चालू घडामोडी - जुलै २०१८

Primary tabs

विशुमित's picture
विशुमित in काथ्याकूट
4 Jul 2018 - 2:56 pm
गाभा: 

‘शाकाहारी’ दहशतवाद्यांनी थांबवली बोकड निर्यात!
http://www.bigul.co.in/bigul/2650/sec/8/goat%20export
====
खाऊन माजलेली बोकडं कष्टकरी जनतेच्या हिताचा विचार करणार आहेत की नाही ?

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

4 Jul 2018 - 3:19 pm | अर्धवटराव

जैनांच्या विरोधामुळे बोकड निर्यात थांबवली असेल असं वाटत नाहि. नागपुरात जैन लॉबी निर्णायक स्ट्राँग नाहि. असल्या मागण्या मान्य करुन आपलं दिवाळं काढायला नितीन गडकरी धजणार नाहि. सत्य नक्कीच काहितरी वेगळं असणार.

मराठी_माणूस's picture

4 Jul 2018 - 4:23 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/manoranjan-news/actor-writer-yogesh-soman-criti...

व्हीडीओ चा शेवट तर मस्त

नाखु's picture

4 Jul 2018 - 5:34 pm | नाखु

भागाबद्दल सहमत असलो तरी उत्तरार्ध बद्दल खरंच साशंक आहे.

केजरीवाल यांच्याविषयी त्यांचे सोडून गेलेले सहकारी याबाबत केजरीवाल कधीच खुलासेवार स्पष्टपणे बोलत नाहीत.
तसंच आमदारांनी केलेल्या प्रशासकीय अधिकर्यांना केलेल्या मारहाणीत सूचकपणे मौन बाळगले आहे

नाखु वाचकांचीही पत्रेवाला

ट्रेड मार्क's picture

4 Jul 2018 - 8:39 pm | ट्रेड मार्क

२०१६ साली दिल्ली हायकोर्टाने उपराज्यपाल नजीब जंग हेच दिल्लीचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय घेतील असा निर्णय दिला होता.

या निर्णयाप्रमाणे जर उपराज्यपाल काम करत असतील तर दडपशाही कशी काय? कोर्टाचा निर्णय केजरीवालांच्या विरुद्ध लागला म्हणून दडपशाही आणि आता मुख्य न्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केजरीवालांच्या बाजूने निकाल दिला म्हणून ते चांगले झाले? याच दीपक मिश्रांवर गेले काही महिने भाजपचे एजन्ट असल्याचा आरोप होत होता ना?

मुद्दाम परिस्थिती निर्माण करून मग आक्रस्ताळेपणा करण्यात केजरीवालांचा हात कोणी धरू शकणार नाही. नजीब जंग तर काँग्रेसने नेमलेले होते. पण त्यांच्यावर पण केजरीवालांनी ते आधी काँग्रेसचे एजन्ट होते आणि नंतर भाजपचे एजन्ट आहेत असा आरोप केला होता.

नाखु's picture

5 Jul 2018 - 7:47 am | नाखु

संधी साधुन घेणं काहीनाच जमतं,संधी तयार करूनही ती साधता आली नाही की करंटेपणा करुन पळवाटा शोधून काढणार्याला केजरीवाल म्हणतात.

कपिलमुनी's picture

5 Jul 2018 - 11:00 am | कपिलमुनी

२०१४ ते २०१६ मध्ये जे प्रकारे परिस्थिती हाताळलि गेलि त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले .
उपराज्यपाल प्रत्येक निर्णयात खोडा घालत होते . जे घाणेरडे राजकारण केले त्याचे समर्थन नको. केजरीवाल असो की फडणवीस , मुख्यमंत्र्याला काम करू दिले पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने एवढ्या कानपिचक्या दिल्या आहेत यातच सर्व आले .

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 8:07 pm | सुबोध खरे

या निर्णयाप्रमाणे जर उपराज्यपाल काम करत असतील तर दडपशाही कशी काय?

हे असे प्रश्न श्री केजरीवाल आणि त्यांच्या भक्तांना विचारायचे नसतात.

पोलीस पण तेच साक्षीदार पण तेच आणि न्यायाधीश पण तेच असतात आणि त्यांनी दिलेल्या निकालाला न्याय म्हणायचे असते .

नजीब जंग तर काँग्रेसने नेमलेले होते. पण त्यांच्यावर पण केजरीवालांनी ते आधी काँग्रेसचे एजन्ट होते आणि नंतर भाजपचे एजन्ट आहेत असा आरोप केला होता.

असं का याचा उत्तर वरच्या परिच्छेदातच आहे

सुबोध खरे's picture

5 Jul 2018 - 8:23 pm | सुबोध खरे

Judiciary Being Treated Like AAP Government By PM Modi: Arvind Kejriwal

https://www.ndtv.com/india-news/judiciary-being-treated-like-aap-governm...

Delhi Chief Minister Arvind Kejriwal on Monday created ripples by alleging that there is a "widespread" fear that the phones of judges are being tapped and said if it is true, then it is the biggest assault on the independence of the judiciary.

http://www.rediff.com/news/report/kejriwal-claims-judges-phones-being-ta...

Delhi High Court raps Arvind Kejriwal for plea against speedy trial

The Aam Aadmi Party supremo had stirred up a hornet’s nest during an election rally in Goa earlier this month where he had asked people to accept money offered by the political parties, but vote for AAP only.

https://indianexpress.com/article/india/kejriwal-self-proclaimed-chief-justice-of-indian-politics-bjp/

सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 9:26 am | सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 9:27 am | सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 9:41 am | सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 10:40 am | सोमनाथ खांदवे
इरसाल's picture

5 Jul 2018 - 11:26 am | इरसाल

पटलय आम्हाला !!!!!

सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 12:08 pm | सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 12:11 pm | सोमनाथ खांदवे

मन कै मॉकळ व्हइना

विशुमित's picture

5 Jul 2018 - 12:42 pm | विशुमित

मोबाईल वरून टंकत असाल आणि ईमोजी टाकत असाल तर पूर्ण प्रतिसाद दिसत नाही, हा माझा अनुभव आहे.
ईमोजी न टाकता प्रतिसाद टाकून बघा, बहुतेक तुमचा प्रश्न सुटेल.
नाहीतर संपादक मंडळाची मदत घ्या.

सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 12:56 pm | सोमनाथ खांदवे
सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 12:57 pm | सोमनाथ खांदवे
विशुमित's picture

5 Jul 2018 - 4:12 pm | विशुमित

सरकार वारीमध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी कशी करणार ?

कपिलमुनी's picture

5 Jul 2018 - 4:52 pm | कपिलमुनी

काँग्रेस असो की भाजप , धार्मिक मुद्द्यावर कोणतेही सरकार कारवाई करत नाही.

सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 5:24 pm | सोमनाथ खांदवे

आण्णा च्या आंदोलन मधून केजरीवाल चा उदय झाला , थोड्याच दिवसात त्याने दिल्ली काबीज केली . पण आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात त्याची डाळ नाही शीजली
तसे म्हणा पुरोगामी कोणाचीच डाळ शीजवू देणार नाहीत .

मानवी भावना किती बोथट होत चालल्या आहेत . शाळेत मुलं सुरक्षित नाहीत . पुण्या मध्ये वानवडी व सिंहगड रोड ला लहान मुली बरोबर असेच घाणेरडे प्रकार झाले होते . दोन दिवस सगळ्या वृत्तपत्रांनी बातम्या छापल्या होत्या पण पुढे त्या केसेस च काय झालं ? कोर्टात केस चालली का ? आरोपी ला शिक्षा झाली का ? याबद्दल कोणालाही काहीही माहिती नसते . दोन दिवस सर्वजण हळहळ व्यक्त करून पुन्हा कामाला लागतात . म्हणून अस वाटत कोर्टात आरोप सिद्ध झाला की
या निर्दयी हारामखोरांना भर चौकात फाशी दिली तरच कदाचित पुढे असल्या घटना कमी होतील
कोलकातामध्ये प्लेस्कूलच्या आवारात एका दोन वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डायमंड हार्बर परिसरात ही घटना घडली आहे. घटनेच्या दोन दिवसानंतर चिमुरड्याच्या वडिलांनी याप्रकरणी ठाकूरपुरकर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जूनला मुलगा घरी आला तेव्हा त्याच्या गुप्तांगामधून रक्त वाहत होतं. याप्रकरणी पॉस्को अंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय अहवालानुसार मुलासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट होत आहे. २ जून रोजी जेव्हा पीडित मुलाची आई त्याला शाळेतून घरी आणण्यासाठी गेली होती तेव्हा तो जोरजोरात रडत असल्याचं त्यांनी पाहिलं. घरी पोहोचल्यानंवर आईने मुलाला बाथरुममध्ये नेऊन पाहिलं असता त्याच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं असं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.

पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मुलाची स्थिती पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला होता. शाळेतील सीसीटीव्ही २६ जूनपासून बंद पडले असून शाळेने कोणतंही फुटेज दाखवण्यास नकार दिला असल्याचाही आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.

'आम्ही मुख्याध्यापक आणि प्रशानाकडे सीसीटीव्ही फुटेज द्यावं यासाठी विनंती केली. पण त्यांनी २६ जूनपासून सीसीटीव्ही बंद पडल्याचं कारण दिलं. शाळा प्रशासनाने जाणुनबुजून फुटेज डिलीट केलं असावं असा आम्हाला संशय आहे', असं त्याच्या वडिलांनी तक्रारीत सांगितलं आहे

झेन's picture

5 Jul 2018 - 10:27 pm | झेन

सगळंच धक्कादायक आहे. राजकीय पक्ष, मिडिया, मानव अधिकार आयोग सगळे सोईस्कर भूमिका घेतात आणि मॅनेजबल असावे का असे वाटते. तसेही पब्लिक मेमरी शॉर्टटर्म असते. केरळ मधल्या बलात्कार केसबद्दलही सगळीकडे शांतता आहे.

प्रसाद_१९८२'s picture

6 Jul 2018 - 1:18 pm | प्रसाद_१९८२

Photo
--
किल्ले रायगडावरिल सिंहासनाच्या चौथर्‍यावर, मेघडंबरित चढून फोटो काढणे अभिनेता रितेश देशमुख याला फारच महाग पडलेले दिसते. त्याच्यावर चौफेर टिका सध्या होत आहे.
--
https://abpmajha.abplive.in/movies/riteish-deshmukh-apologize-for-photo-...

मागच्या रविवार सकाळच्या अंकात शेखर गुप्ता यांचा मोदींच्या परराष्ट्र धोरणाची समीक्षा करणारा लेख होता. शेखर गुप्तांनी मागील चार वर्षात तीव्र मोदीविरोधी भूमिका घेतल्याचे आठवत नाही. नोटबंदी, गोरक्षकांचा धुमाकूळ आणि मोदींचे मौन, इराणी, निहलानी, गजेंद्र चौहान यांचा अथवा यांच्यावरून उठलेला गदारोळ अशा त्या त्या वेळेस चर्चेत असलेल्या प्रश्नांवरदेखील त्यांनी काहीच मते मांडली नसावीत किंवा तीव्र स्वरूपाची टीका केली नसावी असे आठवते.

सर्जिकल स्ट्राईक अगदी इंदिरा गांधींच्या काळातही झाले पण त्यांनी ना त्याची वाच्यता केली ना त्याचा राजकीय फायदा घेतला. त्या उलट मोदींचे वागणे अगदीच उथळ होते असा सर्वसाधारण सूर होता. अमेरिकेने द्विपक्षीय बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित ठेवणे हादेखील एक प्रकारचा संकेतच आहे असेही गुप्तांनी म्हटले आहे.

एरवी महागाई, सामाजिक सलोख्याची झालेली पीछेहाट, नोटबंदी, जीएसटी यामुळे व्यापार उद्योगाची झालेली हानी या सर्वांच्या बाबतीत लटका प्रतिकार करून झाल्यावर परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत भारताने केलेली भरीव प्रगती हा भक्तांचा शेवटचा बालेकिल्ला होता. त्याला अशाप्रकारे खिंडार पडले आहे.

जाता जाता: शेखर गुप्ता हे एक फुटकळ पत्रकार आहे असा रोख असणाऱ्यांनी मोदींची आणि गुप्ता यांची खास हिरवळीवर फिरत मारलेल्या गप्पांची फित बघावी.

सोमनाथ खांदवे's picture

7 Jul 2018 - 9:59 am | सोमनाथ खांदवे

खर हाये ! इथून पुढ लै आवगढ व्हणार ये बगा .आमरिका आन चीन च्या यापार युद्धा मुळ म्हागाई वाढणार आन सगळ्या ना जवारी आन बाजरी च्या कणगी भरून ठ्येवाव्या लागत्याल . आन त्या म्हागाई च्या चटक्या मुळ मोदीभक्त , चौकटरागा भक्त आशा दोघांच्याही चड्ड्या वल्ल्या व्हनारैत
त्यातल्या त्यात त्यो ट्राम्फ जरा सर्किटच हाये ,
सुपामदी टाकून कुटल्याही कण्ट्री ला पाखडत बस्तो , सध्याला आपल्या भारताचा नम्बर हाये यवढच . हातभट्टी मारल्या सारखा बरळतो आन त्याच्या बराळन्या मूळ जगातले सगळे शेरबाजार घरंगळत्यात . मरत बी नै लवकर !!!

बार्नी's picture

7 Jul 2018 - 5:38 am | बार्नी

नेटफ्लिक्स चा पहिला भारतीय शो काल रिलीज झाला . एका रात्रीत बघून संपवला .

खूप दिवसांनी इतका जबरदस्त सिरीज बघितली . नक्की बघा .

अनन्त अवधुत's picture

7 Jul 2018 - 6:45 am | अनन्त अवधुत

नाव ? दुआ?

अनन्त अवधुत's picture

7 Jul 2018 - 6:53 am | अनन्त अवधुत

https://www.netflix.com/watch/८०११५८८७

टर्मीनेटर's picture

7 Jul 2018 - 11:08 pm | टर्मीनेटर

मस्त आहे. सगळे भाग बघितले नाहीयेत, पण चांगलीच थरारक वाटते आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2018 - 1:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

Abu Dhabi warns motorists of Dhs1,000 fine for rubbernecking

अबु धाबी (युएई) मधले काही निवडक वाहतूक नियम व दंड असे आहेत...

१. गाडीच्या खिडक्यांच्या काचा ५०%पेक्षा जास्त अपारदर्शक करणे (तिथले प्रखर उन्ह व गरम हवामान घ्यानात घेऊन ५०% पर्यंतच्या अपारदर्शकतेला परवानगी आहे) : Dhs१,५०० दंड.

२. मोठ्या आवाजाच्या व ध्वनिप्रदुषण करणारी गाडी रस्त्यावर चालवणे : Dhs२,००० + ६ ट्रॅफिक पॉईंट्स *

३. अपघाताच्या ठिकाणी गाडी उभी करून गर्दी करणे आणि/किंवा वाहतूकीला आणि/किंवा मदतकार्याला अडथळा आणणे : Dhs१,००० + ६ ट्रॅफिक पॉईंट्स

४. जुने झिजलेले टायर असलेली गाडी चालवणे : Dhs५०० + ४ ट्रॅफिक पॉईंट्स + गाडी ६ दिवस जप्त

५. दारूच्या अंमलाखाली गाडी चालवणे : Dhs२०,००० आणि/किंवा कारावास

६. वेगमर्यादेपेक्षा ६० किमी/तास वेगाने गाडी चालवणे : Dhs२,००० + १२ ट्रॅफिक पॉईंट्स + गाडी ३० दिवस जप्त

दंडांची मोठी यादी इथे पाहता येईल.

दुबईतले (युएई) कायदे यापेक्षा जास्त कडक आहेत.

दुबई, अबू धाबी इत्यादी ठिकाणांना भेट देऊन आल्यावर तेथिल वाहतूक व्यवस्थेची स्तुती करणार्‍यांनी वरचे कायदे लक्षात घ्यायला हवेत आणि त्यांची अंमलबजावणीही काटेकोरपणे होते हे सुद्धा घ्यानात घ्यायला हवे.

===============

* : ठराविक कालखंडात ट्रॅफिक पॉईंट्सनी ठराविक आकडा पार केल्यास ड्रायव्हिंग लायसेन्स काही काळाकरिता जप्त किंवा रद्दही होते.

नाखु's picture

10 Jul 2018 - 2:03 pm | नाखु

तिथल्या नाशिक फाटा पुलावर रात्री , आमदारपुत्राचा हैप्पी बर्थडे साजरा करता येणार नाही म्हणता, अगदी असहिष्णुता आहे ब्वा
हेच मग आता मानवतावादी, समतावादी यांनी काय करायचं.

प्रश्नांकित नाखु वाचकांची पत्रेवाला

सोमनाथ खांदवे's picture

11 Jul 2018 - 10:38 am | सोमनाथ खांदवे

संभाजी भिडे नीं केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यात कुठे ही दलित समाजा चा उल्लेख नसतांना दलितांचे कैवारी श्री प्रकाश आंबेडकर वारकरी समुदायाला पोलीस तक्रार करायला का सांगत आहेत ?
जे विठ्ठलाचे सेवक आहेत ते खरे वारकरी गेले पालखी बरोबर विठ्ठलाच्या भेटीला मग आंबेडकर कोणाला सांगत आहेत ? सतत प्रसिद्धीझोतात राहण्याची त्यांची धडपड का चालली आहे ?

संभाजी भिडेंविरोधात वारकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारी कराव्यात
https://www.loksatta.com/maharashtra-news/varkari-should-make-a-complain...

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jul 2018 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

India becomes world's sixth largest economy, muscles past France

फ्रान्सला (US$२.५८२ ट्रिलियन) मागे टाकत भारत (US$२.५९७ ट्रिलियन) जगातली सहावी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. असे असले तरी, भारताच्या सुमारे १३२ कोटी भारतिय लोकसंखेच्या मानाने केवळ ६.७ कोटी लोकसंख्या असलेल्या फ्रान्सचे दरडोई उत्पन्न, अर्थातच, खूप जास्त (सुमारे २० पट) आहे. तरीही, सद्याची अस्थिर जागतिक अर्थव्यवस्था आणि चीनचा मंद होणारा अर्थव्यवस्था दर, यांच्या पार्श्वभूमीवर भारताचे हे यश निश्चितच आशादायक आणि स्पृहणिय आहे.

काही तिमाहींच्या संथ गतीनंतर भारतिय अर्थव्यवस्था जोमाने वाढू लागली आहे. आयएमएफच्या (आंतरराष्ट्रीय मुद्रानिधी) अंदाजाप्रमाणे भारतिय अर्थव्यवस्थेत या वर्षी ७.४% व २०१९ मध्ये ७.८% दराने वाढ होईल. या वर्षीच्या वाढीमागे उत्पादन (मन्युफॅक्चरिंग) आणि ग्राहकांनी केलेली खरेदी (कंझ्युमर स्पेंडिंग) हे दोन मोठे घटक आहेत. सद्या समाधानकारक असलेला पावसाळा तसाच राहिला तर शेतीचे उत्पन्नही यामध्ये लक्षणिय भर घालेल.

लंडनस्थित Centre for Economics and Business Research या जागतिक अर्थसल्लागार संस्थेने केलेल्या भाकीताप्रमाणे भारताची वरची प्रगती होत आहे. या संस्थेच्या आडाख्यांप्रमाणे भारत सन २०३२ पर्यंत युके (US$२.६ ट्रिलियन), जर्मनी (US$३.९ ट्रिलियन) आणि जपान (US$४.९ ट्रिलियन) या तीन देशांना मागे टाकून जगातली तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल.

मार्कस ऑरेलियस's picture

11 Jul 2018 - 9:08 pm | मार्कस ऑरेलियस

ही के जबरदस्त बातमी आहे ! भारतीय जनता पार्टीला भारतीय जुमला पार्टी म्हणणारे आणि विकासदराचा फार्म्युला बदलुन झोल केलाय असे म्हणाणारे आता कात म्हणातात ते पहाणे रोचक ठरेल !!

माहितगार's picture

11 Jul 2018 - 9:42 pm | माहितगार

ठिक आहे, पर कॅपिटा इनकम सुद्धा कदाचित महत्वाचा क्रायटेरीया असेल पण या सर्वा पेक्षा प्रॉडक्शन साठी लागणारी कॉस्ट ऑफ कॅपिटल कमी होणे आणि प्रॉडक्शन ( मॅन्यू. आणि अ‍ॅग्री) मध्ये इनव्हेस्ट्मेंट वाढणे महत्वाचे आहे. यात केव्हा सुधारणा होतील कल्पना नाही कारण हि बाब जेवढी कायदा सुधारणांवर अवलंबून आहे तेवढी (अप्रत्यक्ष) सांस्कृतिक सुद्धा.

मार्मिक गोडसे's picture

12 Jul 2018 - 12:33 pm | मार्मिक गोडसे

60 वर्षांची घाण 4 वर्षात काढली म्हणायची जुमला पार्टीने. उगाच इतके दिवस रडत होते.

माहितगार's picture

13 Jul 2018 - 9:24 am | माहितगार

भारतीयांना यश मिळत असल्यास सजरे करण्यास हरकत नाही -चुकीची निगेटीव्ह पब्लिसिटीपण परतवली पाहिजे, अ‍ॅट द सेम टाईम त्याच वेळी - अटल बिहारींच्या वेळी निवडणूक प्रचारात इंडिया शायनींग दाखवण्यात घाई झाली नाही ना अशी साशंकता व्यक्त होत राहीली कारण प्रगतीचा व्यक्तिग्त मतदत्याला अनुभ्व फील होणे महत्वाचे आहे. प्रगतीचा व्यक्तिग्त मतदत्याला अनुभ्व येणे आणि पुढच्या पाच वर्षांचा नेमका कार्यक्रम काय आहे, त्या कार्यक्रमात काँग्रेसपेक्षा अधिक काय देत आहात हे सकारात्म्क पणे सांगता आले पाहीजे.

दुसरे भाजपाच्या राज्य सरकारांनी -केवळ महाराष्ट्रातल्या नव्हे- जे काही थोडे फार काम केले असेल ते सकारात्मक मांडणी आणि प्रसिद्धीत भाजपा समर्थक कमी दिसतात अस माझ व्यक्तिगत निरीक्षण आहे -मी अबकड भाजपाई नसल्यामुळे मला तसे वाटत असल्यास चुभूदेघे.

मार्मिक गोडसे's picture

13 Jul 2018 - 3:10 pm | मार्मिक गोडसे

पुढच्या पाच वर्षांचा नेमका कार्यक्रम काय आहे, त्या कार्यक्रमात काँग्रेसपेक्षा अधिक काय देत आहात हे सकारात्म्क पणे सांगता आले पाहीजे.
ते स्वतःच्या जाळ्यात फसले आहेत.काल परवा पर्यंत मागील 60 वर्षात देशाची आर्थिक अधोगती झाल्याचा कांगावा करणाऱ्यांचा खेळ आता त्यांच्या अंगाशी आला आहे. कुठलेही क्रांतिकारक आर्थिक निर्णय न घेता भुसभुशीत आर्थिक पायावर देशाची आर्थिक प्रगती होणे शक्य नसते. ह्या सरकारने असे काही क्रांतिकारक निर्णय मागील 4 वर्षात घेतल्याचे आठवत नाही. त्यामुळे हया प्रगतीचे श्रेय ते स्वतः कडे घेत असतील तर मागील सरकारची आर्थिक धोरणे चुकीची होती हे त्यांना सिध्द करावे लागेल.

:)) कोणत्याही सरकारने काहीच केले नाही तरी लोकसंख्या वाढली कि इकॉनॉमीचा आकार लोकांच्या किमान क्षमतेवरही बर्‍यापैकी वाढताना दिसू शकेल की ! मनमोहन पि चिदंबरम प्रभृतींनी इलेक्ट्रॉनीक्स उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले नाही ती संधी चीन आणि पूर्व आशियायी देशांना आयती मिळाली. आताच्या सरकार ने रिटेल ट्रेडर्स साठी आधूनिकीकरणाच्या कोणत्याही अटी न टाकता ऋण उपलब्धता वाढवली.

सत्तेवर बसून भरपूर पैसा मिळवा पण घेतलेला पैसा वस्तु - अन्न उत्पादनावर लावा हि माझी राजकारण्यांकडून साधी अपेक्षा आहे, जी कोणत्याही राजकीय पक्षाच्या राजकारण्यांनी पूर्ण केल्यासारखी वाटत नाही. रामदेवबाबांचेही प्रॉब्लेम्स असू शकतील (त्यांच्या बद्दल अल्पशीच माहिती आहे) कदाचित स्वार्थ असेल काही योग्य अयोग्य त्यांच्यातही शोधता येईल पण किमान वस्तू उत्पादनाचा विचार करु शकतो हे पाहून बरे वाटते. इतर प्रत्येक राजकारण्याने तेवढ्या टर्नओव्हरच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवल्यास आर्थीक प्रगती अशक्य नसावी.

मार्मिक गोडसे's picture

13 Jul 2018 - 6:13 pm | मार्मिक गोडसे

सत्तेवर बसून भरपूर पैसा मिळवा पण घेतलेला पैसा वस्तु - अन्न उत्पादनावर लावा हि माझी राजकारण्यांकडून साधी अपेक्षा आहे, जी कोणत्याही राजकीय पक्षाच्या राजकारण्यांनी पूर्ण केल्यासारखी वाटत नाही.
प्रत्येक सरकारची धोरणे ही भविष्याचा विचार करून ठरवली जातात. जसे मागील सरकारने मल्टी ब्रँड रिटेल आणि सिंगल ब्रँड रिटेल मध्ये एफडीआय गुंतवणुकी बाबत केला होता, त्याला तेव्हा सध्या सत्तेत असलेल्या पक्षाने जोरदार विरोध केला होता. आज त्याच पक्षाच्या सरकारने अन्न प्रक्रिया उद्योगात १००% एफडीआयला मान्यता दिली आहे. एखाद्या उद्योगाला भांडवल जेव्हढे महत्त्वाचे असते तितकेच आधुनिक तंत्रज्ञानही आवश्यक असते, ते एफडीआय मुळे शक्य होऊ शकते.

माहितगार's picture

13 Jul 2018 - 6:43 pm | माहितगार

... ब्रँड रिटेल आणि सिंगल ब्रँड रिटेल मध्ये एफडीआय गुंतवणुकी...

रिटेलच्या व्यवसायाचे कौशल्य भारतीय व्यापर्‍यांकडे मोअर दॅन इनफ असावे. प्रॉब्लेम मधली चेन फार मोठी आहे कारण त्यांना टेक्नॉलॉजी आधूनिकरणात आणि अमल्गमेशन्स मध्ये मदत देण्याची गरज असावी. बाहेरच्या रिटेल एफडीआय गुंतवणूकीस परवानगी देण्यास हरकत नाही पण अशी गुंतवणूक एकाच देशातून किंवा फक्त युरोमेरीकेतून न येता अनेक देशातून येते आहे हे पहावयास हवे. आणि निरव मोदी पेक्षा बीग बझार आणि रिलायन्सवर किंवा भारतीय चेन आतंरराष्ट्रीय प्लेयर होण्यासाठी काही हजार कोटी ओवाळून टाकायला हरकत नाही. इतर मल्टीनॅशनल ना भारतात पाय ठेऊ दिला तर भारतीय मल्टीनॅशनलचाही जगात तेवढाच दबदबा असावयास हवा. सध्या एकतर्फी आहे ते स्पृहणीय नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2018 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वतःच्या देशाचा उत्कर्ष सांगणार्‍या बातमीने आनंद वाटण्यातही राजकारण आडवे येते, हीच भारताची सर्वात महत्वाची शोकांतिका आहे ! :(

नगरीनिरंजन's picture

29 Jul 2018 - 1:58 am | नगरीनिरंजन

तुम्हाला ट्रिलियन म्हणायचे असावे बहुधा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jul 2018 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

नजरचुक ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद ! प्रतिसादात योग्य तो बदल करून घेतला आहे.

मी ताज्या घडामोडी धाग्यांवर काश्मिर बाबतीत गुप्तचर यंत्रणा कमी पडताहेत का अशी साशंकता व्यक्त केली होती. आजच्या इंडीयन एक्सप्रेस मध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक अतीरेकी कट प्रयत्नपूर्वक हाणून पाडल्याचे वृत्त आहे तेव्हा या निमीत्ताने अवघड परिस्थितीत देशाला सुरक्षीत ठेवण्यास मोलाचा हातभार लावणार्‍या भारतीय गुप्तचर आणि भारतीय गुप्प्तचर संस्थांचे कौतुकही केले पाहीजे .

शब्दबम्बाळ's picture

11 Jul 2018 - 8:50 pm | शब्दबम्बाळ

+1

रविकिरण फडके's picture

11 Jul 2018 - 10:01 pm | रविकिरण फडके

Why is the govt going out of the way to confer the title of Institution of Eminence on the JIO institute, which has not even come in to existence yet? Why is BJP (party with a difference) - and its upright HRD minister Mr. Prakash Javdekar - bestowing such favours?
Just because it is Ambani's?
Can some one throw light on this, please?
(Of course the respondent can write in Marathi. It's just that transliteration functionality has stopped working on my laptop - don't know why, don't know how to fix it.)

फिक्स क्येलं तर समद फिक्स व्हतय, प्र्याक्टीसनं रुळतयं :)

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2018 - 7:13 pm | सोमनाथ खांदवे

अजून एक वर्ष बाकी आहे , भाजप का मुखभंग करून घेत आहे तेच समजत नाही .' शायनिंग इंडिया घोषणा देऊन वाजपेयी चें सरकार घालवले , आता मोदींचे सरकार ही त्याच वाटेने जात आहे . प्रसिद्धीलोलुप लोकांचा भरणा असला की असेच होते . अजून जिओ इन्स्टिट्यूट च्या कार्यालयाचा पत्ता नाही आणि भाजप ला जिओ चे रँकिंग वाढवण्याची घाई झाली आहे , निर्लल्जपणाचा कळस झालाय . मोदीं उद्योगपती साठी रेडकार्पेट टाकत आहेत का त्यांचे पाय धुवत आहेत ?

माहितगार's picture

13 Jul 2018 - 9:41 am | माहितगार

भारतातही स्त्री वरीळ अत्याचारांचे प्रमाण कमी होण्यासाठी कार्यरत रहाण्याची गरज नक्कीच आहे, पण बाकी युरोमेरीकेच्या परिस्थिती पेक्षा भारतात परिस्थिती वाईट असल्याच्या फसव्या माध्यम प्रसिद्धीतील उणीवा ससंदर्भ सांख्यिकी विश्लेषणासहीत सुभोदीप मुखोपाध्याय यांच्या लेखात आली आहे.

भारतातील बरेच अत्याचार अनरिपोर्टेड रहाण्याची शक्यता वर्तवली जाते त्या आकडेवारी साठी अ‍ॅडज्स्टमेंट केल्यावर सुद्धा युरोमेरीकेतील परिस्थिती भारतापेक्षा ९ पट खेदजनक असल्याचे २१ देशांच्या आकडेवारीवरुन ते दाखवून देताना दिसतात.

भारतातील सद्य स्थिती पेक्षा समाज अधिक कसा चांगला असेल हे बघीतलेच पाहीजे पण परदेशात भारताबद्दलचे चुकीचे स्टिरीओटायपींगही टळावे असे वाटते.

सोमनाथ खांदवे's picture

13 Jul 2018 - 10:53 am | सोमनाथ खांदवे

आंतरराष्ट्रीय नानेनिधींच्या महिला अध्यक्षा ने मोदींना भारतातील महिलांच्या सुरक्षितते बद्दल सुनावले ते म्हणजे उलटा चोर कोतवाल डाटें प्रकार म्हणावा काय ?

https://youtu.be/5zub_3U-REQ

माहितगार's picture

13 Jul 2018 - 1:35 pm | माहितगार

हा ओव्हर-ऑल मिडियामध्ये जाणीवपूर्वक नकारात्मक प्रतिम निर्माण करण्याचा परिणाम असावा. Christine Lagarde स्वतः फ्रान्सच्या आहेत. सुभोधीप मुखोपाध्याय डाटा विशेषज्ञ आहेत त्यांची आकडेवारी बरोबर असेल तर. फ्रान्सचे प्रति एक लाख लोक्सख्ये मध्ये रिपोर्टॅड रेपची लाखेवारी १६ आहे आणि भारताची केवळ १.८ आहे . दोन्ही देशात अनरिपोर्टॅडची शक्यता आकडेवारी स्भोधीपप्रमाणे लक्षात घेतली तर फ्रान्समध्ये हे प्रमाण १६० असेल आणि भारतात केवळ १२.९ इन एनीकेस त्यांच्या फ्रान्स मधलाच प्रॉब्लेम भारतापेक्षा किमान दहापटीने अधिक असावा. बाकी युरोपाचीही स्थिती ची आकडेवारी बोलकी आहे .

तुम्ही आयएमएफच्या प्रमुख आहात महिला असल्यामुळे समोर आलेल्या बातमी बाबत सहानुभूती वाटणे सहाजिक आहे पण आंतरराष्त्रीय पदावर काम करणारी स्त्री अधिक जबाबदार असावी सर्वच देशातील स्त्रीयांबद्दल सारखीच आपुलकी असावी. 'एक स्त्री म्हणून काळजी वाटते' एवढे विधान पुरेसे आहे ना . मिडिया कसा बायस्ड वागू शकतो हे वरीष्ठ स्तरावरील स्त्रीस माहित नसावे का की बघा बघा तुमच्या देशात कसा रिव्होल्ट होतोयची भाषा करावी ? फॉर्मल विधान केल्या नंतर मोदी किंवा सुषमा स्वराज किंवा अरुण जेटलीशी फोनवर संवाद साधण्यास किती वेळ लागतो ? पण कसय दुर्दैवानी , कि एन जी ओ क्षेत्रातील जॉब त्यांच्या बोलवित्या धन्यांच्या इच्छेस किती उतरु शकता त्या नुसार मिळत आणि टिकत असतात.

एखाद्या व्यक्तीचा दुटप्पीपणा किती असू शकतो पहा याच मॅडम सौदी राजाला श्रद्धांजली वाहताना काय म्हणतात पहा - आणि या सौदींनी स्त्रीयांवर केलेले अन्याय अंतरजालावर पहाण्यास मिळतीलच पण हा सौदी राजा स्त्रीयांचा सपोर्टर असता तर दिल्लीत नेपाळी स्त्रीयांना त्यांच्या राजदूतांनी केलेल्या अत्याचाराच्या केस मध्ये न्याय मिळवून दिला असता की नाही ? कमाल असते एक एक.

King Abdullah – a discreet but strong advocate of women, says IMF chief

संदर्भ गार्डीयन

भारताची आर्थीक स्थिती खर्‍या अर्थाने मजबूत असती आणि भारत आय एम एफ चालवत असता तर ह्याच बाई वेगळ्या पद्धतीने बोलल्या असत्या. केवळ त्यांना दोष देऊन उपयोग नाही आपल्या देशाची आर्थीक स्थिती सबळ न ठेवण्यात आपण मागे पडतो आणि आपल्याच देशाची एकांगी नकारत्म्क चित्र रंगवण्यात स्वतःच हकनाक पुढे असतो.

सोमनाथ खांदवे's picture

14 Jul 2018 - 7:39 am | सोमनाथ खांदवे

रांगेत उभे राहून पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांचे जेवण; अधिवेशनातील कामाचे केले कौतुक
https://www.loksatta.com/maharashtra-news/cm-fadnavis-visits-meets-inter...
Shared via Loksatta Android App चांगली गोष्ठ आहे एकत्र जेवण केल्याने दुरावा कमी होतो , तसेच निवडणुका आल्याच आहेत आता पुन्हा एकदा सर्व पक्षाच्या खेडोपाडी दलित वस्तीवर जेवण करण्याच्या प्रथेला सुरवात होईल .
किमान अस केल्यामुळे तरी पोलीस महत्वाच्या व्यक्तींनां आपल्याला न विचारता ( महाराष्ट्र बँक चे मॅनेजर मराठे ) डायरेक्ट कोठडीत टाकणारं नाही असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल . बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांना गेली चार वर्ष भाजप मध्ये गृहमंत्रीपदा साठी योग्य नेता न भेटल्यामुळे शहांच्या आदेशानुसार गृहमंत्रीपद सुद्धा सांभाळावे लागत आहे .देव करो पुढील निवडणुकीनंतर मुखमंत्र्यांचं अतिरिक्त ओझं कमी करण्यासाठी योग्य नेता भेटो , दोन दोन खाती सांभाळायची म्हणजे कामाचा लोड काय कमी असतो का ?

सोमनाथ खांदवे's picture

14 Jul 2018 - 9:11 am | सोमनाथ खांदवे

https://www.usatoday.com/story/money/legal/2018/07/12/nearly-4-7-billion... जॉन्सन अँड जॉन्सन वर अमेरिकेत चाललेली केस कंपनी हरली , 22 महिलांनी केस ठोकली होती त्यातील 6 महिला कॅन्सर ने मरण पावल्या . बेबी पावडर मधील ऍसबेस्टस मूळे आपल्याला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा त्यांनी ठोकला होता . प्रश्न असा उपस्थित होतो की त्या कम्पनी ची ती पावडर आपल्या इथे एसबेस्टस शिवाय आहे का ?
का आपल्या इथे मरण स्वस्त असल्या मूळे कॉस्मेस्टीक , औषधे , खाद्यपदार्थ ची गुणवत्ता कशी ही चालते ?

माहितगार's picture

14 Jul 2018 - 12:28 pm | माहितगार

...आपल्या इथे मरण स्वस्त असल्या मूळे...

भोपाळ वायू दुर्घटना माहित आहे ना ! आपण वापरलेले शब्द वस्तुनिष्ठ आहेत, बाकी काही नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2018 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

ऐकावे ते नवलच !

Taking page out of BJP book? Congress, CPM turn to Ramayana in Kerala

"राम आस्तिवात नव्हता व रामायण केवळ काल्पनिक कथा आहे", "रामसेतू रामाने बांधला या कल्पनेला कोणताही आधार नाही", इत्यादी दावे खुद्द सर्वोच्च न्यायालयात करणारी भारतिय रष्ट्रिय काँग्रेस आणि "देव-धर्माची कल्पना अफूची गोळी आहे" हे मूलभूत तत्व बाळगणारा नास्तिक कम्युनिस्ट पक्ष (CPM), हे दोन पक्ष केरळमध्ये रामायणासंबंधीच्या उत्सवात एकमेकावर कुरघोडी करू लागले आहेत !!!

"हा तमाशा निवडणूकांकडे लक्ष ठेऊन चाललेला आहे. हे ध्यानात येणार नाही इतके लोक मूर्ख आहेत" असा राजकारण्यांचा समज आहे असे दिसत आहे !

माहितगार's picture

14 Jul 2018 - 2:20 pm | माहितगार

कम्युनीस्ट नॅरेटीव्ह वेगळा लेफ्टीस्टच राहील

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Jul 2018 - 9:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

?

सोमनाथ खांदवे's picture

15 Jul 2018 - 6:59 am | सोमनाथ खांदवे

MT: 'सेक्रेड गेम्स'चा वाद; राहुल गांधींनी सोडलं मौन
http://mtonline.in/zEHAzb/dga via @mataonline: http://app.mtmobile.in
वाद सेक्रेड गेम बद्दल चा , हल्ला भाजप आणि rss वर तोही ट्विटर वर करून का तर पत्रकार परिषद मध्ये बोलताना पचका होतो .

डेव्हिड कोलमन हेडली उपाख्य दाऊद सईद गिलानी हा २६/११ साठी अमेरिकेतल्या शिकागो तुरुंगात शिक्षा भोगत असतांना त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

अधिक बातमी : https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news...

बहुधा मोदींनी २६/११ ची अंडीपिल्ली बाहेर काढायला सुरुवात केलेली दिसतेय.

-गा.पै.

माहितगार's picture

24 Jul 2018 - 9:41 pm | माहितगार

आपल्या शेवटच्या वाक्यातून आपण नेमके काय म्हणू इच्छिताय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jul 2018 - 12:05 am | डॉ सुहास म्हात्रे

परदेशात कायमचे राहण्याचे सर्व उपाय थकल्यावर आता मल्ल्याभाऊ भारतात परत येऊन सर्व देणी परत करण्याची भाषा करू लागले आहेत !!!

https://timesofindia.indiatimes.com/india/vijay-mallya-in-talks-to-retur...

सोमनाथ खांदवे's picture

25 Jul 2018 - 5:54 am | सोमनाथ खांदवे

मल्ल्या कर्ज बुडवून पळून गेल्या मूळे कित्तेक देशभक्तांनी किंगफिशर च्या बियर पिणे बंद केले होते , आता ते लोक्स पुन्हा स्वाद घेऊ शकतील .

माहितगार's picture

27 Jul 2018 - 9:30 am | माहितगार

गूड जॉब इन बीइंग सलेक्टीव्ह , ,

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2018 - 1:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

इतर छोट्यामोठ्या गोष्टींचा सोईस्कर गवगवा करणार्‍या तथाकथित लोकप्रिय माध्यमांच्या आणि तथाकथित पुरोगाम्यांच्या नजरेतून अश्या अनेक गोष्टी निसटल्या, याचे आश्चर्य वाटावे काय ?!

खुद्द सुप्रिम कोर्टाने शेरा मारल्यावरही ही बातमी इतर बातम्यांच्या भाऊगर्दीत बुडालेली आहे...

https://timesofindia.indiatimes.com/india/what-is-happening-in-kerala-pr...

ही व्हिडिओ क्लिप, एक अग्रणी व तथाकथित पुरोगामी माध्यम कसे दिशाभूल करते याची अनेक उदाहरणे सबळ पुराव्यासह देते (युट्युबवरून साभार)...

भारतिय माध्यमे दिवसेदिवस जास्त जास्त अविश्वासू बनत चालली आहे, दुर्दैवाने ! :(

यश राज's picture

27 Jul 2018 - 4:01 pm | यश राज

भारतिय माध्यमे दिवसेदिवस जास्त जास्त अविश्वासू बनत चालली आहे, दुर्दैवाने ! :(

खुपच नालायकपणा आहे हा.. या भांड मिडीयाकडून अजून काय अपेक्शा करणार..

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jul 2018 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे

वरचा प्रतिसाद लिहिला आणि आजच व्हॉट्सअ‍ॅपवरून खालील कविता आली (कवीचे नाव लिहिलेले नव्हते)...

जात कळली नव्हती

चौकातील पुतळा थोडा तुटला होता
जरासा फुटला होता..
झाली होती त्याची विटंबना
मोर्चेकरीही तयार होते..
दंग्यांची मात्र सुरुवात झाली नव्हती
कारण अजूनही पुतळ्याची..
जात कळली नव्हती

बलात्कारी पीडिता किंचाळत होती
अत्याचाराचा न्याय मागत होती..
जनता नेहमी सारखच फक्त बघत होती
मदत करणारच होतो हो आम्ही..
पण अजूनही पीडितेची ..
जात कळली नव्हती

छळलं होत त्याला व्यवस्थेनं
म्हणून त्यानं आत्महत्या केली होती..
ठरतील आता त्याचे समर्थक-विरोधक
सोबत होईल राजकारणही
मग हि शांतता कसली..
कारण अजूनही मरणाऱ्याची ..
जात कळली नव्हती

वाचलेलं पुस्तक अन त्यातला गाभा
कळलेला इतिहास आणि त्यातले संदर्भ
खर मानाव कि खोट
तेच उमगत नव्हतं..
कारण अजूनही लिहिणाऱ्याची ..
जात कळली नव्हती

शेवटी एवढंच..
जात कळत नाही म्हणून
माणसं टाळू नका
जाती अंता साठी....
जात कळली नव्हती

आजच्या घडीची परिस्थिती पाहता, या कवितेत थोडीशी भर टाकून आपण असे म्हटले तर जास्त योग्य होईल...

आपल्याला हवी ती जात पकडून
प्रथम आपली पोळी भाजून घेऊ
नंतर सत्य विपरित निघाले तर
मिठाची गुळणी धरून बसू

आपले काम झाल्याशी कारण
लोकांची दिशाभूल झाली तर झाली
त्यांची आठवण कमकुवत असते
आपली तुम्बडी भरली की झाले

डँबिस००७'s picture

28 Jul 2018 - 6:05 pm | डँबिस००७

अकोला : गडकरींचा एक निर्णय आणि कमळगंगेला जीवदान"

गडकरीजींनी महामार्ग बांधत असताना रस्ते बांधायला लागणारी माती कमळगंगेच्या पात्रातुन काढुन वापरली ज्यामुळे कमळगंगेच पा त्र रुंद व खोल झाल !! अश्या प्रकारे कमळगंगेला पुर्नजीवित करण्यात यश आलेल आहे ,!
अकोला जिल्हा टँकर मुक्त झालेला आहे !!
https://youtu.be/hXKkQktIHyU

मार्मिक गोडसे's picture

28 Jul 2018 - 9:23 pm | मार्मिक गोडसे

असं out of box विचार करण्याची अक्कल मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना आली तर , मुंबई पुरमुक्त करणे फार कठीण नाही.

गामा पैलवान's picture

28 Jul 2018 - 9:30 pm | गामा पैलवान

मा.गो.,

मनपाच्या हातात अशी कितीशी सत्ता आहे? त्यातून आजूनही मुंबईच्या उरावर बसतेच आहे गर्दी. राज्य व केंद्र शासनांची काहीच जबाबदारी नाही?

आ.न.,
-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

29 Jul 2018 - 12:05 am | मार्मिक गोडसे

पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचते. भर घालून इमारती बांधल्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा येतो व सखल भागात पाणी साचते. ह्यावर उपाय म्हणजे प्रथम हे अडथळे काढून टाकावे लागतील, हे काम खर्चिक असल्याने महानगरपालिका करू शकणार नाही. पण महानगरपालिकेने अशा भागात विकासकांना पुनर्बांधकामास अमर्याद चटई क्षेत्र द्यावे, त्याबदल्यात पूर रेषेच्या वर बांधकाम, सांडपाण्याचा पुनर्वापर , बहुमजली पार्किंग, इमारतीपर्यंतचा (एलिव्हेटेड)रस्ता ई. विकासकाकडून करून घ्याव्यात.
गर्दी ही समस्या न होता बांधकाम क्षेत्रास लाभदायक ठरेल. महानगरपालिकेस अधिक कर मिळेल, त्याचा उपयोग सार्वजनिक वाहतूक अधिक कार्यक्षम करण्यास वापरता येईल. जलवाहतूकिसारखे कमी खर्चिक पर्यायही सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरता येतील. हे काम कठीण असले तरी अशक्य नाही.

ट्रम्प's picture

29 Jul 2018 - 8:04 am | ट्रम्प

पाच वर्षांखालील मुलींचा मृत्यूदर सर्वाधिक; मुलींबाबतचा भेदभाव कायम असल्याचे स्पष्ट
Updated: Jul 29 2018 01:27 a.m. | Written by लोकसत्ता टीम

|| शैलजा तिवले

मुलींबाबतचा भेदभाव कायम असल्याचे स्पष्ट; आहार, उपचारांकडे दुर्लक्ष

राज्यभरातील गावागावांत लेक वाचवा अभियान राबविले गेले असले तरी पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूदरामध्ये मुलींच्या मृत्यूचे प्रमाण अद्यापही अधिक असल्याचे २०१६च्या नमुना नोंदणी अहवालावरून (सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम) समोर येत आहे. तसेच २०१३ नंतर मुलींच्या जन्मदराचे प्रमाणही घसरत असून २०१६ मध्ये ते ८७६ पर्यंत खाली आल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.

असे अहवाल प्रत्येक 2 / 3 वर्षांनीं प्रसिद्ध केले जातात , सरकार ने लिंग निदान चाचण्या वर बंदी घालून सुद्धा मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे .
असे असताना भिडे गुरुजी सारख्या जाणता माणसाने ' आंबे खाऊन मुलगे होतात ' अस वक्तव्य केले .
त्या नंतर ' अर्धवट व्हिडिओ आहे , त्यांनी अस म्हटलेच नाही , नीट ऐकू येत नाही ' असे वकिली मुद्दे मांडुन त्यांच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ समस्त ब्रह्मवर्ग आंतरजालावर उतरतो काय हे सगळ अनाकलनीय आहे .
तेच वक्तव्य जर आंबेडकर , आठवले , पवार ,राणे यांच्या पैकी कोणाचे असते तर ब्रह्मवर्गाने हेच मतप्रदर्शन केले असते का ?
जातीव्यवस्थे च्या उतरंडी मध्ये वरच्या मानाच्या स्थानी असलेल्या वर्गाकडून ही अपेक्षा नव्हती . त्या वक्तव्या बद्दल सडेतोड विचार मांडले गेले असते तर ब्रह्मवर्गा बद्दल असलेला दुषित पूर्वग्रह ( इति - आदित्य कोरडे ) कमी होण्यास मदत झाली असती .

भाजप च हे दिसून येणारे काम पण मीडिया याच कौतुक न करता त्या 40 लाख लोकांच्या वेदना छापत बसणार , या बेकायदेशीर लोकांमूळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते पण मीडिया ला त्याच्या शी घेणेदेणे काय ? या विषयांवर काँग्रेस ची अवस्था धरलसोडलचावतय अशी झालेली दिसते .

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) मसुदा आज जाहीर झाला आहे. या यादीनुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर असून ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आसाममध्ये ३ कोटी २९ लाख ९१ हजार ३८४ लोकांनी वैधतेसाठी अर्ज केला होता. त्यातील ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना अवैध घोषित करण्यात आले आहे. कागदपत्रांची पुर्तता करू न शकणाऱ्या आणि नागरिकता सिद्ध न करू शकणाऱ्या या ४० लाख लोकांना अवैध घोषित करण्यात आलं आहे. दरम्यान, हा मसुदा अंतिम नसून ज्यांना त्यावर आक्षेप आहे, ते लोक तक्रार करू शकतात. ज्यांचं नाव या यादीत आलं नाही ते लोक पुन्हा अर्ज करून आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकतात, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं. दरम्यान, एनआरसीच्या या मसुद्यावर तृणमूल काँग्रेसने संसदेत स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. तर आरजेडीने यावर राजकारण होत असल्याचा आरोप केला आहे. 
सात जिल्ह्यात कलम १४४ लागू 

हा मसुदा जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सशस्त्र पोलिसांच्या २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी आदी जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.