Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 10/31/2017 - 18:57
पुण्यात रुपाली/वैशाली मध्ये "उपमा" घेतला तर तो पांढरा स्वच्छ असतो.. मात्र घरी उपमा केला की तो तांबूस रंगाचा असतो.. रवा भाजण्याचे त्यांचे टेकनिक निराळे असते का? असेल ते नेमके काय असावे?? .. ..
  • Log in or register to post comments
  • 10528 views

प्रतिक्रिया

Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 10/31/2017 - 19:06

Permalink

वैशालीच्या उपम्यात चक्क काजू

वैशालीच्या उपम्यात चक्क काजू असतात?
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 11/03/2017 - 11:07

In reply to वैशालीच्या उपम्यात चक्क काजू by अभ्या..

Permalink

हो. काही प्रॉब्लेम आहे का ?

हो. काही प्रॉब्लेम आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Tue, 10/31/2017 - 19:26

Permalink

घरातला उपमा भाजलेल्या

घरातला उपमा भाजलेल्या रव्यापासून बनवतात... हाटेलात रवा भाजतात का ? याचा शोध घेऊन पहा....
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 10/31/2017 - 19:56

Permalink

लावा तर्कशास्त्र

  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on Sat, 11/04/2017 - 01:14

In reply to लावा तर्कशास्त्र by नाखु

Permalink

उकळत्या पाण्यात

वैशाली/रुपाली मधे रवा उकळत्या पाण्यात शिजवित असावेत .
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 10/31/2017 - 20:33

Permalink

इथे अंदाज विचारण्यापेक्षा

इथे अंदाज विचारण्यापेक्षा वैशालीच्या शेफला विचारले तर खात्रीचे उत्तर मिळेल !
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 10/31/2017 - 20:40

Permalink

काही ठिकाणी चक्क पांढरा

काही ठिकाणी चक्क पांढरा थपथपीत लगदासुद्धा असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 10/31/2017 - 22:54

Permalink

मायक्रोवेव्ह मध्ये रवा भाजत

मायक्रोवेव्ह मध्ये रवा भाजत असतील ? नाही, पण त्यात सुद्धा रवा तांबुस होइ पर्यंत भाजायचा असतो ! रवा वाफेवर भाजत असतील ?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 11/01/2017 - 07:07

Permalink

रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात

रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात त्यामुळे पांढरा दिसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Wed, 11/01/2017 - 13:26

In reply to रवा भाजत नाहीत,फक्त गरम करतात by कंजूस

Permalink

फक्त गरम ?

फक्त गरम करतात ? मग शिजतो का व्यवस्थित ? हे असलं करून बघितलंय का कुणी ?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 11/01/2017 - 10:16

Permalink

वैशालीचा उपमा घ्यायला लोक

वैशालीचा उपमा घ्यायला लोक पैसे देतात पण घरच्या उपम्याला फुकट खातात म्हणून घरचा उपमा वैशालिच्या उपम्यावर जळतो आणि तो लाल होतो
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Wed, 11/01/2017 - 13:34

In reply to वैशालीचा उपमा घ्यायला लोक by टवाळ कार्टा

Permalink

हाहाहा

हाहाहा
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास२९ on गुरुवार, 11/02/2017 - 11:42

In reply to वैशालीचा उपमा घ्यायला लोक by टवाळ कार्टा

Permalink

हा हा हा ...

हा हा हा ...
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 11/01/2017 - 10:30

Permalink

हॉटेलमध्ये रवा भाजत नाहीत

हॉटेलमध्ये रवा भाजत नाहीत त्यामुळे थोडा चिकटपणा असतो पहा त्याला.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 11/01/2017 - 10:48

Permalink

सांजा व उपमा, यात काय फरक

सांजा व उपमा, यात काय फरक असतो ?
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Wed, 11/01/2017 - 10:54

In reply to सांजा व उपमा, यात काय फरक by पगला गजोधर

Permalink

रव्याला दुसरे नाव सांजा आहे

रव्याला दुसरे नाव सांजा आहे बहुतेक. पण माझी एक लहानपणी समज होती. हळद घालून करतो तो सांजा आणि बिन हळदीचा उपमा.
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on Wed, 11/01/2017 - 11:33

In reply to रव्याला दुसरे नाव सांजा आहे by जागु

Permalink

हळद घालून करतो तो सांजा आणि

हळद घालून करतो तो सांजा आणि बिन हळदीचा उपमा. >> हे बरोबर वाटतेय. + उपमामधे कांदा, इतर भाज्या, उडीद डाळ वगैरे असते. सांजा म्हणजे फक्त फोडणी आणि मिरच्या... हे मी आपलं अंदाजानेच सांगतेय :D
  • Log in or register to post comments

Submitted by परिंदा on Wed, 11/01/2017 - 13:08

In reply to रव्याला दुसरे नाव सांजा आहे by जागु

Permalink

आमच्याकडे पण हळद-तिखट घालून

आमच्याकडे पण हळद-तिखट घालून केलेल्या रव्याला "सांजा" म्हणतात आणि बिनहळदीचा तो उपमा.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on Wed, 11/01/2017 - 13:40

In reply to सांजा व उपमा, यात काय फरक by पगला गजोधर

Permalink

सामान्यपणे आधी रवा खरपूस

सामान्यपणे आधी रवा खरपूस भाजून, त्यात थोडं थोडं गरम पाणी घालून मंद आचेवर शिजवलेल्या पदार्थाला सांजा म्हणतात आधी पाणी उकळवून, त्यात 'थोडासा भाजलेला' रवा ओतून वाफेवर शिजवलेला पदार्थ म्हणजे उपमा
  • Log in or register to post comments

Submitted by सिरुसेरि on Wed, 11/01/2017 - 19:47

Permalink

उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली .

उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली . "प्रेमाला उपमा नाही हे" गाणे व त्यावरुन बेतलेला पीजे आठवला .
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 11/01/2017 - 20:04

In reply to उपम्याबद्दल बरीच माहिती मिळाली . by सिरुसेरि

Permalink

देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा

देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा देव ) फक्त कांदेपोहे रचतात !
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Wed, 11/01/2017 - 20:05

In reply to देवांच्या प्रेमाला (कु प्रेमा by पगला गजोधर

Permalink

रुचतात

*रुचतात
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 11/02/2017 - 07:20

Permalink

उपमा व उप्पीट यांत काय फरक

उपमा व उप्पीट यांत काय फरक आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by एमी on गुरुवार, 11/02/2017 - 07:45

In reply to उपमा व उप्पीट यांत काय फरक by पगला गजोधर

Permalink

:D सेमच. सौथ इंडियन लोकं उपमा

:D सेमच. सौथ इंडियन लोकं उपमा म्हणतात आणि मराठी लोकं उप्पीट म्हणतात... https://en.m.wikipedia.org/wiki/Upma
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on गुरुवार, 11/02/2017 - 10:18

Permalink

उपम्याला कीती उपमा मिळाल्या.

उपम्याला कीती उपमा मिळाल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by रमेश आठवले on गुरुवार, 11/02/2017 - 20:46

In reply to उपम्याला कीती उपमा मिळाल्या. by जागु

Permalink

कालिदासाची उपमा

कालिदासाचा उपमा या आलन्काराचा उपयोग सर्वात जास्त चांगला, असे एका सुभाषितात म्हटले आहे. उपमा कालिदासस्य भारवेर अर्थगौरवं दण्डिन: पदलालित्यम माघे सन्ति त्रयो गुण:
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 11/02/2017 - 10:27

Permalink

पहिला फोटो छान आहे

धाग्यातला पहिला फोटो छान आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दा on गुरुवार, 11/02/2017 - 17:39

Permalink

उपमा कालिदासस्य

उपमा कालिदासस्य
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Fri, 11/03/2017 - 05:55

Permalink

तिखट शिरा

काही मंडळी तिखट शिरा म्हणताना हि ऐकलीत.
  • Log in or register to post comments

Submitted by sayali on Fri, 11/03/2017 - 15:40

Permalink

उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा

उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा असो वा कालिदासांचा. आम्हाला मात्र खायच्या उपम्यातच रस. त्याला मात्रा कशाचीही उपमा देऊ नका. सांजा हा पिवळ्या रंगाचा असतो. आधी फोडणी करून त्यात रवा भाजतात आणि मग पाणी घालून शिजवतात. खरा उपमा आधी रवा भाजून वेगळा ठेवतात. नंतर फोडणी करून त्यात कांदा फुलकोबी मटार छान शिजवून नंतर पाणी घालून उकळतात आणि थोडा थोडा रवा घालून ढवळतात. त्याने पांढरा उपमा अगदी वैशाली सारखाच होतो बरं का.......
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Fri, 11/03/2017 - 19:54

In reply to उपमा तो उपमाच. मग प्रेमाचा by sayali

Permalink

अभिनंदन !

अभिनंदन ! सगळे मिपाकर रवा वेगळा भाजतात तो तांबूस होतो, पण सायलीतै जेव्हा रवा भाजतात, त्यानं उपमा पांढराच होतो ! शिकरेट सांगा की तै !
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 11/03/2017 - 20:50

In reply to अभिनंदन ! by चौथा कोनाडा

Permalink

रवा भाजताना खालच्या शेगाडीचा

रवा भाजताना खालच्या शेगाडीचा गॅस पेटवू नये...
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Sat, 11/04/2017 - 03:52

In reply to रवा भाजताना खालच्या शेगाडीचा by पगला गजोधर

Permalink

हाहाहा

. रेसिपीबद्दल आदर आहे. पण प्रतिसाद मस्तच.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 11/25/2017 - 19:45

In reply to अभिनंदन ! by चौथा कोनाडा

Permalink

शिकरेट मैत नै पण माझ्या घरी,

शिकरेट मैत नै पण माझ्या घरी, माझ्या लहानपणापासन उपमा पण पांढरा व मोकळा होतो, मी केला तरीही ;)-पण हल्ली खूप क्वचीत करतो. घरची पारंपारीक पद्धत गॅसच्या एका बर्नरवर आधी आधणाचे पाणी उकळी येण्यास ठेवत; त्याच वेळी दुसर्‍या बर्नरवर, रवा आधी तुपात (डालडा असण्याच्या काळात चक्क डालड्यात) स्वतंत्र पणे कढईत भाजत, (फारही कमी वेळ भाजल्याचे आठवत नाही पण तुपात भाजल्यामुळे लाल कमी होत असेल आणि मोकळाही होत असेल का ?-मोक्ळा होण्यासाठी रव्याजाडसर की बारीक याचा संबंध असावा पण तो नेमका माहित नाही) पुढच्या स्टेपला जीरा, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची , -पण हळद नाही-बाकीची सामुग्री उपलब्धता आणि आवडी प्रमाणे ज्यात टमाटे, हिरवे वाटाण्यांचा समावेश होऊ शकेल, उपमा झाल्या नंतर पेरण्यास कोथींबीर सर्व करताना सोबत लिंबाची फोड , दही, किंवा रायता-कोशींबीर. फोडणीत आधणचे पाणी अधी टाकायचे की रवा ? नेमके आठवत नाही पुन्हा ट्रायल करून पहावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 11/25/2017 - 20:21

In reply to शिकरेट मैत नै पण माझ्या घरी, by माहितगार

Permalink

वनस्पती तूप / तूप आणि

वनस्पती तूप / तूप आणि तेलाच्या रंगानेही फरक पडत असण्याची शक्यता असू शकतात त्या प्रयोग करून पहाव्या लागतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 11/09/2017 - 17:25

Permalink

काय जाहले पुढे, पांढर्‍या

काय जाहले पुढे, पांढर्‍या उपम्याचे ? नाहीय कुणी इथं मिपावर शेफ ?
  • Log in or register to post comments

Submitted by babu b on Wed, 11/22/2017 - 08:20

Permalink

....

हॉटेलवाले रवा भाजत नाहीत. मलाही हॉटेल पद्धत आवडते.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com