✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उपमा

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 10/31/2017 - 18:57  ·  लेख
लेख
पुण्यात रुपाली/वैशाली मध्ये "उपमा" घेतला तर तो पांढरा स्वच्छ असतो.. मात्र घरी उपमा केला की तो तांबूस रंगाचा असतो.. रवा भाजण्याचे त्यांचे टेकनिक निराळे असते का? असेल ते नेमके काय असावे?? .. ..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10528 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

वैशालीच्या उपम्यात चक्क काजू

अभ्या..
Tue, 10/31/2017 - 19:06 नवीन
वैशालीच्या उपम्यात चक्क काजू असतात?
  • Log in or register to post comments

हो. काही प्रॉब्लेम आहे का ?

चौथा कोनाडा
Fri, 11/03/2017 - 11:07 नवीन
हो. काही प्रॉब्लेम आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

घरातला उपमा भाजलेल्या

पगला गजोधर
Tue, 10/31/2017 - 19:26 नवीन
घरातला उपमा भाजलेल्या रव्यापासून बनवतात... हाटेलात रवा भाजतात का ? याचा शोध घेऊन पहा....
  • Log in or register to post comments

लावा तर्कशास्त्र

नाखु
Tue, 10/31/2017 - 19:56 नवीन
  • Log in or register to post comments

उकळत्या पाण्यात

रमेश आठवले
Sat, 11/04/2017 - 01:14 नवीन
वैशाली/रुपाली मधे रवा उकळत्या पाण्यात शिजवित असावेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

इथे अंदाज विचारण्यापेक्षा

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 10/31/2017 - 20:33 नवीन
इथे अंदाज विचारण्यापेक्षा वैशालीच्या शेफला विचारले तर खात्रीचे उत्तर मिळेल !
  • Log in or register to post comments

काही ठिकाणी चक्क पांढरा

कंजूस
Tue, 10/31/2017 - 20:40 नवीन
काही ठिकाणी चक्क पांढरा थपथपीत लगदासुद्धा असतो.
  • Log in or register to post comments

मायक्रोवेव्ह मध्ये रवा भाजत

चौथा कोनाडा
Tue, 10/31/2017 - 22:54 नवीन
मायक्रोवेव्ह मध्ये रवा भाजत असतील ? नाही, पण त्यात सुद्धा रवा तांबुस होइ पर्यंत भाजायचा असतो ! रवा वाफेवर भाजत असतील ?
  • Log in or register to post comments

रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात

कंजूस
Wed, 11/01/2017 - 07:07 नवीन
रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात त्यामुळे पांढरा दिसतो.
  • Log in or register to post comments

फक्त गरम ?

चौथा कोनाडा
Wed, 11/01/2017 - 13:26 नवीन
फक्त गरम करतात ? मग शिजतो का व्यवस्थित ? हे असलं करून बघितलंय का कुणी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वैशालीचा उपमा घ्यायला लोक

टवाळ कार्टा
Wed, 11/01/2017 - 10:16 नवीन
वैशालीचा उपमा घ्यायला लोक पैसे देतात पण घरच्या उपम्याला फुकट खातात म्हणून घरचा उपमा वैशालिच्या उपम्यावर जळतो आणि तो लाल होतो
  • Log in or register to post comments

हाहाहा

पाटीलभाऊ
Wed, 11/01/2017 - 13:34 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हा हा हा ...

रामदास२९
गुरुवार, 11/02/2017 - 11:42 नवीन
हा हा हा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हॉटेलमध्ये रवा भाजत नाहीत

जागु
Wed, 11/01/2017 - 10:30 नवीन
हॉटेलमध्ये रवा भाजत नाहीत त्यामुळे थोडा चिकटपणा असतो पहा त्याला.
  • Log in or register to post comments

सांजा व उपमा, यात काय फरक

पगला गजोधर
Wed, 11/01/2017 - 10:48 नवीन
सांजा व उपमा, यात काय फरक असतो ?
  • Log in or register to post comments

रव्याला दुसरे नाव सांजा आहे

जागु
Wed, 11/01/2017 - 10:54 नवीन
रव्याला दुसरे नाव सांजा आहे बहुतेक. पण माझी एक लहानपणी समज होती. हळद घालून करतो तो सांजा आणि बिन हळदीचा उपमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हळद घालून करतो तो सांजा आणि

एमी
Wed, 11/01/2017 - 11:33 नवीन
हळद घालून करतो तो सांजा आणि बिन हळदीचा उपमा. >> हे बरोबर वाटतेय. + उपमामधे कांदा, इतर भाज्या, उडीद डाळ वगैरे असते. सांजा म्हणजे फक्त फोडणी आणि मिरच्या... हे मी आपलं अंदाजानेच सांगतेय :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

आमच्याकडे पण हळद-तिखट घालून

परिंदा
Wed, 11/01/2017 - 13:08 नवीन
आमच्याकडे पण हळद-तिखट घालून केलेल्या रव्याला "सांजा" म्हणतात आणि बिनहळदीचा तो उपमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

सामान्यपणे आधी रवा खरपूस

आनन्दा
Wed, 11/01/2017 - 13:40 नवीन
सामान्यपणे आधी रवा खरपूस भाजून, त्यात थोडं थोडं गरम पाणी घालून मंद आचेवर शिजवलेल्या पदार्थाला सांजा म्हणतात आधी पाणी उकळवून, त्यात 'थोडासा भाजलेला' रवा ओतून वाफेवर शिजवलेला पदार्थ म्हणजे उपमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली .

सिरुसेरि
Wed, 11/01/2017 - 19:47 नवीन
उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली . "प्रेमाला उपमा नाही हे" गाणे व त्यावरुन बेतलेला पीजे आठवला .
  • Log in or register to post comments

देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा

पगला गजोधर
Wed, 11/01/2017 - 20:04 नवीन
देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा देव ) फक्त कांदेपोहे रचतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

रुचतात

पगला गजोधर
Wed, 11/01/2017 - 20:05 नवीन
*रुचतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

उपमा व उप्पीट यांत काय फरक

पगला गजोधर
गुरुवार, 11/02/2017 - 07:20 नवीन
उपमा व उप्पीट यांत काय फरक आहे ?
  • Log in or register to post comments

:D सेमच. सौथ इंडियन लोकं उपमा

एमी
गुरुवार, 11/02/2017 - 07:45 नवीन
:D सेमच. सौथ इंडियन लोकं उपमा म्हणतात आणि मराठी लोकं उप्पीट म्हणतात... https://en.m.wikipedia.org/wiki/Upma
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

उपम्याला कीती उपमा मिळाल्या.

जागु
गुरुवार, 11/02/2017 - 10:18 नवीन
उपम्याला कीती उपमा मिळाल्या.
  • Log in or register to post comments

कालिदासाची उपमा

रमेश आठवले
गुरुवार, 11/02/2017 - 20:46 नवीन
कालिदासाचा उपमा या आलन्काराचा उपयोग सर्वात जास्त चांगला, असे एका सुभाषितात म्हटले आहे. उपमा कालिदासस्य भारवेर अर्थगौरवं दण्डिन: पदलालित्यम माघे सन्ति त्रयो गुण:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

पहिला फोटो छान आहे

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 11/02/2017 - 10:27 नवीन
धाग्यातला पहिला फोटो छान आहे.
  • Log in or register to post comments

उपमा कालिदासस्य

आनन्दा
गुरुवार, 11/02/2017 - 17:39 नवीन
उपमा कालिदासस्य
  • Log in or register to post comments

तिखट शिरा

चामुंडराय
Fri, 11/03/2017 - 05:55 नवीन
काही मंडळी तिखट शिरा म्हणताना हि ऐकलीत.
  • Log in or register to post comments

उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा

sayali
Fri, 11/03/2017 - 15:40 नवीन
उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा असो वा कालिदासांचा. आम्हाला मात्र खायच्या उपम्यातच रस. त्याला मात्रा कशाचीही उपमा देऊ नका. सांजा हा पिवळ्या रंगाचा असतो. आधी फोडणी करून त्यात रवा भाजतात आणि मग पाणी घालून शिजवतात. खरा उपमा आधी रवा भाजून वेगळा ठेवतात. नंतर फोडणी करून त्यात कांदा फुलकोबी मटार छान शिजवून नंतर पाणी घालून उकळतात आणि थोडा थोडा रवा घालून ढवळतात. त्याने पांढरा उपमा अगदी वैशाली सारखाच होतो बरं का.......
  • Log in or register to post comments

अभिनंदन !

चौथा कोनाडा
Fri, 11/03/2017 - 19:54 नवीन
अभिनंदन ! सगळे मिपाकर रवा वेगळा भाजतात तो तांबूस होतो, पण सायलीतै जेव्हा रवा भाजतात, त्यानं उपमा पांढराच होतो ! शिकरेट सांगा की तै !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sayali

रवा भाजताना खालच्या शेगाडीचा

पगला गजोधर
Fri, 11/03/2017 - 20:50 नवीन
रवा भाजताना खालच्या शेगाडीचा गॅस पेटवू नये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हाहाहा

अनन्त अवधुत
Sat, 11/04/2017 - 03:52 नवीन
. रेसिपीबद्दल आदर आहे. पण प्रतिसाद मस्तच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

शिकरेट मैत नै पण माझ्या घरी,

माहितगार
Sat, 11/25/2017 - 19:45 नवीन
शिकरेट मैत नै पण माझ्या घरी, माझ्या लहानपणापासन उपमा पण पांढरा व मोकळा होतो, मी केला तरीही ;)-पण हल्ली खूप क्वचीत करतो. घरची पारंपारीक पद्धत गॅसच्या एका बर्नरवर आधी आधणाचे पाणी उकळी येण्यास ठेवत; त्याच वेळी दुसर्‍या बर्नरवर, रवा आधी तुपात (डालडा असण्याच्या काळात चक्क डालड्यात) स्वतंत्र पणे कढईत भाजत, (फारही कमी वेळ भाजल्याचे आठवत नाही पण तुपात भाजल्यामुळे लाल कमी होत असेल आणि मोकळाही होत असेल का ?-मोक्ळा होण्यासाठी रव्याजाडसर की बारीक याचा संबंध असावा पण तो नेमका माहित नाही) पुढच्या स्टेपला जीरा, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची , -पण हळद नाही-बाकीची सामुग्री उपलब्धता आणि आवडी प्रमाणे ज्यात टमाटे, हिरवे वाटाण्यांचा समावेश होऊ शकेल, उपमा झाल्या नंतर पेरण्यास कोथींबीर सर्व करताना सोबत लिंबाची फोड , दही, किंवा रायता-कोशींबीर. फोडणीत आधणचे पाणी अधी टाकायचे की रवा ? नेमके आठवत नाही पुन्हा ट्रायल करून पहावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

वनस्पती तूप / तूप आणि

माहितगार
Sat, 11/25/2017 - 20:21 नवीन
वनस्पती तूप / तूप आणि तेलाच्या रंगानेही फरक पडत असण्याची शक्यता असू शकतात त्या प्रयोग करून पहाव्या लागतील असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

काय जाहले पुढे, पांढर्‍या

चौथा कोनाडा
गुरुवार, 11/09/2017 - 17:25 नवीन
काय जाहले पुढे, पांढर्‍या उपम्याचे ? नाहीय कुणी इथं मिपावर शेफ ?
  • Log in or register to post comments

....

babu b
Wed, 11/22/2017 - 08:20 नवीन
हॉटेलवाले रवा भाजत नाहीत. मलाही हॉटेल पद्धत आवडते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा