✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उपकार इंग्रजांचे

आ
आशु जोग यांनी
Wed, 04/18/2018 - 10:11  ·  लेख
लेख
इंग्रजांनी या देशाला गुलाम केले. ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा इंग्रजांनी काही चांगल्या, वरदान म्हणाव्यात अशा गोष्टी भारताला दिल्या. त्यातली एक म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी भाषेमुळे आपल्याला जगाचे दरवाजे खुले झाले. इंग्रज या देशातून जाऊन आता 70 वर्षे झाली पण त्यांची इंग्रजी भाषा आणि तिची उपयुक्तता मात्र आम्ही विसरलेलो नाही. त्यामुळे आजही अनेक मराठी पालक आपल्या मुलांना आवर्जून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच घालतात. ashutoshjog@yahoo.com घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात. इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत ! निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये. ashutoshjog@yahoo.com
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
36415 वाचन

💬 प्रतिसाद (78)

प्रतिक्रिया

आपण विंग्रजी समजून सुद्धा

manguu@mail.com
Fri, 04/20/2018 - 07:55 नवीन
आपण विंग्रजी समजून सुद्धा दळिद्री का आहोत ? जर इंग्रजी येऊनही दळिद्री तर मराठी येऊनही दळिद्रीच ना ? विनाकारण इंग्रजीवर का ढकलायचे ?
  • Log in or register to post comments

+1

विशुमित
Fri, 04/20/2018 - 10:57 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

लेखात आपल्या मराठीच्या

sagarpdy
Fri, 04/20/2018 - 11:11 नवीन
लेखात आपल्या मराठीच्या निर्मात्यांचे उपकार मानण्या/न मानण्याचा विषय आहे का ? इंग्रजी आली म्हणून आम्ही अधिक उपयुक्त झालो असा मुद्दा आहे. (बाकी तुम्हाला मराठी भाषेतून "inference" समजत नसावा असे लक्षात येते) पुढील विषय मांडा : इंग्रजी येतेय म्हणून इथे तरी आलो, तीही न येती तर याहून वाईट गरिबीत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

....

श्वेता२४
Fri, 04/20/2018 - 11:15 नवीन
घरात बोलायला, गप्पा मारायला वगैरे मराठी ठीक आहे पण शिक्षणासाठी माध्यम म्हणून इंग्रजीच ! अनेक पालक मुलांना मराठी साहित्याची घरच्या घरीच ओळख करून देतात पण माध्यमाचा दर्जा मात्र इंग्रजीलाच देतात. इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत ! निदान या बाबतीतले इंग्रजांचे उपकार तरी आपण विसरता कामा नये. यामधून निघणारा इन्फरन्स इंग्रजी येतेय म्हणून इथे तरी आलो, तीही न येती तर याहून वाईट गरिबीत असतो. हा आहे असं वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

एखाद्या गोष्टीबद्दल उपकार

sagarpdy
Fri, 04/20/2018 - 11:25 नवीन
एखाद्या गोष्टीबद्दल उपकार मानायचे असतील तर ती गोष्ट न मिळती तर आताच्या परिस्थितीपेक्षा वाईट परिस्थितीत असतो असा माझा तर्क चालतो बा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

उपकार तेव्हा मानले असते

श्वेता२४
Fri, 04/20/2018 - 12:01 नवीन
जर भारतीयांना स्वतला इंग्रजी शिक्षणाची गरज असती व इंग्रजांनीही उदारपणे स्वत आर्थिक झळ सोसून उदात्त हेतूने भारतीयांना शिक्षण दिले असते. तथापि ऐतिहासिक संदर्भ हेच सांगतात की इंग्रज मूळातच अत्यंत व्यावसायिक हेतूने भारतात आले आणि त्यानी राज्य केलं. त्यात कोणताही उपकाराचा भाव नव्हता निव्वळ स्वार्थीपणा होता.भारतीयांना शिक्षण देणे व तेही इंग्रजी भाषेतून ही निव्वळ इंग्रजांची सोय होती. हा उपकार एका बाबतीत इंग्रजांचे मी मानेन मात्र (हे उपरोधीक आहे) की त्यांनीच आमच्यावर राज्य केले, पोर्तूगीजांना त्यांनी देश पादाक्रांत करु दिला नाही. अन्यथा संपूर्ण भारताचा गोवा झाला असता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

संपूर्ण भारताचा गोवा झाला

sagarpdy
Fri, 04/20/2018 - 12:28 नवीन
संपूर्ण भारताचा गोवा झाला असता
म्हणजे स्वस्त पेट्रोल :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

स्वस्त बिअर??

विशुमित
Fri, 04/20/2018 - 14:22 नवीन
स्वस्त बिअर??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

काय कळ्ळे नै ...

manguu@mail.com
Mon, 04/23/2018 - 15:30 नवीन
आंबा लावणारा / विकणारासुद्धा व्यावसायिक कारणानेच लावत असतो. मग आंबा खाणार्याने आंब्याची स्तुती करायची की नाही ? मोघल अन इंग्रज स्वार्थासाठी राज्य चालवायचे , मग त्याच्यापुर्वीचे राजे लोकसेवा म्हणून राज्य चालवायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

मूळ आक्षेप उपकार या शब्दाला आहे

श्वेता२४
Mon, 04/23/2018 - 16:00 नवीन
जेव्हा दोन संस्कृती एकत्र येतात तेव्हा त्याच्या छटा एकमेकात मिसळणारच. त्याचप्रमाणे भाषा, वेशभूषा. खानपानसंस्कती, सणसमारंभ हे एकमेकांकडून आत्मसात केले जाणे स्वाभाविक आहे. त्यात उपकाराचा भाग काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

छान

manguu@mail.com
Mon, 04/23/2018 - 16:03 नवीन
इंग्रजांपुर्वीचे देशी राजे स्वत: झळ सोसून अन्न वस्त्र निवारा शिक्षण औषधोपचार जनतेला द्यायचे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

एक वेगळा मुद्दा

श्वेता२४
Fri, 04/20/2018 - 10:58 नवीन
एक वेगळा मुद्दा इथे मांडावासा वाटतोय आधुनिक भारताच्या इतिहासाचा जेवढा काही अभ्यास केलाय त्यावरुन माझं निरीक्षण मांडत आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये इंग्रजी भाषेची गरज सुरुवातीली इंग्रजांना व नंतर भारतीयांची गरज म्हणून प्रसार पावलीय. ब्रिटीशांना दोन गोष्टींसाठी मुख्यत्वे इंग्रजी भाषा भारतीयांवर लादण्याची आवश्यकता वाटली. 1) प्रशासनात भारतीयांना कारकून म्हणून सामावून घेणे 2) इंग्रजनिष्ठ भारतीयांचा वर्ग तयार करणे. त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे इंग्रजीकरण केले व सुरुवातीची भारतीय फळी इंग्रजी शिक्षण घेऊन बाहेर पडली. ही पिढी इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून होती परंतु त्यातील काहींना देशाच्या परिस्थितीची जाणिव झाल्यामुळे त्यांनी अधीक अधीकारांसाठी चळवळ सुरु केली(मवाळ कालखंड) याच काळात त्यांनी ब्रिटीशांच्या सासन व्यवस्थेचा अभ्यास केला, कायदेमंडळ, न्यायव्यवस्था, पत्रकारीता तसेच इतर देशांविषयीचे साहित्य यांच्याकरीता इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच स्वांतंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा भाग म्हणून समविचारी नेते एकत्र येत असताना इंग्रजी भाषेमुळे त्यांना आपापसात संवाद साधण ेअवघड गेले नाही. आपल्या देशाच्या भाषिक वैविध्यतेमुळे सर्वमान्य अशी एकही भाषा आजतागायत स्विकारली गेली नाही. तसेच इंग्रजी भाषेला पर्यायी भाषा म्हणून देशी भाषा समृद्ध करण्यात आपण कमी पडलो. कारण ब्रिटीशांनी जी व्यवस्था उभी केली, त्याचे भाषिक देशीकरण करता आले नाही. आजही प्रशासनात काम करताना वापरण्यात येणारे शब्द मला बोजड व कृत्रिम वाटतात. त्यांचा सार्वजनिक उपयोग वाढवला पाहिजे असे वाटते. अंतीमत एवढेच नमुद करेन की ब्रिटीशांची इंग्रजी भाषा उपकार वगैरे नाही ती गरज म्हणून प्रसार पावली आणि आता अविभाज्य भाग झाली. आपण जेवढी स्वतची भाषा समृद्ध करु, नवीन येणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधून त्यांचा बोलीभाषेमध्ये जास्तीत जास्त वापर करु तेवढी बाषा समृद्ध होत जाईल. बाकी मुलांना इंग्रजी शाळेत घालावे या मताशी मीही सहमत नाही. परंतु मराठीइतकीच इंग्रजी भाषादेखील आली पाहिजे कारण ती काळाची गरज आहे. इतकेच नव्हे तर आता मी अशा मताची आहे की मुलांना मराठी, हिंदी, संंस्कृत, इंग्रजी याचबरोबर एक दक्षिणात्य भाषा त एक आंतरराष्ट्रीय भाषा (जपानी, फ्रेंच, जर्मनी इ.) आल्या तर त्यांचे जगात कुठे अडणार नाही.
  • Log in or register to post comments

शिक्षणात अधिक भाषा जोडण्याचा

माहितगार
Sat, 04/21/2018 - 13:08 नवीन
शिक्षणात अधिक भाषा जोडण्याचा श्वेता यांचा मुद्दा योग्य आहे . (गुगल सीईओ एकमेकांच्या भाषेतील रिअल टाइम विश्वासार्ह संवाद आणि व्यवहार येत्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहज शक्य होईल म्हणतो , असे तंत्रज्ञानावर युरोमेरिका संशोधन आणि नियंत्रण ठेवेल रडके भारतीय शक्य नाही म्हणून बालिश तांत्रम किंवा न्यूनगंडाच्या कोशात झोपलेले असतील ) अर्थात कोणत्याही तंत्रज्ञान शिवाय लो . टिळकांची आणि इतरही अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणाचे अनुवाद भारतातील सर्व भाषांतून वितरित केले जात ते स्मितीत करणारे होते . एका भारतीय भाषेतून दुसऱ्या भारतीय भाषेत अनुवाद करताना तिसऱ्या खासकरून परकीय भाषांचा आधार फारसा घ्यावा लागत नसे . आजच्या काळा वरून आपल्या आधीच्या पिढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आपापसातील संवादासाठी सरसकट इंग्रजीवर अवलंबून असत हा निष्कर्ष अन्याय कारक आहे . हिंदीत चुक होऊ नये म्हणून टिळकांनी इंग्रजी वापरली अशी उदाहरणे आहेत पण खूपशी नाही . त्यावेळी हिंदी आणि संस्कृत द्वेष टोकाला पोहोचलेला नसावा . इसवीसनाच्या आधी अनेक शतके भारतातील अध्यात्मिक विचारांची असो देवाण घेवाण असो कि व्यापार असो अडसर आले नाही . आपल्या देशाच्या भाषिक वैविध्यतेमुळे सर्वमान्य अशी एकही भाषा आजतागायत स्विकारली गेली नाही. तसेच इंग्रजी भाषेला पर्यायी भाषा म्हणून देशी भाषा समृद्ध करण्यात आपण कमी पडलो. कारण ब्रिटीशांनी जी व्यवस्था उभी केली, त्याचे भाषिक देशीकरण करता आले नाही. प्रत्येक भारतीयाने दुसऱ्या भाषिक प्रदेशात स्थानांतरित होऊन गेल्यावर तीन वर्षात तेथील स्थानिक भाषा शक्यतोवर आत्मसात करावी आणि हिंदी सुद्धा आंतरराज्यीय संवाद भाषा म्हणून स्वीकारावी असे विसाव्या शतकाच्या मध्यातील हिंदी भाषेचे एक मुख्य गांधी वादी प्रचारक काका कालेलकर यांचे मत होते . सोबत त्रिभाषा सूत्रानुसार शाळेत इंग्रजी शिवाय दोन भारतीय भाषा शिकवल्या जाव्यात हे अभिप्रेत होते त्या नुसार हिंदी भाषी राज्यातील शाळांनी भारतातील विविध भाषा शिक्षणासाठी वाटून घेणे अभिप्रेत होते ते ना करताच हिंदीचा डंका पिटण्याचा प्रयत्न हिंदी विषयक धोरणा बाबत इतर राज्यात राजकीय साशंकतेस कारणी भूत झाला तर पूर्वोत्तर राज्ये आणि तामिळनाडूतील संकुचित भूमिकांचे यथोचित खंडणास हिंदी प्रेमी नेतृत्व कमी पडले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

माहितगार

श्वेता२४
Sat, 04/21/2018 - 13:49 नवीन
आजच्या काळा वरून आपल्या आधीच्या पिढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आपापसातील संवादासाठी सरसकट इंग्रजीवर अवलंबून असत हा निष्कर्ष अन्याय कारक आहे कृपया मी असा काही निष्कर्ष काढला नाही. तसेच स्वांतंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा भाग म्हणून समविचारी नेते एकत्र येत असताना इंग्रजी भाषेमुळे त्यांना आपापसात संवाद साधण ेअवघड गेले नाही. हे मी असे ढोबळ विधान केले आहे कारण कुठेतरी वाचनात आलं होतं की सुरुवातील राष्ट्रीय स्तरावर इंग्रजी भाषेच्या प्रसारामुळे समविचारी नेते एकत्र येण्यास मदत झाली व इंग्रजीने अप्रत्यक्षरीत्या स्वातंत्र्यआंदोलन पसरवण्यास साहाय्यच झाले असा त्याचा काहीसा आशय होता. बाकी तुमच्या सर्व विचारांशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

इंग्रज नसते तर हिंदी (नि

arunjoshi123
Fri, 04/20/2018 - 14:19 नवीन
इंग्रज नसते तर हिंदी (नि कदाचित मराठी) हीच जगत्भाषा राहीली असती. पण इतका अँबिशिअस विचार करणं न्यूनगंडी मनांना शक्य नाही.
  • Log in or register to post comments

इंग्रज नसते तर हिंदी (नि

प्रसाद गोडबोले
Fri, 04/20/2018 - 20:06 नवीन
इंग्रज नसते तर हिंदी (नि कदाचित मराठी) हीच जगत्भाषा राहीली असती. जगत्भाषा लोल !! तुमचं जग इकडे कोथरुडला अन तिकडे सिंहगड रोडला पलीकडे हडपसर अन वाघोलीला संपतं का हो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

....तुमचं जग इकडे कोथरुडला अन

माहितगार
Sat, 04/21/2018 - 12:27 नवीन
....तुमचं जग इकडे कोथरुडला अन तिकडे सिंहगड रोडला पलीकडे हडपसर अन वाघोलीला संपतं का हो ?
मार्कस तुम्हाला नेमका कुणाला खिजवायचे आहे , अ. जो. पुणेरी नसूनही त्यांना पुणेरी म्हणून खिजवायचे आहे , की पुणेरी लोकांना ? पुणेरी नसलेल्यांनी मराठीचा बाणा वापरु नये असे थोडेच आहे ? उलट सध्या पुणेकरच न्युनगंडाने पछाडलेले नाहीत ना अशी शंका येते कधी कधी (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पेठा सोडून बाकीचाच भाग

माहितगार
Sat, 04/21/2018 - 12:29 नवीन
अर्च्चा हे लक्षातच आले नाही कि पुण्याच्या पेठा सोडून बाकीचाच भाग निवडलेला दिसतोय याचे गमक काय - अज्ञानी माहितगार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

जगावर राज्य भारतीयांचं राहिलं

arunjoshi123
Mon, 04/23/2018 - 16:10 नवीन
जगावर राज्य भारतीयांचं राहिलं असतं. (कधी काळी होतं देखील). त्या अर्थानं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

नाव घ्या नाव!

गामा पैलवान
Sat, 04/21/2018 - 13:13 नवीन
मंगूश्री,
इथले आकडी मिशीवाले , वाघावर पाय ठेवून उभे राहिलेले , फूल हुंगणारे वगैरे राजेम्हाराजे नेमके काय करत होते ?
सरळ नाव घ्या ना. उगीच आडवळणाने नको. लाजताय कशाला? ते तुमचा नवरा लागतात का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

नाव ?

manguu@mail.com
Mon, 04/23/2018 - 15:33 नवीन
नावासकट यादी करुन पिंडदान करायचे आहे का ? मी जी वर्णनं केली ती overall general आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

इतकी अफाट संख्या आहे?

गामा पैलवान
Mon, 04/23/2018 - 18:00 नवीन
तुमचे इतके नवरे आहेत हे नवंच कळलं. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

वाघ मंजे संभाजी राजे आठवतात.

arunjoshi123
Mon, 04/23/2018 - 16:12 नवीन
वाघ मंजे संभाजी राजे आठवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

इंग्रजीने देशाचा सर्वनाश केला

arunjoshi123
Mon, 04/23/2018 - 16:14 नवीन
इंग्रजीने देशाचा सर्वनाश केला आहे. किमान आता तरी इंग्रजीला समुद्रात बुडविली पाहिजे.
  • Log in or register to post comments

बुडवा...

manguu@mail.com
Mon, 04/23/2018 - 17:18 नवीन
लवकर बुडवा.. बर्फ वितळून पुण्यापर्यंत समुद्र येणार आहे. त्याच्या आत बुडवा , नैतर विनाकारण ग्लोबल वॉर्मिंगला क्रेडिट जाईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचे उपकार असा एखादा धागा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

अजून काय काय होईल?

arunjoshi123
Mon, 04/23/2018 - 17:41 नवीन
अजून काय काय होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

इंग्रजांनी बाकी कुठलेही

arunjoshi123
Mon, 04/23/2018 - 16:18 नवीन
इंग्रजांनी बाकी कुठलेही अन्याय केलेले असले तरीसुद्धा इंग्रजी भाषेचे माध्यम भारतीयांना देऊन आपल्यावर अनंत उपकार करुन ठेवलेले आहेत !
न्यूनगंडी लोकांसही लज्जा वाटेल इतकं न्यूनगंडी विधान आहे. एक तर इतर अन्यायांचा संदर्भ देऊ नये. त्यांची तीव्रता कमी होते. दुसरा इंग्रजांचा हेतू तसा (मंजे चांगला) नव्हता. -------------------- आणि सर्वात महत्त्वाचं मंजे इंग्रजीमुळे देशाची वाट लागली आहे. इथूनही पुढे लागत राहील.
  • Log in or register to post comments

इंग्रजांनी उपकार केले असे

उपेक्षित
Mon, 04/23/2018 - 20:12 नवीन
इंग्रजांनी उपकार केले असे म्हणणे म्हणजे लाचारीची हद्द झाली राव.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा