Skip to main content

गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?

लेखक पुंबा यांनी बुधवार, 11/04/2018 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
गांजाचे व्यसन असणारी शरीराचे खोके झालेली, डोळे निस्तेज झालेली समाजाच्या निम्न स्तरातली मंडळी नेहमी दिसून येत, तेव्हा त्यांच्याविषयी अनुकंपा वाटत असे. समाजात नेहमीच त्यांची गांजाडा म्हणूनच संभावना होत असे, दारूड्यांपेक्षा वाईट प्रतीचे व्यसनाधीन म्हणून त्यांची घृणा केली जाई. मी लहानपणी 'लोकमत' या वृत्तपत्रात डॉ. कल्याण गंगवाल यांची ड्रग्जचे दुष्परीणाम सांगणारी एक लेखमालिका वाचली होती, तीतदेखिल गांजाचे भरपूर दुष्परीणाम सांगितले होते, जे वाचून अंगावर काटा आल्याचे आठवते. आता मात्र ऑफिसमधील कलिग्ज किंवा कॉलेजमधले मित्र यांच्याकडून गांजाविषयी निराळीच माहिती समजते. एक तर ह्या सगळ्याच लोकांत गांजा हे निरूपद्रवी व्यसन असल्याबद्दल खात्री आहे. ह्यांच्या तब्येतीवर किंवा कार्यक्षमतेवर कुठला वाईट परीणाम झाल्याचे दिसत नाही. (माझा सँपल सेट खुप छोटा आहे याची जाणीव निश्चित आहे.) अमेरिकेत झालेल्या संशोधनाचा किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गांजाच्या सुरक्षीत आणि अंमली पदार्थ नसण्याबद्दलच्या रिपोर्टचा(संदर्भ) हवाला देत ते भारतात गांजा कायदेशीररीत्या उपलब्ध असावा अशी मागणी करत असतात. अमेरिकेत ९ राज्यांत डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गांजा सेवन करण्याची परवानगी २१ वर्षांपुढील व्यक्तिस आहे. २९ राज्यात मेडिकल प्रिस्क्रिप्शन असेल तर गांजा मिळू शकतो. पॉप्युलर कल्चरमधूनदेखिल गांजा सेवन केल्याचे उल्लेख(एआयबी किंवा टिव्हीएफच्या वेबसीरीजमधून वगैरे) होताना दिसतात. गांजा बर्‍याचदा अ‍ॅंटी- एस्टॅब्लिशमेंटचे चिन्ह म्हणून देखिल मिरवले जाते. गांजा हे अगदीच निरूपद्रवी आणि व्यसन न लागू शकणारी वनस्पती आहे असे मत वैद्यकिय क्षेत्रात देखिल बहुसंख्य तज्ञांत आढळेल. मात्र मानसरोगतज्ञांत व मेंदूतज्ञातील काही वर्तुळात गांजाच्या दुष्परीणामांबद्दल भिन्न मते असल्याचे आढळते. इतर अंमली पदार्थांच्या सोबत गांजा असणे हे सिगारेट व दारू कंपन्यांचे कारस्थान असल्याचे बंदीविरोधकांचे म्हणणे दिसते. बंदीविरोधकांचे युक्तिवाद खालीलप्रमाणे: १. गांजामुळे उलट इतर अंमली पदार्थाकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल. २. सिगारेट ओढण्याचे किंवा तंबाखूचे दुष्परीणाम सर्वांसमोर आहेत, ते शास्त्रिय संशोधनातून सिद्ध देखिल झाले आहेत. तंबाखू सेवनाने ७० लाखांहून अधिक व्यक्ति एका वर्षात मरतात(स्रोतः वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) मात्र तरीही तंबाखुवर बंदी नाही मात्र गांजाच्या थेट सेवनामुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण नसतानासुद्धा गांजावर बंदी हे तंबाखू लॉबीचे कारस्थान आहे. तसेच दारूमुळे झालेल्या मृत्यूंशी देखिल तुलना केली जाते. ३. बंदी असूनसुद्धा नार्कोटिक्स डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थाचे व्यापारी-स्मगलर्स यांच्या संगनमताने भारतात निर्धोकपणे गांजा मिळतो. मात्र त्याचे पैसे दहशतवादी व समाजविरोधी तत्वांना मनी लाऊंडरींगस्वारे मिळतात. एक नगदी पिक जे शेतकर्‍यांना बरेचसे उत्पादन मिळवून देऊ शकते त्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवले जाते. ४. भारतात गांजाच्या परीणामांवर फारसे सम्शोधन न होताच बंदी घातली गेली आहे. जे अन्याय्य आहे. ५. टिपिकल लिबर्टेरियन युक्तिवादः लोकांच्या वैयक्तिक बाबीत जसे व्यसन ढवळाढवळ करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला असू नये. तर बंदी चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचे मुख्य युक्तिवाद खालीलप्रमाणे असतातः १. गांजा ही इतर अंमली पदार्थाच्या सेवनाची पहिली पायरी असू शकते. किंबहूना बर्‍याच केसेसमध्ये तसेच असते. २. गांजामुळे होणारे भास- भ्रम हे मेंदूला हानीकारक ठरतात असेदेखिल काही संशोधनात सिद्ध झाले आहे. मेंदूतील पेशी मरण्यासंबंधीचे संशोधन बर्‍यापैकी गाजले आहे. संदर्भ ३. अंमली पदार्थावर बंदी असणेच योग्य, खरे तर सिगारेट- दारूवरदेखिल बंदी असावी पण गांजावरील बंदी उठवू नये. ४. भारत आणि अमेरिकेत फरक आहे, तिथे मेडिकल मरियुवानाचे नियम्ट्रण व्यवस्थित होऊ शकते मात्र भारतातल्या भ्रष्ट व्यवस्थेत त्याची पायमल्लीच होईल. त्यामुळे परवानगी नकोच. ५. गांजा तंबाखूप्रमाणे प्रक्रिया करून मग सेवन करायचा नसतो, थेट वापरता येतो. अधिकृत परवानगी दिली तर किती मोठ्या प्रमणात गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढेल? शिवाय देशासाठी अतीमौल्यवान असणारे मनुष्यतास गांजाच्या नशेत वाया जातील त्यामुळे हे आजिबात करू नये. आणखी एक उपमुद्दा: सत्पुरूष, संत किंवा सदगुरू वगैरे म्हणून पुज्य असणार्‍या धार्मिक गुरूंच्या हातातील चिलिम हे गांजाच्या गौरवीकरणाचं उदाहरण वाटतं का? या विषयावर मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडतील. चर्चा गांजा व त्याचे उपप्रकार जसे भांग इत्यादीपर्यंतच मर्यादीत रहावी. शक्यतो राजकिय सुंदोपसुंदी टाळाच. १. या विषयावर द हिंदूत झालेला वादविवादः इथे २. गांजाविषयीची WHO वरील माहिती इथे: http://www.who.int/substance_abuse/facts/cannabis/en/ ३. क्वोरावर या विषयावर ढिगार्‍याने चर्चा झाल्या आहेत त्यातील महत्वाच्या चर्चा: इथेइथे ४. अमेरिकेतील गांजासंबंधी: इथे

वाचने 78093
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

Cannabis is the most common illicit drug used worldwide and it is used frequently by Canadian teenagers. Cannabis use during adolescence can cause functional and structural changes to the developing brain, leading to damage. Marijuana use in this age group is strongly linked to: cannabis dependence and other substance use disorders; the initiation and maintenance of tobacco smoking; an increased presence of mental illness, including depression, anxiety and psychosis; impaired neurological development and cognitive decline; and diminished school performance and lifetime achievement. Rates of acute medical care and hospitalization for younger children who have ingested cannabis unintentionally are increasing. Ongoing debate concerning cannabis regulation in Canada makes paying close attention to the evidence for its health effects and ensuring that appropriate safeguards are in place, vital public health priorities. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/29480902

Gone to Pot - A Review of the Association between Cannabis and Psychosis. Cannabis is the most commonly used illicit drug worldwide, with ~5 million daily users worldwide. Emerging evidence supports a number of associations between cannabis and psychosis/psychotic disorders, including schizophrenia. These associations-based on case-studies, surveys, epidemiological studies, and experimental studies indicate that cannabinoids can produce acute, transient effects; acute, persistent effects; and delayed, persistent effects that recapitulate the psychopathology and psychophysiology seen in schizophrenia. Acute exposure to both cannabis and synthetic cannabinoids (Spice/K2) can produce a full range of transient psychotomimetic symptoms, cognitive deficits, and psychophysiological abnormalities that bear a striking resemblance to symptoms of schizophrenia. In individuals with an established psychotic disorder, cannabinoids can exacerbate symptoms, trigger relapse, and have negative consequences on the course of the illness. Several factors appear to moderate these associations, including family history, genetic factors, history of childhood abuse, and the age at onset of cannabis use. Exposure to cannabinoids in adolescence confers a higher risk for psychosis outcomes in later life and the risk is dose-related. Individuals with polymorphisms of COMT and AKT1 genes may be at increased risk for psychotic disorders in association with cannabinoids, as are individuals with a family history of psychotic disorders or a history of childhood trauma. The relationship between cannabis and schizophrenia fulfills many but not all of the standard criteria for causality, including temporality, biological gradient, biological plausibility, experimental evidence, consistency, and coherence. At the present time, the evidence indicates that cannabis may be a component cause in the emergence of psychosis, and this warrants serious consideration from the point of view of public health policy. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/24904437

Cannabis use: a perspective in relation to the proposed UK drug-driving legislation. With regard to THC (Δ(9)-tetrahydrocannabinol), the main psychoactive constituent identified in the plant Cannabis sativa L, several facts are indisputable. Cannabis remains the most commonly used drug in the UK among those who reported driving under the influence of illegal drugs in the previous 12 months. There is a significant dose-related decrement in driving performance following cannabis use; raised blood THC concentrations are significantly associated with increased traffic crash and death risk. When cannabis and alcohol are detected together, there is a greater risk to road safety than when either drug is used alone. Patterns of use are important when interpreting blood concentration data: Smoking infrequently a single cannabis cigarette leads to peak plasma THC concentrations (21-267 µg/L) causing acute intoxication. In habitual, daily users, plasma THC concentrations range from 1.0 to 11.0 µg/L and are maintained by sequestration of the drug from the tissues. These facts undoubtedly make setting thresholds for drug-driving legislation difficult but there is clearly a case for cannabis. Determining minimum blood THC concentrations at which a driver becomes sufficiently impaired to be unable to safely drive a vehicle is of particular concern given the increasing medicinal use of the drug. Internationally legislation for driving under the influence of drugs (DUID) is based on either a proof of impairment or a per se approach. For the latter this can be either zero-tolerance or based on concentration limits such as those used for alcohol. The different approaches are considered against current scientific evidence. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/24327278

When cannabis and alcohol are detected together, there is a greater risk to road safety than when either drug is used alone. गांजाचे समर्थन करणाऱ्यांनो अजूनही विचार करा.

गांजाच्या उपयोगांवर पतंजली आयुर्वेद करणार संशोधन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या खासदारांची गांजा कायदेशीर करावा ही मागणी राजीव गांधी सरकारच्या अगोदर भारतात गांजा बेकायदेशीर नव्हता म्हणे, नंतर त्यांच्याकाळात अमेरिकन दबावाखाली गांजा बेकायदेशीर ठरला का? ,समकालीन राजकारण, पॉलिसी इत्यादींची माहिती असणार कोणीतरी काही सांगू शकेल का?

In reply to by जेम्स वांड

https://en.m.wikipedia.org/wiki/Cannabis_in_India भारतात cannabis वर इंग्रजकाळापासुनच बंदी आहे. फक्त काही राज्यात भांग अलाउड आहे . ( शिवरात्री , प्रसाद इ कारणांस्तव. )

In reply to by manguu@mail.com

मग सांगणारा गांजा पिऊन सांगत असेल!

खरंतर काल रात्रीच प्रतिसाद टंकायला घेतला होता, पण धाग्यावारचे सगळे प्रतिसाद वाचले नव्हते म्हणून आत्ता लिहितोय. तुमचा प्रश्न: गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का? माझे उत्तर: नाही. गांजाला भारतातच काय तर जगात कुठेही कायदेशीर मान्यता मिळू नये. वरील उत्तर हे माझं वैयक्तिक मत असले तरी ते कुठलेही आदर्शवादी लेखन, बातम्या किंवा माहिती वगैरे वाचून बनलेले नसून काही निकटवर्तीयांनी भोगलेल्या वा भोगत असलेले गांजासेवनाचे दुष्परिणाम प्रत्यक्ष बघून बनलेले आहे. २० एप्रिल २०१८ ला एका शाळू सोबत्याचा गांजाच्या अतिसेवनाने ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यूही झाला आहे. काहीवर्षांपुर्वी पर्यंत गावखेड्यांमध्ये, शहरात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये आणि जेल मध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांपुरते मर्यादित असलेले हे व्यसन पुढे पुढे इंटरनेटवर अंत्यंत पद्धतशीरपणे गांजाचे ग्लोरीफिकेशन करून त्याचे मार्केटिंग करत करत आज जवळपास सगळ्याच शहरांमधल्या शाळा, कॉलेजच्या गेट पर्यंत पोचले आहे. पुण्यात देशाच्या विविध भागांतून आणि विदेशातून मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणेच गांजा पिणाऱ्या/ओढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील देशात सर्वात जास्त झाली आहे. मागच्या वर्षी बिबवेवाडी मधील एका हॉस्पिटल मध्ये माझा भाचा टायफॉइड झाल्याने ॲडमिट होता. त्यावेळी मला तीन दिवस हॉस्पिटल मध्ये थांबायला लागले होते. आठ दिवसांपासून ICCU मध्ये उपचार घेत असलेल्या एका विद्यार्थी रुग्णाला अतिदक्षता विभागातून बाहेर काढून सेमी स्पेशल वॉर्ड मध्ये भाच्याच्या शेजारच्या बेडवर हलवण्यात आले. वीस-एकवीस वर्षाच्या त्या रुग्णाच्या कॉलेज मधील मित्र मैत्रिणींचा तिथे सतत राबता होता. त्याचे आई वडील तिथे नसले कि त्यांच्यात ज्या गप्पा व्हायच्या त्या ऐकून हसावं का रडावं हेच समजत नव्हतं. त्यांचा सर्व ग्रुपच नाशेडी होता, अगदी मुली सुद्धा. सुरवातीचे दोन दिवस त्या मुलाला व्हेंटीलेटर वर ठेवले होते तेव्हाचे त्याचे नाका-तोंडात नळ्या घातलेल्या अवस्थेतले, सोशल मिडियावर शेअर केलेले त्याचे फोटो सवंगड्यांनी त्याला दाखवले तेव्हा "भेन्चोद ये मै है? ड्यूड आय लूक सो डिफरंट " हि त्याची प्रतिक्रिया ऐकून तर डोक्यात संतापाची तिडीकच उठली. नंतर डॉक्टरांशी बोलताना समजले कि त्याची इथे भरती होण्याची हि चौथी वेळ आहे, आधीच्या तीन वेळी एवढी गंभीर परिस्थिती नव्हती पण ह्यावेळी त्याने गांजा सोबत मेथ, एलएसडी वगैरेचे कॉम्बिनेशन ट्राय केले होते त्यामुळे कोमा मध्ये गेला असताना त्याला येथे दाखल केले होते. बाहेरून काही शारीरिक बदल जाणवत नाही, दारू सारखा वास येत नसल्याने घरच्यांना काही पत्ता लागत नाही असे अनेक फायदे(?) सांगून नवनवीन तरुणांना ह्या नशेकडे आकर्षित केले जाते. सुरुवात तुलनेने स्वस्त अशा गांजा भरलेली सिगरेट, चिलीम, बॉंग पासून करून मग हळूहळू किमतीने आणि नशेने जास्त असलेल्या ईतर अंमली पदार्थांकडे नकळत त्यांचा प्रवास सुरु होत जातो. कात्रजलगतच्या जांभूळवाडी येथे डोंगरावर असलेल्या माझ्या मित्राच्या 'हेल्प' नावाच्या व्यसनमुक्ती केंद्रात दोन तीन वेळा जाणे झाले आहे. तिथे उपचार घेणाऱ्या लोकांच्या कहाण्या पण मन हेलावून टाकणाऱ्या होत्या. (तिथे एकदा तुषार नातुंशीही भेट झाली होती.) गांजाच्या नियमित सेवनाने त्यतल्या THC ह्या घटकामुळे विचारशक्ती, स्मरणशक्ती आणि कार्यशक्ती वर गंभीर असे कायमस्वरूपी परिणाम होतात. 'गांजा पिये राजा' अशी एक जुनी म्हण देखील हिंदीत प्रचलित आहे. ज्याला स्वतःला कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायचे नसतात, बुद्धी वापरून कुठलेही काम करायचे नसते तसेच कुठलेही शारीरिक कष्टाचे काम करायचे नसते त्याचं लोकांनी गांजा सेवन करावे अशा अर्थाने ती वापरली जाते. गांजा पिताय म्हणजे तुम्ही राजा आहात असा अर्थ काढणे सर्वस्वी चुकीचे आहे. दिशाहीन, विचारहीन, बुद्धिहीन, निस्तेज अशी नुसती हाडामासाची जिवंत पण त्यांना शहाणं म्हणावं का वेडं हा प्रश्न पडावा अशी बधीर भावी पिढी निर्माण होऊ द्यायची नसेल तर गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी असा आग्रह न धरता वा त्याचे समर्थन न करता उलट जेवढे लोक सद्यस्थितीत त्याच्या आहारी गेले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढणे जास्त गरजेचे आहे. गम्मत म्हणून वा अनुभव घ्यावा म्हणून अशा प्रतिबंधित गोष्टींची नशा करणे, तिचे समर्थन करणे हा भाग वेगळा पण सगळ्यांनाच कुठे थांबायचे हे समजत नसल्याने आणि प्रत्येकाची नशा पेलण्याची शारीरिक व मानसिक क्षमता वेगवेगळी असल्याने त्याचे व्यसन लागण्याची शक्यता आणि परिणाम सहन करण्याची क्षमताही व्यक्तिगणिक वेगवेगळी असते हे विसरून चालणार नाही. दारू/सिगरेट/तंबाखू सेवन आता एवढे कॉमन झाले आहेत कि एक व्यसन म्हणून त्यांच्याकडे तेवढे गंभीरपणे बघितले जात नाही कि लपवले जात नाही. कुठलीही गोष्ट सिध्द करण्यासाठी पुरावा/डेटा मागितला जातो. परंतु गांजा आणि ईतर अंमली पदार्थांचे व्यसन असे आहे कि पालकांना आपला पाल्य ह्याच्या आहारी गेलाय हे माहित झाले तरी त्याची वाच्यता करणेही लज्जास्पद वाटते. आपल्या आजूबाजूला राहणारे कित्येक जण ह्यातून उद्भवलेल्या दुषपरिणामांवर हॉस्पिटलमधे अथवा ३० ते ४० दिवसांसाठी व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत असतात पण हि माहिती घरच्यांकडून लपवली जाते. समाजातली बदनामी टाळण्यासाठी पोलीस केस न होऊ देता प्रकरण दाबण्याकडे कल असतो. ऑफिस कडून मुलाबाळांच्या किंवा स्वतःच्या उपचारांवर झालेल्या वैद्यकीय खर्चाची रिएम्बर्समेंट मिळत असून सुद्धा मेडिकल रिपोर्ट वर कशासाठी उपचार घेतलेत त्याचा उल्लेख असल्याने ऑफिसमध्ये नाचक्की नको म्हणून अक्षरशः वीस पंचवीस हजारांपासून लाखभर रुपयांची हॉस्पिटलची बिलेही स्वखर्चाने भरली जातात. अशा तेरी भी चूप मेरी भी चूप प्रकारामुळे ह्या गंभीर व्यसनाची आणि त्याच्या दुष्परिणामांची खरी आकडेवारी/सांख्यिकी मिळणे अशक्य होऊन बसते. प्रतिसाद फारच लांबतोय याचे भान आल्याने आवरता घेतोय. सर्वच अनुभव लिहायचे म्हंटले तर लेखच होईल. पण सर्वच पालकांना विशेषकरून पुण्यातल्या पालकांना एक विनंती करतोय कि त्यांचा मुलगा वा मुलगी ह्या वाटेला गेला/गेली आहे का याची खात्री करून घ्या. दुर्दैवाने दारू सारखा उग्र वास येत नसल्याने ते सहसा चटकन लक्षात येत नाही पण सतत कुठ्यातरी तंद्रीत असणे, समोरचा काय बोलतोय किंवा विचारतोय ह्याचे नेहमीपेक्षा उशिराने आकलन होणे, डोळे थोडेसे लालसर, खोल गेलेले किंवा सतत विचारांत हरवलेली नजर ह्या लक्षणांवरून त्याचा अंदाज घेता येतो.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद प्रचेतसजी. या गंभीर विषयावरील धाग्यावारचे समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे सगळे प्रतिसाद वाचले. विरोधातले मुद्दे कळकळीने मांडणाऱ्यांच्या प्रतिसादांना लाईटली घेऊन , कित्येकांचे भविष्य अंधकारमय करण्याची ताकद असलेल्या गांजा सारख्या अमलीपदार्थाचे (गांजा हा अमली पदार्थच आहे) उदात्तीकरण करणारे प्रतिसाद वाचून तर धक्काच बसला. अगदी तुळशी वृंदावना सारखे गांजा वृंदावन असावे वगैरे सारखे प्रतिसाद तर कळसच.

In reply to by टर्मीनेटर

विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याची विड चे माहेरघर अशी नवीन ओळख तयार होत आहे हे वाचून खेद वाटला! या व्यासानासंबंधी गुलदस्त्यातली माहीती उघड केल्याबद्दल आभार!
दिशाहीन, विचारहीन, बुद्धिहीन, निस्तेज अशी नुसती हाडामासाची जिवंत पण त्यांना शहाणं म्हणावं का वेडं हा प्रश्न पडावा अशी बधीर भावी पिढी निर्माण होऊ द्यायची नसेल तर गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी असा आग्रह न धरता वा त्याचे समर्थन न करता उलट जेवढे लोक सद्यस्थितीत त्याच्या आहारी गेले आहेत त्यांना त्यातून बाहेर काढणे जास्त गरजेचे आहे.
+१०० .

In reply to by टर्मीनेटर

टर्मिनेटरसाहेब, खुप कळकळीने लिहिलंयंत आपण. धन्यवाद.

In reply to by पुंबा

पुंबा जी, आभार तर तुमचे मानायला पाहिजेत, एवढ्या गंभीर विषयावर धागा काढल्या बद्दल. माझ्या वाचनात तो उशिरा आला.

In reply to by टर्मीनेटर

+१००० उत्तम चित्रदर्शी प्रतिसाद. छोट्या व नियंत्रित मात्रेत काही फायदेशीर (किंबहुना फायदेशीर वाटणारे) परिणाम असलेली अनेक रसायने आहेत. याचा आधार घेऊन त्यांचा उपयोग कायदेशीर करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या अनेक लॉबीज आहेत... पण, वर वर काही कारणे दिली जात असली तरी त्यामागचा गुप्त हेतू (क्वचित अज्ञान व) बहुदा आर्थिक फायदा असतो हे सांगायला नकोच. कोणतीही सवय अथवा व्यसन (हॅबिच्युएशन ऑर अ‍ॅडिक्शन) लावणार्‍या गोष्टीच्या वापरावर नियंत्रण ठेवणे (काही अपवादात्मक व्यक्तींची उदाहरणे वगळता) शक्य नसते आणि तो वापर हाताबाहेर जाऊन जीवन बरबाद होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. अश्या गोष्टींचे समर्थन करताना ही वस्तूस्थिती विसरली जाते... किंबहुना, हितसंबंध राखण्यासाठी हेतूपुर्रसर लपविली जाते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

_/\_

नवज्योतसिंग सिद्दू ने पंजाबमधे अफूचे पिक घेणे, सरकारने कायदेशीर करावे अशी मागणी केली आहे. ---- हेरॉइनहून अफू बरी,कायदेशीर करा: सिद्धू