✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

व
वामन देशमुख यांनी
Tue, 01/01/2019 - 20:18  ·  लेख
लेख
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
225933 वाचन

💬 प्रतिसाद (616)

प्रतिक्रिया

अच्छे दिन चे प्रतीक होते म्हणे

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 01/30/2019 - 09:55 नवीन
http://captivatour.com/a-greek-mythical-hero-behind-the-mughal-throne/ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

सौ चूहे खाके बिल्ली चली हाज

गामा पैलवान
Wed, 01/30/2019 - 17:28 नवीन
च्यायला, एव्हढा शांतीप्रिय होता शहाजहान तर सतत मोहिमा का काढल्या? सौ चूहे खाके बिल्ली चली हाज. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

सगळ्या मोगल्या आक्रमकामध्ये

ट्रम्प
Wed, 01/30/2019 - 20:36 नवीन
सगळ्या मोगल्या आक्रमकामध्ये शाहया ने कमीत कमी हिंदू मारले असतील , म्हणून त्याला शांततप्रिय म्हणत असतील .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

म्हणून त्याची पिलावळ त्याला

ट्रम्प
Wed, 01/30/2019 - 20:38 नवीन
म्हणून त्याची पिलावळ त्याला शांततप्रिय म्हणत असेल !!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

अल्ला मेहेरबान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 01/30/2019 - 13:42 नवीन
बेनामी संपत्ती प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याला लवादानं दिलासा दिला आहे. अलिबागमधील मालमत्तेचा लाभार्थी असल्याच्या आरोपांतून त्याची मुक्तता करण्यात आली आहे. तसंच मालमत्ता जप्तीची केलेली कारवाई निराधार असल्याचं नमूद करत लवादानं आयकर विभागाला फटकारलं आहे. लवादाचे प्रमुख डी. सिंघई आणि सदस्य तुषार व्ही. शाह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शाहरूख आणि कंपनीविरोधातील कारवाईच्या आदेशावरूनही लवादानं आयकर विभागावर ताशेरे ओढले. गेल्या वर्षी फेब्रुवारीत व्यवसायाच्या हेतूनं झालेल्या देवाण-घेवाणीला बेनामी व्यवहार झाल्याचं म्हणू शकत नाही. कारण कर्जाच्या माध्यमातून पैशांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं अलिबागमधील मालमत्ता ही बेनामी संपत्ती नाही आणि आयकर विभागानं केलेली जप्तीची कारवाई अयोग्य असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असं खंडपीठानं स्पष्ट केलं आहे.  १५ कोटींच्या संपत्तीचा वाद आयकर विभागानं रायगडमधील अलिबाग येथील शेतजमीन, फार्महाऊस आणि भूखंडावर जप्तीची कारवाई केली होती. त्याची किंमत अंदाजे १५ कोटी रुपये आहे. या प्रकरणात आयकर विभागानं शाहरुख खान आणि मेसर्स देजा वू फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आरोपी केलं होतं. 
  • Log in or register to post comments

आता तोतऱ्या ला भारत हा देश

ट्रम्प
Wed, 01/30/2019 - 14:24 नवीन
आता तोतऱ्या ला भारत हा देश सुरक्षित वाटत असेल आणि त्याला उठसुठ पाकप्रेमाची भरती येणार नाही .
  • Log in or register to post comments

अल्ला मेहेरबान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 01/30/2019 - 14:34 नवीन
सलमान सुटला , शाहरुख सुटला. लोकांच्या जळफळाटासाठी आता जनाब तैमुर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

व्यावसाईक आणि वैयक्तिक

lakhu risbud
Wed, 01/30/2019 - 14:59 नवीन
व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ मोगा या विषय बद्दलचे मत जाणून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

'No mention of Rafale, feel

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 01/30/2019 - 21:04 नवीन

'No mention of Rafale, feel let down': Parrikar slams Rahul for politicising courtesy visit

पूर्वी एकदा, रागांनी वाजपेयी आजारी असताना, "मीच्च कसा पहिला (पक्षी : भाजप नेत्यांच्या अगोदर) त्यांच्या भेटीला गेलो" असा राजकिय भाव खाण्याचा खालच्या पायरीवरचा केविलवाणा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी, कर्नाटकमधिल एका कॉन्ग्रेस विधायकाने, अमित पटेल यांच्या आजारावर खालच्या पातळीवर जाऊन टीप्पण्या केल्या होत्या. आता रागांनी गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना त्यांच्या आजारानिमित्ताने सदिच्छाभेट दिली असे सांगत नंतर, "राफालं विमानांच्या न केलेल्या चर्चेबद्दल टीप्पणी करून, आपली भेट ही सदिच्छाभेट नसून, अजून खालच्या पायरीवर उतरून केलेले राजकारण होते, हे सिद्ध केले. अरेरे, अगतिक होऊन किती खोटे बोलायचे आणि किती खालच्या स्तरावर जायचे याला काही सीमा?... याबाबतीत, कॉन्ग्रेस आणि खुद्द तिचे अध्यक्ष जणू बुड नसलेल्या पिंपात उभे असल्यासारखे वागत आहेत... भारताच्या इतिहासात, "विरोधकांच्या आजारपणाचे भांडवल करणारे" असे राजकारण, इतक्या खालच्या पायरीवर गेल्याची दुसरी उदाहरणे शोधणे कठीण आहे!!! :( :( :( Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

रागा नावाच्या मूर्ख कार्ट्या

बाप्पू
Wed, 01/30/2019 - 21:53 नवीन
रागा नावाच्या मूर्ख कार्ट्या कडून दुसरी काय अपेक्षा करणार?? राखी सावंत पेक्षाही जास्त स्टंटबाजी रागा करतोय. ज्यावेळी त्याने एका सभेत स्वतःला गरीब म्हणवत फटका (खरेतर स्वतःच फाडलेला ) खिसा दाखवला होता तो प्रसंग म्हणजे कहर होता... कीव येते अश्या माणसाकडून पंतप्रधान पदाची अपेक्षा करणाऱ्या लोकांची. अनेक सुशिक्षित लोक तसेच फेक्युलर लोक (स्पेशली काळ्या मांजरी चे भाऊबंद ) नेमके काय पाहून या विदुषकाला भारताचा पंप्र बनवू इच्छितात ते कळत नाही. टीप : रागाचा विरोध करतोय म्हणजे मी मोदीभक्त आहे असे नाही. मी टीका केली म्हणून मोदी किंवा BJP च्या चुका दाखवून राहुल्याचा मूर्खपणा दाबून टाकण्याचा किंवा विषय भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. विशेतः मांजरांनी खाल्या हाडकाला जागून इथे गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

...

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 01/30/2019 - 22:40 नवीन
आश्चर्य वाटले, पर्रीकर केंद्रीय समरक्षण खात्यातून राज्यात परत गेले , त्यात ते गँभीर आजारी आहेत, असे असताना , त्या भेटीबाबत राजकीय कमेंट राहुल गांधींनी करायला नको होती .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

....

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 01/30/2019 - 22:35 नवीन
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. नेहमीच गांधी विचारांना विरोध करणाऱ्या अखिल भारत हिंदू महासभेने खूप विकृत पद्धतीने महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी केली. हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पूजा शकुन पांडे यांनी महात्मा गांधींच्या पुतळयाला गोळी मारुन पुण्यतिथी साजरी केली. आजच्याच दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. पूजा शकुन पांडे यांनी गोळी मारताच पुतळयामधून रक्त वाहण्यास सुरुवात झाली. हे कृत्य केल्यानंतर पांडे यांनी महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई वाटली. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे अखिल भारत हिंदू महसभेशी जोडलेला होता.
  • Log in or register to post comments

बदनाम कोण ?

गामा पैलवान
गुरुवार, 01/31/2019 - 00:14 नवीन
हिंदूंना बदनाम करायला काँग्रेसवाले कुठल्याही थराला जातील! पण एकंदरीत गंमत वाटली पुतळ्याला गोळी मारून पुण्यतिथी साजरी करायची! :-D नेहरूची कशी साजरी करणार? सिफिलीस झालेला पुतळा कुठून आणायचा? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

व्हिडीओ

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/31/2019 - 00:49 नवीन
https://youtu.be/7-_AQE4B9x4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

खोटारडेपणाचा कळस....

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/31/2019 - 08:59 नवीन
Fact Check: Viral post claiming Modi govt killed more terrorists than that of Manmohan Singh is false India Today Fact Check found that the entire claim is false and the newspaper clipping is photoshopped. https://www.indiatoday.in/fact-check/story/fact-check-viral-post-claiming-modi-govt-killed-more-terrorists-than-that-of-manmohan-singh-is-false-1426590-2019-01-08
  • Log in or register to post comments

मोगा खान

सुबोध खरे
गुरुवार, 01/31/2019 - 10:23 नवीन
मोगा खान यामागे वस्तुस्थिती अशी आहे कि लष्कराला मोकळा हात न दिल्यामुळे अतिरेकी मोठ्या संख्येने देशात घुसत होते. आता लष्कराला प्रतिहल्ला करण्याची मोकळीक दिली असल्याने दारुगोळा किती वापरला याची फिकीर न करता लष्कर पाकिस्तानी ठाण्यावर हल्ले करत आहेत शिवाय बऱ्याच ठिकाणी सीमा सीलबंद करण्यात यश मिळाल्याने आत घुसणारे अतिरेकी कमी झाले आहेत.मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार बरखास्त केल्यावर याला विशेष जोर आला आहे. हि माहिती लष्कराकडून मिळालेली आहे तेंव्हा हि वर्तमानपत्रात येणार नाही अन्यथा मानवी हक्कवाले परत आरडा ओरडा करण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

Damage control

महेश हतोळकर
गुरुवार, 01/31/2019 - 10:55 नवीन
हे कालच्या पर्रीकरांच्या पत्राचं damage control सुरु आहे. आजून ५-६ दिवस तरी असा धुरळा उडणारच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/31/2019 - 13:47 नवीन
लष्कर तुम्हाला माहिती देते, पेपरात अन आम्हाला माहिती मात्र देणार नाही, अशी कोणती तुमची स्पेशल पोस्ट आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माझे ७० वर्गमित्र लष्करात

सुबोध खरे
गुरुवार, 01/31/2019 - 19:13 नवीन
माझे ७० वर्गमित्र लष्करात आहेत. (एक वर्ष पुढे आणि एक वर्ष मागे असे मित्र अधिक १०० -१२५ असतील.) त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत. हे वर्गमित्र तुम्हाला किंवा पेपराना का काही सांगतील? जिथे तिथे पचपच केलीच पाहिजे का? सर्जिकल स्ट्राईक झाला तेंव्हा गुरेझ येथे असणाऱ्या डिव्हिजनचा कमांडर (पॅरा स्पेशल फोर्सचा कमांडो) माझ्या वर्ग मैत्रिणीचा नवरा आहे. तो आता नगरोटा येथे कोअर कमांडर आहे लेफ्टनंट जनरल या हुद्द्यावर. काश्मीर मधील युद्धाची थेट जबाबदारी या कोअर वर आहे.( हि माहिती जालावर उपलब्ध आहे. नाव हवं तर शोधून काढा )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

त्यापैकी १७ ब्रिगेडियर या

विशुमित
गुरुवार, 01/31/2019 - 19:46 नवीन
त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत ==)) हे चिंताजनक वाटत आहे. जबाबदार व्यक्तिमत्व असल्याकारणाने, आशा करतो संवेदनशील माहितीचे आदानप्रदान होत नसावे. ===
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यापैकी १७ ब्रिगेडियर या

विशुमित
गुरुवार, 01/31/2019 - 19:52 नवीन
त्यापैकी १७ ब्रिगेडियर या उच्च पदावर आहेत आणि त्त्यातील पाच जण प्रत्यक्ष काश्मीर मध्ये आहेत. आम्ही व्हाट्सअँप ग्रुप वर कायम संपर्कात आहोत ==)) हे चिंताजनक वाटत आहे. जबाबदार व्यक्तिमत्व असल्याकारणाने, आशा करतो संवेदनशील माहितीचे आदानप्रदान होत नसावे. ===
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बाकीचे बहुसंख्य हे

सुबोध खरे
गुरुवार, 01/31/2019 - 20:46 नवीन
बाकीचे बहुसंख्य हे माझ्यासारखे लष्करातून निवृत्त झाले आहेत त्यामुळे कोणती माहिती जालावर टाकायची हे सर्वाना अर्थातच माहिती आहे. व्हाट्सअँप encrypted असले तरीही ते सुरक्षित नाही हे गृहीत धरूनच तेथे विषय चर्चिले जातात.आणि बहुतेक बातम्या या सार्वजनिक झाल्यावरच तेथे येतात. परंतु पत्रकार आणि पत्रकारिता गढूळ झाल्यामुळे ज्या गोष्टी सार्वजनिक झाल्या आहेत त्याना अजिबात प्रसिद्धी दिली जात नाही आणि यामुळेच त्या गोष्टी लोकांना खऱ्या वाटत नाहीत. आणि लष्करी रितीरिवाजाप्रमाणे आमच्यापैकी कोणी त्याचे समर्थन करण्याच्या फंदात पडत नाही. उदा मोगा खान ला नगरोटाचे कोअर कमांडर कोण आहेत ते शोधायला सांगितले जे जालावर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त लष्करी रितीरिवाजाप्रमाणे तेथे राजकारण हा विषय अजिबात चर्चिला जात नाही. चिंता नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

....

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 01/31/2019 - 14:18 नवीन
राम मंदिराबद्दल विचारले की बोलायचे काँग्रेस मोडता घालते , बाकी कायद्यासाठी मुसलमान मोडता घालतात , असे रिजन द्यायचे सैन्याचे आकडे का कमी , तर ते मानवाधिकारवाले ओरडतात , असे बोलायचे. बाकी इतिहासातील राजवटीना विरोधक नसायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

Damage control है बॉस damage

विशुमित
गुरुवार, 01/31/2019 - 15:38 नवीन
Damage control है बॉस damage control ...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

Fact Check:

डँबिस००७
गुरुवार, 01/31/2019 - 22:55 नवीन
Fact Check: Modi govt killed more terrorists than that of Manmohan Singh म्हणुनच ह्यांच्या लाडक्या भ्रष्ट व राष्ट्रविरोधी कॉंग्रेसच्या पीद्दी लोकांनी पाकिस्तानात जाउन मोदीविरुद्ध मदत मागत होते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

धुवांधार माहिती

विशुमित
Fri, 02/01/2019 - 01:08 नवीन
मानले बुवा तुमच्या शोधपत्रिकारितेला... ज्ञानात भर...!! आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

डैमेज कंट्रोल ?

ट्रम्प
गुरुवार, 01/31/2019 - 12:40 नवीन
भिकाऱ्या चा कसला आलाय डैमेज कन्ट्रोल !!! पूर्वी राष्ट्रपिताच्या च्या नावाने , नंतर आज्जी च्या नावाने आणि त्या नंतर बापाच्या नावाने मतांची भिक मागितली !!!! आता राजकारणाच्या बाजारात बहिणीला सत्ताप्राप्ती साठी उतरवले !!! सत्ता हस्तगत करण्यासाठी नातिगोती वापरून जनतेला भावनिक ब्लैकमेल करणाऱ्या ख़ानावळ ने पर्रिकरांच्या गंभीर अजाराचा उपयोग केला तर त्यात आश्चर्य कसले ? मी तर म्हणेन रागाच्या रक्तात सगळ्या कुटुंबा चा हरामीपणा उतरलेला आहे !!! इथुन पुढे अजुन याची निर्लज्जपणाची काय ! काय !! रुपे पहावी लागतील कोणास ठावूक ?
  • Log in or register to post comments

गोंधळ माजवून

महेश हतोळकर
गुरुवार, 01/31/2019 - 13:02 नवीन
गोंधळ माजवून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

अजुन एक गांधी पैदा न करून

ट्रम्प
गुरुवार, 01/31/2019 - 15:01 नवीन
अजुन एक गांधी पैदा न करून तमाम भारतीय जनतेवर उपकारच केले आहेत !!! वड्रा कुटुंबा पुढे नतमस्तक होणे भारतीय लोकांना ज्यास्त दिवस जमणार नाही आणि रागा निपुत्रिक राहण्याची शक्यता त्यामुळे अजुन पाच दहा वर्षात काँग्रेस चा अस्त होण्याची शक्यता वाटते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

वैयक्तिक टिप्पणी निदान मी तरी

महेश हतोळकर
गुरुवार, 01/31/2019 - 15:45 नवीन
वैयक्तिक टिप्पणी निदान मी तरी टाळेन. "गांधी" घराणं संपलं म्हणून त्यांचे समर्थक संपणार नाहीत. राहूल गांधीला घोड्यावर बसवायची घाई यांना आहे, राहूल गांधीला नाही. त्यामुळे उद्या हेच लोकं दुसरं कोणत तरी बुजगावणं उभ करतीलच. आपल्या हातात फक्त स्वतःची व जमल्यास इतरांची बुद्धी शाबूत ठेवणे आणि असले प्रकार उघड करणे एवढेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

आपल्या देशात "गांधी" नावाची

विशुमित
गुरुवार, 01/31/2019 - 16:04 नवीन
आपल्या देशात "गांधी" नावाची चलती आहे. उद्या एखाद्या दगडाला गांधी नावाचा शेंदुर फासून त्याला निवडणुकीला जनते समोर उभे करतील. विशेष म्हणजे तो दगडसुद्धा निवडून येण्याची जास्त शक्यता आहे. काय करणार नथुरामपेक्षा लोकांना गांधीच अधिक प्रिय आहे. ... सुशिक्षित लोकांचं वगळे मत असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

वैयक्तिक टिप्पणी मी सुद्धा टाळतो हो !!!

ट्रम्प
गुरुवार, 01/31/2019 - 20:31 नवीन
पण पर्रिकरांच्या गंभीर आजारा तुन राजकीय फायदा शोधणाऱ्या रागा वर वैयक्तिक टिप्पणी केल्या शिवाय चैन पडणार नव्हती हो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

गांधी कुटुंब!

ट्रेड मार्क
Fri, 02/01/2019 - 08:03 नवीन
साहेब गांधी कुटुंबात सामील होण्यासाठी काही जैविक माता अथवा पिता गांधी घराण्यातलेच पाहिजेत असा काही दंडक नाही. राजमाता किंवा युवराज किंवा आता त्यांच्या भगिनी यांना जे मान्य असेल ते वारसदार होणार. नेहरूंची कन्या फिरोझ घांदी नावाच्या माणसाबरोबर लग्न करून गांधी झाल्या. सोनिया मैनो राजीव गांधींबरोबर लग्न करून गांधी झाल्या. पण प्रियांका गांधी मात्र रॉबर्ट वद्रा बरोबर लग्न करून गांधीच राहिल्या. आहे का नाही गम्मत? त्यात या कुटुंबातील काही लेकरांच्या आणि कुटुंबाबाहेरील इतर काही लोकांच्या चेहऱ्यात इतके साम्य आहे, पण तरी सगळं चालतं. उद्या मिराया किंवा रेहान वद्रा हे गांधी म्हणून पुढे आले तरी आपण सहज स्वीकारू. काय? मला वाटत नाही काँग्रेस अस्त होईल. सध्या तर असं वाटतंय की राहुल गांधी तर एक पपेट आहे. बाकी सूत्रसंचालक दुसरेच कोणीतरी आहेत. जरी रागा पंप्र झालाच तरी त्याला म्यानेज करता येईल कारण त्याच्याकडे स्वतःचे असे काही विचार/ निर्णयक्षमता नाहीये. जरी हरले तरी खापर रागा वर फोडून आपल्याला नामानिराळे राहता येईल असा प्लॅन असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

सर्वबाद ९२.

गामा पैलवान
गुरुवार, 01/31/2019 - 13:31 नवीन
बक्कीचा डाव गडगडला. एकदिनी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करतांना सर्वबाद ९२. जरा कुठे चेंडू वळू लागला की बक्कीच्या फलंदाजांची भंबेरी उडते. कधीकधी शंका येते की बक्की पैशाच्या जोरावर विदेशातही आपल्याला हव्या तशा खेळपट्ट्या बनवून घेते की काय! -गा.पै.
  • Log in or register to post comments

वृत्तपत्रीय बातमी..

विशुमित
गुरुवार, 01/31/2019 - 15:24 नवीन
नोटाबंदीमुळे देश बेजार, तरुण बेरोजगार; ४५ वर्षातील सर्वात दयनीय स्थिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल...!! === नोटाबंदीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल जारी करणे महत्त्वाचे होते. त्यात सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जे परिणाम झाले, त्यातील प्रतिकूल बाबींचा समावेश असल्याने हा अहवाल रोखून धरण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, सरकारने यावरुन सारवासारव केली होती. या सदस्यांनी आमच्याकडे कधीही त्यांचे आक्षेप व्यक्तच केले नाहीत, अशी भूमिका सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने घेतली होती. === खरे खोटे (नमो)देवच जाणे! === नोकरी गेलेले अजून काही निवांत बसले नसतीलच. कुठे ना कुठेतरी काम शोधलच असणार. नाहीतर वडापावची गाडीचा लास्ट ऑप्शन त्यांच्या कडे आहेच. === https://www.loksatta.com/desh-videsh-news/unemployment-rate-at-four-decade-high-in-2017-18-says-nsso-survey-1832743/
  • Log in or register to post comments

#How's the jobs Sir#

विशुमित
गुरुवार, 01/31/2019 - 15:36 नवीन
ट्रॉललींग...!! https://www.loksatta.com/desh-videsh-news/people-troll-modi-government-with-hows-the-jobs-hashtag-over-unemployment-issue-1832899/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

नोटाबंदीमुळे देश बेजार, तरुण

डँबिस००७
गुरुवार, 01/31/2019 - 18:36 नवीन
नोटाबंदीमुळे देश बेजार, तरुण बेरोजगार; ४५ वर्षातील सर्वात दयनीय स्थिती राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा अहवाल...!! गेल्या ६५-७० वर्षांत काँग्रेसच्या काळात देशात सतत दयनीय स्थितीच होती !! ह्या काळात तरुण बेरोजगारच होते , शेतकरी आत्महत्या करत होते , काही नेते भ्रष्ट्राचार करत होते तर काही नेते मुसलमान समाजाला हिंदुं विरुद्ध प्रेरीत करत होते. याच दरम्यान हिंदु लोकांना अतिरेकी ठरवुन त्या मोठ्या लोकसंख्येचे आंतरराष्टीय न भरुन येणारे नुकसान करत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

अगदी अगदी..!!

विशुमित
गुरुवार, 01/31/2019 - 22:26 नवीन
अगदी अगदी..!! अगदी बरोबर बोलत आहात. अतिप्रचंड सहमत..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

नोटबंदीमुळे कुठल्या नोकऱ्या गेल्या?

ट्रेड मार्क
Fri, 02/01/2019 - 08:56 नवीन
सत्यम प्रॉब्लेम मध्ये आली तर नोकऱ्या गेल्याच ना? Unregulated किंवा गैर धंदे असतील तर एक तर त्यांनी रेग्युलर व्हावे नाहीतर ते बंद पडणे अपेक्षितच होते. लोकांनी कर चुकवायचे धंदे का करावेत याचं तुमच्याकडे काही स्पष्टीकरण आहे का? असे धंदे बंद पडले तर तिथे काम करणाऱ्या लोकांची नोकरी जाणार हे होणारच होते. पण म्हणून त्यांना दुसरी नोकरी मिळूच शकत नाही अशी परिस्थिती आहे का? नोकऱ्या नाहीत असं नाहीये पण ती नोकरी मिळवण्यासाठी जे स्किल लागतं ते नसणाऱ्या लोकांची कमतरता आहे. CSO च्या म्हणण्याप्रमाणे जून २०१८ पर्यंतच्या १० महिन्या १.२ कोटी नोकऱ्या मिळाल्या. ऑटो सेक्टरच्या वाढीशी संबंधित बातमी भारताबाहेरील वर्तमानपत्राचे हे मत वाचा. आम्हाला तरी असं वाटायचं की नोकरी मिळवणे वा धंदा करणे हे आपले काम आहे. अजूनही नोकरी मिळवण्यासाठी जे स्किल लागतं ते मिळवायचं आणि प्रयत्न करायचा हे मी अजूनपर्यंत करतोय. इतके वर्ष फक्त जॉब मार्केट मध्ये रिलेव्हन्ट राहण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण यात असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं कधी वाटलं नाही. वर्षानुवर्षे सैन्यात, पोलीस दलात जागा आहेत पण योग्य उमेदवार नाहीत अशी परिस्थिती आहे. लोक नाक्यावर गुंडागर्दी करतील पण हे जॉब घेणार नाहीत कारण शिस्त पाळावी लागेल. यात कोणते सरकार आहे हे बाजूला ठेवा, पण परिस्थिती हीच आहे का नाही ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

खरच अभ्यासू प्रतिक्रिया...!!

विशुमित
Fri, 02/01/2019 - 20:14 नवीन
वर्षानुवर्षे सैन्यात, पोलीस दलात जागा आहेत पण योग्य उमेदवार नाहीत अशी परिस्थिती आहे. लोक नाक्यावर गुंडागर्दी करतील पण हे जॉब घेणार नाहीत कारण शिस्त पाळावी लागेल. ==)) सैन्यात पोलीस दलात उपलब्द जागांची काही अभ्यासू आकडेवारी मिळेल का? भर्तिची 3-4 वर्षातील अवस्था आपल्याला माहित आहे का? सुशिक्षित बेरोजगार गुंडागर्दी करतात याचा किती मोठा सैंपल सेट तुम्ही अभ्यासासाठी निवडला होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

मोगा खानच्या लाडक्या पक्षाचा

डँबिस००७
गुरुवार, 01/31/2019 - 20:58 नवीन
मोगा खानच्या लाडक्या पक्षाचा हरयाणाच्या जींद ईथल्या पोट निवडणुकीत लाजीरवाणी हार झालेली आहे !! राहुल गांधीच्या खास मर्जीतले सुरझांवाला यांना कॉंग्रेसने जींद मधुन ह्या पोट निवडणुकीसाठी उतरवलेल होत !! भाजपाने ह्या ठिकणी निवडणुक कधीही जिंकलेली नव्हती !! २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाला चांगला संकेत आहे अस मानल जात आहे !!
  • Log in or register to post comments

+1111111111111111111111....

विशुमित
Fri, 02/01/2019 - 01:03 नवीन
सही विश्लेषण..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

कॉंग्रेसला जींद मधली पोट

डँबिस००७
Fri, 02/01/2019 - 11:02 नवीन
कॉंग्रेसला जींद मधली पोट निवडणुकीतली हार जिव्हरी लागली आणि हरयाणात दंगल सुरु केली आहे ! पोलिसांनी लाठीचार्ज करुन कॉंग्रेसी दंगलखोरांना पळवुन लावले आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

Bad loans: Madam, don't send

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 01/31/2019 - 21:18 नवीन
Bad loans: Madam, don't send us to court, companies tell SBI काही वेळेपर्यंत, सरकारदरबारी वशिले लावून बँकांकडून आपल्याला हवी तशी कर्जे घेणे, ती बदमाशी करत टाळत राहणे आणि सर्वात शेवटी त्यांना एनपिए बनवून ती परत करण्यापासून मुक्त होऊन मजेत राहणे. हे भ्रष्टचक्र सतत चालू होते. चोरीसाठी सरकारचा हातभार तर लागत नाहीच, उलट सरकारने नवीनच अंमलात आलेल्या बँकरप्सी कोडनुसार, बँकांना कर्जबुडव्यांवर कारवाई करणे भाग पडत आहे. या कायद्यानुसार बँकेने कर्जबुडव्याचे नाव National Company Law Tribunal (NCLT) कडे दिले की कडक कारवाई सुरू होऊन कर्जबुडव्यांचा कंपनीवरचा हक्क नाहीसा होतो. त्यामुळे, पैसे अचानक पुढे येऊ लागले आहेत आणि (पूर्वी अजिबात शक्य नसलेली) कर्जे व्याजासकट परत करणे चालू झाले आहे. पूर्वी (सरकारच्या वरदहस्तामुळे) बँकेवर डोळे वटारणारे आता हात जोडत, व्याजासह कर्ज परत करतो पण, "आमचे नाव NCLT कडे पाठवू नका" अशी विनंती करू लागले आहेत.
  • Log in or register to post comments

खर म्हणजे या बदलाचे पक्षीय

ट्रम्प
Fri, 02/01/2019 - 06:32 नवीन
खर म्हणजे या बदलाचे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून कौतु6 केले गेले पाहिजे कारण बुड़ावलेल्या कर्ज मधील पैसा आपण सर्व सामान्य गरीब लोकांचाच होता . कौतुक करण्या इतपत औदार्य मिपावरिल पुराणमतवादी मध्ये नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

जागतीक भ्रष्टाचाराच्या Index

डँबिस००७
गुरुवार, 01/31/2019 - 21:29 नवीन
जागतीक भ्रष्टाचाराच्या Index मध्ये भारताने चांगली प्रगती केलेली आहे ! गेल्या वर्षी ८१ व्या रँकवर असलेला भारत ह्यावर्षी ७८ व्या क्रमांकावर चढलेला आहे ! चीन ह्या बाबतीत भारताच्या बर्याच मागील क्रमांकावर आहे ! पाकीस्तान तर फारच मागे राहीलेला आहे ! ६५ वर्षांच्या कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभारानंतर जागतीक स्तरावर भारताची एक भ्रष्ट देश म्हणुन ओळख झालेली होती ! गेल्या १० वर्षांत तर भारताची वर्णी फ्रॅजाईल ५ देशात लागलेली होती !! बर्याच प्रयत्नामुळे भारताने आपली जागा ह्या फ्रॅजाईल ५ देशाच्या ग्रुप मधुन बाहेर पडुन भ्रष्टाचार मुक्त ते कडे चाललेली आहे
  • Log in or register to post comments

ह्या प्रगतीबद्दल भारतीय

विशुमित
गुरुवार, 01/31/2019 - 22:29 नवीन
ह्या प्रगतीबद्दल भारतीय नागरिकांचे हार्दिक अभिनंदन..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/01/2019 - 21:37 नवीन
https://en.m.wikipedia.org/wiki/Corruption_Perceptions_Index
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

ब्लैक बेल्ट

विशुमित
Fri, 02/01/2019 - 23:36 नवीन
जे जे फेकट ते ते सर्व पौष्टिक... जास्त बोलायच काम नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

कुंभ मेलापर शशी थरुर चा ट्विट

डँबिस००७
गुरुवार, 01/31/2019 - 23:22 नवीन
कुंभ मेलापर शशी थरुर चा ट्विट : गंगाको स्वच्छ रखना है और पाप भी धोने है !! रा गा सारख्या भ्रष्ट कॉंग्रेसच्या नेत्यांनी व त्यांच्या भ्रष्ट चेल्यांनी कुंभ मेलाच्या नावाने गंगा नदीत आंघोळ करुन पवित्र गंगा नदीला अस्वच्छ करु नये असा संदेश दिला !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा