✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आत्मताडनाची कविता.....

श — शिव कन्या, Sat, 04/21/2018 - 16:26
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी? कशासाठी? सुख टोचते राव तुम्हा लोकांना बिर्याणी खावी सर्वांगाने .....! बस्स, तेवढी एक आत्मताडनाची कविता लिहू नये.... -शिवकन्या

प्रतिक्रिया द्या
1435 वाचन

💬 प्रतिसाद (1)

ब्येस ! आत्म्ताडन शिलेक्टिव

गब्रिएल
Sun, 04/22/2018 - 20:54 नवीन
ब्येस ! आत्म्ताडन शिलेक्टिव का काय त्ये म्हंत्यात ना त्ये आसू नये, बास. नाय्तर त्येला येगळास बास येतोय बगा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा