✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

प
पुंबा यांनी
Wed, 04/11/2018 - 21:07  ·  लेख
लेख
गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्‍याचदा अ‍ॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते. बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे: १. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल. २. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते. ३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते. ४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे. ५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये. तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः १. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्‍याच केसेसमध्ये तसेच असते. २. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्‍यापैकी गाजले आहे. संदर्भ ३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये. ४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच. ५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये. आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्‍या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का? या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच. १. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे २. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/ ३. क्वोरावर या विषयावर ढिगार्‍याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथे व इथे ४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
77448 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

धन्यवाद प्रचेतसजी. या गंभीर विषयावरील धाग्यावारचे समर्थन करणारे

टर्मीनेटर
Tue, 10/02/2018 - 21:26 नवीन
धन्यवाद प्रचेतसजी. या गंभीर विषयावरील धाग्यावारचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे सगळे प्रतिसाद वाचले. विरोधातले मुद्दे कळकळीने मांडणाऱ्यांच्या प्रतिसादांना लाईटली घेऊन , कित्येकांचे भविष्य अंधकारमय करण्याची ताकद असलेल्या गांजा सारख्या अमलीपदार्थाचे (गांजा हा अमली पदार्थच आहे) उदात्तीकरण करणारे प्रतिसाद वाचून तर धक्काच बसला. अगदी तुळशी वृंदावना सारखे गांजा वृंदावन असावे वगैरे सारखे प्रतिसाद तर कळसच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

विद्येचे माहेरघर कि विड चे माहेरघर!

अथांग आकाश
Wed, 10/03/2018 - 13:04 नवीन
विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची विड चे माहेरघर अशी नवीन ओळख तयार होत आहे हे वाचून खेद वाटला! या व्यासानासंबंधी गुलदस्त्यातली माहीती उघड केल्याबद्दल आभार!
दिशाहीन, विचारहीन, बुद्धिहीन, निस्तेज अशी नुसती हाडामासाची जिवंत पण त्यांना शहाणं म्हणावं का वेडं हा प्रश्न पडावा अशी बधीर भावी पिढी निर्माण होऊ द्यायची नसेल तर गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी असा आग्रह न धरता वा त्याचे समर्थन न करता उलट जेवढे लोक सद्यस्थितीत त्याच्या आहारी गेले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढणे जास्त गरजेचे आहे.
+१०० Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

टर्मिनेटरसाहेब, खुप कळकळीने

पुंबा
Wed, 10/03/2018 - 13:55 नवीन
टर्मिनेटरसाहेब, खुप कळकळीने लिहिलंयंत आपण. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

पुंबा जी, आभार तर तुमचे मानायला पाहिजेत, एवढ्या गंभीर विषयावर

टर्मीनेटर
गुरुवार, 10/04/2018 - 09:09 नवीन
पुंबा जी, आभार तर तुमचे मानायला पाहिजेत, एवढ्या गंभीर विषयावर धागा काढल्या बद्दल. माझ्या वाचनात तो उशिरा आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

+१०००

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/03/2018 - 14:29 नवीन
+१००० उत्तम चित्रदर्शी प्रतिसाद. छोट्या व नियंत्रित मात्रेत काही फायदेशीर (किंबहुना फायदेशीर वाटणारे) परिणाम असलेली अनेक रसायने आहेत. याचा आधार घेऊन त्यांचा उपयोग कायदेशीर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या अनेक लॉबीज आहेत... पण, वर वर काही कारणे दिली जात असली तरी त्यामागचा गुप्त हेतू (क्वचित अज्ञान व) बहुदा आर्थिक फायदा असतो हे सांगायला नकोच. कोणतीही सवय अथवा व्यसन (हॅबिच्युएशन ऑर अ‍ॅडिक्शन) लावणार्‍या गोष्टीच्या वापरावर नियंत्रण ठेवणे (काही अपवादात्मक व्यक्तींची उदाहरणे वगळता) शक्य नसते आणि तो वापर हाताबाहेर जाऊन जीवन बरबाद होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. अश्या गोष्टींचे समर्थन करताना ही वस्तूस्थिती विसरली जाते... किंबहुना, हितसंबंध राखण्यासाठी हेतूपुर्रसर लपविली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

_/\_

टर्मीनेटर
गुरुवार, 10/04/2018 - 09:11 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

नवज्योतसिंग सिद्दू ने

प्रसाद_१९८२
Tue, 10/02/2018 - 20:18 नवीन
नवज्योतसिंग सिद्दू ने पंजाबमधे अफूचे पिक घेणे, सरकारने कायदेशीर करावे अशी मागणी केली आहे. ---- हेरॉइनहून अफू बरी,कायदेशीर करा: सिद्धू
  • Log in or register to post comments

ह्या विनोद विराकडून आणखीन काय अपेक्षा करणार.

टर्मीनेटर
Tue, 10/02/2018 - 21:28 नवीन
ह्या विनोद विराकडून आणखीन काय अपेक्षा करणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा