22:36 नवीन
अभिनंदन, छान लिहिलंय, स्वागत आहे मिपावर. असेच उत्साही प्रतिसाद आपण इतर लेखकांच्या लेखावरही द्यावेत ही अपेक्षा. खूप वेगवेगळ्या विषयावरचे लेख, कविता, कथा, चर्चा इथे आहेत. आपल्या प्रतिसादाने जसा आपल्याला आला तसा हुरूप त्यांनाही मिळो ही सदिच्छा. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी

हो, जरूर.

इरामयी
Mon, 04/29/2019 - 19:29 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हो, जरूर.

इरामयी
Mon, 04/29/2019 - 19:29 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हो, जरूर.

इरामयी
Mon, 04/29/2019 - 19:30 नवीन
हो, जरूर प्रतिसाद देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वरचा मजकूर चूकून दोन्दा छापला

इरामयी
Sun, 04/28/2019 - 14:38 नवीन
वरचा मजकूर चूकून दोन्दा छापला गेलाय. क्रुपया उडवाल का?
  • Log in or register to post comments

ओघवती शैली आहे तुमची . पु ले

सुचिता१
Sun, 04/28/2019 - 15:52 नवीन
ओघवती शैली आहे तुमची . पु ले शु!!
  • Log in or register to post comments

छान!

अन्या बुद्धे
Sun, 04/28/2019 - 18:41 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

खुपच छान

श्वेता२४
Sun, 04/28/2019 - 21:02 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

वा वा सुंदर प्रकटन!

सोन्या बागलाणकर
Mon, 04/29/2019 - 09:06 नवीन
वा वा सुंदर प्रकटन! अजून येऊ द्या.
  • Log in or register to post comments

अभिनंदन, छान लिहिलंय,

महासंग्राम
Mon, 04/29/2019 - 09:54 नवीन
अभिनंदन, छान लिहिलंय,
  • Log in or register to post comments

वाह, सुंदर सुरेख !

चौथा कोनाडा
Sat, 06/29/2019 - 23:14 नवीन
वाह, सुंदर सुरेख ! माझ्याही बालपणीच्या कागदीफुलांच्या आठवणी जाग्या झाल्या ! किती निरागस असते ते वय ! किती जीव जडतो अश्या छोट्या छोट्या गोष्टीवर ! शेवटचा परिच्छेद आणि संवादात्मक शेवट तास मस्तच ! लिहीत रहा, आनंद वाटत रहा ! पुलेशु ।।
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय.

टर्मीनेटर
Sat, 06/29/2019 - 23:43 नवीन
छान लिहिलंय. पुढील लेखनास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

छान लिहलंय, लिखाण करत रहा...

मदनबाण
Sun, 06/30/2019 - 10:53 नवीन
छान लिहलंय, लिखाण करत रहा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant
  • Log in or register to post comments

+1

जालिम लोशन
Sat, 07/06/2019 - 23:59 नवीन
छान
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा