स्वातंत्र्यपूर्व काळामधे त्या वेळच्या इंग्रज राज्यकर्त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधे डावं-उजवं करण्याचा प्रयत्न केला.
अनेकदा हिंदूंना डावलून मुसलमानांना झुकतं माप दिलं गेलं. यामुळे हिंदूंमधे आपल्याला डावललं जातं आहे अशी एक सुप्त भावना होती.
यातूनच हिंदूत्वाच्या राजकारणाला सुरुवात झाली. सावरकरांनी भारतीय राजकारणामधे हिंदूत्वाचा ठळकपणे उच्चार केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा हेसुद्धा हिंदूत्वाचाच आधार घेत होते. संघाची राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनसंघाने सुद्धा हिंदूत्वाचे राजकारण केले. स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी पूर्वीच्या राज्यकर्त्यांचाच कित्ता गिरवला.
त्यामुळे स्वतंत्र भारतामधेही हिंदूंमधे डावलले गेल्याची भावना तशीच राहिली. त्यामुळे हिंदूत्वाच्या राजकारणाला बळकटी मिळत राहिली.
पुढे शाहबानो प्रकरण घडले. एका मुसलमान स्त्रीला कायद्याने दिलेला न्याय, कायदा बदलून नाकारण्यात आला. हे काही मुल्ला मौलवींची मर्जी राखण्यासाठी झाले.
यामुळे हिंदूत्वावर आधारित राजकारण करणाऱ्यांना आयते कोलीतच मिळाले आणि मग त्यांनी सरकारच्या विरोधात रान पेटवले.
"बघा बघा हिंदूंनो तुमची दखलसुद्धा घेतली जात नाही आणि मुल्ला मौलवींची मात्र मर्जी कशी राखली जाते पहा" असे हिंदूत्ववादी हिंदू जनतेला सांगत राहिले.
हिंदूंवरती सतत कसा अन्याय होतो आहे असे सांगणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्या विरोधात बघा कसे संघटित षडयंत्राचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगताना लव्ह जिहाद सारखे मुद्दे पुढे आणू लागले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या कथा रंगवून रंगवून सांगितल्या जायला लागल्या आणि यामधून हिंदूंना फक्त आम्हीच सोडवू शकतो असे म्हणून स्वतःचे महत्व वाढविण्याचा हिंदूत्ववादी प्रयत्न करू लागले.
ह्या देशांत हिंदू धर्म खतरे में असे म्हणायला हिंदूत्ववाद्यांना संधीची कमतरता कधीच भासली नाही. त्यांना भांडवल करता येईल असे मुद्दे सतत मिळत राहिले.
यातूनच ज्या राजीव गांधींनी शाहबानोचा निर्णय फिरवला, त्याच राजीव गांधींना हिंदूंना खूष करण्यासाठी अयोध्येच्या मंदिराचे दरवाजे उघडावे लागले.
हिंदूत्वाचे राजकारण सुरूच राहिले. आपल्यावर अन्याय होतो आहे हे म्हणणे विरोधात असताना तसे सोपे असते. छोट्या छोट्या गोष्टींचे भांडवल करून जनतेमधे असंतोष उभा करता येतो.
सरकारने हज यात्रेला सबसिडी दिली तर "त्यांना देता मग आम्हाला का नाही" किंबहुना "आम्हा हिंदूंना डावललं जातंय" ही आवडती बोंब ठोकता येते आणि त्यातून राजकारण साधता येते, स्वतःचे महत्व अबाधित राखता येते.
या सगळ्या प्रयत्नातून अखेर हिंदूत्ववादी म्हणवणार्या पक्षांना भारतामधे सत्ता मिळाली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर बसले.
पण आजवर हिंदूंवर सतत अन्याय होतो आहे, हिंदूंना सतत डावललं जात आहे अशा प्रकारच्या तक्रारी करण्याची सवय पडलेल्या कार्यकर्त्यांना आता मात्र कुठलाच उद्योग राहिला नाही. कारण तक्रार तरी कुणाच्या विरोधात करायची ? सरकार त्यांचेच होते.
पण हिंदूंवर अन्याय होतो आहे अशी रडारड करण्याची सवय मात्र गेली नाही. ती वेगळ्या स्वरूपात बाहेर यायला लागली.
आपल्याकडे मूळातच जंगलतोड खूप झालेली आहे. राखायला पाहिजेत अशी जंगले सुद्धा आपण राखू शकलेलो नाही. त्या ठिकाणी माणसाचे अतिक्रमण झाले. त्यामुळे होळीच्या निमित्ताने तरी लाकडे जाळू नका आणि वृक्षतोड करू नका.
निसर्गाने आपल्याला दिलेले पाणी मर्यादित आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने आपल्या घरातले पाणी नासू नका त्यामुळे आपलीच गैरसोय होणार आहे.
असे कोणी सांगायला गेले की बिथरलेले हिंदूत्ववादी अंगावर यायला लागले. आम्हा हिंदूंनाच तुम्ही बंधने का घालता ? त्यांच्या बकरी ईदला ते इतके पाणी खर्च करतात मग आम्ही पाण्याची नासाडी का करू नये असे युक्तिवाद ऐकू यायला लागले.
दिल्लीतील प्रदूषण पाहून सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली त्यावेळी अनेक हिंदूत्ववाद्यांनी त्याचा निषेध केला. काही जणांनी तर आजवर आपण फटाके उडवत नव्हतो पण केवळ निर्णयाचा निषेध करण्यासाठी फटाके उडविणार आहोत असे जाहीर केले.
नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर हिंदूत्ववादी निस्तेज व्हायला लागले. पर्यावरणाच्या विनाशामधे हिंदूत्व शोधायला लागले.
सत्तेमधे बसलेले लोक आपापले काम करत होते पण सत्तेबाहेर राहणाऱ्या हिंदूत्ववादी गटांमधे मात्र तू जास्त भगवा की मी अशी अहमहमिका सुरु झाली. पूर्वी अहिंदूंचे कसे लाड होत आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढणारे हिंदूत्ववादी आपापसात लढून स्वतःचे उपद्रवमूल्य वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. गो सेवकांच्या हिंसाचारामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना कानपिचक्याही दिल्या.
ज्या हिंदूत्वाने आयोध्येसारखे लढे उभारले, तेच हिंदूत्ववादी आता अगदी क्षुल्लक मुद्यांचे केविलवाणेपणाने राजकारण करताना दिसू लागले.
राजकारणातला आणखी एक सुप्त हेतू असतो. तो म्हणजे आपल्याला मते देणाऱ्यांना चुचकारणे आणि आपल्या विरोधात असणाऱ्यांना झोडपणे, धाक दाखवणे, बदनाम करणे. हिंदूत्ववाद्यांनी एक प्रकारे हिंदूंना चुचकारले आणि आपल्याला मते न देणाऱ्या अहिंदूंना इशारे दिले, धाक बसवला.
सुरुवातीला हिंदूत्ववादी अशी प्रतिमा असणाऱ्या नरेंद्र मोदींना केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचे सुद्धा समर्थन मिळू लागल्यानंतर मुस्लिमांना दुखावणे परवडणारे नव्हते. मुस्लिमांच्या विरोधात लव जिहाद वगैरे सारखे मुद्दे मांडणे सुद्धा आता अवघड झाले.
कारण आपल्याला मत न देणाऱ्याला सर्व प्रकारे कोंडीत पकडण्यासाठी निरनिराळे प्रचाराचे, अपप्रचाराचे मुद्दे वापरले जातात. ते मुद्दे तो आपला मतदार झाल्यानंतर पुन्हा बासनात गुंडाळून ठेवावे लागतात.
लव जिहादचे प्रकरण म्हणून सांगितलेली एक केस 2017 मधे न्यायालयाने फिरवली आणि त्या मुलीला पुन्हा आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याची मुभा देण्यात आली. लव जिहादची हाकटी पिटणारे तोंडावर आपटले.
मुसलमान सुद्धा आपला मतदार झाल्यानंतर हिंदूत्ववादी राज्यकर्ते त्यांच्या अजानच्या वेळी आपली सभा थांबवून ठेवू लागले. अशा वेळी हिंदूत्ववाद्यांना आपलेच दात ओठ खाण्यावाचून दुसरा काही पर्याय राहीला नाही.
पुढचा काही काळ तरी हिंदूत्वाला भारतामधे मार्केट राहणार नाही, असे दिसते.
वाचने
48407
प्रतिक्रिया
196
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्छा... असो.
एकच लंबर.
अजान, दात ओठ, लव्ह जिहाद वगैरे
सहमत गामाजी.
In reply to अजान, दात ओठ, लव्ह जिहाद वगैरे by गामा पैलवान
हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट
In reply to अजान, दात ओठ, लव्ह जिहाद वगैरे by गामा पैलवान
हिंदुत्वाचे मार्केट
In reply to हिंदुत्वाचं भारतातलं मार्केट by नर्मदेतला गोटा
आम्हाला कलहमुक्त भारत नको आहे
लोल =))))
In reply to आम्हाला कलहमुक्त भारत नको आहे by प्रकाश घाटपांडे
१. किती काळ सर्व गोष्टी साठी
हो का ?
In reply to १. किती काळ सर्व गोष्टी साठी by साहना
>>> मुस्लिम आणि हिंदू लोकांत
In reply to १. किती काळ सर्व गोष्टी साठी by साहना
हिंदुत्व चौफेर उधळल्याने व
अनेकदा हिंदूंना डावलून
शेक्युलर दिस्ताय राव तुमी आणि
अरे वाह्ह छान..!!
In reply to शेक्युलर दिस्ताय राव तुमी आणि by सोमनाथ खांदवे
हिंदुत्ववाद याची मुळात
तुमच्या कडे हिंदुत्ववादाची
In reply to हिंदुत्ववाद याची मुळात by बिटाकाका
माझी सांगतो जमेल तसं, आधी
In reply to तुमच्या कडे हिंदुत्ववादाची by विशुमित
धागा लेखकाला लोक नर्मदेचा
In reply to माझी सांगतो जमेल तसं, आधी by बिटाकाका
थोडक्यात काय लोकांनी ठरवले
In reply to धागा लेखकाला लोक नर्मदेचा by विशुमित
<<<शिवाय मी प्रश्न कसे
In reply to थोडक्यात काय लोकांनी ठरवले by बिटाकाका
हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता,
In reply to <<<शिवाय मी प्रश्न कसे by विशुमित
प ग जी...
In reply to हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, by पगला गजोधर
तुम्ही दोघेही कुठल्याही
In reply to हिंदुत्व म्हणजे हिंदू सभ्यता, by पगला गजोधर
"हिंदुत्व म्हणजे काय", ते
In reply to तुम्ही दोघेही कुठल्याही by बिटाकाका
आपला कयास चुकीचा होता मालक!
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर
"हिंदुत्व म्हणजे काय", ते
In reply to आपला कयास चुकीचा होता मालक! by बिटाकाका
परत वाचा, मी माझ्याबद्दल बोलत
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर
<<<माझा मुद्दा
In reply to आपला कयास चुकीचा होता मालक! by बिटाकाका
असे बघा, इस्लामच्या नावाखाली
In reply to <<<माझा मुद्दा by विशुमित
मी धागा पुन्हा एकदा वाचला.
In reply to असे बघा, इस्लामच्या नावाखाली by बिटाकाका
तुम्हाला माझा मुद्दा समजलेला
In reply to मी धागा पुन्हा एकदा वाचला. by विशुमित
<<<तुम्हाला माझा मुद्दा
In reply to तुम्हाला माझा मुद्दा समजलेला by बिटाकाका
काय आहे, तुमच्या ह्या
In reply to <<<तुम्हाला माझा मुद्दा by विशुमित
<<<वैयक्तिक टिप्पण्या टाळणे
In reply to काय आहे, तुमच्या ह्या by बिटाकाका
साहेब, मी पिंका टाकतो ही
In reply to <<<वैयक्तिक टिप्पण्या टाळणे by विशुमित
बरं ठीक आहे. तुमच्या वेळेचे
In reply to साहेब, मी पिंका टाकतो ही by बिटाकाका
इथे डांबिस जी नि त्यांच्या
In reply to असे बघा, इस्लामच्या नावाखाली by बिटाकाका
मी माझी व्याख्या दिलेली
In reply to इथे डांबिस जी नि त्यांच्या by विशुमित
ह्या लेख प्रपंचाला सुरवात कशी
In reply to मी माझी व्याख्या दिलेली by बिटाकाका
"हिंदुत्व म्हणजे काय", ते
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by पगला गजोधर
हिंदु मनुष्याची व्याख्या काय
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by डँबिस००७
जोकच की
In reply to हिंदु मनुष्याची व्याख्या काय by पगला गजोधर
येकदम बरुबर , ल्येखका चा
In reply to "हिंदुत्व म्हणजे काय", ते by डँबिस००७
मी पण सदाशिव पेठेत असेच ३
In reply to येकदम बरुबर , ल्येखका चा by सोमनाथ खांदवे
३-३.५ वर्ष राहतोय, असा काही
In reply to येकदम बरुबर , ल्येखका चा by सोमनाथ खांदवे
आप तो बुरा मान गये...
In reply to तुम्ही दोघेही कुठल्याही by बिटाकाका
परत विनंती, गूगल.कॉम वर जायचं
In reply to आप तो बुरा मान गये... by विशुमित
जाऊ द्या जास्त लोड घेऊ नका.
In reply to परत विनंती, गूगल.कॉम वर जायचं by बिटाकाका
हाहाहा, कोण कुणाला सांगताय
In reply to जाऊ द्या जास्त लोड घेऊ नका. by विशुमित
चान चान चान ...!!
In reply to हाहाहा, कोण कुणाला सांगताय by बिटाकाका
विशुमित,
In reply to धागा लेखकाला लोक नर्मदेचा by विशुमित
बिटाकाका
In reply to माझी सांगतो जमेल तसं, आधी by बिटाकाका
बर्राबर वलीकलाव! हेच
In reply to बिटाकाका by नर्मदेतला गोटा
सगळ्या हिंदुत्ववाद्यांना
In reply to बर्राबर वलीकलाव! हेच by बिटाकाका
अर्रारा...
In reply to सगळ्या हिंदुत्ववाद्यांना by पगला गजोधर
काय वाह्यात प्रश्न कम शंका
In reply to सगळ्या हिंदुत्ववाद्यांना by पगला गजोधर
सगळ्या हिंदुत्ववाद्यांना
In reply to काय वाह्यात प्रश्न कम शंका by बिटाकाका
मालक बररोबर उलटा मुद्दा
In reply to सगळ्या हिंदुत्ववाद्यांना by पगला गजोधर
"तुम्हाला मूळ मुद्दा समजलाच
In reply to मालक बररोबर उलटा मुद्दा by बिटाकाका
बरं बीटाकाका, माझ्यावर असे
In reply to मालक बररोबर उलटा मुद्दा by बिटाकाका
१. मला योग्य वाटत असलेली
In reply to बरं बीटाकाका, माझ्यावर असे by पगला गजोधर
आखीर कहना क्या चाहते हो मेरे
In reply to १. मला योग्य वाटत असलेली by बिटाकाका
आखीर कहना क्या चाहते हो मेरे
In reply to १. मला योग्य वाटत असलेली by बिटाकाका
ते कोणतर कुणालातरी म्हणलं
In reply to आखीर कहना क्या चाहते हो मेरे by विशुमित
>>> एक शंका _
In reply to सगळ्या हिंदुत्ववाद्यांना by पगला गजोधर
ब्वार गुर्जी , तुम्ही म्हणता
In reply to >>> एक शंका _ by श्रीगुरुजी
अमित शहा (जैन) ???? .
In reply to >>> एक शंका _ by श्रीगुरुजी
https://www.loksatta.com/desh
In reply to अमित शहा (जैन) ???? . by पगला गजोधर
श्रीगुरुजी, मला माहिती नव्हते
In reply to https://www.loksatta.com/desh by श्रीगुरुजी