Skip to main content

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला.. वेगळे सुचलेले--

लेखक राघव यांनी बुधवार, 17/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
विशालची ही रचना बघून वेगळ्याप्रकारे काही मांडणे झाले [विडंबन नाही].. गझल आहे की नाही हे मात्र माहित नाही. सूर येथे होत बेसूर.. ऐकायचे नव्हते मला.. या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला.. श्वापदांनी फाडलेले पदर ज्यांना झाकती.. देहभूमीच्या चिरांना मोजायचे नव्हते मला.. ओथंबले आभाळ माझे.. मग सर्वकाही चांगले! तीरापल्याडच्या भुकेला उमजायचे नव्हते मला.. पुन्हा वळती त्या दिशेला..पावले माझी.. कितीदा.. पावलांना त्या दिशेला न्यायचे नव्हते मला.. दुभंगल्या घरट्यात अजुनी अंकुराची आस होती.. रेशमाचे भाव-बंध जोडायचे नव्हते मला.. आयुष्य पेटून सांगते, अभिमान माझा कोरडा.. कातळही म्हणावा बरा.. [पा]झरायचे नव्हते मला..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3116
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान झालीये रचना! दुभंगल्या घरट्यात अजुनी अंकुराची आस होती.. रेशमाचे भाव-बंध जोडायचे नव्हते मला..>> इथे 'तोडायचे' केलेत तर अर्थ नीट पोहोचेल असे वाटते.

In reply to by विनिता००२

कदाचित त्यांना "जोडायचे" असंच म्हणायचं असेल. अंकुराची आस म्हणजे निव्वळ जगण्याची इच्छा, रेशमी भावबंध म्हणजे जणू frills attached. कवीच खरा अर्थ सांगू शकेल.

In reply to by विनिता००२

खरंय.. पण शक्यता असूनही जोडायला टाळणे हा भाव अपेक्षीत असल्यानं, तोडायचे नाही म्हटले तर अर्थ बदलतो. तसंच उर्वरीत रचनेशी विसंगत होतंय. जोडायचं नाही असंच बरोबर वाटतं.

हा ही दॄष्टीकोन आवडला. मजा आली वाचताना... पैजारबुवा,

In reply to by विशाल कुलकर्णी

गझल वृत्तातच हवी ना अन्यथा गझल अन मुक्तछंद काय फरक उरणार नाही, बिना वृत्ताचे 'नज्म' असतात बहुतेक