Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नर्मदेतला गोटा on Tue, 04/03/2018 - 15:37
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला. त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली. पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले. यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले. "बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले. हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले. ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले. यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले. हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो. सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते. या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्‍या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले. पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते. पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली. आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका. निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे. असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले. दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले. सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या. ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले. राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला. सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले. कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात. लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले. मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही. पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
  • Log in or register to post comments
  • 48091 views

प्रतिक्रिया

Submitted by आनन्दा on Tue, 04/03/2018 - 17:45

Permalink

अच्छा... असो.

अच्छा... असो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 04/03/2018 - 18:07

Permalink

एकच लंबर.

एकच लंबर. चला.......टीआरपीची सोय झाली. . जिओ मिपा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 04/03/2018 - 20:15

Permalink

अजान, दात ओठ, लव्ह जिहाद वगैरे

नगो, दोन विधानं महत्त्वाची वाटली. त्यांवर भाष्य करेन म्हणतो. १.
अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.
दातओठ कशाला खायचे? अजानचा आवाज मर्यादेत ठेवायची सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. २.
लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.
लव जिहाद खरा आहे हे केरळ उच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. असो. त्याचं काय आहे की न्यायालयाचे निर्णय फिरवण्यासाठी संसदेचा वापर करता येत नाही हे खरं दुखणं आहे. बाकी, हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट बिर्केट म्हणंत असाल तर लवकर जागे व्हा. हिंदुत्व जागतिक पातळीवर केंव्हाच पोहोचलं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/04/2018 - 00:08

In reply to अजान, दात ओठ, लव्ह जिहाद वगैरे by गामा पैलवान

Permalink

सहमत गामाजी.

सहमत गामाजी.
  • Log in or register to post comments

Submitted by नर्मदेतला गोटा on Wed, 09/26/2018 - 17:39

In reply to अजान, दात ओठ, लव्ह जिहाद वगैरे by गामा पैलवान

Permalink

हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट

हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट बिर्केट म्हणंत असाल तर लवकर जागे व्हा
ते कसे काय बुवा
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 09/27/2018 - 18:14

In reply to हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट by नर्मदेतला गोटा

Permalink

हिंदुत्वाचे मार्केट

नगो, वर लिहिलंय ना, की भारतातलं मार्केटबिर्केट विसरून जा. पूर्ण जग हे हिंदुत्वाचं मार्केट आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Tue, 04/03/2018 - 20:23

Permalink

आम्हाला कलहमुक्त भारत नको आहे

आम्हाला कलहमुक्त भारत नको आहे.मुक्त ची भाशा नको.युक्तची भाशा हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 04/04/2018 - 02:13

In reply to आम्हाला कलहमुक्त भारत नको आहे by प्रकाश घाटपांडे

Permalink

लोल =))))

लोल =))))
  • Log in or register to post comments

Submitted by साहना on Tue, 04/03/2018 - 22:49

Permalink

१. किती काळ सर्व गोष्टी साठी

१. किती काळ सर्व गोष्टी साठी साहेबाला जबाबदार धरणार ? मुस्लिम आणि हिंदू लोकांत कधीही प्रेम नव्हते आणि ते असणे शक्य सुद्धा नाही. जगाच्या पाठीवर कुठेही धार्मिक मुस्लिम इतर लोकांबरोबर सलोख्याने राहू शकत नाहीत. अमेरिका असो वा इंग्लंड सगळीकडे तीच परिस्थिती आहे. २. लव जिहाद १००% खरा आहे. लोणंद मध्ये सुद्धा ग्रूमिंग गँग्स द्वारे हे चालू आहे. (हिंदू मुलींच्या बलात्काराचे अनेक व्हिडीओ डार्क वेब वर विपुल प्रमाणात आहेत पण ते पाहण्याची आमच्या सारख्या लोकांची हिम्मत सुद्धा होणार नाही. त्यापेक्षा डोळे बंद करणे सोपे) ३. हिंदूंवर अन्याय होतोय हि गोष्ट १००% खरी आहे. भारतीय घटनेत हिंदू लोकांना इतर धर्मिया पेक्षा कमी अधिकार आहेत. शिक्षण संस्था चालविण्याचा अधिकार है एका विषयावर मी विपुल प्रमाणात लेखन केले आहे पण त्या शिवाय व्यवसायाचा अधिकार, आपले देऊळ चालविण्याचा अधिकार इत्यादी अनेक अधिकार हिंदू लोकांना नाहीत. ४. मोदी ह्यांची `हुनर हात` हि स्कीम पहा. फक्त मुस्लिम कारागिरांनाच ह्या स्कीम चा फायदा होतो. मला सांगा हिंदू गरीब कारागिरांनी काय घोडे मारले आहे हे त्यांना हि स्कीम मिळत नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Tue, 04/03/2018 - 23:20

In reply to १. किती काळ सर्व गोष्टी साठी by साहना

Permalink

हो का ?

मुसलमान ख्रिस्चन येऊन २००० च वर्षे झाली आहेत. त्याआधी टोळीयुद्धे - महायुद्धे होत नव्हती का ? http://pib.nic.in/newsite/PrintRelease.aspx?relid=176436 हुनर हात खास minority ministry कडूनच सुरु आहे. त्यामुळे ती त्यानाच दिली जाणार. इतरांसाठी make in India , stand up India वगैरे स्कीम आहेत ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/03/2018 - 23:32

In reply to १. किती काळ सर्व गोष्टी साठी by साहना

Permalink

>>> मुस्लिम आणि हिंदू लोकांत

>>> मुस्लिम आणि हिंदू लोकांत कधीही प्रेम नव्हते आणि ते असणे शक्य सुद्धा नाही. जगाच्या पाठीवर कुठेही धार्मिक मुस्लिम इतर लोकांबरोबर सलोख्याने राहू शकत नाहीत. अमेरिका असो वा इंग्लंड सगळीकडे तीच परिस्थिती आहे. + २० लाख >>> लव जिहाद १००% खरा आहे. लोणंद मध्ये सुद्धा ग्रूमिंग गँग्स द्वारे हे चालू आहे. (हिंदू मुलींच्या बलात्काराचे अनेक व्हिडीओ डार्क वेब वर विपुल प्रमाणात आहेत पण ते पाहण्याची आमच्या सारख्या लोकांची हिम्मत सुद्धा होणार नाही. त्यापेक्षा डोळे बंद करणे सोपे) + २० लाख
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/04/2018 - 00:04

Permalink

हिंदुत्व चौफेर उधळल्याने व

हिंदुत्व चौफेर उधळल्याने व भाजप एकामागे एक राज्य जिंकत असल्याने बिथरलेल्या एक नर्मदेतील (लाल) गोटा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 04/04/2018 - 00:07

Permalink

अनेकदा हिंदूंना डावलून

अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती. हेच मी उलट वाचलेलं मुस्लिमांना डावलून हिंदूंना झुकतं माप इंग्रजांनी दिलं. त्यामुळे मुस्लिम लीगची स्थापना झाली. आता कोण खरं बोलतय???☺️
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Wed, 04/04/2018 - 13:51

Permalink

शेक्युलर दिस्ताय राव तुमी आणि

शेक्युलर दिस्ताय राव तुमी आणि असणारच कारण हिंदू धर्मातच शेक्युलर च लै पीक आलया . का नावा परमाने लेख लिवलाय ?कांग्रेस ने गेली 60 वर्ष हिंदू समाजा ला कोपऱ्यात उभं केलं व्हत झाडू सारख म्हणून कदाचित गेल्या चार वर्षात हिंदुत्व वाल्यांचा थोडा बटबटीत पना वाढलाय. पप्पू , सोनिया , मणिशंकर , लालू , ममता , शरद , आझम , येडा दिग्विजय यांची गेल्या सात आठ वर्षातली मुक्ताफळ आनी त्यांचं मुस्लिम प्रेम जर तुमाला लक्षात असत तर तुमी एकेरी लेख लिवलाच नस्ता .
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 04/04/2018 - 14:31

In reply to शेक्युलर दिस्ताय राव तुमी आणि by सोमनाथ खांदवे

Permalink

अरे वाह्ह छान..!!

अरे वाह्ह छान..!!
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/04/2018 - 14:00

Permalink

हिंदुत्ववाद याची मुळात

हिंदुत्ववाद याची मुळात व्याख्याच माहित नसल्याने स्वतःची व्याख्या गृहीत धरून पूर्वग्रहाने लिहिलेला लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 04/04/2018 - 14:21

In reply to हिंदुत्ववाद याची मुळात by बिटाकाका

Permalink

तुमच्या कडे हिंदुत्ववादाची

तुमच्या कडे हिंदुत्ववादाची व्याख्या असली तर कृपया सांगता का? विषय समजून घ्यायला उपयोग होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/04/2018 - 15:37

In reply to तुमच्या कडे हिंदुत्ववादाची by विशुमित

Permalink

माझी सांगतो जमेल तसं, आधी

माझी सांगतो जमेल तसं, आधी एकदा लेखकाला विचारा कि तुमच्या वरच्या चिखलफेकीत हिंदुत्ववादी म्हणजे नेमके कोण. हिंदुत्ववाद्यांना अमुक झालं, तमुक झालं, अमुक केलं, तमुक केलं वगैरेत हिंदुत्ववादी म्हणजे नेहमीच्या ठराविक पाठिंबा असलेल्या संघटना कि हिंदू हा विचार मानणारे, हिंदू हा धर्म मानणारे वगैरे सगळे हे फंडामेंटल स्पष्ट झालं तरी पुरेसं!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 04/04/2018 - 15:44

In reply to माझी सांगतो जमेल तसं, आधी by बिटाकाका

Permalink

धागा लेखकाला लोक नर्मदेचा

धागा लेखकाला लोक नर्मदेचा गोटा ठरवून मोकळे झाले आहेत. त्यामुळे त्यांना हे प्रश्न विचारून माझे समाधान होणार नाही. मला वाटले तुमच्या कडे व्याख्या लगेच रेडी असेल, अशी फेकून माराल पण तुम्ही वेळ मारून नेताय असे वाटते. नसेल माहित परिपूर्ण व्याख्या तरी तसे सांगा, उगाच गोल गोल प्रश्न नका विचारत बसू.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/04/2018 - 16:13

In reply to धागा लेखकाला लोक नर्मदेचा by विशुमित

Permalink

थोडक्यात काय लोकांनी ठरवले

थोडक्यात काय लोकांनी ठरवले आणि तुम्ही मानले! व्वा! तुम्हाला पण तसेच मानायचे आहे का? नसेल मानायचे तर विचारायाला पाहिजे कि राव प्रश्न त्यांना. ========================== मी तुम्हाला काय वाटले याला जबाबदार नसून मी काय म्हटले याला जबाबदार आहे. शिवाय मी प्रश्न कसे विचारायचे हे मी ठरवतो, तुम्ही काय करायचे ते तुम्ही ठरवा! ========================== व्याख्या फेकून मारायची गरज पडते याचे आश्चर्य वाटते, एवढी उत्सुकता ताणली गेली होती तर नुसते गुगल मारले असते तरी उत्तर मिळाले असते. तरीपण तुम्ही विचारलेच आहे म्हणून माझे मत सांगतो. हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण. असे आचरण करणारे सगळे हिंदुत्ववादी असे या शब्दाच्या जन्मदात्यानींच सांगितलं आहे. आता अगदी सामान्य हिंदू देखील वरील गोष्टींपैकी काहीतरी करत असल्याने हिंदुत्ववादी बनतो असे मला वाटते. म्हणून मी वर म्हणालो कि लेखात हिंदुत्ववादी चिखलफेक नेमकी कोणावर चालली आहे, हिंदूंवर कि हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांवर?
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 04/04/2018 - 16:41

In reply to थोडक्यात काय लोकांनी ठरवले by बिटाकाका

Permalink

<<<शिवाय मी प्रश्न कसे

<<<शिवाय मी प्रश्न कसे विचारायचे हे मी ठरवतो, तुम्ही काय करायचे ते तुम्ही ठरवा!>> ==>> धागा लेखकाचे म्हणणे वाचले होतेच. पण तुम्हीच तर म्हणालात की धागा लेखकाला हिंदुत्वाद्याची व्याख्या समजलेली दिसत नाही, म्हणून तर तुम्हालाच थेट प्रश्न विचारला. त्यात एवढे आकांडतांडव करण्याचे कारण नव्हते. सरळ प्रश्न होता, सरळ उत्तर दिले असते तरी भागले असते. असो.. <<<व्याख्या फेकून मारायची गरज पडते याचे आश्चर्य वाटते, एवढी उत्सुकता ताणली गेली होती तर नुसते गुगल मारले असते तरी उत्तर मिळाले असते. >>> ==>> गुगलून उगाळून सगळी उत्तरे गोल गोल मिळतात. वाटले तुमच्याकडे काही ठोस माहिती/व्याख्या हाती लागली की काय ते पाहावे. तुम्हाला प्रश्न विचारलेला रुचले दिसत नाही. तसदी बदल क्षमस्व. <<< हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण. ==>> हे जरा विस्कटून सांगाल का ? (पुन्हा आगाऊ प्रश्नासाठी माफी) <<< असे आचरण करणारे सगळे हिंदुत्ववादी असे या शब्दाच्या जन्मदात्यानींच सांगितलं आहे>>> ==>> शब्दाचे जन्मदाते गुगलून पाहिले पण उत्तर सापडले नाही. कोण होते ते ? आणखी थोडी तसदी देतो. <<< म्हणून मी वर म्हणालो कि लेखात हिंदुत्ववादी चिखलफेक नेमकी कोणावर चालली आहे, हिंदूंवर कि हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांवर?>>> ==>> हिंदू म्हणा, की हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनां म्हणा याने फरक काय पडतो ? हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा दाखला देऊनच तर हे सगळे प्रकार चालू आहेत ना. तेच तर समजून घायचे होते, नेमके कोणाची बाजू नैतिकतेची आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 04/04/2018 - 16:57

In reply to <<<शिवाय मी प्रश्न कसे by विशुमित

Permalink

हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता,

हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण.
. विशुमितजीं जाऊ द्या, सन्माननीय बीटाकाका, आधी झाडांवर बाण मारणार, नंतर जाऊन, स्वतःच त्या रोवलेल्या बाणाभोवती वर्तुळे गिरवणार.. काय बोलणार मग आपण ? . निदान ह्यां काकानी "हिंदू" शब्दाचा उद्गम जरी सांगितला तरी धन्य _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 04/04/2018 - 17:13

In reply to हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, by पगला गजोधर

Permalink

प ग जी...

<<<विशुमितजीं जाऊ द्या...>> मी कुठे त्यांना पकडून ठेवले आहे? मी फक्त त्यांना अभिप्रेत असणारे लॉजिकल प्रश्न विचारले आहेत. ते पण भांडे वगैरे न लपवता. तुम्ही काळजी करू नका त्यांच्या कडून लॉजिकल प्रतिउत्तर अवश्य मिळतील याची मला खात्री आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/04/2018 - 17:18

In reply to हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, by पगला गजोधर

Permalink

तुम्ही दोघेही कुठल्याही

तुम्ही दोघेही कुठल्याही मुद्द्यावर बोलत नसून माझ्या वैयक्तिक मतांवर पिंका टाकायचे काम करत आहात असे माझे मत झाले आहे, त्यामुळे असोच. =========================== हिंदुत्व या शब्दाचा उगम कुणाचा आहे हे गुगलून मिळाले नै होय, शुभेच्छा! =========================== गजोधर साहेब, गृहीत धरा कि मला हिंदू (आणि लगेहाथ हिंदुत्व) शब्दाचा अर्थ ज्ञात नाही आणि माझ्या ज्ञानात वृद्धी करा. तुमच्या बाणांभोवती वर्तुळे मी मारतो तोपर्यंत, कसे?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 04/04/2018 - 17:24

In reply to तुम्ही दोघेही कुठल्याही by बिटाकाका

Permalink

"हिंदुत्व म्हणजे काय", ते

"हिंदुत्व म्हणजे काय", ते फक्त मलाच कळले आहे, असा दावा मी कधी केलाच नाही. त्यामुळे एखादा लेख हिंदू/हिंदुत्व विरोधी आहे/नाही हे कसे ठरवावे ? याबाबत उहापोह चालला आहे, असा माझा कयास होता (आपली पहिली प्रतिक्रिया पाहून, असो)
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/04/2018 - 17:31

In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर

Permalink

आपला कयास चुकीचा होता मालक!

आपला कयास चुकीचा होता मालक! लेख हिंदुत्वविरोधी आहे कि नाही याचा उहापोह करण्याची आवश्यकता भासतेय यातच सर्व आले. माझा मुद्दा हिंदुत्ववाद्यांचे काही ठराविक संघटनांच्या कृतीतून सरसकटीकरण याच्याभोवती होता. ================ तुम्हाला हिंदुत्व कळले नाही तर मी आधी बाण मारून मग वर्तुळ मारतोय असा आपला शेरा का होता हेही सांगून टाका लगेहाथ. मी तर फक्त त्या शब्दाकर्त्याचे म्हणणे (तेही माझ्या वैयक्तिक माहितीनुसार) मांडले. तुम्हाला पटले नाही किंवा वेगळे काही सांगायचे असेल तर तसे स्पष्टपणे लिहिणे अपेक्षित आहे, माझ्यावर वैयक्तिक हल्ला करणे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 04/04/2018 - 17:45

In reply to आपला कयास चुकीचा होता मालक! by बिटाकाका

Permalink

"हिंदुत्व म्हणजे काय", ते

"हिंदुत्व म्हणजे काय", ते फक्त मलाच कळले आहे, असा दावा मी कधी केलाच नाही.
याचा अर्थ, "मला हिंदुत्व कळलेच नाही", असा आपण केला असेल असे मला वाटले नव्हते. असो आपला पहिला प्रतिसाद ,
"हिंदुत्ववाद याची मुळात व्याख्याच माहित नसल्याने स्वतःची व्याख्या गृहीत धरून पूर्वग्रहाने लिहिलेला लेख!"
त्यावर विशुमितप्रमाणे माझाही समज झाला, की आपण धागा लेखकाला, हिंदुत्ववाद याची व्याख्या माहीत नसल्याचे प्रतिक्रियेतून दर्शवत आहात, तर कदाचित आपल्यास प्रमाण-व्याख्या माहिती असू शकेल, (की त्या प्रमाण व्याख्येशी लेखकाने पूर्वग्रहाने प्रतारणा करून, आपलीच वैयक्तिक मते लादली आहे , अशी आपली भावना झाली अशी माझी भावना झाली) तेव्हा हेही असो, आपली पुढील प्रतिक्रिया "हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा अभ्यास आणि आचरण. असे आचरण करणारे सगळे हिंदुत्ववादी असे या शब्दाच्या जन्मदात्यानींच सांगितलं आहे." त्यावर आपल्याला "हिंदू" शब्दाची जन्मदाता/दात्री माहिती असेल असे मत झाले, परंतु काहीही ठोस माहिती पुढे न आल्याने , निराशेत भर पडली... तेव्हा असोच....
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/04/2018 - 19:43

In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर

Permalink

परत वाचा, मी माझ्याबद्दल बोलत

परत वाचा, मी माझ्याबद्दल बोलत आहे. मी काय म्हणत आहे ते तुम्हाला कळले नाही, तर तो बाणाचा अकारण शेरा का असे मला म्हणायचे आहे. ------------------------------ मी मला माहित असलेली प्रमाण व्याख्या लिहिली आहे, ती वाचा, ती प्रमाण आहे की नाही तुम्ही ठरवा, नसेल प्रमाण वाटत तर तुमची सांगा. मग त्या प्रमाण व्याख्येत कोण कोण येतात ते सांगा, त्या त्या लोकांच्या संदर्भाने लेख पुन्हा वाचतो, कसे? ----------------------------- तुम्हाला त्या शब्दाचा जन्मदाता कोण आहे हे जाणून घेण्यात रस नाहीच आहे अशी माझी ठाम समजूत झालेली आहे. रस असता तर तो मुद्दा स्वतःहून काढणे अवघड नाही. उलटपक्षी मी हिंदू या शब्दाचा देखील जन्म सांगू शकणार नाही अशी आपली खात्री दिसते, त्यामुळे खरंच....असो!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 04/04/2018 - 17:49

In reply to आपला कयास चुकीचा होता मालक! by बिटाकाका

Permalink

<<<माझा मुद्दा

<<<माझा मुद्दा हिंदुत्ववाद्यांचे काही ठराविक संघटनांच्या कृतीतून सरसकटीकरण याच्याभोवती होता.>> ==>> पण ह्या संघटना हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा दाखल देऊन हे कृत्य करत आहेत. म्हणून हे नेमके काय गौडबंगाल आहे ते तुमच्याकडून चर्चेतून जाणून घेण्याचा प्रयत्न होता. १००% तुम्हाला सहमत होईलच असे समजण्याचे काही कारण नाही. फक्त विचाराच्या कक्षा रुंदावल्या गेल्या असत्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/04/2018 - 19:52

In reply to <<<माझा मुद्दा by विशुमित

Permalink

असे बघा, इस्लामच्या नावाखाली

असे बघा, इस्लामच्या नावाखाली दहशतवाद करणाऱ्या संघटनांच्या कृतीवरून सगळे इस्लाम ला मानणारे तसेच आहेत असे म्हणण्याइतकंच बेसलेस हिंदुत्ववादी संघटनांच्या (त्याही सगळ्या नाही) कृतीवरून हिंदुत्ववादाला नावे ठेवणे आहे. माझा मुद्दा न समाजण्याइतका क्लिष्ट नाही, हिंदुत्ववादाची व्याख्या सोयीस्करपणे वापरून सगळ्या हिंदुत्ववाद्यांना सरसकटिकरणाने झोडपणे चुकीचे आहे. बघा पटलं तर नाहीतर सोडून देऊ मुद्दा
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 04/05/2018 - 10:14

In reply to असे बघा, इस्लामच्या नावाखाली by बिटाकाका

Permalink

मी धागा पुन्हा एकदा वाचला.

मी धागा पुन्हा एकदा वाचला. त्यात लेखकाने कुठे सरसकटीकरण केलेले दिसले नाही. असेल तर दाखवून द्या. त्यांनी फक्त काही उदाहरणे दिली आहेत. त्यांचा आशय दिसतोय की ठिणगीपासून उत्पन्न झालेला वाद भडक्यामध्ये रूपांतरित होऊ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 04/05/2018 - 10:29

In reply to मी धागा पुन्हा एकदा वाचला. by विशुमित

Permalink

तुम्हाला माझा मुद्दा समजलेला

तुम्हाला माझा मुद्दा समजलेला नाहीये हे तुमच्या आधीच्या प्रतिसादातून दिसलेच होते, प्रतिसादाने नक्की झाले. ============================== हिंदुत्ववादी असे करतात, तसे करतात, हिंदुत्ववाद्यांना असे होते, तसे होते, हिंदुत्ववादी असे बिथरले तसे बिथरले वगैरे वाक्यांमध्ये हिंदुत्ववादी कोणते अपेक्षित आहेत एवढा साधा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसल्याकारणाने......तुम्ही लोड घेऊ नका, चिलॅक्स!!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 04/05/2018 - 10:42

In reply to तुम्हाला माझा मुद्दा समजलेला by बिटाकाका

Permalink

<<<तुम्हाला माझा मुद्दा

<<<तुम्हाला माझा मुद्दा समजलेला नाहीये हे तुमच्या आधीच्या प्रतिसादातून दिसलेच होते, प्रतिसादाने नक्की झाले.>>> ==>> काय आहे, तुमच्या ह्या प्रतिसादावरून तुम्ही खायचे एक आणि दाखवायचे दुसरे अशी पद्धतीने मिपावर वावरत असता अशी माझी पक्की समजूत/धारणा झाली/होत आहे. <<< हिंदुत्ववादी असे करतात, तसे करतात, हिंदुत्ववाद्यांना असे होते, तसे होते, हिंदुत्ववादी असे बिथरले तसे बिथरले वगैरे वाक्यांमध्ये हिंदुत्ववादी कोणते अपेक्षित आहेत एवढा साधा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसल्याकारणाने>>> ==>> ते ठीक आहे ना. समजले की सगळेच हिंदुत्वादी असे नसतात पण जे स्वतःला कथित हिंदुत्वादी समजत आहेत ते त्यांचे दुष्कार्य करायला तुमच्या व्याख्येतील हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याचा आधार घेत असतात. त्यामुळे स्वधर्माची काळजी वाटते. त्याबद्दलच तर धागालेखक तळमळीने सांगत आहेत. मोदींचे देखील त्यांनी उदाहरणे दिली आहेतच. <<<तुम्ही लोड घेऊ नका, चिलॅक्स!! ==>> हाहाहा, कोण कुणाला सांगताय लोड घेऊ नका म्हणून, लैच मज्जा!
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 04/05/2018 - 11:53

In reply to <<<तुम्हाला माझा मुद्दा by विशुमित

Permalink

काय आहे, तुमच्या ह्या

काय आहे, तुमच्या ह्या प्रतिसादावरून तुम्ही खायचे एक आणि दाखवायचे दुसरे अशी पद्धतीने मिपावर वावरत असता अशी माझी पक्की समजूत/धारणा झाली/होत आहे.
तुमचे दाखवायचे आणि खायचे दात एकाच असले तरी मला त्याचे काही सोयरसुतक असण्याचे कारण नाही. वैयक्तिक टिप्पण्या टाळणे लै अवघड नसते. म्हणून, वरील वैयक्तिक टिपण्णीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
पण जे स्वतःला कथित हिंदुत्वादी समजत आहेत ते त्यांचे दुष्कार्य करायला
याबद्दल वर माझं मत वर सांगितलं आहेच, बाकी तुमचा अट्टाहास चालू ठेवायला माझी काहीच हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 04/05/2018 - 12:12

In reply to काय आहे, तुमच्या ह्या by बिटाकाका

Permalink

<<<वैयक्तिक टिप्पण्या टाळणे

<<<वैयक्तिक टिप्पण्या टाळणे लै अवघड नसते. म्हणून, वरील वैयक्तिक टिपण्णीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!!>>> ==>> साहेब, मी पिंका टाकतो ही वैयक्तिक टिपणी नव्हती का ? http://www.misalpav.com/comment/989214#comment-989214 मला वाटते आपल्या दोघांची तू तू मैं मैं खरडवहीत झाली तर बरे होईल. इतर सदस्यांना आपला त्रास नको. ... <<<बाकी तुमचा अट्टाहास चालू ठेवायला माझी काहीच हरकत नाही.>>> ==>> तुमच्या कडून काही उत्तर मिळावे यासाठी मी कुठेही अट्टाहास केलेला नाही. फक्त जाता जाता हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याबद्दल सविस्तर लिहले असते तर हिंदुत्वाची व्याख्या व्यापक दृष्टीने समजली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 04/05/2018 - 12:58

In reply to <<<वैयक्तिक टिप्पण्या टाळणे by विशुमित

Permalink

साहेब, मी पिंका टाकतो ही

साहेब, मी पिंका टाकतो ही वैयक्तिक टिपणी नव्हती का ?
तुम्ही पिंका "टाकता" असे मी म्हणालो नसून तुम्ही वरील संदर्भात पिंका "टाकत आहात" असे मी म्हणालो आहे. हा तुमचा नेहमीचा उद्योग आहे असे मी म्हणालो नाही. इथे तुम्ही पिंक टाकत आहात याचा अर्थ विषयाशी धरून बोलत नाही आहात असा आहे. यात वैयक्तिक टिप्पणी काय आहे ते कळले नाही, त्यामुळे परत असो.
हिंदू सभ्यता, हिंदू सामाजिकता, हिंदू धार्मिकता आणि हिंदू इतिहास याबद्दल सविस्तर लिहले असते
मी लिहिलेले तुमच्यापर्यंत (आणि अनेकांपर्यंत, लेखनदोष समजा हवं तर) पोहोचत नाही असा माझा अनुभव आहे आणि तसेच मतही बनले असल्यामुळे मी लिहून काही उपयोग नाही हे उघड आहे. या विषयावरील काही चांगले लिखाण (इतरांचे) सुचवू शकतो वेळ मिळेल तसं, जमलं तर वाचून मत बनवा.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 04/05/2018 - 13:08

In reply to साहेब, मी पिंका टाकतो ही by बिटाकाका

Permalink

बरं ठीक आहे. तुमच्या वेळेचे

बरं ठीक आहे. तुमच्या वेळेचे गणित सांभाळून तुम्ही इतरांचे चांगले लिखाण सुचवू शकता.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 04/05/2018 - 10:28

In reply to असे बघा, इस्लामच्या नावाखाली by बिटाकाका

Permalink

इथे डांबिस जी नि त्यांच्या

इथे डांबिस जी नि त्यांच्या वैयत्तिक मतानुसार त्यांची हिंदूची व्याख्या सांगितली. कदाचित त्यांचे अनुभव बरोबर ही असतील. पण अशी व्याख्या तुम्हाला मान्य आहे का? का स्वमर्जीचे कारण देऊन त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार नाही आहात ? http://www.misalpav.com/comment/989238#comment-989238
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 04/05/2018 - 10:33

In reply to इथे डांबिस जी नि त्यांच्या by विशुमित

Permalink

मी माझी व्याख्या दिलेली

मी माझी व्याख्या दिलेली असताना सुद्धा अमुक कोणाची व्याख्या तुम्हाला मान्य आहे का वगैरे विचारणे हास्यास्पद आहे. मी तुम्ही म्हणता त्यांना प्रश्न विचारला का हे विचारण्याच्या आधी मी तुम्हाला लेखकाला विचारा अशी विनंती केली होती तिकडे थोडे लक्ष दिले तर बरे होईल. कि तिथे स्वमर्जी?
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 04/05/2018 - 10:54

In reply to मी माझी व्याख्या दिलेली by बिटाकाका

Permalink

ह्या लेख प्रपंचाला सुरवात कशी

ह्या लेख प्रपंचाला सुरवात कशी झाली बघा तुम्ही जसे म्हणालात की " हिंदुत्ववाद याची मुळात व्याख्याच माहित नसल्याने स्वतःची व्याख्या गृहीत धरून पूर्वग्रहाने लिहिलेला लेख!"" धागालेखाची हिंदुत्वादाची व्याख्या/विचार आल्रेडी मी धाग्यात वाचली होती. एक बाजू मला समजली होती. दुसरी देखील समजून घायची होती. त्यात तुम्ही म्हणाला धागालेखकाला परिपूर्ण व्याख्या माहित नसावी असे म्हणालात म्हणून तुम्हालाच मी थेट प्रश्न विचारला. यात माझी स्वमर्जी काही नव्हती. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही धागालेखाकडे बोट करून मोकळा झालात. डांबिस यांना तुम्ही प्रश्न विचारावा हा माझा हेतू मुळात नव्हताच.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Wed, 04/04/2018 - 19:52

In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर

Permalink

"हिंदुत्व म्हणजे काय", ते

"हिंदुत्व म्हणजे काय", ते फक्त मलाच कळले आहे, असा दावा मी कधी केलाच नाही. हिंदुत्व तर सोडाच "हिंदु म्हणजे काय" ते सुद्धा ईथे कोणाला कळले आहे, अस मला वाटत नाही. हिंदु मनुष्याची व्याख्या काय , हे कळण्यासाठी मुसलमान बहुल भागात जाऊन "हिंदुस्तान झिंदाबाद " तर राहु दे " पाकिस्तान मुर्दाबाद " अस तरी ओरडा , जर जिंवत परत आलात तर तुमच नशीब !! पण जर परत ला ना हीत तर तुम्ही हिंदुच !!
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 04/04/2018 - 20:15

In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by डँबिस००७

Permalink

हिंदु मनुष्याची व्याख्या काय

हिंदु मनुष्याची व्याख्या काय , हे कळण्यासाठी मुसलमान बहुल भागात जाऊन "हिंदुस्तान झिंदाबाद " तर राहु दे " पाकिस्तान मुर्दाबाद " अस तरी ओरडा , जर जिंवत परत आलात तर तुमच नशीब !! पण जर परत ला ना हीत तर तुम्ही हिंदुच !!
. वॉव... . हशा, टाळ्या, आणि शिट्ट्यासुध्दा... . नै जोकच तसा होता ना !
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Wed, 04/04/2018 - 22:27

In reply to हिंदु मनुष्याची व्याख्या काय by पगला गजोधर

Permalink

जोकच की

ह्यान्ना कसे माहिती ? हे गेले होते का ओरडायला कधी ?
  • Log in or register to post comments

Submitted by सोमनाथ खांदवे on Wed, 04/04/2018 - 22:41

In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by डँबिस००७

Permalink

येकदम बरुबर , ल्येखका चा

येकदम बरुबर , ल्येखका चा तळागळा तील मुस्लिम शी कदी संबंध आलेला नसणार म्हणून त्यांची गाडी हिंदुत्वाच्या मुद्या वर जरा डाव्या बाजूने कलली आहे . लेखकाने पुण्यातील लुल्लानगर , कोंढवा भागात फक्त यकच महिना राहून अनुभव घेतला तर आयुष्यात परत कदी शेक्युलर चा कोट घालायची ईच्छा नाय व्हणार .
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 04/05/2018 - 10:05

In reply to येकदम बरुबर , ल्येखका चा by सोमनाथ खांदवे

Permalink

मी पण सदाशिव पेठेत असेच ३

मी पण सदाशिव पेठेत असेच ३ महिने काढले होते. परत तलफच नाही झाली कुठल्या गोष्टीची. तसेच फुरसुंगी, वाघोली, मांजरी, उरुळी, भेकराई, तिकडे बाणेर, रावेत, सुस, देहू रोड एरिया मध्ये सुद्धा गुंठा मंत्रांच्या हौदासात लोक कसे काय फ्लॅट घेऊन राहतात याचे आश्चर्य वाटते. असो...
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on गुरुवार, 04/05/2018 - 10:48

In reply to येकदम बरुबर , ल्येखका चा by सोमनाथ खांदवे

Permalink

३-३.५ वर्ष राहतोय, असा काही

३-३.५ वर्ष राहतोय, असा काही अनुभव नाही. सरसकट आरोप चुकीचा आहे. अर्थात सल्ला exclusively लेखकाला असेल तर पास. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Wed, 04/04/2018 - 17:41

In reply to तुम्ही दोघेही कुठल्याही by बिटाकाका

Permalink

आप तो बुरा मान गये...

<<<तुम्ही दोघेही कुठल्याही मुद्द्यावर बोलत नसून माझ्या वैयक्तिक मतांवर पिंका टाकायचे काम करत आहात असे माझे मत झाले आहे, त्यामुळे असोच.>>> ==>> मी किती सरळ सोपा कोणते ही आढेवेढे न घेता तुम्हाला प्रश्न विचारला होता. यात मी कुठे पिंका टाकल्या ते सांगा? http://www.misalpav.com/comment/989186#comment-989186 ... तुमच्या वैयत्तिक मतांचा आदर मला आहेच पण फक्त ते जरा विस्तृत जाणून घायचे होते कारण अगदी सारखेच प्रश्न मला देखील पडले होते. .... <<हिंदुत्व या शब्दाचा उगम कुणाचा आहे हे गुगलून मिळाले नै होय, शुभेच्छा!>> ==>> अहो खरेच मला नाही सापडले. शुभेच्छा देण्यापेक्षा लिंक चिटकून दिली असती तर पुरेसे होते.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Wed, 04/04/2018 - 19:32

In reply to आप तो बुरा मान गये... by विशुमित

Permalink

परत विनंती, गूगल.कॉम वर जायचं

परत विनंती, गूगल.कॉम वर जायचं, ओरिजिन ऑफ हिंदुत्व किंवा त्याच्याशी संलग्न आपला प्रश्न टाकायचा, पहिल्या पाचात एकतरी लिंक कामाची येईलच, खासकरून विकिपीडियाची. ============= तुम्हाला गुगलवर शोधून हिंदुत्व या शब्दाचा उगम सापडला नाही हे मनाला पटत नाही, त्यामुळे तुम्ही कायतर प्रतिवाद करायचा म्हणून करत आहात असा समज होणे स्वाभाविक आहे. ठराविक हिंदू संघटनांच्या पलीकडे हिंदुत्व नावाची गोष्ट नाही हि समजूत कायम ठेवायची असल्यास, शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 04/05/2018 - 09:57

In reply to परत विनंती, गूगल.कॉम वर जायचं by बिटाकाका

Permalink

जाऊ द्या जास्त लोड घेऊ नका.

जाऊ द्या जास्त लोड घेऊ नका. माझे मी बघून घेतो व्याख्या, कर्ता-करविता वगैरे वगैरे... चिल्लाक्स..!
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 04/05/2018 - 10:24

In reply to जाऊ द्या जास्त लोड घेऊ नका. by विशुमित

Permalink

हाहाहा, कोण कुणाला सांगताय

हाहाहा, कोण कुणाला सांगताय लोड घेऊ नका म्हणून, लैच मज्जा!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com