या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला.. वेगळे सुचलेले--
विशालची ही रचना बघून वेगळ्याप्रकारे काही मांडणे झाले [विडंबन नाही].. गझल आहे की नाही हे मात्र माहित नाही.
सूर येथे होत बेसूर.. ऐकायचे नव्हते मला..
या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला..
श्वापदांनी फाडलेले पदर ज्यांना झाकती..
देहभूमीच्या चिरांना मोजायचे नव्हते मला..
ओथंबले आभाळ माझे.. मग सर्वकाही चांगले!
तीरापल्याडच्या भुकेला उमजायचे नव्हते मला..
पुन्हा वळती त्या दिशेला..पावले माझी.. कितीदा..
पावलांना त्या दिशेला न्यायचे नव्हते मला..
दुभंगल्या घरट्यात अजुनी अंकुराची आस होती..
रेशमाचे भाव-बंध जोडायचे नव्हते मला..
आयुष्य पेटून सांगते, अभिमान माझा कोरडा..
कातळही म्हणावा बरा.. [पा]झरायचे नव्हते मला..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3116
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान झालीये रचना!
कदाचित त्यांना "जोडायचे" असंच
In reply to छान झालीये रचना! by विनिता००२
खरंय.. पण शक्यता असूनही
In reply to छान झालीये रचना! by विनिता००२
रचना आवडली .
येस..मस्त...
वृत्त गडबडलेय काही ठिकाणी. पण
वृत्त गडबडलेय काही ठिकाणी. पण
वृत्त नसेल तर ती गझल रहात नाही
In reply to वृत्त गडबडलेय काही ठिकाणी. पण by विशाल कुलकर्णी
खरंय!
In reply to वृत्त नसेल तर ती गझल रहात नाही by ss_sameer