सांगा, तुम्ही काय काय विकलय ? (कसं कसं पटवलय ?)

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
6 Oct 2018 - 9:24 am
गाभा: 

'विकणे' शब्दाला 'पटवणे' असा साधा सोपा शब्दही सुरवातीसच घेऊ, कारण 'विकणे' या शब्दाची बर्‍याच जणांना धास्ती असते. - या धागा चर्चे पुरते नकारात्मक आणि अनएथिकल अनुभव जरासे मागे ठेऊ आणि चांगल्या अनुभवांचा ते ही खरेदीच्या नव्हे विक्रिच्या विचार करू -

कारण प्रत्येकाने, अगदी लहानपणा पासून कुणाला न कुणाला कशा न कशासाठी पटवलेले असते . किंवा छोट्या मोठ्या गोष्टी विकलेल्या असतात. कधी एखाद्या आनंद मेळ्यात एखादा स्टॉल लावलेला असतो , एखादी सेकंड हँड वस्तू ते घर भाड्याने देणे अशी सेवा विकलेली असते किंवा एखाद घर विकून पाहिलेल असतं. शेतकरी ते घरगुती पदार्थ बनवणारे या सर्वांनी काही ना काही विकुन बघीतले असते. आणि खासगी क्षेत्रातील नौकरदार वर्गाने मुलाखत देताना स्वतःचे कौशल्य विकुन दाखवलेले असते.

मला या विषयाशी संबंधीत अजून दोन एक तरी लेख लिहिण्याचा मानस आहे, पण तत्पुर्वी सर्व मिपाकर वाचक आणि लेखकांचे तुम्ही (वस्तु, सेवा, संकल्पना घेणार्‍याच्या कपाळाला कटूतेची आठी न पडू देता) काय काय विकलय ? (कसं कसं पटवलय ?) या बद्दल सकारात्मक, एथिकल आणि यशस्वी अनुभव शेअर करुया.

* सांगा, तुम्ही काय काय विकलय ? (आणि कसं कसं पटवलय ?)

* व्यक्तिगत टिका, अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळणे आणि चर्चा सहभागासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया

सर्वसाक्षी's picture

6 Oct 2018 - 10:46 am | सर्वसाक्षी

शिर्षक वाचुन अचंबित झालात? पण मी खरंच माथेरान विकलय, एक संकल्पना म्हणून.

तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आणि सौ. ठाण्याहून डेक्कन एक्स्प्रेसच्या अनारक्षित डब्यातून पुण्याला निघालो होतो. मे महिना असावा. बसायला जागा नव्हती, उभ्याने प्रवास करत होतो. आम्ही उभे होतो त्या बाकावर एक मध्यमवयीन जोडपं बसलेलं होतं. होतं मराठीच पण पुण्या मुंबई कडचं नसावं. स्मित हास्याची देवाण घेवाण झाली. ते लोणावळ्याला चालले होते, सहजच फिरायला निघाले होते.

बघता बघता नेरळ आलं. त्या जोडप्याने कुतुहलाने पलिकड्च्या फलाटावर लागलेली छोटी गाडी पाहिली. मी तात्काळ माथेरानचे निसर्ग सौंदर्य, मातीचे रस्ते,वाहन प्रवेश नसल्या मुळे रस्त्यातून निवांत भटकायचा आनंद , छोट्या गाडीची मजा वगैरेचं वर्णन सुरू केलं, हातात वेळ थोडा होता. "तुम्ही माथेरान अजून पाहिलच नाहीत? अहो लोणावळं झक मारतय! निवांत माथेरानला जा. लोणावळं हली फार गजबजलाय......... बघा पटकन ठरवा, जर समोरची छोटी गाडी गेली तर तीन तास दुसरी गाडी नाही"
जोडप्यानं तात्काळ माथेरानला जायचा निर्णय घेतला, माझे आभार मानले आणि ते उतरुन गेले.

बसायला मस्त जागा मिळाली, कधी नव्हे ते बायकोकडून कौतुकाचे चार शब्द ऐकायला मिळाले.

चौथा कोनाडा's picture

6 Oct 2018 - 2:26 pm | चौथा कोनाडा

+१

असे क्षण फार कमी वेळा येतात.

चौथा कोनाडा's picture

8 Oct 2018 - 1:17 pm | चौथा कोनाडा

:-)))

चौथा कोनाडा's picture

6 Oct 2018 - 2:33 pm | चौथा कोनाडा

मी इथंच मिपावर दोन तीन धागे विकलेत !

हेच ते धागे:

तलकाडू : एक प्रवास

कहाणी एका पाण्याची !

कहाणी एका औदार्यवतीची

(जस्ट गंमत)

मुक्त विहारि's picture

7 Oct 2018 - 11:39 pm | मुक्त विहारि

पण मोठ्या मुलाला शालेय शिक्षण घेत असतांना पैसे कमी पडले की, कागदाचे आवाज करणारे, फटाके शाळेतल्या मुलांना विकून वडापाव खायचा.

धाकटा मुलगा २ वर्षे कॉलेजला गेलाच नाही.शिक्षणाचा कंटाळा आला म्हणाला.त्या काळात त्याने, घरगूती पदार्थ विकायचा धंदा करून बघीतला.

बायको जर्मन भाषा विकते आणि पंजाबी ड्रेसेस शिवते.

तर आमची सौ.आई आणि आमच्या सासूबाई पिशव्या शिवून विकतात.

Ganesh Dwarkanath Mhatre's picture

8 Oct 2018 - 2:04 pm | Ganesh Dwarkana...

"बायको जर्मन भाषा विकते आणि पंजाबी ड्रेसेस शिवते.".. हे छान!!

ज्योति अलवनि's picture

12 Oct 2018 - 1:11 pm | ज्योति अलवनि

सर्वात best गोष्ट विकणं म्हणजे भविष्य! हात, पत्रिका, आकडे यांच्या मदतीने लोकांना काहीही ठोका... नक्की विकलं जातं. मी स्वतः नाही विकलं पण अनुभवलंय. लोक लगेच विश्वास ठेवतात आणि विकत घेतात. त्यात 'तुम्ही खूप सहन केलंय आणि तुमची कोणालाही किंमत नाही' ही दोन वाक्य तर जादू आहेत.

कोणाला इच्छा असली तर प्रयोग करून बघा

....लोकांना काहीही ठोका....

धागा चर्चा लेखास एथिकल अनुभवांची चर्चा अभिप्रेत आहे. सहकार्यासाठी अनेक आभार.