आजच्या म. टा. मधील संवाद पुरवणीतल्या 'माझेही मत' मध्ये प्रसिद्ध झालेले हे पत्र
म. टा. च्या संकेतस्थळावर मी नोंदविलेली ही प्रतिक्रिया
मा. संपादक,
आजच्या म. टा. संवादमधील ’माझेही मत’ या सदरात श्री. विजय दांडेकर यांनी लिहिलेल्या पत्रातून एकुण असा सूर असल्याचे जाणवले की स्वा. सावरकर यांनी बोटीतुन समुद्रात उडी मारलीच नव्हती. या साठी श्री. दांडेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक व स्व्तातंत्र्यसंग्रामाचे अभ्यासक कै. डॉ. य. दि. फडके यांचा दाखला दिला आहे. या संबंधी मला असलेल्या दोन शंका
१) दांडेकरसाहेबांनी ह प्रश्न डॉ. फडके यांच्या हयातीत का उपस्थित केला नाही? आता ते नसताना ’आज ते असते तर त्यांनी खुलासा केला असता’ असे लिहिण्यात काही अर्थ नाही
२) जेव्हा अंदमानान येथील स्वातंत्र्यज्योतीवरील स्वा. सावरकर यांचे उदगार मणीशंकर अय्यर यांनी काढुन टाकले तेव्हा बराच गदारोळ उठला होता व कोट्यावधी स्वा. सावरकरभक्त संतप्त झाले होते व त्या अनुषंगाने अनेक चर्चा घडल्या होत्या. दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात मी या संबंधी डॉ. फडके यांची मुलाखत पाहिली होती. डॉ. फडके यांच्या सारख्या परखड संशोधकाने जर त्यांना असे काही माहित असते तर त्यांनी ते लपवुन न ठेवता जनतेला सांगितले असते. स्वा. सावरकरांची धास्ती जन्मभर बाळगणाऱ्या ईंग्रजांनी तर अशी काही कपोलकल्पित घटना स्वा. सावरकरांचे महात्म्य प्रस्थापित करते आहे हे लक्षात येताच अशी उडी न घेतल्याचे ठणाणा करुन सांगितले असते व स्वा. सावरकरांना जनतेचा आदर लाभणार नाही याची पूर्ण काळजी घेतली असती. मात्र इंग्रजसरकारने या घटनेचा इन्कार केल्याचे कुठे ऐकिवात नाही.
स्वा. सावरकरांची ही जगप्रसिद्ध उडी हे कोट्यावधी हिंदुस्थानियांचे श्रद्धास्थान आहे. श्री. दांडेकर महाशयांना अशी घटना घडलीच नाही असे म्हणायचे असेल तर त्यांनी स्वा. सावरकरांचे ते पत्र व अन्य पुरावे कृपया सादर करावेत. ते खरे असल्यास आम्ही अंध भक्ति न करता आम्हाला आराध्य असले तरी स्वा. सावरकरांनी अशी उडी मारली नव्हती हे मनोमन मान्य करु.
वाचने
7660
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे हा कोण
सर्वसाक्ष
कोण हा
नाना, दुर्लक्ष नको!
सहमत
इतिहास
पुरावे
+१ सहमत आहे!
In reply to पुरावे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
पुरावा
धन्यवाद विकासराव...
In reply to पुरावा by विकास
उत्तम दुवा!
In reply to पुरावा by विकास
कोण हा
१००% सहमत..
In reply to कोण हा by विसोबा खेचर
मानसिक
मूळ मुद्दा
१००००००००००००००००००००१% सहमत
In reply to मूळ मुद्दा by प्रकाश घाटपांडे
+१
In reply to मूळ मुद्दा by प्रकाश घाटपांडे
अवांतर वाटले...
In reply to मूळ मुद्दा by प्रकाश घाटपांडे
बालिश बहु बायकात बडबडला.....
जेव्हा
असल्या क्षुल्लक लोकांच्या बोलण्याकडे ल़क्ष देतो कोण?
मूळ कागदपत्रातला मजकूर -
धन्यवाद!
In reply to मूळ कागदपत्रातला मजकूर - by विसुनाना