एकपक्षीय पंतप्रधान

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in काथ्याकूट
22 Nov 2018 - 4:24 pm
गाभा: 

नमस्कार मिंत्रानो ,
मला मराठी टाईप नीट करता नाही.
परंतु तुम्ही मी मांडत असलेला मुद्दा समजून घेऊन कॉमेंट द्याल असं वाटत आहे.

संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी),
,
हा(अश्याप्रकारचा) पंतप्रधानपदी कोणते निर्णय घेऊन तडीस नेऊ शकतो, कि जे
,
युती /आघाडीचा बहुपक्षीय पंतप्रधान (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) घेऊ शकत नाही ?

संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ?
लोकांना कसे समजावुन सांगता येऊ शकतील ?
.
जीडीपी ग्रोथ (उदा नेहरूजी, राजीव गांधीजी, मोदीजी) यांच्या कारकिर्दीतील व
.
जीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल ?

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 4:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

 संसदेत बहुमत असलेला एकपक्षीय पंतप्रधान असण्याचे काय बेनेफिट असतात देशाला ?

अगं आई गं...! आज काय खरं नाय.

मित्रा, एकपक्षीय पंतप्रधानांच्या बेनीफ़िटवर बोलायचं असल्यास आमच्याकडे आमचे मित्र डॉक्टर.... ते त्यांचं नाव, ते हे आपले, ते आपणास एक पक्षीय पंतप्रधान पंतप्रधानांचे बेनीफ़िट या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतील. त्यांचं बोलून झालं की... तसं त्यांचं बोलून संपतच नाही, पण त्यांचा उत्साह जरा आवरला की की मग एकपक्षीय पंत्रप्रधानपदाचे तोटे याविषयावर आम्ही सविस्तर बोलू तो पर्यंत ''दिल्ली ते गल्ली'' एक पेशीय सॉरी एक पक्षीय पंतप्रधानाचे कार्य आणि परिणाम वाचत राहा.

हलकेच घ्या हो डॉक्टर साहेब. *

अटी लागू. *

-दिलीप बिरुटे

डँबिस००७'s picture

22 Nov 2018 - 5:28 pm | डँबिस००७

प्रो डॉ बिरुटे साहेब ,

धागा कर्त्याने न विचारलेल्या प्रश्नावर तुम्हाला कश्याला बोलायचय वा सांगायचय ? एकपक्षीय पंत्रप्रधानपदाचे तोटे काय आहेत हे त्या धाग्या कर्त्याने विचारलेले नाही.

त्या पुढे एकपक्षीय पंत्रप्रधानपदाचे फायदे काय आहेत हे विचारलेले आहे , तुमच्या पहील्या प्रतिसादातुन कळत की त्या बद्दल तुम्हाला काहीच म्हणायच नाही म्हणुन दुसर्यावर ( तुमचे मित्र डॉ साहेब) ती जवाबदारी ढकलत आहात. ईतक्या घाईने पहीला प्रतिसाद द्यायच्या आधी धागा वाचुन द्यायला हवा होता.

मार्मिक गोडसे's picture

22 Nov 2018 - 5:37 pm | मार्मिक गोडसे

इंदिरा गांधी - आणीबाणी
राजीव गांधी- शहाबानो
नरेंद्र मोदी - फक्त विकास,विकास आणि विकास

विजुभाऊ's picture

23 Nov 2018 - 7:29 am | विजुभाऊ

इंदिरा गांधी - बांगला देश ,
राजीव गांधी- मारुती मोटर्स, औद्योगीक उदारीकरण , सी डॉट , सार्क , डिजीटायझेशन ची सुरवात
नरेंद्र मोदी - नोटाबंदी , रीलायन्स उद्योग समूहाची संरक्षण उपकरणे बनवणारी कंपनी,

आलमगिर's picture

6 Jan 2019 - 11:46 am | आलमगिर

नरेंद्र मोदी
१-नोटबंदी
२-जिएसटी सुधारणा
३-मेक इन इंडिया
४-मुद्रा योजना
५-परराष्ट्र धोरणात सातत्य

एकुलता एक डॉन's picture

13 Jan 2019 - 1:49 am | एकुलता एक डॉन

राजीव गांधी- मारुती मोटर्स,

sanjay gandhi asayala pahije

गोडसे नी पार्टी बदलली का काय?

विशुमित's picture

22 Nov 2018 - 5:40 pm | विशुमित

नरसिम्हा राव- बाबरी
वाजपेयीजी- कारगील
मनमोहनजी - 2जी कोळसा

विशुमित's picture

22 Nov 2018 - 5:41 pm | विशुमित

वाजपेयीजी- हायजॅक

विशुमित's picture

22 Nov 2018 - 5:45 pm | विशुमित

जीडीपी ग्रोथ (नरसिम्हा राव, वाजपेयीजी, मनमोहनजी) यांच्या कारकिर्दीतील तुलना करण्यास रिलायबल डेटा कुठे मिळेल ?
...
जीडीपी ग्रोथ असले काहीही त्यांच्या कारकिर्दीत नव्हतं.

मार्मिक गोडसे's picture

22 Nov 2018 - 5:51 pm | मार्मिक गोडसे

जीडीपी ग्रोथ असले काहीही त्यांच्या कारकिर्दीत नव्हतं.
आता पुरावे मागणारे तुमच्या मागे धावतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 6:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर मला अंमळ आवडणारी एक कविता राजसभा.
एकपक्षीय नेतृत्वाचा आशय पिर्‍यामिड्सच्या स्ट्रक्चर मधून फार सुंदर व्यक्त झालंय फार सुरेख मांडणी आहे.

आज हसुन हसुन मरतंय मी....!

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

23 Nov 2018 - 7:31 am | विजुभाऊ

जी डी पी ग्रोथ ही नक्की कशामुळे होते कोणी उल गडून सांगेल का?

मामाजी's picture

23 Nov 2018 - 7:43 am | मामाजी

विजुभाऊ ही लिंक बघा
https://youtu.be/JIqd_T_uf0E

मार्मिक गोडसे's picture

23 Nov 2018 - 8:50 am | मार्मिक गोडसे

RBI आणि सरकार एकत्रीत काम करू शकतात हे ताजे उदाहरण आहे, यापूर्वीच्या सरकारने स्वायत्ततेच्या नावाखाली कधीही हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नव्हते.कोणत्याही संस्थेची अती स्वायतत्ता देशासाठी हितकारक नसते. सध्यातरी RBI आणि सरकारने समंजसपणा दाखविला आहे. फक्त सरकारकडून अतिरेक होऊ नये ही अपेक्षा.

ट्रम्प's picture

23 Nov 2018 - 3:48 pm | ट्रम्प

असाच समंजसपणा एम एम सरकार आणि राहुल शेठ नीं दाखवला होता , त्या वेळी तमाम भारतीयांचे डोळे दिपले होते .
भ्रस्ट लालू सारख्या नेत्यांना वाचविण्यासाठी एमएम सरकार ने जीवाची पराकाष्ठा करून अध्यादेश काढला पण तो अध्यादेश राहुल शेठ नीं मिडियासमोर फाडण्याचा हास्यास्पद पराक्रम करून स्वतःच्याच एम एम सरकार ला उघडे पाडले . दुसऱ्या दिवशी एमएम सरकार च चुकलआणि राहुल शेठ बरोबर आहेत हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते व एमएम सरकार यांच्यात स्पर्धा लागल्याची आख्या देशांनी बघितले होते . सी बी आय व आर बी आय मध्ये मोदी सरकार च्या हस्तक्षेप चा आरोप सध्या काँग्रेसवाले करत आहेत तर त्यांनी खालीवाकून आपण पूर्वी किती घाण केली होती ते पाहावे .

https://m.aajtak.in/news/national/story/rahuls-rebellion-against-ordinan...

माहितगार's picture

23 Nov 2018 - 9:30 am | माहितगार

तळ्याला जेवढे राखणदार जेवढे अधिक तेवढा अधिक पाण्याचा वाटा राखणदारांना द्यावा लागतो. ह्या वस्तुस्थिती सोबत 'तळे राखील तो पाणि चाखील ' हि म्हण आठवावी. मग ठरवावे किती राखणदार हवेत ते .

नितिन थत्ते's picture

23 Nov 2018 - 10:23 am | नितिन थत्ते

आजवर एकाच पक्षाला पूर्ण बहुमत नसलेल्या आघाडी सरकारांनीसुद्धा कठोर निर्णय घेतल्याचा आणि ते राबवल्याचाही इतिहास आहे.

१ - ७७ चे जनता सरकार- साखर आणि काही इतर कमोडिटीज नियंत्रण मुक्त केल्या. सत्ताधारी संसदीय बहुमताचा दुरुपयोग करू शकणार नाहीत अशा काही घटना दुरुस्त्या केल्या.
२ - ८९ चे व्हीपी सिंग सरकार - कोकण रेल्वेला चालना दिली.
३ - ९१ चे नरसिंहराव सरकार - मुद्दाम सांगण्याची गरजच नाही.
४ - ९६-९७ ची सरकारे - आजवर ड्रीम बजेट अशी ज्याची भलामण झाली असे एकमेव बजेट या सरकारच्या कारकीर्दीत चिदंबरम यांनी सादर केले.
५ - वाजपेयी सरकार - सुवर्ण चतुष्कोण, निर्गुंतवणूक, फिस्कल मॅनेजमेंट कायदा केला, मोबाईल ऑपरेटर्स साठी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह पॉलिसी आणली. त्यामुळे मोबाइल जाळे विस्तारण्यात मदत झाली - पानवाला आणि वॉचमन यांच्याकडेही मोबाइल असणे ही उपलब्धी यांच्या काळातल्या पॉलिसीमुळे झाली.

अंशतः मान्य, त्याचवेळी भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांना अनीष्ठ राजकीय किंमत न मोजता, इच्छित सर्व गोष्टी करण्यास खर्‍या अर्थाने लोकसभेतील एक पक्षीय साधे बहुमतही पुरेसे पडेलच असे नाही, सोबत राज्यसभेतील स्वपक्षाचे बहुमत हवे आणि क्वचित दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश आणी अधिक क्वचित भारतातील अर्ध्या राज्यात एक पक्षीय सरकार असण्याची गरज भासू शकते.

टिवटिव's picture

24 Nov 2018 - 2:25 am | टिवटिव

काहितरी करण्याची ईछ्या हवी...बहुमत असो वा नसो;फारसा फरक पडत नाहि. बँक राष्ट्रीयीकरण आणि नोटबंदी एकाच पक्षाला पूर्ण बहुमत असलेल्या सरकारांनी केल्या.

ऐकपेशिय सरकार केंद्रात आसने हे भारता सारख्या असंख्य भाषा आणि संस्कृती आसलेल्या देशासाठी खूप धोकादायक आहे .
केंद्रात नेहमीच अस्थिर सरकार असणे हे जनतेच्या खूप फायद्याचं असते .
ऐकपक्षीय सरकार हुकुम शही कडे झुकू शकत .हिंदी भाषा आसलेल्या pm आसेल तर nonhindi rajyavishyi क्लेश ठेवून निर्णय होवू शकतो आणि सर्वाचा परिपाक लोकशाही नष्ट

ट्रेड मार्क's picture

6 Jan 2019 - 7:54 am | ट्रेड मार्क

तुमची ही अथांग बुद्धिमत्ता बघून डोळे दिपले. कौनसी चक्की का आटा खाते हो?

बुद्धिमतेचा ट्रेड मार्क काय फक्त तुमच्यावरच छापला आहे का?
मुद्दा पटला नसेल तर त्याचे खंडण करा. आपल्या बुद्धीमत्तेचे प्रदर्शन करा. आम्ही रस ग्रहण करु.
काय म्हणताय??
===
अवांतर: अशी ही समर्थकांची पहिल्या सारखी दादागिरी आजकाल कोणी खपून घेत नाही.

ट्रेड मार्क's picture

11 Jan 2019 - 6:24 am | ट्रेड मार्क

तुम्ही केवळ प्रतिसाद कोणी लिहिलाय यावर समर्थन करायचं का विरोध करायचा हे ठरवता का? एकाच विरोध करण्याच्या नादात आपण कोणाचं समर्थन करतोय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.

ऐकपेशिय सरकार केंद्रात आसने हे भारता सारख्या असंख्य भाषा आणि संस्कृती आसलेल्या देशासाठी खूप धोकादायक आहे .

ऐकपेशिय सरकार म्हणजे काय? हे तुम्हाला तरी कळलं का? हे महाशय कुठल्या आसनांविषयी बोलत आहेत? भारतात प्रथमपासूनच असंख्य भाषा आणि संस्कृती आहेत. मग काय एक पंतप्रधान न नेमता प्रत्येक राज्याचा एक सदस्य असलेलं पंतप्रधान मंडळ नेमायचं का?

केंद्रात नेहमीच अस्थिर सरकार असणे हे जनतेच्या खूप फायद्याचं असते .

याचं तुम्ही समर्थन करताय? अवघड आहे!

ऐकपक्षीय सरकार हुकुम शही कडे झुकू शकत .हिंदी भाषा आसलेल्या pm आसेल तर nonhindi rajyavishyi क्लेश ठेवून निर्णय होवू शकतो आणि सर्वाचा परिपाक लोकशाही नष्ट

हुकूमशहा बनण्यासाठी बहुमतातलं सरकार लागतं असं कोणी सांगितलं?

अवांतर: अशी ही समर्थकांची पहिल्या सारखी दादागिरी आजकाल कोणी खपून घेत नाही.

सगळेच कोणा ना कोणाचे समर्थक आहेतच. त्यामुळे हे तुम्हालाही लागू होतं. आता म्हणू नका मी कोणाचंच समर्थन करत नाही. तुम्ही कोणाचे समर्थक आहात हे इथे सगळ्यांना माहित आहे

विशुमित's picture

11 Jan 2019 - 11:15 am | विशुमित

))तुम्ही केवळ प्रतिसाद कोणी लिहिलाय यावर समर्थन करायचं का विरोध करायचा हे ठरवता का?
==)) नाही नो नेवर
)) एकाच विरोध करण्याच्या नादात आपण कोणाचं समर्थन करतोय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे
==)) मी समर्थन कुठे केले ते दाखवून द्या.
)) ऐकपेशिय सरकार म्हणजे काय? हे तुम्हाला तरी कळलं का? हे महाशय कुठल्या आसनांविषयी बोलत आहेत?
==)) सदस्य नवे दिसत आहेत. टंकन चुका स्पष्ट दिसत आहेत.
त्याना एकपक्षीय सरकार असे म्हणायचं दिसते आहे. आसने नसुन असणे हे प्रतित होतय.
))केंद्रात नेहमीच अस्थिर सरकार असणे हे जनतेच्या खूप फायद्याचं असते .

याचं तुम्ही समर्थन करताय? अवघड आहे!
==)) समर्थन कुठे केले आहे?? अवघड आहे बुआ.!
)) हुकूमशहा बनण्यासाठी बहुमतातलं सरकार लागतं असं कोणी सांगितलं?
==)) भारतात ते अवघड आहे. पण हुकूमशाही वृती वाढू शकते.
)) सगळेच कोणा ना कोणाचे समर्थक आहेतच. त्यामुळे हे तुम्हालाही लागू होतं
==)) मान्य.
)) तुम्ही कोणाचे समर्थक आहात हे इथे सगळ्यांना माहित आहे.
==)) असो..
====
लेखप्रपंच यासाठी की एखाद्याच विचार नाही पटले, कदाचीत त्याला व्यवस्थित नाही मांडता आले तर भसकन त्याची बुद्धीमत्ता काढत जाऊ नका.
==
बाकी टंकाळा!!

ट्रेड मार्क's picture

13 Jan 2019 - 5:02 am | ट्रेड मार्क

तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेतलं आहे का? नसेल तर तुम्ही मध्ये पडायचं कारण काय? जर त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय?

मी समर्थन कुठे केले ते दाखवून द्या.

राजेश१८८ यांनी असा प्रतिसाद देऊनही तुम्ही एकदाही त्याचे खंडन केले नाहीत. वर माझ्यावर टिप्पणी केलीत आणि पुढे जे अवांतर लिहिलेत ते तर अनावश्यक होते. मग तुम्ही त्यांच्या प्रतिसादाचे समर्थन करता असे का वाटू नये? का त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळीबार करायचा विचार आहे?

सदस्य नवे दिसत आहेत. टंकन चुका स्पष्ट दिसत आहेत.

मी कोणाचेही सदस्यत्व किती जुने आहे हे बघत नाही. जालावर खुल्या चर्चेत त्यांनी त्यांचे विचार मांडलेत तर भाषेसकट विचारांवर प्रतिक्रिया येणारच. बाकी त्यांची भाषा सोडून निदान विचारांवर सुद्धा तुम्ही दुसऱ्या प्रतिसादातही एकही टिप्पणी केली नाहीत वर "भारतात ते अवघड आहे. पण हुकूमशाही वृती वाढू शकते." हे म्हणताय म्हणजे कुठेतरी समर्थन आहे हेच दिसून येतंय.

लेखप्रपंच यासाठी की एखाद्याच विचार नाही पटले, कदाचीत त्याला व्यवस्थित नाही मांडता आले तर भसकन त्याची बुद्धीमत्ता काढत जाऊ नका.

तुम्ही का अंगाला लावून घेताय. तुम्हाला पण भीती वाटतीये बहुतेक. मी आयडी बघून प्रतिसाद देत नाही तर प्रतिसाद काय आहे त्यावर प्रतिक्रिया देतो. काळजी नसावी.

विशुमित's picture

16 Jan 2019 - 5:41 pm | विशुमित

<<< तर प्रतिसाद काय आहे त्यावर प्रतिक्रिया देतो.>>
==>> मग मी काय म्हणत होतो. बुद्धिमत्तेसाठी कोसी चक्की का आटा खाते हो हे म्हणण्या पेक्षा त्यांच्या विचारांचे खंडन सयंत शब्दात केले असते तर तुमच्या आय डी नामाला प्रतिष्ठा लाभली असती. तुम्ही एकदम शॉर्ट कर्ट मारलात.
===
माझ्या वकीलपत्राची काळजी करत बसण्यापेक्षा न्यायाधीश बनून बुद्धिमत्तेची सर्टिफिकेटस वाटण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले, ह्या बद्दल थोडे आत्मचिंतन केलेत तर बरे होईल.
===
तुम्हाला पण भीती वाटतीये बहुतेक>>
आम्ही जमेल, रुचेल आणि पचेल एवढेच लिखाण करतो. ज्या विषयातले आपल्याला कळत नाही त्याबाबत लोकांना बुद्धिमत्तेची सर्टिफिकिटे वाटत प्लॅन मागत फिरत नाही.
===
आता जरा विषयाकडे वळू-
मुळात राजेश यांच्या विचाराशी १००% सहमत किंवा असहमत या निकर्ष पर्यंत पोहचायच्या आधीच शिक्कामोर्तब करून टाकले. कदाचित त्यामध्ये तुमच्या लाडक्या (नसतील ही कदाचित) नेत्या विरुद्ध विचार जातो, हे महत्वाचे कारण असावे. (i guess )
उलट एक जिग्नासू विध्यार्थी असल्या कारणाने या विषयाच्या अनुषंगाने काही प्रश्नांची उत्तरे मिपावरील तज्ज्ञ आणि अभ्यासू मंडळींकडून जाणू इच्छितो. मागील आपले सगळे मतभेद विसरून तुम्ही त्यासाठी (विशेष) प्रयत्न कराल हे अपेक्षा ठेवतो.
१. एकपक्षीय सरकार (भाजपचं नाही एकूण सगळेच) केंद्रात असणे हे भारतासारख्या असंख्य भाषा आणि विविधतेने नटलेल्या संस्कृती आसलेल्या देशासाठी खूप धोकादायक होऊ शकतात का ? विशेषतः संविधानाच्या चौकटीच्या बाहेर विचारसरणी अस्लेल्यालेले पक्ष. विकासाच्या नावाखाली आप आपला अजेंडा राबायचं वगैरे वगैरे..
२. केंद्रात नेहमीच अस्थिर सरकार असणे हे जनतेच्या खूप फायद्याचं होऊ शकते का ? असे पक्षीय विचारसरणी देशातील ग्रास रूट प्रश्न सोडून लोकांमध्ये भांडणे लावून मज्जा बघतात तसे अस्थिर सरकार देऊन जनतेने नेत्यांची (कस)रत एन्जॉय केली तर काय हरकत आहे. (कारण आजच्या घडीला पुनर्निवडणूक कोणत्याच विजेत्या उमेदवाराला नको असते. कॉस्ट फॅक्टर )
३. ऐकपक्षीय सरकार हुकुम शही कडे झुकू शकत का ?
माझे विचार असे मानतात की कोना एक पक्ष, एक विचारसरणीला भारतात हुकूमशाही रुजवणे एवढे सहजासहजी शक्य नाही. तरी सुद्धा बहुमताले सरकार आले तर वृत्ती वाढू शकते. हम करे सो कायदा ! आपल्याला काय वाटते??
====
उत्तरांमध्ये भूतकाळातील दाखले दिले तरी वर्तमान/ (किंबहुना भविष्यातील) घडामोडींवर विशेष जोर असावा.
===
माझ्या अल्पमतीने विचारलेल्या प्रश्न आहेत कृपया याला कोणी काय प्लॅन मागत फिरत आहात असे समजू नये.
जय हिंद..!

ट्रेड मार्क's picture

17 Jan 2019 - 9:12 am | ट्रेड मार्क

प्लॅनचा बराच धसका घेतलेला दिसतोय! हरकत नाही, देऊ शकणार नाही हे माहित आहे.

काही प्रश्नांची उत्तरे मिपावरील तज्ज्ञ आणि अभ्यासू मंडळींकडून जाणू इच्छितो

अश्या व्यक्ती उत्तरे देतीलच, पण माझ्या बुद्धिमत्तेचा वारंवार उल्लेख झाल्यामुळे ती पाजळायची उर्मी दाबून ठेवत नाही.

मुद्दा १: विशेषतः संविधानाच्या चौकटीच्या बाहेर विचारसरणी अस्लेल्यालेले पक्ष. विकासाच्या नावाखाली आप आपला अजेंडा राबायचं वगैरे वगैरे

असे पक्षच नव्हे विचारसरणीच कोणत्याही देशासाठी धोकादायक आहे. उदा. कम्युनिस्ट. या विचारसरणीने आणि पक्षाने कुठल्याही देशाचे भले केले नाही. एवढंच नव्हे तर त्यांची विचारसरणी न मानणाऱ्या लोकांना अतिशय क्रूर वागणूक देण्यात आली. विकासाचे नारे काँग्रेससकट सगळ्याच पक्षांनी दिलेत. गरिबी हटाव चे नारे अगदी नेहरू, इंदिरा गांधी ते आत्तापर्यंत समस्त काँग्रेसी नेत्यांनी दिले आहेत. पण अश्या देशात फक्त ३-३.५% लोक आयकर भरणारे असावेत? मग विकासाच्या/ गरिबी हटाव च्या नावाखाली ते कुठला अजेंडा राबवत होते? पण विषय तो नाहीये, प्रतिसाद देणाऱ्याच्या मते एकपक्षीय सरकार असणेच धोकादायक आहे.

मुद्दा २: केंद्रात नेहमीच अस्थिर सरकार असणे हे जनतेच्या खूप फायद्याचं होऊ शकते का ?

फायदा म्हणजे काय हा मोठ्ठा प्रश्न आहे. या वर्षी माझा आयकर किती कमी झाला किंवा माझे कर्ज सरकारने माफ केले किंवा मला टिव्ही घ्यायचाय आणि या वर्षी सरकारने सेल्स टॅक्स/ जीएसटी कमी केला किंवा तत्सम काहीतरी याला जास्त महत्व असेल तर मग अस्थिर सरकार कदाचित फायद्याचे असेल. कारण या सरकारातील घटक पक्ष मग त्यांच्या त्यांच्या भागासाठी किंवा समाजासाठी त्या त्या पक्षाला लाभाचे ठरतील असे निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडू शकतात. अर्थतज्ञ असलेल्या ममो सिंगांच्या सरकारमध्ये लालू सारख्या नेत्याला रेल्वे मंत्री पद मिळाले तेव्हा त्यांनी जे गोंधळ घातले ते नंतर ऑडिट मध्ये उघडकीला आले. एवढंच नव्हे तर लालूनंतर रेल्वेमंत्री झालेल्या ममता बॅनर्जींनी पण लालूंच्या कारभारावर टीका केली. अर्थात ममतांनी पण काही चांगला कारभार केला असं नाही. एवढं असूनही ममो सिंग म्हणा किंवा काँग्रेस त्याबाबतीत फार काही करू शकली नाही.

बिहारमध्ये जद आणि राजद मध्ये युती झाल्यावर नितीशकुमारांना किती त्रास सहन करावा लागला हे अलीकडचंच उदाहरण आहे. आता कर्नाटक मध्ये कुमारस्वामी जाहीरपणे रडत रडत कसे विषाचा घोट घेत आहेत हे सांगतात. ही कशाची उदाहरणे आहेत?

बहुमताले सरकार आले तर वृत्ती वाढू शकते. हम करे सो कायदा !

त्यासाठी बहुमतातले सरकारच लागते असं काही नाही. ते नेत्याच्या वृत्तीवर अवलंबून असतं. एवढ्या मोठ्या देशाला आणि लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी एक कडक प्रशासकच पाहिजे. चीनच्या प्रगतीकडे आता डोळे विस्फारून बघतात पण तिथे काही दशके कोणी ना कोणी एक प्रशासक होता आणि जो येईल त्याने फक्त देशाची प्रगती एवढेच ध्येय ठेवले होते. एक साधी गोष्ट आहे, अगदी एकत्र कुटुंबातले निर्णयसुद्धा जर घरातली कर्ती व्यक्ती खंबीर नसेल तर आपापल्या सोयीने घेतले जातात. त्यात संपूर्ण कुटुंबाला फायदेशीर असेल असे निर्णय असतालीच असं नाही. रशियामध्ये पुतीन बहुमताने निवडून येतात, काय वाईट चाललं आहे रशियाचं? तीच गोष्ट चीनची आहे.

या उलट एका कुटुंबाकडे सतत सत्ता असणं हे जास्त घातक आहे. एक प्रशासक चांगला होता म्हणून त्याचे वारसदार तेवढेच किंवा जास्त चांगले असतील असं नाही. लायकीप्रमाणे पद का मिळू नाही? एकाआड पिढी हुशार असते अशी एक म्हण आहे. बापाने कष्टाने उभारलेलं सगळं मुलगा केवळ फुकट मिळाल्याने फुंकून टाकतो अशी उदाहरणे कितीतरी आहेत. यात मोदी का राहुल हा वाद नसावा. राहुल जर तेवढा लायक असेल तर त्याला योग्य ते पद मिळावं, पण ते केवळ पूर्वजांच्या पुण्याईवर नसावं. पन्नाशीला आलेला माणूस अजून नीट बोलायला शिकतोय त्यातही सुधारतोय असं वाटत असतानाच मधेच काहीतरी गोंधळ घालतो हे देशाच्या दृष्टीने घातक ठरणार नाही का? जिथे पुतीन, जिनपिंग सारखे श्रूड नेते आहेत त्यांच्या समोर राहुल किती तग धरू शकेल? एखाद्या उच्चस्तरीय द्विपक्षीय मीटिंग मध्ये राहुलला जागेवर मदत करणारी माणसे कुठून असतील? एखादा महत्वाचा निर्णय स्वतः घेण्याची त्याची क्षमता किती आहे? जर त्यावेळेला १० लोक परस्परविरोधी गोष्टी सांगू लागले तर राहुल काय करेल? असे प्रश्न लोकांना का पडत नाहीत?

पंप्र म्हणून फक्त जनतेला आवडणारे निर्णय घ्यायला मिळतीलच असं नाही. काही ठिकाणी चाबूक घेऊन शिस्त लावायला लागते हे त्याला जमेल का? उद्या देशातील समस्त शेतकऱ्यांनी दर वर्षी कर्जमाफी मागितली, वर दीडपट/ दुप्पट हमीभाव मागितला तर पैसा कुठून आणायचा? प्रत्येक गोष्टीला सबसिडी देत राहिलं तर तो पैसे कुठून आणायचा? वर्षानुवर्षे अंबानींच्या घरातला गॅस सिलिंडर आणि त्यांच्या ड्रायव्हरचा गॅस सिलिंडर एकाच भावात मिळत होते. त्याचा विचार कधी झालं का?

या तीन राज्यातल्या विधानसभा निवडणूका काँग्रेसने केवळ कर्जमाफीच्या मुद्द्यावर जिंकल्या. एका तरी भाषणात राहुलनी या अडचणींचे कायमचे निराकरण करण्यासाठी शॉर्ट/ लॉंग टर्म प्लॅन (तुम्हाला विचारत नाहीये, काळजी नसावी) सांगितला का? असेल तर लिंक द्यावी (हे तुम्हालाच विचारतोय).

म्हणून म्हणतो सरकार कुठलेही असो वृत्ती महत्वाची. पाशवी बहुमत असताना काय झालं बघा, इंदिरा गांधी: ३५२ सीट्स (आणीबाणी), राजीव गांधी ४००+ सीट्स (शाहबानो प्रकरण). हेच नंतर युपीए सरकारमध्ये प्रचंड घोटाळे झाले, स्थानिक पक्षांच्या नेत्यांचं (ममता, लालू ई) वर्चस्व विनाकारण वाढलं.

असो, तुम्हाला मुद्दा समजला असेल अशी आशा करतो.

प्रसाद_१९८२'s picture

6 Jan 2019 - 11:03 am | प्रसाद_१९८२

ऐकपेशिय सरकार केंद्रात आसने हे भारता सारख्या असंख्य भाषा आणि संस्कृती आसलेल्या देशासाठी खूप धोकादायक आहे .
---

ऐकपेशिय ??

एकपेशीय सरकार = अमिबा (Amoeba) सरकार ? ??

विशुमित's picture

7 Jan 2019 - 11:13 am | विशुमित

सोयीनुसार (की सोयिस्करपणे ??) आकार (भुमिका) बदलणारा प्राणी!

सुबोध खरे's picture

7 Jan 2019 - 12:22 pm | सुबोध खरे

साहेब कि काय?

विशुमित's picture

7 Jan 2019 - 12:46 pm | विशुमित

हाहाहा..!!
सही पकडे!
पकडे रहो !

mrcoolguynice's picture

11 Jan 2019 - 11:21 am | mrcoolguynice

लेटेस्ट मधे

युतीसाठी भाजप नेहमीच तयार
30 | Updated: 11 Jan 2019, 04:00 AM
मोदी म्हणाले...
- मित्रपक्षांशी आमचे घट्ट ऋणानुबंध
- प्रादेशिक अस्मितांची बूज आम्हीच राखली
वृत्तसंस्था, चेन्नई
भारतीय जनता पक्षाचे तमाम नेते 'शतप्रतिशत भाजप'चा नारा सातत्याने देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पक्षाच्याच एका कार्यक्रमात युतीचा नारा दिला. लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर, 'भाजप युतीसाठी नेहमीच तयार असतो, आपल्या मित्रपक्षांशी आपले घट्ट ऋणानुबंध आहेत, आपण ते निगुतीने राखले आहेत', असा सूर मोदी यांनी आळवला.

पंतप्रधान ऐकपाशिय आहे की काय खूप साऱ्या पक्षाचा आहे ह्याला थोडा जास्त विचार केला तार काहीच किंमत नसते .
कोणताही पक्ष आसू द्यात सर्वच समाजाचं हिस्सा आसतात आणि सर्व लोकांवर रोजच्या परिस्थीचा समान परिणाम होतो त्या मुळे भले पक्ष वेगळे असतील पण मानसिकता ऐकाच आस्ते .
पण लोकशाही मध्ये हे मतदारांचा झेंगट आहे ना .
म्हणून समाजातील च काही समूह कसा विचार करतात .
मुळात विचार म्हणजे उच्य नव्हे धार्मिक जातीय आर्थिक aivdyach मर्यादित क्षेत्रात .कारण जनता mature नसते.
मग सर्व पक्ष असे समूह वाटून घेतात आणि भावनिक मुद्यावर निवडणुका जिंकता येतात .
पण मुळ हेतू खूप सारा पैसा कमविणे .
परत निवडून येण्यासाठी विरोधी नेते आणि वियरोधी समूह कमजोर करणे हाच हेतू असतो
जनतेच्या सुख दुःख हा प्रश्न आसू शकत नाही .