पुण्यात रुपाली/वैशाली मध्ये "उपमा" घेतला तर तो पांढरा स्वच्छ असतो..
मात्र घरी उपमा केला की तो तांबूस रंगाचा असतो..
रवा भाजण्याचे त्यांचे टेकनिक निराळे असते का?
असेल ते नेमके काय असावे??
हळद घालून करतो तो सांजा आणि बिन हळदीचा उपमा. >> हे बरोबर वाटतेय. + उपमामधे कांदा, इतर भाज्या, उडीद डाळ वगैरे असते. सांजा म्हणजे फक्त फोडणी आणि मिरच्या... हे मी आपलं अंदाजानेच सांगतेय :D
सामान्यपणे आधी रवा खरपूस भाजून, त्यात थोडं थोडं गरम पाणी घालून मंद आचेवर शिजवलेल्या पदार्थाला सांजा म्हणतात
आधी पाणी उकळवून, त्यात 'थोडासा भाजलेला' रवा ओतून वाफेवर शिजवलेला पदार्थ म्हणजे उपमा
कालिदासाचा उपमा या आलन्काराचा उपयोग सर्वात जास्त चांगला, असे एका सुभाषितात म्हटले आहे.
उपमा कालिदासस्य भारवेर अर्थगौरवं
दण्डिन: पदलालित्यम माघे सन्ति त्रयो गुण:
उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा असो वा कालिदासांचा.
आम्हाला मात्र खायच्या उपम्यातच रस. त्याला मात्रा कशाचीही उपमा देऊ नका.
सांजा हा पिवळ्या रंगाचा असतो. आधी फोडणी करून त्यात रवा भाजतात आणि मग पाणी घालून शिजवतात.
खरा उपमा आधी रवा भाजून वेगळा ठेवतात. नंतर फोडणी करून त्यात कांदा फुलकोबी मटार छान शिजवून नंतर पाणी घालून उकळतात आणि थोडा थोडा रवा घालून ढवळतात. त्याने पांढरा उपमा अगदी वैशाली सारखाच होतो बरं का.......
शिकरेट मैत नै पण माझ्या घरी, माझ्या लहानपणापासन उपमा पण पांढरा व मोकळा होतो, मी केला तरीही ;)-पण हल्ली खूप क्वचीत करतो. घरची पारंपारीक पद्धत गॅसच्या एका बर्नरवर आधी आधणाचे पाणी उकळी येण्यास ठेवत; त्याच वेळी दुसर्या बर्नरवर, रवा आधी तुपात (डालडा असण्याच्या काळात चक्क डालड्यात) स्वतंत्र पणे कढईत भाजत, (फारही कमी वेळ भाजल्याचे आठवत नाही पण तुपात भाजल्यामुळे लाल कमी होत असेल आणि मोकळाही होत असेल का ?-मोक्ळा होण्यासाठी रव्याजाडसर की बारीक याचा संबंध असावा पण तो नेमका माहित नाही)
पुढच्या स्टेपला जीरा, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची , -पण हळद नाही-बाकीची सामुग्री उपलब्धता आणि आवडी प्रमाणे ज्यात टमाटे, हिरवे वाटाण्यांचा समावेश होऊ शकेल, उपमा झाल्या नंतर पेरण्यास कोथींबीर सर्व करताना सोबत लिंबाची फोड , दही, किंवा रायता-कोशींबीर. फोडणीत आधणचे पाणी अधी टाकायचे की रवा ? नेमके आठवत नाही पुन्हा ट्रायल करून पहावे लागेल.
प्रतिक्रिया
वैशालीच्या उपम्यात चक्क काजू
हो. काही प्रॉब्लेम आहे का ?
घरातला उपमा भाजलेल्या
लावा तर्कशास्त्र
उकळत्या पाण्यात
इथे अंदाज विचारण्यापेक्षा
काही ठिकाणी चक्क पांढरा
मायक्रोवेव्ह मध्ये रवा भाजत
रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात
फक्त गरम ?
वैशालीचा उपमा घ्यायला लोक
हाहाहा
हा हा हा ...
हॉटेलमध्ये रवा भाजत नाहीत
सांजा व उपमा, यात काय फरक
रव्याला दुसरे नाव सांजा आहे
हळद घालून करतो तो सांजा आणि
आमच्याकडे पण हळद-तिखट घालून
सामान्यपणे आधी रवा खरपूस
उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली .
देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा
रुचतात
उपमा व उप्पीट यांत काय फरक
:D सेमच. सौथ इंडियन लोकं उपमा
उपम्याला कीती उपमा मिळाल्या.
कालिदासाची उपमा
पहिला फोटो छान आहे
उपमा कालिदासस्य
तिखट शिरा
उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा
अभिनंदन !
रवा भाजताना खालच्या शेगाडीचा
हाहाहा
शिकरेट मैत नै पण माझ्या घरी,
वनस्पती तूप / तूप आणि
काय जाहले पुढे, पांढर्या
....