की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने.....

रत्नागिरीस आलो असताना पतित पावन मंदिर व स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास भेट दिली व काही अमुल्य क्षण टिपले.....
माझी सर्व मिपा करांस नम्र विनंती आहे,,जर कधी रत्नागिरीस येण्याचा योग झाला तर या ठिकाणी जरुर भेट ध्या.
(विशेष आभार :-- सौ.गीता कृ पालवणकर यांच्या कडुन त्यांच्या अंदमान भेटीतील काही फोटो इथे दिलेले आहेत.)


(सप्टेंबर १९२९ मधे आपल्या अमोघ वत्कृत्वाने सभा जिंकुन पूर्वास्पृश्याना रत्नागिरी येथील मंदिरात प्रवेश मिळवून देताना तात्याराव सावरकर )


(भारतात सर्वात प्रथम विदेशी कपड्यांची होळी पुण्यातील लकडी पुलाजवळ करताना लोकमान्य टिळकांसमवेत युवा सावरकर:--७ ऑक्टोबर १९०६ विजयादशमी)


(चाफेकर बंधुंच्या फाशीमुळे उद्विग्न होऊन भगुर येथील आपले घरातील अष्टभुजा देवीसमोर भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन अशी शपथ घेताना बाल विनायक :--१८ एप्रिल १८९८ )


(अंदमानात 'कोलू' नावाच्या तेलाच्या घाण्याला जुंपून घेऊन प्रखर देशभक्तीच्या गुन्ह्यासाठी दोन जन्मठेपांचा सश्रम कारावास भोगताना स्वातंत्र्यवीर सावरकर )


(स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या 'मोरिया' जलयानातुन उडी मारुन मार्सेलिस,फ्रान्सचा किनारा गाठला त्याची प्रतिकृती)

अंदमान :--


(येथेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते.)

(स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त )
मदनबाण.....

शाब्बास रे

शाब्बास रे मदनदा.

तात्यारावांचं हे स्मारक आणि पतित पावन मंदीर ह्यांचे फोटो छानच.
ह्या माहितीबद्दल धन्यवाद. Smile

बाकी, तात्यारावांसारख्या सह्स्त्रसुर्यांच्या तोडीच्या मानवसुर्याबद्दल माझ्यासारख्या रातकिडयानं काय बोलावं?

तात्यारावांच्या चरणि सहस्त्र प्रणाम.
_/\_

हेच

हेच म्हणतो.. प्रत्येक शब्दाशी सहमत.

नतमस्तक !!!

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

वरील

वरील प्रतिसादांशी सहमत

शेवटचा

शेवटचा फोटो पाहून काटा आला अंगावर.. इथे, या खोलीमधे सावरकर राहीले.. कोलुला जुंपून घेतलं, सतत भारतमातेच्या चांगल्याचा विचार केला.. कमला हे काव्य लिहीले ... प्रत्यक्ष नाही पाहीले, पण तुझ्या फोटोंनी सफर घडवलीस मदनदा!! खूप धन्यु!!

http://bhagyashreee.blogspot.com/

हेच म्हणतो...

सफर घडवल्याबद्द्ल धन्यवाद!
असे मंदिर स्थापन करणार्‍या माणसाला जातीयवादी म्हटले जाते तेव्हा खरच वाईट वाटते.

धन्य ते

धन्य ते सावरकर.....

आणी धन्यवाद मदनबान !!!!!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

खूप छान

फारच छान फोटो.
शतशः आभार

छान

चित्रांसाठी आभार !
- (प्रभावित) लिखाळ.

खरंच डोळ्यात पाणी आलं

प्रत्यक्ष नाही पाहीले, पण तुझ्या फोटोंनी सफर घडवलीस मदनदा!! खूप धन्यु!!

हेच म्हणते....
सावरकरांच्या चरणी माझाही प्रणाम.

धन्य..

मिपा धन्य झालं!

तात्या.

फोटो मस्तच

सर्व फोटो पाहुन सावरकरा॑ बद्दलचा आदर अजुनही व्दिगुणीत झाला,
स्वात्॑त्रवीर सावरकरा॑ना मा़झे शतदा व॑दन
ने मज सी ने परत मातृभुमीला सागरा प्राण तळमळा....
डोळ्यातुन पाणी आणते.
काय आयुष्य जगले असतील ते.

धन्यवाद

अप्रतिम फोटो, बाणा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सगळेच

फोटो छान आहेत मदणबाण. Smile
बाकी धमाल म्हणतो तेच खरे.
अंदमानचे फोटो पाहुन अंगावर काटा आला.
आयुष्यात एकदा तरी त्या महातीर्थाच दर्शन घ्यायची ईच्छा आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

क्या बात है...

सध्या तात्यारावांच आत्मचरित्र वाचत आहे. विलक्षण व्यक्तिमत्व...प्रकांड पंडित.

तात्यारावांच्या बाबतीत अजून एक ऐकलेलं ...

आलात तर तुमच्या बरोबर..
नाही आलात तुमच्याशिवाय..
आणि आडवे आलात तर तुम्हाला मारून ..
आम्ही पुढे जातच राहणार...

काय ज्वलंत निष्ठा...

तात्यारावांना शत दंडवत...आणि मदनबाण यांना मनापासून धन्यवाद...

मुकुल

अतिशय छान

नमस्कार,

जबरदस्त.

दुसरा शब्दच नाही. फोटो बघत असताना आपोआप हात जोडले गेले.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सही !!!

पतित पावन मंदीर आणि इतरही फोटोतील माहिती सुरेख.
सावरकर स्मारकाची सफर घडवून आणल्याबद्दल आपले आभार !!!

अतिशय सुरेख प्रकाशचित्रे मदनबाणा!

तात्यारावांचे वर्णन करायला समर्थांचे शब्द थोडा बदल करुन उसने घेतोय

निश्चयाचा महामेरु
भारतभूसि आधारु
सशस्त्र क्रांतिचा निर्धारु
स्वातंत्र्ययोगी!

चतुरंग

सुंदर

बाणा,
उत्तम काम केलयस तू. धन्यवाद!
आंबोळी

धन्यवाद

फोटो सफरीबद्दल धन्यवाद!

सावरकरांचे खालील अर्थाचे (मूळ वाक्य जास्त प्रभावी आहे, पण आत्ता मिळाले नाही) अंदमानातील वाक्य प्रसिद्ध आहे. त्यात त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास दिसतो. ज्याची वरील फोटो पाहताना आठवण झाली:

"आज आपण असहाय्य आहोत, आज आपला या अशा ठिकाणि अपमान होईल. पण उद्या असाही दिवस येईल की स्वतंत्र भारतातील जनता तिर्थक्षेत्र समजून अंदमानच्या या काळकोठडीचे दर्शन घेण्यास येईल आणि अभिमानाने सांगतील की हाच तो तुरूंग जेथे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनीक राहीले होते..."

अगदी

"आज आपण असहाय्य आहोत, आज आपला या अशा ठिकाणि अपमान होईल. पण उद्या असाही दिवस येईल की स्वतंत्र भारतातील जनता तिर्थक्षेत्र समजून अंदमानच्या या काळकोठडीचे दर्शन घेण्यास येईल आणि अभिमानाने सांगतील की हाच तो तुरूंग जेथे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनीक राहीले होते..."
हेच म्हणतो...

मदन धन्यवाद रे!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आपण सर्वांनी

निश्चितच भेट द्यावी असा एका समृद्ध संकेतस्थळाचा दुवा.

http://www.savarkar.org

चतुरंग

खरच

तात्यारावांचं हे स्मारक आणि पतित पावन मंदिर ह्यांचे फोटो छानच.
ह्या माहितीबद्दल धन्यवाद.

धन्यवाद

धन्यवाद मदनबाण

वाचून बरे वाटले !!!

धन्यवाद

चांगली सफर घडवलीस रे!

मदनबाण,

मदनबाण, फोटो दिसत नाहित रे... इथे फ्लिकर वगैरे बॅन आहे... पिकासा वगैरे वर चढवता येतिल का?

बिपिन.

आभार

फोटोंबद्दल आणि माहितीबद्दल अनेक आभार.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी