पाकोळी
निळ्या-जांभळ्या
आभाळाखाली,
हिरव्यागार कुरणाच्या
लुसलुशीत गवतावर
निवांतपणे
पहुडलेला असताना,
पलीकडच्या,
ताटव्यातल्या फुलांवरून
एक नाजूकशी पाकोळी
उडतउडत
माझ्याकडे आली
आणि मला म्हणाली…
"बाबा, तू आज आपिशला ज्यावू नको,
आपण गार्डनमध्ये खेळायला ज्यावू"
- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)
- संदीप चांदणे (१०/०९/२०१८)
छान! आॅग्डेन नॅशची
आह्हा!
कित्ती गोड
मस्तच ! एकदम गोड ! नाजुक
अप्रतिम
आवडली
कसलं गोड!
सुंदर!
क्या बात है
छान पाकोळी
.